BOSS-Linux/C2/Basic-Commands/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script:Basic commands

Author: Manali Ranade

Keywords: Linux

Time Narration
00:00 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरियलमध्ये प्राथमिक कमांडस् शिकू या.
00:10 यात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वापरू.
00:12 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची हे तुम्ही जाणता असे आपण मानू या.
00:17 जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर [1] येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता.
00:26 या ट्युटोरियलमध्ये आपण Command आणि Command Interpreter म्हणजे काय हे पाहणार आहोत.
00:33 नंतर आपण लिनक्समध्ये man या कमांडच्या सहाय्याने मदत कशी मिळवायची ते पाहू.
00:39 आता पहिला प्रश्न, Commands म्हणजे काय?
00:43 साध्या शब्दात सांगायचे तर लिनक्स कमांड म्हणजे असे शब्द की जे टाईप केल्यावर संगणक काही कार्य करतो.
00:51 लिनक्स कमांडस् चार किंवा कमी अक्षरांच्या असतात. जसे की, ls, who, ps.
00:59 कमांडस् Lowercase मधे दिल्या जातात व Case Sensetive असतात.
01:05 Application Menu मध्ये जा.
01:08 Accessories सिलेक्ट करा आणि त्यात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी Terminal वर क्लिक करा.
01:14 आता आपल्याला Prompt $ आणि त्याच्यापुढे लुकलुकणारा कर्सर दिसेल. इथेच आपल्याला कमांड टाईप करायच्या आहेत.
01:22 who असा शब्द टाईप करा आणि एंटर की दाबा.
01:28 आपण logged in असलेल्या उपयोगकर्त्यांची नावे बघू शकतो. आपण 'who' ही कमांड कार्यान्वित केल्यावर सिस्टीम वर कोण logged in आहे हे दिसते.
01:41 संगणकातील कोणत्या घटकामुळे काही अक्षरांनी बनलेली कमांड कार्यान्वित होते?
01:47 हे Command Interpreter चे काम आहे. त्याला Shell असे म्हणतात.
01:53 Shell हा एक प्रोग्रॅम असून तो आपल्याला आणि लिनक्स सिस्टीमला जोडण्याचे काम करतो.
02:02 तसेच Shell, ऑपरेटिंग सिस्टीमला कार्यरत करण्यासाठी कमांडस् स्वीकारतो.
02:07 लिनक्समध्ये एकापेक्षा जास्त Shell स्थापित केलेले असू शकतात. युजर त्याच्या आवडीप्रमाणे हवा तो Shell वापरू शकतो.
02:16 लिनक्सवर कायम स्वरूपी /bin/sh हे Standard Shell इन्स्टॉल केलेले असते. ज्याला bash म्हणजेच the GNU Bourne-Again SHell म्हणतात. जे GNU Suite of tool मधून घेतले आहे.
02:29 आपण या ट्युटोरियलमध्ये सर्वसामान्य कमांडस् ची माहिती घेणार आहोत. ज्या थोड्याशा फरकांनी बहुतांश सर्व लिनक्स Shells मध्ये वापरता येतात.
02:38 आपण या ट्युटोरियलमध्ये bash या Shell चा उपयोग करणार आहोत.
02:44 कारण bash हे सर्वात लोकप्रिय असलेले shell आहे. आणि जवळजवळ सर्वप्रकारच्या युनिक्सवर वापरता येते.
02:52 इतर वापरल्या जाणा-या shells पुढीलप्रमाणे. Bourne shell जे मुळात Unix shell आहे, C shell आणि Korn shell .
03:02 आपण कोणते Shellवापरत आहोत हे बघण्यासाठी
03:08 Terminal वर जा आणि echo space dollar in capital SHELL अशी कमांड टाईप करून एंटर दाबा.
03:21 साधारणपणे /bin/bash असा आऊटपुट मिळतो. याचा अर्थ आपण bash Shell मध्ये आहोत.
