BASH/C3/Basics-of-Redirection-(error-handling)/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

­Title of script: Basics of redirection

Author: Manali Ranade

Keywords: Video tutorial, redirection, file descriptors, standard input, standard output, standard error

Time Narration
00:01 नमस्कार.

Basics of redirection वरील पाठात आपले स्वागत.

00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:10 Bash मधील इनपुट आणि आऊटपुट
00:12 रिडायरेक्शन आणि फाईल डिस्क्रीप्टर्स
00:15 स्टँडर्ड इनपुट
00:16 स्टँडर्ड आऊटपुट
00:18 स्टँडर्ड एरर
00:19 हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00:22 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00:28 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. (http://www.spoken-tutorial.org)
00:34 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:36 उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:40 GNU BASH वर्जन 4.2.
00:43 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन "4" किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:50 GNU/Linux मधे आपण फाईलमधे आऊटपुट पाठवू शकतो किंवा फाईलमधील इनपुट वाचू शकतो.
00:58 प्रत्येक Shell कमांडला त्याची स्वतःची इनपुटस आणि आऊटपुटस असतात.
01:03 इनपुट आणि आऊटपुटचे redirection करण्यासाठी विशिष्ठ नोटेशनचा वापर Shellद्वारे केला जातो
01:11 इनपुट किंवा आऊटपुटचा डिफॉल्ट पाथ बदलण्याला redirection म्हणतात.
01:18 GNU/Linux मधे हार्डवेअर सकट प्रत्येक गोष्ट ही फाईल असते.
01:24 सामान्यतः रिटर्न व्हॅल्यूज अशा असतात.
01:27 इनपुटसाठी "0" (शून्य) म्हणजेच कीबोर्ड
01:31 आऊटपुट साठी "1" (एक) म्हणजेच स्क्रीन
01:34 एरर साठी "2" (दोन) म्हणजेच स्क्रीन
01:38 0, 1, 2 हे POSIX नंबर्स आहेत आणि हे फाईल डिस्क्रीप्टर्स (FD) म्हणून ओळखले जातात.
01:46 युजर किंवा इतर प्रोग्रॅमशी बोलण्यासाठी रीडायरेक्टर POSIX नंबर्स वापरतो.
01:54 स्टँडर्ड इनपुट: स्टँडर्ड इनपुट ही डिफॉल्ट इनपुट मेथड आहे.
02:00 इनपुट वाचण्यासाठी सर्व कमांडसद्वारे ही वापरली जाते.
02:04 ही शून्याने(0) दाखवली जाते.
02:07 ह्याला stdin(स्टँडर्ड इनपुट) असेही म्हणतात.
02:13 कीबोर्ड हे डिफॉल्ट स्टँडर्ड इनपुट आहे.
02:17 Less than चे चिन्ह हे इनपुट रीडायरेक्शनचे चिन्ह आहे.
02:22 त्याचा सिंटॅक्स असा आहे. Command space less than symbol space filename
02:30 redirection dot sh नावाची फाईल उघडू.
02:34 मी फाईलमधे कोड टाईप करून ठेवला आहे.
02:37 ही shebang line आहे.
02:41 टाईप करा 'sort space less than symbol space file dot txt
02:48 हे इनपुट रीडायरेक्शनचे उदाहरण आहे.
02:52 file dot txt ह्या फाईलमधून इनपुट घेतले जाईल.
02:57 sort कमांड file dot txt फाईलमधील अंक क्रमाने लावेल.
03:04 सेव्ह क्लिक करा.
03:06 redirection dot sh फाईल कार्यान्वित करा.
03:10 CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03:18 आता file dot txt फाईलमधील घटक पाहू.
03:23 टाईप करा cat space file dot txt.
03:27 एंटर दाबा.
03:30 फाईलमधे अंकांची मालिका आपण बघू शकतो.
03:35 टाईप करा: chmod space plus x space redirection dot sh
03:43 एंटर दाबा.
03:45 टाईप करा dot slash redirection dot sh
03:48 एंटर दाबा.
03:51 सॉर्ट केल्यानंतरचे आऊटपुट टर्मिनलवर बघू शकतो.
03:56 अंक हे चढत्या क्रमाने सॉर्ट केलेले आहेत.
04:00 स्लाईडस वर जा.
04:03 स्टँडर्ड आऊटपुट: आऊटपुट दाखवण्यासाठी स्टँडर्ड आऊटपुट सर्व कमांडसद्वारे वापरले जाते.
04:10 डिफॉल्ट आऊटपुट स्क्रीनवर दाखवले जाते.
04:14 हे एक(1)या अंकाने दाखवले आहे.
04:17 हे stdout (स्टँडर्ड आऊटपुट) म्हणून ओळखले जाते.
04:23 ( > )ग्रेटर दॅनचे चिन्ह हे आऊटपुट रीडायरेक्शनचे चिन्ह आहे.
04:28 त्याचा सिंटॅक्स असा आहे Command space greater than symbol space filename
04:35 आता redirection dot sh ह्या फाईलवर जाऊ.
04:41 मागील म्हणजेच sort ह्या ओळीला कमेंट करा.
04:45 त्याच्याखाली टाईप करा ls space greater than space ls underscore file.txt
04:55 हे आऊटपुट रीडायरेक्शनचे उदाहरण आहे.
04:59 "ls" चे आऊटपुट ls_file dot txt मधे संचित होईल.
05:06 "ls" कमांड विशिष्ट डिरेक्टरीतील फाईल्सच्या संबंधित माहितीची सूची दाखवेल.
05:14 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
05:19 प्रॉम्प्ट क्लियर करा. प्रथम "ls" टाईप करून आऊटपुट पहा.
05:28 अप ऍरो बटण तीन वेळा दाबा.
05:33 dot slash redirection dot sh ही मागील कमांड मिळवा.
05:38 एंटर दाबा.
05:41 आता आऊटपुट योग्य प्रकारे रीडायरेक्ट झाले का ते तपासू.
05:46 टाईप करा gedit space ls underscore file dot txt आणि एंटर दाबा.
05:56 आपण ह्या फाईलमधे आऊटपुट बघू शकतो. रीडायरेक्ट यशस्वी झाले आहे.
06:03 स्लाईडस वर जा.
06:06 स्टँडर्ड एरर ही डिफॉल्ट आऊटपुट एरर आहे.
06:12 हे सर्व सिस्टीम एरर्स लिहिण्यासाठी वापरले जाते.
06:16 हे दोन (2)अंकाने दाखवले जाते.
06:20 ह्याला stderr(स्टँडर्ड एरर)असेही म्हणतात.
06:25 डिफॉल्ट स्टँडर्ड एरर आऊटपुट स्क्रीन किंवा मॉनिटरवर दिसते.
06:32 दोन ग्रेटर दॅनचे चिन्ह (2>)हे एरर रीडायरेक्शनचे चिन्ह आहे.
06:36 त्याचा सिंटॅक्स असा आहे command space 2 greater than space error dot txt
06:44 redirection dot sh या फाईलवर जाऊ.
06:49 मागील म्हणजेच "ls" कमांडला कमेंट करा.
06:54 त्याखाली टाईप करा rm space backslash tmp backslash 4815 dot txt space 2 greater than symbol space error dot txt.
07:11 एरर आऊटपुट error dot txt फाईलमधे रीडायरेक्ट केले जाईल.
07:17 सेव्ह क्लिक करा आणि टर्मिनलवर जा.
07:22 प्रथम एरर बघण्यासाठी कमांड टाईप करू.
07:26 टाईप करा rm space backslash tmp backslash 4815 dot txt
07:36 एंटर दाबा.
07:38 एरर दाखवली जाईल.
07:40 rm: cannot remove slash tmp slash 4815 dot txt: No such file or directory
07:49 आता फाईल कार्यान्वित करू.
07:53 अप ऍरोचे बटण दाबा.
07:55 आणि dot slash redirection dot sh ही मागील कमांड मिळवा.
08:01 एंटर दाबा.
08:03 आता एरर रीडायरेक्ट झाली का तपासू.
08:07 टाईप करा gedit space error dot txt आणि एंटर दाबा.
08:15 आता एरर error dot txt फाईलमधे रीडायरेक्ट झालेली बघू शकतो.
08:22 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.


08:26 थोडक्यात,


08:28 पाठात शिकलो,
08:31 Bash मधील इनपुट आणि आऊटपुट
08:35 रिडायरेक्शन आणि फाईल डिस्क्रीप्टर्स
08:38 <(less than)चिन्हाच्या सहाय्याने स्टँडर्ड इनपुट
08:42 >(greater than) चिन्हाच्या सहाय्याने स्टँडर्ड आऊटपुट
08:47 2> (2 ग्रेटर दॅन) चिन्हाच्या सहाय्याने स्टँडर्ड एरर
08:52 असाईनमेंट म्हणून,
08:54 C, C++, Java सारख्या कुठल्याही लँग्वेजमधे प्रोग्रॅम लिहा.
08:59 आणि आऊटपुट किंवा एरर नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा.
09:04 किंवा तुमचे नाव, पत्ता या सारखे घटक असलेली टेक्स्ट फाईल बनवा.
09:11 आणि ते घटक नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा.
09:15 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:19 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:34 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:38 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:46 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:50 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:58 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro 
10:04 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
10:10 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana