BOSS-Linux/C2/The-Linux-Environment/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: The Linux Environment
Author: Manali Ranade
Keywords: Linux Title of script: The Linux Environment
Author: Manali Ranade
Keywords: Linux
Time | Narration |
00:01 | Linux Environment आणि ते कुशलतेने हाताळण्याचे मार्ग यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या पाठासाठी लिनक्स सिस्टीम वापरावी. |
00:12 | तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सुरू करणे तसेच कमांडस्, फाईल सिस्टीम आणि shell या बद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या. |
00:20 | जर तुम्हाला या संकल्पनांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ती स्पोकन ट्युटोरियलच्या संकेतस्थळावर इतर पाठांमध्ये उपलब्ध आहे. |
00:30 | तसेच लक्षात टेवा की लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे. जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत वापरलेल्या सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील. |
00:40 | सिस्टीमने युजर कमांडस् चा लावलेला अर्थ व दिलेला प्रतिसाद Linux Environment वर अवलंबून असतो. |
00:48 | सोपेपणासाठी Shellसेटींगमध्ये बदल करतात. |
00:51 | कसे ते पाहू. |
00:54 | Shell कशा प्रकारे काम करेल हे shell Variables ठरवतात. |
00:58 | Shell Variables चे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. Environment Variables आणि Local Variables. |
01:06 | Environment Variables नावाप्रमाणेच युजरच्या एकूण Environment मध्ये उपलब्ध असतात. |
01:12 | शेलने निर्माण केलेल्या subshell मध्येही हे Variable उपलब्ध असतात. |
01:18 | नावाप्रमाणेच Local Variables ची उपलब्धता मर्यादित असते. |
01:24 | हे shell द्वारे बनवलेल्या subshell मध्ये उपलब्ध नसतात. |
01:28 | या ट्युटोरियलमध्ये आपण मुख्यत्वे Environment Variables बद्दल चर्चा करणार आहोत. आता प्रथम आपण shell variables च्या व्हॅल्यू कशा घालायच्या ते पाहू या. |
01:41 | Shell मधीलVariables बघण्यासाठी set ही कमांड देऊ या. |
01:46 | टर्मिनलवर टाईप करा. set space vertical-bar more आणि एंटर दाबा. |
01:53 | आपण चालू Shell मधील सर्वVariables बघू शकतो. |
01:58 | उदाहरणार्थ HOME हे Environment Variable आणि त्याला दिलेली व्हॅल्यू बघा. |
02:07 | पुढील सूची बघण्यासाठी एंटर दाबा. आणि सूचीतून बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा. |
02:14 | set या कमांडचा मोठा आऊटपुट स्क्रीनवर पाठवताना एकावेळी एका स्क्रीनवर मावेल एवढाच मजकूर more या पर्यायामुळे पाठवला जातो. |
02:31 | केवळ Environment Variable बघण्यासाठी env ही कमांड कार्यान्वित करू या. |
02:38 | टर्मिनलवर टाईप करा env space vertical-bar more आणि एंटर दाबा. |
02:46 | Shellया variableकडे लक्ष द्या. याची व्हॅल्यू slash bin slash bash आहे. |
02:53 | सूचीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही q हे बटण दाबू शकता. |
03:00 | आता लिनक्समधील इतर काही महत्त्वाच्या Environment variables ची चर्चा करू या. |
03:05 | येथे आपण bash shell चा वापर करणार आहोत. |
03:09 | विविध shells युजर्सच्या सोयीनुसार बनवलेल्या असतात. |
03:12 | व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू साठवली आहे हे पाहण्यासाठी echo कमांड वापरली जाते. या कमांडच्या पुढे dollar sign व व्हेरिएबलचे नाव लिहितात. |
03:24 | आपण SHELL variable प्रथम बघणार आहोत. |
03:28 | या मध्ये चालू Shell चे नाव संचित केले जाते. |
03:31 | SHELL variable ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar SHELL कॅपिटलमध्ये असे टाईप करून एंटर दाबा. |
03:48 | सध्या आपण slash bin slash bash या शेलमध्ये कार्यरत आहोत. |
03:56 | दुसरे variable आहे HOME |
03:58 | login केल्यावर आपण ज्या डिरेक्टरीमध्ये असतो ती userच्या नावावर आधारित असते. |
04:04 | त्या डिरेक्टरीला होम डिरेक्टरी असे म्हणतात आणि HOME variable मध्ये हे उपस्थित असते. |
04:10 | व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar HOME कॅपिटलमध्ये टाईप करून एंटर दाबा. |
04:22 | PATH variable हे पुढील Environment variable आहे. |
04:26 | कमांड फाईल शोधण्यासाठी shell ज्या डिरेक्टरीज बघते त्यांची यादी PATH या व्हेरिएबल मध्ये असते. |
04:33 | आता PATH variableची व्हॅल्यू बघू या. |
04:36 | टर्मिनलवर echo space dollar PATH कॅपिटलमध्ये ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा. |
04:45 | माझ्या संगणकावर slash user slash local slash sbin slash user slash bin इत्यादी डिरेक्टरीज दाखविल्या जात आहेत. |
04:57 | प्रत्येक सिस्टीमप्रमाणे यात थोडा बदल असू शकतो. |
05:00 | colon या डिलिमिटर द्वारे डिरेक्टरीज ही सूची वेगळी केली आहे. shell त्या क्रमाने executable commandsचा शोध घेतो. |
05:11 | आपण आपली स्वतःची डिरेक्टरी या सूचीत समाविष्ट करू शकतो जेणे करून आपली डिरेक्टरी देखील shell द्वारे शोधली जाईल. |
05:18 | आपली स्वतःची डिरेक्टरी समाविष्ट करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा. |
05:22 | PATHकॅपिटलमध्ये 'equal-to' dollar PATHकॅपिटलमध्ये colon slash home slash 'the name of my own home directory' आणि एंटर दाबा. |
05:47 | आता जर आपण पुन्हा PATH variable ची व्हॅल्यू बघितली |
05:57 | तर PATH variable मध्ये आपली डिरेक्टरी समाविष्ट झालेली असेल. |
06:03 | बघा आता आपली डिरेक्टरी येथे उपस्थित आहे. |
06:09 | अजून एक उत्सुकता वाढविणारे variable म्हणजे LOGNAME. |
06:12 | हे सध्याच्या userचे नाव संचित करते. |
06:16 | या variable ची व्हॅल्यू बघण्यासाठी टाईप करा echo space dollar LOGNAMEआणि एंटर दाबा. |
06:28 | टर्मिनलमधील डॉलरच्या चिन्हाला prompt म्हणतात. येथे आपण सर्व कमांडस टाईप करतो. |
06:35 | ती primary prompt string आहे. जी Environment variable PS1 मध्ये ठेवली जाते. |
06:40 | येथे secondary prompt string देखील आहे. |
06:43 | जर कमांडला एका ओळीपेक्षा जास्त जागा लागत असेल तर दुस-या ओळीपासून 'Greater Than' चिन्ह prompt म्हणून दिसते. |
06:53 | ही Secondary prompt string असून ती Environment variable PS2 मध्ये ठेविली जाते. |
06:58 | Secondary command prompt ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar PS2 असे टाईप करून एंटर दाबा. |
07:13 | आपण आपली Primary prompt string बदलू शकतो. जसे की prompt म्हणून at the rate - @ हे चिन्ह. |
07:20 | हे करण्यासाठी टाईप करा PS1 equal-to '@' आणि एंटर दाबा. |
07:34 | आता prompt म्हणून dollar च्या चिन्हाऐवजी आपल्याला @ हे चिन्ह दिसेल. |
07:43 | आपण अजून एक गंमत करू शकतो. जसे की आपण prompt म्हणून user name ही दर्शवू शकतो. |
07:49 | त्यासाठी केवळ टाईप करा PS1 equal-to अवतरण चिन्हात dollar LOGNAME कॅपिटलमध्ये आणि एंटर दाबा. |
08:05 | आता माझे user name येथे prompt म्हणून दिसत आहे. |
08:09 | हे पूर्ववत करण्यासाठी केवळ टाईप करा PS1 equal-to dollar अवतरण चिन्हात आणि एंटर दाबा. |
08:21 | आपण अनेक Environment variables ना व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. |
08:25 | परंतु एक लक्षात ठेवा की हे बदल केवळ चालू सत्रासाठी मर्यादित असतात. |
08:30 | जसे आपण आत्ताच आपली डिरेक्टरी PATH variable मध्ये समाविष्ट केली होती. |
08:34 | जर आपण टर्मिनल बंद करून पुन्हा उघडले किंवा एक नवे टर्मिनल उघडून त्यात echo कमांड कार्यान्वित करून PATH variable ची व्हॅल्यू तपासली, |
08:53 | तर आपण केलेले बदल आता तेथे उपस्थित नाहीत हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. |
08:59 | आपण हे बदल कायम स्वरूपाचे कसे करता येतात हे पुढील Advanced Tutorial मध्ये बघू या. |
09:06 | अनेकदा आपण काही काळापूर्वी वापरलेल्या कमांडस आपल्याला पुन्हा पुन्हा कार्यान्वित कराव्या लागतात. मग तेव्हा काय करायचे? आपल्याला संपूर्ण कमांड पुन्हा टाईप करावी लागते का? |
09:15 | नाही. त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. |
09:19 | प्रथम जर आपण कीबोर्डवरील up arrow चे बटण दाबले तर आपल्याला टाईप केलेली शेवटची कमांड दिसेल. |
09:26 | तेच बटण दाबत राहिल्यास त्यामागील कमांड एकेक करून दिसतील. |
09:30 | तर मागील कमांड बघण्यासाठी down arrowचे बटण दाबा. |
09:36 | परंतु अनेक कमांडस मधून स्क्रॉल करत राहणे थोडे कंटाळवाणे होते त्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे history कमांड होय. |
09:45 | command prompt वर history टाईप करा. |
09:51 | आणि एंटर दाबा. आपल्याला पूर्वी कार्यान्वित झालेल्या कमांडची सूची दिसेल. |
09:57 | मोठ्या सूचीऐवजी शेवटच्या केवळ १० नोंदी बघण्यासाठी |
10:02 | history space 10 असे टाईप करून एंटर दाबा. |
10:13 | लक्षात घ्या की सूचीमध्ये पूर्वी कार्यान्वित केलेल्या प्रत्येक कमांडला एक क्रमांक दिलेला आहे. |
10:20 | एखादी कमांड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी |
10:24 | केवळ टाईप करा उद्गार चिन्ह (!) आणि त्यापुढे त्या कमांडचा क्रमांक उदाहरणार्थ 442 जे या ठिकाणी echo space dollar PATH ही कमांड कार्यान्वित करेल. |
10:44 | जर तुम्हाला शेवटची कमांड पुन्हा कार्यान्वित करायची असेल तर केवळ दोन वेळा उद्गारचिन्ह टाईप करा. आणि एंटर दाबा. |
10:56 | आपण पुढे tilde substitution बद्दल जाणून घेणार आहोत. होम डिरेक्टरीचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी tilde (~) या चिन्हाचा वापर केला जातो. |
11:05 | आता तुमच्या होम डिरेक्टरीमध्ये testtree नावाची डिरेक्टरी आहे. त्या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी cd space tilde slash testtree ही कमांड टाईप करा. |
11:18 | cd tilde minus किंवा cd minus ही कमांड current directory मधून आधी वापरलेल्या डिरेक्टरीत जाण्यासाठी उपयोगी पडते. |
11:28 | आता आपण testtree या डिरेक्टरी मध्ये आहोत आणि त्या आधी आपण होम या डिरेक्टरीमध्ये होतो. |
11:34 | आता cd space minus टाईप करून एंटर दाबा. आपण होम या डिरेक्टरीमध्ये परत जाऊ. |
11:40 | हीच कमांड पुन्हा कार्यान्वित करा. आता आपण पुन्हा testtree या डिरेक्टरी मध्ये आलो आहोत. |
11:47 | शेवटची पण थोडी महत्त्वाची alias ही कमांड आता आपण बघणार आहोत. |
11:51 | आपल्याला मोठी कमांड पून्हा पून्हा कार्यान्वित करण्याची गरज भासू शकते. |
11:57 | येथे आपण या कमांडला दुसरे एखादे छोटे नाव देऊ शकतो व कमांड कार्यान्वित करताना त्या दुस-या नावाचा उपयोग करू शकतो. |
12:03 | समजा आपल्याकडे डिरेक्टरीची मोठी हायरार्की आहे. त्यात आपण संगीत ऐकण्यासाठी सतत जात असतो. आपण त्याला अशा प्रकारे दुसरे छोटे नाव देऊ शकतो. |
12:13 | alias space cdMusic equal-to अवतरण चिन्हात cd space slash home slash 'the name of my own home directory' slash music असे टाईप करून एंटर दाबा. |
12:39 | आता प्रत्येक वेळी या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी केवळ cdMusic टाईप करून एंटर दाबा. |
12:47 | बघा आता आपण Music या डिरेक्टरीत आहोत. |
12:52 | आता prompt वर cd space minus ही कमांड टाईप करून तुम्ही मागील चालू डिरेक्टरीमध्ये जाऊ शकता. |
13:01 | हायरार्कीला दिलेले दुसरे नाव काढून टाकण्यासाठी केवळ unalias space cdMusic असे टाईप करू एंटर दाबा. |
13:13 | आता पुन्हा जर आपण cdMusic ही कमांड टर्मिनलवर कार्यान्वित केली तर आपल्याला command not found अशी error दाखवेल. |
13:22 | समजा चालू डिरेक्टरी मध्ये test1 आणि test2 या दोन फाईल्स आहेत. |
13:31 | आणि जर आपण rm आणि test1 ही कमांड कार्यान्वित केली तर test1 ही फाईल डिलिट होईल. |
13:38 | आपल्याला माहित आहे की rm या कमांडसोबत hyphen i हा पर्याय डिलिट करण्याच्या प्रक्रियेला interactive बनवतो. |
13:45 | आता आपण alias या कमांडनी alias बनवू शकतो. alias rm equal-to, अवतरण चिन्हात “rm space hyphen i” |
13:56 | आता आपण जेव्हा rm ही कमांड कार्यान्वित करू तेव्हा प्रत्यक्षात rm space hyphen i कमांड कार्यान्वित होईल. |
14:05 | अशा प्रकारे आपण पाहिले की test1 ही फाईल डिलिट झाली परंतु test2 डिलिट करण्यापूर्वी सिस्टीम आपल्याला परवानगी विचारते. |
14:13 | आपण या ट्युटोरियलमध्ये Environment variable, history आणि alias बद्दल शिकलो |
14:18 | हा पाठ येथे संपत आहे. |
14:21 | हे प्रॉजेक्ट "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT , MHRDयांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
14:29 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:32 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. |
14:36 | सहभागासाठी धन्यवाद. |