03:28 अनेक पध्दतींनी आपण वेगवेगळे Shells सक्रिय करू शकतो. ज्याबद्दल आपण ऍडव्हान्स ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ.
03:36 Commands या बहुदा C मध्ये लिहिलेल्या Program फाईल्स असतात.
03:41 या फाईल्स डिरेक्टरीमध्ये साठवलेल्या असतात. कमांडस् कुठे साठवलेल्या आहेत हे शोधण्यासाठी आपण type या कमांडचा उपयोग करू शकतो.
03:48 Command Prompt वर type space ps असे टाईप करून एंटर दाबा.
03:58 ps ही फाईल /bin या डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केलेली आहे असे आपल्याला दिसते.
04:03 जेव्हा आपण Command Prompt वर Command देतो तेव्हा Shell, डिरेक्टरीतील फाईलच्या यादीमध्ये त्या कमांडच्या नावाची फाईल शोधतो.
04:12 ती फाईल सापडली तर त्या फाईलशी संबंधित प्रोग्रॅम कार्यान्वित करतो. नाहीतर Command not found ही error देतो.
04:21 आपण नंतर पाहूच की ज्या डिरेक्टरीजचा शोध घेतला जातो त्यांची यादी PATH या व्हेरिएबल मध्ये असते.
04:28 आता जर आपल्याला ती यादी बघायची असेल तर टाईप कराः echo space dollar कॅपिटल लेटरमध्ये PATH
04:40 आणि एंटर दाबा.
04:45 कमांडस् बद्दल जाणून घेताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे आवश्यक आहे.
04:51 लिनक्स कमांडस् चे दोन प्रकार आहेत. External command आणि Internal command.
04:56 External commands च्या फाईल्स स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात.
05:00 लिनक्स मध्ये बहुतांश कमांडस् अशाच प्रकारच्या आहेत. परंतु काही कमांडस् चे कार्य Shell मध्ये लिहिलेले असते. म्हणजेच त्याची स्वतंत्र रूपात फाईल उपलब्ध नसते.
05:12 त्यांना Internal commands म्हणतात.
05:14 echo कमांड ही वास्तवात एक Internal command आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊ.
05:18 Terminal वर जाऊन कमांड टाईप करा.
05:26 type space echoआणि एंटर दाबा.
05:34 echo is a shell built-in असे आऊटपुट दिसेल.
05:43 याचा अर्थ ही कमांड ही Shell मधूनच कार्यान्वित झाली आहे. म्हणून ही Internal command आहे आणि कमांडशी संबंधित फाईल नेम दिले गेलेले नाही.
05:50 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कमांडस् ची रचना समजून घेणे गरजेचे आहे.
05:55 कमांड ही एक शब्दाची किंवा space वापरून वेगळे केलेल्या अनेक शब्दांनी बनलेली असू शकते.
06:02 दुस-या प्रकारात पहिला शब्द ही खरी कमांड असते तर त्यानंतरचे शब्द हे arguments असतात.
06:09 Arguments हे कमांडमधील पर्याय, expression किंवा filename असते.
06:14 आपण टाईप केलेल्या पर्यायानुसार एकच कमांड वेगवेगळे कार्य करू शकते.
06:20 साधारणपणे पर्यायाच्या आधी एक किंवा दोन वजाची चिन्हे असतात ज्याला क्रमशः short किंवा long पर्याय म्हणतात.
06:28 Terminal Window वर जाऊन कमांड टाईप करा आणि त्याचे आऊटपुट बघा.
06:34 Terminal Window रिकामी करण्यासाठी प्रथमclear असे टाईप करा.
06:37 नंतर ls असे टाईप करून एंटर दाबा.
06:43 पुन्हा clear असे टाईप करून एंटर दाबा.
06:49 ls space minus a असे टाईप करून एंटर दाबा.
06:58 Terminal Window रिकामी करण्यासाठी clear असे टाईप करा.
07:04 ls space minus minus all असे टाईप करून एंटर दाबा.
07:13 Terminal रिकामे करण्यासाठी clear असे टाईप करा.
