Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:05 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:09 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मध्ये प्रॉपर्टीस विंडो विषयी आहे.
00:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:29 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:35 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Render panel म्हणजे काय?
00:39 प्रॉपर्टीस विंडो च्या रेंडर पॅनल मधील विविध सेट्टिंग्स काय आहेत.
00:45 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांविषयी माहिती आहे.
00:50 जर नसेल तर कृपया आमचे मागील ट्यूटोरियल - Basic Description of the Blender Interface पहा.
00:58 प्रॉपर्टीस विंडो मध्ये विविध पॅनल्स समाविष्ट आहे. हे आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01:08 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर आइकॉन्स ची रांग आहे.
01:14 हे आइकॉन्स विविध पॅनल्स दर्शवितात जे, प्रॉपर्टीस सेक्शन च्या खाली येते.
01:21 Render, Scene, World, Object, इत्यादी.
01:30 हे पॅनल्स विविध सेट्टिंग्स समाविष्ट करतात जे, ब्लेंडर मध्ये काम करताना अतिशय उपयुक्त ठरतात.
01:37 अधिक चांगले पहाणे आणि समजण्या करिता आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा.
01:43 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करा, पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:52 आता आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय अधिक स्पष्ट पणे पाहु शकतो.
01:59 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
02:12 Render हे प्रॉपर्टीस विंडो मध्ये पहिले पॅनल आहे.
02:16 डिफॉल्ट द्वारे जेव्हा हि आपण ब्लेंडर उघडू हे ब्लेंडर इंटरफेस वर प्रदर्शित होईल.
02:23 एनीमेशन चे अंतिम आउटपुट तयार करण्यासाठी या पॅनल मधील सेट्टिंग्स चा उपयोग केला जातो.
02:31 Image चा उपयोग सक्रिय कॅमरा व्यू चे एकेरी फ्रेम इमेज रेंडर करण्यासाठी केला जातो.
02:39 image वर लेफ्ट क्‍लिक करा. कीबोर्ड शॉर्टकट साठी F12 दाबा.
02:48 सक्रिय कॅमरा व्यू एकेरी फ्रेम इमेज सारखे रेंडर केले आहे.
02:55 3D view वर पुन्हा जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा.
03:03 Animation चा वापर संपूर्ण फ्रेम रेंज रेंडर करण्यासाठी किंवा इमेज क्रम साठी आणि मूवी फाइल तयार करण्यासाठी केला जातो.
03:13 डिफॉल्ट द्वारे, टाइम लाइन वरील फ्रेम रेंज 1 ते 250' आहे.
03:22 Animation वर लेफ्ट क्लिक करा. संपूर्ण फ्रेम रेंज फ्रेम 1 ते फ्रेम 250 पर्यंत रेंडर होत आहे.
03:39 रेंडर प्रोग्रेस थांबविण्यासाठी Esc दाबा.
03:43 3D view वर पुन्हा जाण्यासाठी ESC दाबा.
03:48 रेंडर पॅनल मध्ये Display वर जा.
03:52 Display - आपल्यास स्क्रीन वरील रेंडर प्रोग्रेस कसा पाहायचा, हे निवडण्यास मदत करते.
03:58 डिफॉल्ट द्वारे, डिसप्ले Image Editor mode मध्ये आहे. मी प्रात्यक्षित करून दाखविते.
04:05 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
04:09 रेंडर डिस्प्ले UV/Image Editor च्या रूपात दर्शित होते.
04:15 प्रत्येक वेळी सक्रिय कॅमरा व्यू रेंडर केल्यास, 3D व्यू UV/Image Editor मध्ये बदलते.
04:22 UV/Image Editor, बद्दल शिकण्यासाठी Types of windows - UV/Image Editor हे ट्यूटोरियल पहा.
04:31 3D view वर पुन्हा जाण्यासाठी ESC दाबा.
04:36 Render पॅनल मध्ये Display वर जा . image editor वर लेफ्ट क्लिक करा.
04:44 हे ड्रॉप-डाउन मेन्यू रेंडर डिसप्ले पर्यायाची सूची दर्शविते.
04:51 Full Screen निवडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
04:55 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यास F12 दाबा.
05:01 आता संपूर्ण ब्लेंडर स्क्रीन UV/Image editor मध्ये बदलते.
05:09 Full Screen रेंडर मोड च्या बाहेर येण्यास ESC दाबा आणि ब्लेंडर कार्यक्षेत्रा वर पुन्हा जा .
05:16 Render पॅनल मध्ये Display वर जा. Full screen लेफ्ट क्लिक करा आणि सूची मधून New window निवडा.
05:28 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यास साठी F12 दाबा.
05:31 आता रेंडर डिसप्ले ब्लेंडर कार्यक्षेत्रावर नवीन विंडो च्या रूपात दर्शित होते.
05:39 तुमच्या एनिमेशन चे प्रिव्यू रेंडर करताना, हे अतिशय उपयुक्त ठरते.
05:44 हे कसे करायचे हे आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
05:50 रेंडर डिसप्ले विंडो बंद करा.
05:55 Render पॅनल मध्ये Display वर जा. New Window वर लेफ्ट क्लिक करा.
06:01 Image editor mode निवडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. डिसप्ले Image Editor mode मध्ये आहे.
06:08 पुढील Dimensions सेट्टिंग्स पाहु. येथे आपण आपल्या आवश्यक आउटपुट नुसार विविध रेंडर प्रिसेट्स कस्टमाइज़ करू शकतो.
06:20 Render Presets वर लेफ्ट क्लिक करा. ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल.
06:27 येथे सर्व मुख्य रेंडर प्रिसेट्स ची सूची आहे. DVCPRO, HDTV, NTSC, PAL इत्यादी.
06:41 सध्या आपण हे बाजूला ठेवू आणि Render Dimension सेट्टिंग्स कडे वळू.
06:49 Resolution रेंडर डिसप्ले आणि सक्रिय कॅमरा व्यू ची रुंदी आणि उंची आहे.
06:56 डिफॉल्ट द्वारे, ब्लेंडर 2.59 मध्ये रेज़ल्यूशन 1920 by 1080 pixels आहे.
07:09 रेंडर रेज़ल्यूशन च्या टक्क्या चे प्रमाण 50% आहे.
07:14 याचा अर्थ फक्त 50% प्रत्यक्ष रेज़ल्यूशन रेंडर केले जाईल. मी समजावून सांगते.
07:22 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा. हे डिफॉल्ट रेंडर रेज़ल्यूशन आहे
07:29 हे फक्त अर्धे किंवा 50% प्रत्यक्ष रेज़ल्यूशन आहे.
07:35 रेंडर डिसप्ले विंडो बंद करा.
07:40 Rendeपॅनल मध्ये Resolution च्या खाली 50% वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून उजव्या बाजूला ड्रॅग करा.
07:50 टक्केवारी 100% मध्ये बदलते, टक्केवारी बदली करण्याची दुसरी पद्धत म्हणजे,
08:00 100%. वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter दाबा.
08:12 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
08:18 येथे 1920 by 1080 pixels चे पूर्ण रेज़ल्यूशन 100% रेंडर आहे.
08:27 रेंडर डिसप्ले विंडोस बंद करा. आता मला रेज़ल्यूशन 720 by 576 pixels मध्ये बदलायचे आहे.
08:38 1920 वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 720 टाइप करा आणि enter दाबा.
08:49 पुन्हा, 1080 वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 576 टाइप करा आणि enter दाबा.
09:00 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
09:07 येथे संपूर्ण 100% रेज़ल्यूशन 720 by 576 pixels मध्ये रेंडर झाले आहे.
09:16 रेंडर डिसप्ले विंडो बंद करा.
09:21 Render पॅनल मध्ये Dimensions च्या खाली Frame range वर जा.
09:26 Frame Range तुमच्या मूवी साठी रेंडेरेबल एनिमेशन ची लांबी निर्धारित करते.
09:33 अगोदर सांगीतल्या प्रमाणे डिफॉल्ट द्वारे फ्रेम रेंज 1 ते 250' आहे.
09:39 Start 1 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter दाबा.
09:51 हि आपल्या एनिमेशन लांबी ची सुरवातीची फ्रेम किंवा पहिली फ्रेम आहे.
09:57 End 250 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter दाबा.
10:08 हि आपल्या एनिमेशन लांबी ची अंतिम किंवा शेवटची फ्रेम आहे.
10:16 आता आपल्याकडे एनिमेशन साठी नवीन फ्रेम रेंज आहे.
10:22 3D व्यू च्या खाली Timeline वर जा.
10:26 लक्ष द्या, आता टाइम लाइन डिसप्ले बदलला आहे, कारण आपण रेंडर पॅनल मध्ये फ्रेम रेंज बदलली आहे .
10:35 टाइम लाइन विंडो विषयी शिकण्यासाठी, Types of Windows – Timeline हे ट्यूटोरियल पहा.
10:45 Render पॅनल मध्ये Dimensions च्या खाली Aspect Ratio वर जा.
10:53 लक्ष द्या जेव्हा आपण रेज़ल्यूशन बदलतो तेव्हा aspect ratio सुद्धा बदलतो.
11:01 Frame rate आपल्या मूवी मधील एक सेकेंड मध्ये एनिमेटिंग केलेले फ्रेम क्रमांक निर्धारित करते.
11:09 डिफॉल्ट द्वारे हे 24 fps किंवा फ्रेम्स प्रति सेकेंड आहे.
11:16 24 fps. वर लेफ्ट क्लिक करा. ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल.
11:25 येथे सर्व मुख्य frame rates ची सूची आहे, जी एनिमेशन मूवी तयार करताना वापरली आहे.
11:31 तुम्ही तुमच्या आवश्यकते नुसार कोणतेही एक निवडू शकता.
11:37 FPS 24 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 15 टाइप करा आणि enter दाबा.
11:48 आता आपली फ्रेम रेट 15 frames per second मध्ये बदलली आहे.
11:55 पुढचे Output आहे. तुम्हाला डाव्या बाजुवर tmp लिहिलेला आडवा बार आणि उजव्या बाजुवर file browser आइकान दिसत आहे का?
12:07 येथे आपण आपल्या रेंडर फाइल साठी आउट पुट फोल्डर विनिर्दिष्ट करू शकतो.
12:13 file browser आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
12:18 फाइल ब्राउज़र विषयी शिकण्यासाठी Types of Windows - File Browser and Info Panel हे ट्यूटोरियल पहा .
12:28 तुमचे आउट पुट फोल्डर निवडा. मी My Documents निवडत आहे.
12:35 Create new directory वर लेफ्ट-क्लिक करा. OUTPUT टाइप करा आणि enter दाबा.
12:46 फोल्डर उघडण्यासाठी Output वर लेफ्ट क्लिक करा.
12:51 Accept वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या सर्व रेंडर फाइल्स आउटपुट फोल्डर My Documents.मध्ये सेव होतील.
13:03 आउटपुट फोल्डर बार च्या खाली Image format मेन्यू आहे.
13:08 येथे आपण रेंडर इमेजस आणि मूवी फाइल्स साठी आपण आपले आउटपुट फॉरमेट निवडू शकतो.
13:13 PNG वर लेफ्ट क्लिक करा. येथे ब्लेंडर मध्ये आधारित सर्व फॉरमॅट्स ची सूची आहे.
13:20 आपल्याकडे image formats आणि movie formats आहे.
13:25 आपण आपल्या आवश्यकते नुसार कोणतेही एक निवडू शकतो.
13:30 PNG च्या खाली तीन कलर मोड आहेत जे, ब्लेंडर मध्ये वापरलेले आहेत. BW हे ग्रेस्केल मोड आहे.
13:38 RGB डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे. RGB हे कलर मोड आहे, जे रेंडर फाइल, RGB डेटा सह सेव करते.
13:48 RGBA अतिरिक्त डेटा सह रेंडर फाइल सेव करते ज्याला, Alpha channel म्हणतात.
13:54 हे फक्त काही इमेज फॉरमॅट्स सह कार्य करते Alpha channel रेंडरिंग च्या आधारित असते.
14:01 render panel तर हे रेंडर पॅनल विषयी होते.
14:05 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रॉपर्टीस विंडो खालील रेंडर पॅनल बद्दल शिकलो.
14:11 उरलेले पॅनल्स आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
14:17 आता पुढे जा आणि नवीन ब्लेंडर फाइल तयार करा . रेंडर डिसप्ले ला न्यू विंडो मध्ये बदला.
14:25 रेज़ल्यूशन ला 720 by 576 100% मध्ये बदला. फ्रेम रेंज ला 0 ते 100 बदला.
14:38 फ्रेम रेट 15 fps बदला. रेंडर फाइल साठी आउटपुट फोल्डर तयार करा.
14:47 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
14:57 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
15:17 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
15:19 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15:23 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
15:28 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
15:34 आमच्या सह जुडण्यासाठी,
15:36 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana