Avogadro/C3/Stereoisomerism/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 नमस्कार! Stereoisomerism वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरिअल मध्ये, आपण उदाहरणासह Conformational isomerism Geometrical isomerism आणि R-S configurations शिकूया.
00:18 येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन. 14.04 , Avogadro व्हर्जन 1.1.1 वापरत आहे.
00:28 या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे. नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:39 या ट्युटोरियलमध्ये वापरलेल्या उदाहरण फाइल्स, कोड फाईल्स म्हणून प्रदान केल्या आहेत.
00:45 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण Avogadro वापरून stereoisomers तयार करणे शिकूया.
00:51 मी stereoiosmersism बद्दल थोडक्यात परिचय देईल.
00:56 Stereoisomersism अणूंच्या स्थानिक व्यवस्थेतील (spatial arrangement ) फरकांमुळे निर्माण होते.
01:03 Isomers समान रचना आहे आणि म्हणून ते गुणधर्मांमध्ये फारसे वेगळे नाहीत.
01:09 येथे अशी स्लाइड आहे जी isomers चे वर्गीकरण दर्शविते.
01:16 मी Conformational isomerism सह सुरवात करेल.
01:21 हे स्टिरिओआइसोमेरिसम चा एक प्रकार आहे
01:23 यामध्ये isomers सिंगल बॉन्ड्सच्या भोवती रोटेट करून आंतर-रूपांतरीत केले जाऊ शकते.
01:30 सिंगल बॉन्डच्या भोवती रोटेशन rotational energy barrier द्वारे प्रतिबंधित आहे.
01:36 आता 1,2-dichloroethane च्या कन्फॉर्मर्स सह सुरवात करूया.
01:41 1,2-dichloroethane तीन कन्फॉर्मर्स मध्ये होतात जसे कि:

Eclipsed, Gauche आणि Anti

01:50 मी Avogadro विंडो उघडली आहे.
01:53 Draw टूल वर क्लीक करा.
01:55 Adjust Hydrogens चेक बॉक्स अनचेक करा.
01:59 Panel वर क्लीक करून दोन अणू तयार करण्यासाठी ड्रॅग करा.
02:04 Element ड्रॉप डाउन मधून Chlorine निवडा.
02:08 प्रत्येक carbon वर एक बॉन्ड तयार करा.
02:11 Build मेनू वर जा आणि Add Hydrogens वर क्लीक करा.
02:15 1,2-dichloroethane पॅनल वर तयार होतो.
02:19 आता स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करू.
02:22 Auto Optimization टूल वर क्लीक करा.
02:25 Force Field मध्ये, MMFF94 निवडा आणि Start बटण वर क्लीक करा.
02:35 optimization प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा.
02:40 योग्य ओरिएंटेशन साठी स्ट्रक्चर फिरवण्यासाठी Navigation टूल वर क्लीक करा.
02:45 आपल्याकडे पॅनल वर Gauche conformer आहे.
02:49 1,2-dichloroethane चा कन्फॉर्मर्स दाखवण्यासाठी, मी रोटेशनचे प्लेन स्थिर करेल.
02:55 Bond Centric Manipulation टूल वर क्लीक करा.
02:59 दोन कार्बन अणूंमधील बॉन्ड वर क्लीक करा.
03:03 अणूंमधील प्लेन निळे किंवा पिवळ्या रंगात दिसते.
03:08 Chlorine अणू वर कर्सर ठेवा.
03:10 घड्याळाच्या दिशेने बॉन्डला फिरवा.
03:14 Navigation टूल वर क्लीक करून स्ट्रक्चर फिरवा.
03:18 आपल्याकडे पॅनल वर Anti conformer आहे.