07:18 ls space minus d असे टाईप करून एंटर दाबा.
07:26 आता पर्याय बदलल्यावर कमांडचे कार्य कसे बदलते हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे.
07:33 लिनक्स मध्ये मोठ्या संख्येने कमांडस् आहेत.
07:39 प्रत्येकासाठी अनेक पर्याय आहेत.
07:42 कमांडस् संयुक्त रूपातदेखील वापरता येतात. ज्याबद्दल नंतर जाणून घेऊ.
07:48 कमांडची माहिती देण्यास लिनक्सवर 'online help' सुविधा उपलब्ध आहे.
07:55 man command आपल्याला सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक कमांडचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते.
08:01 उदाहरणादाखल ls कमांडबद्दल जाणून घेण्यासाठी Terminal वर जाऊ.
08:09 आणि ls या argument सहित man ही कमांड टाईप करा. म्हणजेच man space ls असे टाईप करून एंटर दाबा.
08:23 त्यातून बाहेर पडण्यासाठी q दाबा.
08:29 man हे सिस्टीमचे manual page आहे. manबरोबर argument देता येते.
08:37 कमांड दिल्यानंतर या argumentशी संबंधित असलेले page दर्शवले जाते.
08:43 man command मध्ये सेक्शनचे नावही देता येते. त्यानुसार शोध घेतला जातो.
08:49 नाव दिलेले नसले तर, man command उपलब्ध असलेले सर्व section शोधते. व त्यातील फक्त पहिले पान स्क्रीनवर दाखवते.
09:00 man या कमांडबद्दल अजून अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही man याच कमांडचा उपयोग करू शकता.
09:07 Terminal वर जाऊन man space man असे टाईप करा. आणि एंटर दाबा.
09:16 त्यातून बाहेर पडण्यासाठी q दाबा.
09:20 man कमांडसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
09:23 आपण जास्त वापरल्या जाणा-या कमांडस् बघू. काही वेळा आपल्याला योग्य कमांड माहित नसते. अशावेळी आपण काय करू शकतो?
09:35 man ही कमांडminus k हा पर्याय देते. ज्याद्वारे संबंधित कमांडस् ची यादी आणि त्यांचे कार्य संक्षिप्त रूपात दर्शवले जाते.
09:44 उदाहरणार्थ आपल्याला एक डिरेक्टरी बनवायची आहे. परंतु त्यासाठीची योग्य कमांड आपल्याला माहित नाही.
09:50 मग Command promptवर जा आणि man space minus k space directories असे टाईप करून एंटर दाबा.
10:06 दिलेल्या यादीतील प्रत्येक कमांडचा अभ्यास करून योग्य ती कमांड वापरता येते.
10:11 वरील सर्व गोष्टी आपण apropos या कमांडच्या सहाय्याने सुध्दा करू शकतो.
10:15 Command prompt वर apropos space directories असे टाईप करून एंटर दाबा. आणि येणारे आऊटपुट बघा.
10:29 काही वेळा आपल्याला अधिक माहितीची आवश्यकता नसते. केवळ एखादी कमांड काय करते हे जाणून घेणे पुरेसे असते.
10:35 त्यावेळी आपण whatis किंवा man minus f या कमांडचा उपयोग करू शकतो.
10:45 Terminal Window रिकामी करण्यासाठी clear असे टाईप करा.
10:51 आता whatis space ls असे टाईप करून एंटर दाबा.
10:59 काही Commandना अनेक पर्याय असतात. जर आपल्याला त्या Commandना असलेल्या विविध पर्यायांची यादी हवी असेल
11:07 तर आपण minus minus help या पर्यायाचा उपयोग करू.
11:12 Command prompt वर जा आणि ls space minus minus help असे टाईप करा. आणि एंटर दाबा.
11:23 आपण वरच्या दिशेला स्क्रॉल करू या. म्हणजे आपल्याला या manual page वरील सर्व पर्याय बघता येतील.
11:38 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:54 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana