BOSS-Linux/C2/File-System/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: File System
Author: Manali ranade
Keywords: Linux
Time | Narration |
00:00 | लिनक्स फाईल सिस्टीमच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | येथे आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वापरू. |
00:08 | तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम सुरू करण्याबद्दल आणि कमांडसबद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या. |
00:16 | अधिक माहिती स्पोकन ट्युटोरियल http://spoken-tutorial.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
00:28 | लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे. |
00:32 | जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत या ट्युटोरियल मध्ये वापरल्या गेलेल्या सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील. |
00:41 | लिनक्समधील प्रत्येक गोष्ट फाईल स्वरूपात असते. |
00:44 | मग फाईल म्हणजे काय? आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाईल म्हणतात. |
00:54 | लिनक्समध्ये फाईल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते. |
01:00 | आता डिरेक्टरी म्हणजे काय? |
01:03 | डिरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाईल्स आणि सब डिरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा. |
01:10 | डिरेक्टरी आपल्याला आपल्या फाईल्सची मांडणी योग्य पध्दतीने करण्यास मदत करते. |
01:16 | विंडोज मध्ये डिरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो. |
01:20 | लिनक्समध्ये वेगवेगळे users स्वतःच्या डिरेक्टरी तयार करून त्यात फाईल ठेवू शकतात. ज्यात दुसरा userकोणताही बदल करू शकत नाही. |
01:30 | डिरेक्टरी नसत्या तर संगणकातील सर्व फाईल्सना वेगळी नावे देणे आवश्यक झाले असते जे खूप कठीण आहे. |
01:41 | फाईल्स आणि फोल्डरच्या केलेल्या व्याख्या त्यांच्या कार्याविषयी कल्पना येण्यासाठी ठीक असल्या तरी त्या संपूर्णतः अचूक नाहीत. |
01:51 | फाईलमध्ये माहितीशिवाय फाईलचे नाव, प्रॉपर्टीज व administrative information असते. त्यात फाईल बनल्याच्या किंवा बदलाच्या तारखा व user permissions असतात. |
02:05 | फाईलची विशिष्ट माहिती फाईलच्या आय-नोड मध्ये साठवण्यात येते. जो एक फाईल सिस्टीम मधील मजकुराचा भाग असतो. त्यामध्ये फाईलची लांबी आणि फाईलचा डिस्कवरील पत्ता असतो. |
02:20 | सिस्टीम, फाईलच्या आयनोडमधील नंबर्सचा वापर करते. डिरेक्टरीमधील फाईलची नावे केवळ usersच्या सोईकरता असतात. कारण मोठ्या नंबर्सपेक्षा फाईलचे नाव लक्षात ठेवणे userला सोपे जाते. |
02:35 | वरील व्याख्येप्रमाणे प्रत्यक्षात डिरेक्टरीमध्ये फाईल समाविष्ट केलेल्या नसतात. डिरेक्टरी स्वतःच एक फाईल असते ज्यामध्ये इतर फाईल्सची फक्त नावे व आयनोड नंबर्स यांचा समावेश असतो. |
02:49 | लिनक्स मध्ये तीन प्रकारच्या फाईल्स असतात. |
02:54 | १)रेग्युलर किंवा ऑर्डिनरी फाईल्स - यामध्ये अक्षरांच्या रूपात मजकूर किंवा माहिती उपलब्ध असते. |
03:01 | २)डिरेक्टरीज - ज्याबद्दल आपण मागील स्लाईड्स वर माहिती घेतली आहे. |
03:07 | ३)डिव्हाइस फाईल्स - सर्व हार्डवेअर उपकरणे आणि पेरिफेरल्स लिनक्समधे फाईल स्वरूपात दाखवली जातात. |
03:14 | लिनक्समधे सर्व उपकरणे जसे की CD, Hard Disk, USB Stick हे सर्व काही फाईलस स्वरूपात असते. पण असे का? यामुळेच साधारण फाईलप्रमाणे ही उपकरणे वाचणे आणि लिहिणे सोपे जाते. |
03:32 | कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे लिनक्समधील फाईलस् चा एकमेकांशी संबंध असतो. |
03:39 | फाईल्स व सबडिरेक्टरीज यांनी, डिरेक्टरी बनलेली असते आणि या डिरेक्टरीजचा एकमेकांशी पालक-बालक असा संबंध असतो. अशा प्रकारे लिनक्स फाईल सिस्टीमचा वृक्ष तयार होतो. |
03:52 | सगळ्यात वरती फॉरवर्ड स्लॅशने दर्शवलेली root असते. त्यामध्ये इतर सर्व फाईल्स आणि डिरेक्टरी असतात. |
04:04 | जर आपल्याला योग्य path माहित असेल तर आपल्याला एका फाईल किंवा डिरेक्टरीमधून दुसरीकडे जाण्यास मदत होते. |
04:12 | लिनक्समध्ये फाईल सिस्टीमस्वरूपी वृक्षाच्या फांद्या असतात. |
04:18 | एक कमांड देऊन तुम्ही एका फांदीवरून दुसरीवर जाऊ शकता. |
04:24 | आहे की नाही मजेशीर? कसे ते पाहू! |
04:29 | जेव्हा आपण लिनक्स सिस्टीम मध्ये login करतो तेव्हा आपणdefault रूपात home या डिरेक्टरी मध्ये असतो. |
04:36 | आता टर्मिनलवर जाऊ या. |
04:39 | होम डिरेक्टरी बघण्यासाठी command prompt वरecho space dollar कॅपिटलमध्ये HOME असे टाईप करून एंटर दाबा. |
04:53 | हे आपल्याला होम डिरेक्टरीचे path name दाखवते. |
04:57 | एका डिरेक्टरीमधून दुस-यात जाता येते. |
05:01 | परंतु एका वेळी एकाच डिरेक्टरीमध्ये रहाता येते. तिला Current किंवा Working Directory म्हणतात. |
05:09 | present working directory म्हणजेचpwd कमांडने आपण चालू डिरेक्टरी पाहू शकतो. |
05:18 | command prompt वर pwd असे टाईप करून एंटर दाबा. आता ही आपली Current Directory आहे. |
05:28 | आधी म्हटल्याप्रमाणे आपण एका डिरेक्टरीतून दुस-या डिरेक्टरीत जाऊ शकतो. |
05:32 | पण आपण हे कसे करू शकतो? त्यासाठी आपल्याकडे cd ही कमांड आहे. |
05:39 | cd ही कमांड व त्यापुढे डिरेक्टरीचे path name टाईप करू या. |
05:47 | पुन्हा एकदा आपली चालू डिरेक्टरी बघण्यासाठी command prompt वर pwd असे टाईप करून एंटर दाबा. |
05:57 | सध्या आपण या डिरेक्टमध्ये आहोत. |
06:01 | आता समजा आपल्याला slash usr डिरेक्टरीमध्ये जायचे असेल तर cd space slash usr असे टाईप करा. लक्षात ठेवा लिनक्समध्ये slash म्हणजे forward slash होय. आता एंटर दाबा. |
06:17 | आता आपण Current Directory बघू या. त्यासाठी pwd असे टाईप करून एंटर दाबा. |
06:24 | आता आपण slash usr या डिरेक्टरीमध्ये आहोत. |
06:30 | यात अडचण अशी आहे की path name खूप लांबलचक असू शकतात. याचे कारण संपूर्ण path name हे root directory पासून सुरू झाल्याने खूप मोठे होते. |
06:42 | त्याऐवजी आपण relative path nameवापरू शकतो. |
06:48 | येथे आपल्याला दोन स्पेशल कॅरॅक्टर माहित असणे आवश्यक आहे. dot (.) हे Current Directory दाखविते आणि dot dot (..) हे Current Directory ची पेरेंट डिरेक्टरी दाखवते. |
07:02 | आता cd या कमांडबद्दल थोडी माहिती करून घेऊ या. |
07:06 | कुठल्याही argument शिवाय cd या कमांडचा उपयोग होम डिरेक्टरीमध्ये परत जाण्यासाठी केला जातो. |
07:13 | command prompt वर cd असे टाईप करून एंटर दाबा. |
07:19 | आता pwd कमांडने आपली Current Directory पहा. |
07:23 | अशा प्रकारे आता आपण होम डिरेक्टरी म्हणजेच Slash home slash gnuhata मध्ये परत आलो आहोत. |
07:30 | आता आपण Music डिरेक्टरीमध्ये जाऊ या. command prompt वरcd space Music (M कॅपिटलमध्ये) slashअसे टाईप करून एंटर दाबा. |
07:43 | pwd ही कमांड टाईप करून एंटर दाबा. आणि आपली Current Directory कुठली आहे ते तपासा. बघा आपण slash home slash gnuhata slash Music मध्ये आलो आहोत. |
07:57 | Music मधून parent directory मध्ये जाऊ या. त्यासाठी cd dot dot कमांड देऊ. |
08:04 | command prompt वरcd space dot dot टाईप करून एंटर दाबा. |
08:11 | pwd ही कमांड टाईप करून आपली parent directory बघा. आपण पुन्हा slash home slash gnuhata मध्ये आलो आहोत. |
08:23 | आता dot च्या सहाय्याने Current Directory च्या सबडिरेक्टरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू या. |
08:30 | command prompt वरcd space dot slash Documents (Dकॅपिटलमध्ये) slash असे टाईप करून एंटर दाबा. |
08:42 | pwd ही कमांड टाईप करून आपली चालू डिरेक्टरी बघा. आपणslash home slash gnuhata slash Documents मध्ये आलो आहोत. |
08:53 | CTRL L दाबून आपण स्क्रीन clear करून घेऊ. म्हणजे आपल्याला नीट बघता येईल. |
08:58 | होम डिरेक्टरीवर परत जाण्यासाठी cd कमांड टाईप करून एंटर दाबा. |
09:07 | pwd या कमांडच्या सहाय्याने आपली Current Directory कुठली आहे ते पहा. आपणslash home slash gnuhata येथे परत आलो आहोत. |
09:17 | relative path मध्ये आपण स्लॅशनी वेगळे केलेल्या dot dot चा समावेश कितीही वेळा करू शकतो. |
09:23 | या स्लाईडमध्ये आपण फाईल सिस्टीमची रचना बघू शकतो.सगळ्यात वर root किंवा फॉरवर्ड स्लॅश आहे. home आणि bin या root च्या सबडिरेक्टरीज आहेत. आणि user name म्हणजेच इथे gnuhata नामक डिरेक्टरी आहे. जी होमची सब डिरेक्टरी आहे. |
09:43 | आता आपण slash home slash gnuhata मध्ये आहोत. आता आपण bin या डिरेक्टरीमध्ये कसे जाऊ शकतो? |
09:51 | command prompt वरcd space dot dot slash dot dot slash bin टाईप करून एंटर दाबा. |
10:03 | pwd या कमांडच्या सहाय्याने आपली Current Directory पहा. आपणslash bin मध्ये आहोत. |
10:11 | पहिल्या dot dot मुळे आपण slash home slash gnuhata मधून slash home मध्ये येतो. |
10:18 | आणि पुढील dot dot मुळे आपण slash home मधून root मध्ये जातो. |
10:24 | आता slash किंवा root मधून आपण slash bin मध्ये गेलो आहोत. |
10:30 | cd कमांड वापरून होम डिरेक्टरीमध्ये परत जा. |
10:34 | नवी डिरेक्टरी बनवण्यासाठी आपण mkdir या कमांडचा वापर करतो. |
10:40 | आपल्याला कमांड आणि नव्या डिरेक्टरीचे नाव टाईप करावे लागेल. ही डिरेक्टरी आपण आपल्या Current Directory मध्ये बनवणार आहोत. |
10:49 | testdir नामक नवी डिरेक्टरी बनवण्यासाठी mkdir space testdir असे टाईप करून एंटर दाबा. |
11:01 | अशा प्रकारे आपली testdir ही डिरेक्टरी यशस्वीरित्या बनली आहे. |
11:05 | डिरेक्टरी बनल्याची किंवा काढून टाकल्याची कुठलीही सूचना दिली जात नाही. |
11:13 | error message न मिळाल्यास कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाली. |
11:18 | तुम्हाला नवीन डिरेक्टरी तयार करण्याचे अधिकार असतील व त्या नावाची डिरेक्टरी आधीच बनवलेली नसेल तर आपण रिलेटीव्ह किंवा ऍबसोल्युट पाथ नेम वापरून डिरेक्टरी बनवू शकतो. |
11:33 | अशा प्रकारे आपण अनेक डिरेक्टरीज किंवा डिरेक्टरीजची Hierarchy बनवू शकतो. |
11:39 | mkdir space test1 space test2 टाईप करून एंटर दाबा. तुमच्या Current Directory मध्ये test1आणि test2 नामक दोन डिरेक्टरी तयार होतील. |
11:57 | mkdir space testtree space testtree slash test3 टाईप करून एंटर दाबा. |
12:11 | त्यामुळे testtree ही डिरेक्टरी आणि testtree मध्ये test3 नामक एक सब डिरेक्टरी तयार होईल. |
12:20 | अशा प्रकारे आपण testdir,test1,test2 आणि testtree या चार डिरेक्टरी आपल्या Current Directory मध्ये बनवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या तीन रिकाम्या आहेत आणि शेवटच्या डिरेक्टरीमध्ये test3 नामक एक सब डिरेक्टरी आहे. |
12:40 | mkdir प्रमाणेच आपणrmdir ही कमांड एक किंवा अनेक डिरेक्टरी काढून टाकण्यासाठी वापरू शकतो. |
12:50 | rmdir space test1 ही कमांडtest1 ही डिरेक्टरी यशस्वीरित्या काढून टाकेल. |
13:00 | जर तुम्ही एखाद्या डिरेक्टरीचे ओनर असाल तरच तुम्ही ती डिरेक्टरी काढून टाकू शकता. तसेच जी डिरेक्टरी तुम्हाला काढून टाकायची आहे ती डिरेक्टरी रिकामी असणे आणि तुमच्या Current Directoryच्या आत असणे आवश्यक आहे. |
13:13 | आता command prompt वरcd space testtree slash test3 टाईप करा. |
13:25 | आता आपणtest3 या testtree डिरेक्टरीच्या सब डिरेक्टरीमध्ये आहोत. |
13:33 | testdir ही डिरेक्टरी काढून टाकण्यासाठी rmdir space testdir टाईप करून एंटर दाबा. |
13:46 | आपण हे करू शकलो नाही कारण आपल्याला जी डिरेक्टरी काढून टाकायची आहे ती डिरेक्टरी आपल्या Current Directory मध्ये उपलब्ध नाही. |
13:54 | त्यासाठी आपल्याला त्या डिरेक्टरीमध्ये जाणे आवश्यक आहे ज्यामध्ये testdir ही डिरेक्टरी उपलब्ध आहे. |
14:00 | cd space dot dotटाईप करून एंटर दाबा. |
14:06 | आता cd space dot dotटाईप करून आपल्या पेरेंट डिरेक्टरीमध्ये परत या. |
14:13 | आता पुन्हा आधीची कमांड देऊन बघू या. |
14:16 | rmdir space testdir टाईप करून एंटर दाबा. |
14:23 | testdir ही डिरेक्टरी यशस्वीरित्या डिलीट झाली आहे. लक्षात घ्या testdir ही रिकामी डिरेक्टरी होती. |
14:32 | अनेक डिरेक्टरीज किंवा डिरेक्टरीजची Hierarchy एकाच वेळी काढून टाकता येते. मग testtree ही डिरेक्टरी तिच्या test3 या सबडिरेक्टरीसोबत डिलीट करण्याचा प्रयत्न करा. |
14:43 | command prompt वर rmdir space testtree space testtree slash test3 टाईप करून एंटर करा. |
14:57 | बघा हे एक error message दाखवत आहे की testtree ही डिरेक्टरी रिकामी नसल्यामुळे ती काढून टाकता येणार नाही. |
15:07 | पण आपण एक गोष्ट विसरतो आहोत की testtree slash test3 रिकामी असल्यामुळे ती डिलीट झाली आहे. |
15:16 | हे तपासण्यासाठी command prompt वर cd space testtree टाईप करून एंटर दाबा. |
15:25 | आता ls टाईप करून एंटर दाबा. बघा डिरेक्टरीमध्ये काहीच दिसत नाही. कारण test3 डिलीट झालेली आहे. |
15:34 | या ट्युटोरियलमध्ये लिनक्समधील फाईल आणि डिरेक्टरीज मधे काम करणे, डिरेक्टरी बघणे, एका डिरेक्टरीतून दुसऱ्यामध्ये जाणे तसेच डिरेक्टरी बनवणे आणि डिलीट करणे हे शिकलो. |
15:48 | हा पाठ येथे संपला. "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
16:02 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
16:08 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद. |