03:21 C-C bond रोटेट करण्यासाठी पुन्हा Bondcentric Manipulation टूल वापरा.
03:25 आपल्याकडे पॅनल वर Eclipsed conformer आहे.
03:30 आता मी Cyclohexane चे विविध conformers दाखवेन.
03:35 एक नवीन विंडो उघडा.
03:38 Draw settings मेनू मध्ये, Carbon डिफॉल्ट एलिमेंट म्हणून निवडले आहे.
03:44 Adjust Hydrogens चेक बॉक्स अनचेक करा .
03:48 आता cyclohexane स्ट्रक्चर boat form मध्ये तयार करा.
03:53 पॅनल वर cyclohexane चा boat conformer तयार करण्यासाठी क्लिक आणि ड्रॅग करा.
04:01 अणूंना लेबल करण्यासाठी Display Types मेनू मध्ये Label चेक बॉक्स वर क्लीक करा.
04:07 कृपया लक्षात घ्या लेबलिंग प्रत्येक वेळी सारखी असू शकत नाही.
04:11 आपल्या गरजेनुसार conformers लेबल करू.
04:16 Selection टूल वर क्लीक करा, नंतर प्रथम carbon अणूवर राईट क्लीक करा.
04:21 एक मेनू उघडतो. Change label निवडा.
04:25 Change label of the atom टेक्स्ट बॉक्स उघडतो.
04:30 New Label फील्ड मध्ये 1 टाईप करा आणि OK वर क्लीक करा.
04:35 पुढे दुसऱ्या अणू वर राईट क्लीक करा आणि लेबलला 2 करा.
04:41 तसेच मी अणूंचे लेबल्स 3, 4, 5 आणि 6 मध्ये बदलेल.
04:50 आपण boat ला twist boat conformer मध्ये बदलूया.
04:54 Manipulation टूल वर क्लीक करा. 2 वर क्लीक करा आणि त्याला वरती ड्रॅग करा.
05:01 5 वर ड्रॅग करून त्याला वरती ड्रॅग करा. 3 वर ड्रॅग करून त्याला वरती ड्रॅग करा.
05:08 आपल्याकडे पॅनल वर twist boat आहे.
05:10 आता आपण twist boat ला half chair conformer मध्ये बदलूया.
05:16 2 वर क्लीक करून त्याला खाली ड्रॅग करा.
05:19 5 वर क्लीक करून त्याला खाली ड्रॅग करा.
05:23 4 वर क्लीक करून त्याला क्षैतिज(आडव्या) स्थिती वर ड्रॅग करा.
05:27 योग्य स्ट्रक्चर मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या सर्व carbon अणूंच्या स्थानांना समायोजित करा.
05:33 आपल्याकडे पॅनल वर half chair आहे.
05:36 आता आपण half chair ला chair conformer मध्ये बदलूया.
05:41 4 वर क्लीक करून त्याला खाली ड्रॅग करा.
05:44 1 वर क्लीक करून त्याला खाली ड्रॅग करा.
05:47 योग्य स्ट्रक्चर मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या सर्व carbon अणूंच्या स्थानांना समायोजित करा.
05:53 आपल्याकडे पॅनल वर chair conformer आहे.
05:56 असाइन्मेंट म्हणून Butane आणि Cyclopentane चे विविध conformers तयार करा.
06:03 आता मी geometrical isomerism दाखवण्यासाठी स्ट्रक्चर्स तयार करेल.
06:09 Geometrical isomerism तयार होतो: डबल बॉन्डच्या भोवती अणूंच्या विविध स्थानिक व्यवस्था (spatial arrangement) मुळे
06:17 येथे double-bonded carbon च्या भोवती अणूच्या किंवा गटांच्या रोटेशनवर मर्यादा आहे.
06:24 प्रात्यक्षिकांसाठी मी diamminedichloroplatinum(II) स्ट्रक्चर तयार करेल, जी cisplatin म्हणून ओळखली जाईल.
06:33 एक नवीन विंडो उघडा.
06:36 Draw settings मेनू मध्ये, Element ड्रॉप डाउन वर क्लीक करा आणि Other निवडा.

Periodic table विंडो उघडते.

06:44 टेबल मधून Platinum(Pt) निवडा. Periodic table विंडो बंद करा.
06:50 Panel वर क्लीक करा.
06:53 Element ड्रॉप डाउन मधून Chlorine निवडा.
06:55 Platinum अणूवर एकाच बाजूला दोन chlorine bonds तयार करा.
07:00 Element ड्रॉप डाउन मधून Nitrogen निवडा. आधीप्रमाणेच दोन nitrogen bonds तयार करा.
07:07 स्ट्रक्चर पूर्ण करण्यासाठी आपल्याला नायट्रोजन अणूंवर तीन संलग्न हायड्रोजन्स आवश्यक आहेत.
07:13 Element ड्रॉप डाउन लिस्ट मधून Hydrogen निवडा.
07:16 तिसरा बॉन्ड तयार करण्यासाठी प्रत्येक nitrogen अणूवर क्लीक करा.
07:21 आता स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करू.
07:24 Auto Optimization टूल वर क्लीक करा.
07:27 Force Field मध्ये UFF निवडा आणि Start बटण वर क्लीक करा.
07:35 ऑप्टिमायजेशन प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा.
07:39 प्रदर्शनासाठी मला दोन स्ट्रक्चर्स आवश्यक आहेत.
07:43 मी स्ट्रक्चर्सना कॉपी आणि पेस्ट करेल.
07:46 स्ट्रक्चर निवडण्यासाठी Selection टूल वर क्लीक करा.
07:50 कॉपी साठी CTRL+C आणि पेस्ट साठी CTRL+V दाबा. पेस्ट केलेली स्ट्रक्चर उजवीकडे ड्रॅग करा.
07:57 सोयीसाठी मी अणूंना लेबल करणार आहे.
08:00 Display Types मेनू मध्ये Label चेक बॉक्स वर क्लीक करा.
08:05 Hydrogens काढून टाकण्यासाठी, Build मेनू वर जाऊन Remove Hydrogens निवडा.
08:11 आपल्याकडे पॅनल वर cisplatin चे दोन आयसोमर्स (isomers) आहेत.
08:16 मी दुसरे cis isomer , trans isomer मध्ये बदलेल.
08:21 Manipulation टूल वर क्लीक करा.
08:24 Cl4 वर क्लीक करून डावीकडे ड्रॅग करा . N4 वर क्लीक करून उजवीकडे ड्रॅग करा.
08:32 नंतर योग्य ओरिएंटेशन दाखवण्यासाठी सर्व बॉन्ड्सची स्थिती समायोजित करा.
08:38 Build मेनू वर जा आणि Add Hydrogens निवडा.
08:43 आधीप्रमाणे प्रत्येक nitrogen कडे दोन जोडलेले अणू आहेत.
08:48 Draw टूल मधून Hydrogen वापरून तिसरा Hydrogen जोडा.
08:53 आता स्ट्रक्चर्स ऑप्टिमाइज करू.
08:55 Auto Optimization टूल वर क्लीक करा.
08:59 Force Field मध्ये UFF निवडा आणि Start बटण वर क्लीक करा.
09:05 ऑप्टिमायजेशन प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा.
09:09 आता आपल्याकडे पॅनल वर diamminedichloroplatinum(II) चे दोन geometrical isomers आहेत.
09:17 तसेच आपल्याकडे diamminetetracyanoferrate(III)ion चे geometrical isomers आहेत.
09:25 पुढे आपण R-S configuration बद्दल चर्चा करू.
09:29 R-S configurations, Chiral centre च्या उपस्थितीमुळे निर्माण होते.
09:35 Chiral centre चार वेगवेगळ्या घटकांशी जोडलेले अणू आहे.
09:41 कॉन्फिगरेशन्स एकमेकांची non-superimposable mirror images आहेत.
09:47 R-S configurations च्या प्रदर्शनासाठी मी amino acid - Alanine वापरेल.
09:53 एक नवीन विंडो उघडा.
09:56 मी Fragment library मधून Alanine स्ट्रक्चर लोड करेल.
10:01 Fragment library मध्ये उपलब्ध सर्व amino acids हे optically active आहेत.
10:07 तुम्ही स्वतःहून लोड आणि एक्सप्लोर करू शकता.
10:11 स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL+SHIFT आणि A कीज दाबा.
10:15 योग्य ओरिएंटेशन साठी स्ट्रक्चर फिरवण्यास Navigation टूल वापरा.
10:22 केंद्रीय carbon अणू chiral आहे, जो 4 वेगवेगळ्या गटांशी संलग्न आहे
10:26 R S configuration घड्याळाच्या किंवा विरुद्ध दिशेत संशोधकांना प्राधान्य दिलेला आहे.
10:35 प्राधान्य अणु संख्येवर आधारित आहे.
10:40 उच्चतर आण्विक क्रमांकाचे सहकारी यांना प्रथम प्राधान्य मिळतो.
10:45 आता आपण प्राधान्य घड्याळ्याच्या दिशेने पाहतो.
10:49 ह्या स्ट्रक्चर मध्ये, nitrogen ला प्रथम प्राधान्य दिले जाते.
10:53 oxygens सह जुडलेल्या Carbon ला दुसरे आणि methyl ला तिसरे प्राधान्य दिले जाते.
11:02 स्ट्रक्चर R configuration ठेवते.
11:05 मी संलग्न गटाच्या स्थानांना chiral carbon मध्ये बदलेल.
11:10 Build मेनू वर जा आणि Remove Hydrogens निवडा.
11:15 Click on मॅनिप्युलेशन टूल वर क्लीक करा.
11:17 carbon ला उजवीकडे हलवा.
11:20 oxygens सह जुडलेला carbon डावीकडे हलवा.
11:25 Build मेनू वर जा आणि Add Hydrogens निवडा.
11:29 आता आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्राधान्य दिसेल.
11:33 Nitrogen हा प्रथम प्रधान्य आहे. oxygens सह जुडलेला carbon हा दुसरा प्रधान्य आहे. आणि Methyl हा तिसरा प्रधान्य आहे.
11:45 स्ट्रक्चर R configuration ठेवते.
11:48 तसेच आपल्याकडे पॅनल वर Glyceraldehyde चे R आणि S configurations आहे.
11:55 थोडक्यात.
11:57 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण:

1,2-dichloroethane चे Conformations

cyclohexane चे Conformations

cisplatin चे Geometrical isomers

amino acid Alanine चे R-S configurations बनवायला शिकलो:

12:15 असाइन्मेंट म्हणून 2-butene आणि 1,2-dichloroethene चे जयोमेट्रिकल आयसोमर्स, bromochloroiodomethane चे R-S configurations बनवा.
12:29 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
12:37 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:51 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana