BOSS-Linux/C2/Working-with-Regular-Files/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Working with regular files

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Time Narration
00:00 लिनक्सच्या working with regular files वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 फाईल्स आणि डिरेक्टरीजचे एकत्रित रूप म्हणजे लिनक्सची फाईल सिस्टीम.
00:13 आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये डिरेक्टरीज कशा हाताळायच्या हे जाणून घेतले होते. याच वेबसाईटवर त्यासंबंधीचे ट्युटोरियल तुम्हाला बघता येईल.
00:25 या ट्युटोरियलमध्ये आपण regular files कशा हाताळायच्या ते बघणार आहोत.
00:32 आधीच्या ट्युटोरियलमध्ये आपण पाहिले की cat कमांडच्या सहाय्याने फाईल कशी बनवायची . अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील ट्युटोरियल बघा.
00:46 आता आपण एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फाईल कॉपी कशी करायची ते पाहू. त्यासाठी आपल्याकडे cp कमांड आहे.
00:56 ही कमांड कसे कार्य करते ते पाहू.
01:00 एक फाईल कॉपी करण्यासाठी टाईप करा.cp space एक किंवा अधिक पर्याय... space SOURCE file चे नाव space destination file चे नाव
01:15 अनेक फाईल्स एकाच वेळी कॉपी करण्यासाठी टाईप करा. cp space एक किंवा अधिक पर्याय ... आपल्या कॉपी करायच्या SOURCE files ची नावे आणि जिथे आपल्याला फाईल्स कॉपी करायच्या आहेत ती destination DIRECTORY
01:34 आता आपण काही उदाहरणे बघू. त्यासाठी टर्मिनल उघडा.
01:42 आपल्याजवळ होम या डिरेक्टरीत test1 नामक फाईल आहे.
01:49 test1 मधील मजकूर वाचण्यासाठी टर्मिनलवर cat test1टाईप करून एंटर दाबा.
02:00 आपण test1 मधील मजकूर बघू शकतो. आता जर आपल्याला हे test2 नामक फाईलमध्ये कॉपी करायचे असल्यास cp test1 test2 टाईप करून एंटर दाबा.
02:22 आता आपली फाईल कॉपी झाली आहे.
02:25 जर test2 उपलब्ध नसेल तर प्रथम ती बनेल आणि नंतर त्यात test1 मधील मजकूर कॉपी होईल.
02:35 जर ती उपलब्ध असेल तर मजकूर त्यावर लिहिला जाईल. कॉपी केलेली फाईल वाचण्यासाठी cat test2 टाईप करून एंटर दाबा.
02:52 तसेच आपण एका डिरेक्टरीमधील फाईल दुस-या डिरेक्टरीत कॉपी करू शकतो उदाहरणार्थ cp /home/anirban/arc/demo1 /home/anirban/demo2 टाईप करून एंटर दाबा.
03:32 ही कमांड demo1 ही फाईल /home/anirban/arc/ या डिरेक्टरीतून /home/anirbanया डिरेक्टरीमधील demo2 मध्ये कॉपी करेल.
03:51 demo2 ही फाईल बघण्यासाठी ls space /home/anirban टाईप करून एंटर दाबा.
04:07 येथे आपण Demo 2 फाईल बघू शकतो.
04:12 पुढे जाण्यापूर्वी आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ.
04:17 जर आपल्याला डेस्टिनेशन डिरेक्टरीमध्ये जर मूळ नावानेच कॉपी करायची असल्यास आपल्याला डेस्टीनेशन फाईलचे नाव देणेही गरजेचे नसते. उदाहरणार्थ
04:27 cp /home/anirban/arc/demo1 /home/anirban/ टाईप करून एंटर दाबा.
04:55 ही कमांड /home/anirban/arc/ या डिरेक्टरीतून demo1 ही फाईल /home/anirban या डिरेक्टरीत demo1 ह्याच नावाने कॉपी होईल.
05:11 पूर्वीप्रमाणेच demo1 फाईल बघण्यासाठी ls /home/anirban टाईप करून एंटर दाबा.
05:25 आपल्याला demo1 ही फाईल दिसेल.
05:30 पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा स्क्रीन क्लियर करू या.
05:37 अनेक फाईल्स कॉपी करायच्या असल्यासही डेस्टिनेशन फाईल नेम द्यावे लागत नाही.
05:44 समजा आपल्या होम डिरेक्टरीमध्ये test1 test2 test3 या तीन फाईल्स आहेत.
05:53 आता cp test1 test2 test3 /home/anirban/testdir टाईप करून एंटर दाबा.
06:16 test1 test2 test3 या तीनही फाईल्स त्यांची नावे न बदलता /home/anirban/testdir या डिरेक्टरीत कॉपी होतील.
06:30 तुम्हाला फाईल खरोखरच कॉपी झाल्या आहेत का ते बघण्यासाठी ls /home/anirban/testdir टाईप करून एंटर दाबा.
06:52 आपण बघू शकतो की test1 test2 test3 या फाईल्स डिरेक्टरीत उपस्थित आहेत.
06:58 cp कमांड सोबत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे आपण त्यापैकी केवळ काही अति महत्त्वाचे पर्याय बघणार आहोत.
07:07 प्रथम आपण स्लाईडसवर परत जाऊ या.
07:12 त्यापैकी -R हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. यामुळे संपूर्ण डिरेक्टरी स्ट्रक्चर recursively कॉपी होते.
07:23 आता आपण एक उदाहरण बघू या.
07:27 testdir या डिरेक्टरीतील सर्व घटक test या डिरेक्टरीत कॉपी करण्याचा प्रयत्न करू.
07:36 त्यासाठी cp testdir/ test टाईप करून एंटर दाबा.
07:51 आपल्याला एक एरर संदेश दर्शवला जाईल.
07:54 त्यानुसार आपण cp कमांडच्या सहाय्याने काही घटक असलेली डिरेक्टरी अशा पध्दतीने कॉपी करू शकत नाही.
08:02 पण -R या पर्यायाच्या सहाय्याने आपण हे करू शकतो.
08:07 आता cp -R testdir/ test टाईप करून एंटर दाबा.
08:25 आता फाईल ज्या test डिरेक्टरीमध्ये कॉपी झाल्या ती डिरेक्टरी खरोखरच उपस्थित आहे ना हे बघण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
08:37 test डिरेक्टरी तिथे उपस्थित असल्याचे तुम्ही बघू शकता. आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ या.
08:45 test डिरेक्टरीतील घटक बघण्यासाठी ls test टाईप करून एंटर दाबा.
08:57 तुम्ही test या डिरेक्टरीतील सर्व घटक बघू शकता.
09:01 आता स्लाईडस वर परत जाऊ या.
09:05 जर एक फाईल दुस-या उपस्थित फाईलवर कॉपी केली तर ती फाईल ओव्हरराईट होते. म्हणजेच आधीची फाईल नष्ट होते.
09:14 आता जर अनवधानाने एखादी महत्त्वाची फाईल आपल्याकडून ओव्हरराईट झाली तर?
09:19 असा प्रकार टाळण्यासाठी आपल्याकडे -b हा पर्याय आहे.
09:25 यामुळे प्रत्येक उपस्थित डेस्टिनेशन फाईलचा बॅकअप घेतला जातो.
09:32 आपण -i म्हणजेच interactive या पर्यायाचा उपयोग करू शकतो, जो कुठलीही डेस्टिनेशन फाईल ओव्हरराईट करण्यापूर्वी आपल्याला त्याबद्दवची सूचना देईल.
09:43 आता आपण mv कमांड कसे कार्य करते ते पाहू.
09:47 याचा उपयोग फाईल स्थलांतरित करण्यासाठी होतो.
09:53 याचे दोन मोठे उपयोग आहेत.
09:57 ज्याचा पहिला उपयोग फाईल किंवा डिरेक्टरीचे नाव बदलण्यासाठी होतो.
10:00 तसेच अनेक फाईल्स डिरेक्टरीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी होतो.
10:05 mv कमांड cp कमांड सारखीच आहे जी आपण पूर्वी पाहिली आहे. मग आपण mv कशी कार्यन्वित होते ते पाहू.
10:17 टर्मिनल उघडा आणि mv test1 test2 टाईप करून एंटर दाबा.
10:32 ही कमांड होम डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या test1 या फाईलचे नाव बदलून test2 करेल.
10:40 जर test2 आधीच उपलब्ध असेल तर ती फाईल ओव्हरराईट होईल.
10:49 जर आपल्याला फाईल ओव्हरराईट होण्यापूर्वी त्याबाबतची वॉर्निंग हवी असेल,
10:54 तर आपण mv कमांडसोबत -i पर्याय वापरू शकतो.
10:59 समजा आपल्याकडे anirban नावाची अजून एक फाईल आहे त्याचेही नाव बदलून आपल्याला test2 करायचे आहे.
11:08 त्यासाठी mv -i anirban test2 टाईप करून एंटर दाबा.
11:21 आपल्याला सूचना म्हणून test2 ही फाईल ओव्हरराईट करायची आहे की नाही असा प्रश्न विचारला जाईल.
11:30 जर आपण y हे बटण दाबले तर फाईल ओव्हरराईट होईल.
11:37 mv कमांडचा वापर अनेक फाईल्स साठी करताना कमांडमधील डेस्टिनेशन, डिरेक्टरीचे नाव असावे लागते.
11:47 पुढे जाण्यापूर्वी आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ.
11:52 समजा आपल्या होम डिरेक्टरीमध्ये abc.txt, pop.txt आणि push.txt या फाईल्स आहेत.
12:03 त्या बघण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
12:09 येथे, pop.txt , push.txt आणि abc.txt या तीनही फाईल्स आहेत. आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ.
12:24 आता आपल्याला या तीनही फाईल्स testdir या डिरेक्टरी मध्ये स्थलांतरित करायच्या आहेत.
12:32 त्यासाठी mv abc.txt pop.txt push.txt आणि नंतर डेस्टिनेशन फोल्डरचे नाव म्हणजेच येथे testdir टाईप करून एंटर दाबा.
12:58 हे बघण्यासाठी ls testdir टाईप करून एंटर दाबा.
13:06 आपल्याला abc, pop and push या .txt extension च्या फाईल्स दिसतील.
13:14 आता आपण mv सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघू या. त्यासाठी प्रथम स्लाईडस वर जाऊ या.
13:22 mv कमांडने फाईल ओव्हरराईट होण्यापूर्वी प्रत्येक डेस्टिनेशन फाईलचा बॅकअप घेण्यासाठी -b पर्याय वापरतात.
13:34 आपण पूर्वीच पाहिले आहे की -i हा पर्याय कुठलीही फाईल ओव्हरराईट होण्यापूर्वी आपली परवानगी विचारतो.
13:44 पुढे आपण rm ही कमांड बघणार आहोत. या कमांडचा उपयोग फाईल डिलिट करण्यासाठी होतो.
13:52 टर्मिनलवर परत जा. आणि ls testdir टाईप करा.
14:00 आपल्याला दिसेल की faq.txt ही फाईल उपलब्ध आहे. समजा आपल्याला ही फाईल डिलिट करायची आहे.
14:09 त्यासाठी rm testdir/faq.txt टाईप करून एंटर दाबा.
14:23 ही कमांड testdir या डिरेक्टरीतून faq.txt ही फाईल काढून टाकेल.
14:32 फाईल खरोखरच डिलिट झाली की नाही हे बघण्यासाठी पुन्हा ls testdir टाईप करून एंटर दाबा.
14:47 आपल्याला दिसेल की faq.txt फाईल उपलब्ध नाही.
14:51 rm ही कमांड अनेक फाईल्स एकाच वेळी डिलिट करण्यासाठीही वापरता येते.
14:57 testdir ह्या डिरेक्टरीमध्ये abc2 आणि abc1 या दोन फाईल्स आहेत.
15:03 समजा आपल्याला abc1 आणि abc2 या फाईल्स डिलिट करायच्या आहेत.
15:09 त्यासाठी rm testdir/abc1 testdir/abc2 टाईप करून एंटर दाबा.
15:31 testdir या डिरेक्टरीतून abc1 आणि abc2 या फाईल्स डिलिट होतील.
15:39 त्या डिलिट झाल्या आहेत की नाही हे बघण्यासाठी पुन्हा ls testdir ही कमांड टाईप करा. आपल्याला abc1 आणि abc2 या फाईल्स दिसणार नाहीत.
15:53 पुढे जाण्यापूर्वी आपला स्क्रीन क्लियर करू या.
15:58 आता आपण स्लाईडसवर परत जाऊ या.
16:02 आपण आता काय शिकलो ते थोडक्यात पाहू या.
16:04 एक फाईल डिलिट करण्यासाठी आपण rm पुढे त्या फाईलचे नाव लिहितो.
16:11 अनेक फाईल्स डिलिट करण्यासाठी आपण rm पुढे त्या सर्व फाईल्सची नावे लिहितो, ज्या आपल्याला डिलिट करायच्या आहेत.
16:19 आता rm सोबत वापरल्या जाणा-या काही पर्यायांवर आपण एक नजर टाकू.
16:24 काही वेळेस आपल्याला फाईलमध्ये लिहिण्याची परवानगी नसल्याने rm कमांडच्या सहाय्याने ती फाईल आपल्याला डिलिट करता येत नाही. अशा वेळी आपण -f या पर्यायाच्या सहाय्याने फाईल जबरदस्ती डिलिट करू शकतो.
16:41 दुसरा कॉमन पर्याय म्हणजे -r आहे. बघू या हा पर्याय कोठे उपयोगी पडतो.
16:52 आता पुन्हा टर्मिनलवर जाऊ.
16:57 साधारणपणे rm कमांडचा उपयोग डिरेक्टरी डिलिट करण्यासाठी केला जात नाही. त्यासाठी rmdir ही कमांड आहे.
17:05 परंतु rmdir ही कमांड साधारणपणे फक्त रिकामी डिरेक्टरी डिलिट करते .
17:12 पण जेव्हा एखाद्या डिरेक्टरी मध्ये अनेक फाईल्स आणि डिरेक्टरीज असतात तेव्हा काय करायचे?
17:19 अशा वेळी आपण rm कमांडचा उपयोग करू शकतो.
17:23 rm कमांडपुढे आपल्याला जी डिरेक्टरी डिलिट करायची आहे तिचे नाव टाईप करून एंटर दाबा.
17:31 आपण rm कमांडच्या सहाय्याने testdir ही डिरेक्टरी डिलिट करू शकत नाही अशा अर्थाचा संदेश आपल्याला दिसेल.
17:39 परंतु जर आपण -r आणि -f हे पर्याय एकत्रितपणे वापरले तर आपण हे करू शकतो.
17:47 टर्मिनलवर rm -rf testdir टाईप करून एंटर दाबा.
18:00 आता testdir ही डिरेक्टरी यशस्वीरित्या डिलिट झाली आहे.
18:06 पुढील कमांड जाणून घेण्यासाठी पुन्हा स्लाईडस वर जाऊ या.
18:11 आता आपणcmp कमांड बघू .
18:13 कधीकधी दोन फाईल्स समान आहेत का ते तपासावे लागते. असल्यास एक डिलिट करू शकतो.
18:22 आधीच्या फाईलमध्ये काही बदल झाले आहेत का ते आपल्याला बघायचे असते.
18:28 यासारख्या उद्देशांसाठी cmp कमांड वापरतात.
18:33 ही कमांड दोन फाईल्सची तुलना byte by byteपध्दतीने करते.
18:38 file1 आणि file2 मध्ये तुलना करण्यासाठी cmp file1 file2 टाईप करा.
18:47 जर दोन्ही फाईल्समधील मजकूर समान असेल तर कुठलाही संदेश दर्शवला जाणार नाही.
18:55 केवळ prompt दर्शवला जाईल.
18:58 जर त्या मजकूरात काही फरक असेल तर पहिल्या फरकाचे लोकेशन टर्मिनलवर लिहिले जाईल.
19:10 cmp कसे काम करते ते पाहू. आपल्या दोन डिरेक्टरी मध्ये sample1 आणि sample2 नामक दोन फाईल्स आहेत.
19:19 त्या काय आहेत ते बघू या.
19:22 cat sampe1 टाईप करून एंटर दाबा. त्यामध्ये “This is a Linux file to test the cmp command” हा मजकूर आहे.
19:34 sample2 या दुस-या फाईलमधील मजकूर बघण्यासाठी cat sample2 टाईप करून एंटर दाबा.
19:44 यामध्ये “This is a Unix file to test the cmp command.” हा मजकूर आहे.
19:50 आता आपण ही cmp कमांड या दोन्ही फाईलसाठी वापरून बघू.
19:55 cmp sample1 sample2 टाईप करून एंटर दाबा.
20:08 sample1 आणि sample2 या दोन्ही फाईल्समधील निर्देशित केलेला पहिला फरक बघू शकतो.
20:16 पुढील कमांड बघण्यासाठी आपण स्क्रीन क्लियर करू या.
20:22 पुढे आपण wc कमांड बघू या.
20:26 या कमांडचा उपयोग अक्षरे, शब्द आणि ओळींची संख्या मोजण्यासाठी होतो.
20:34 आपल्या होम डिरेक्टरीमध्ये sample3 नामक फाईल आहे.
20:39 त्यातील मजकूर वाचण्यासाठी cat sample3 टाईप करून एंटर दाबा.
20:50 हा sample3 मधील मजकूर आहे.
20:54 आता wc कमांड या फाईलवर वापरून बघू.
20:59 त्यासाठी wc sample3 टाईप करून एंटर दाबा.
21:10 ही कमांड फाईलमध्ये सहा ओळी, सदुसष्ट शब्द आणि ३८५ अक्षरे असल्याचे दर्शवते.
21:22 या काही कमांडस आहेत, ज्या आपल्याला फाईल्स सोबत काम करण्यासाठी मदत करतात.
21:27 अशा अनेक कमांडस आहेत. तसेच प्रत्येक कमांडसोबत अनेक पर्यायही आहेत.
21:36 याबद्दल अधिक माहिती तुम्हाला man कमांडचा वापर करून मिळेल.
21:44 अशा प्रकारे आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
21:48 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
22:02 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
22:18 *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana