Avogadro/C2/Create-Surfaces/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 नमस्कार. Create surfaces वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत: रेणूचे दिसणारे गुणधर्म.
00:13 partial charge सह अणूंना लेबल करणे.
00:17 Van der waals सरफेस तयार करणे.
00:20 electrostatic potential एनर्जीजच्या अनुसार सरफेस रंगीत करणे.
00:25 येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन. 14.04, Avogadro व्हर्जन 1.1.1 वापरत आहे.
00:35 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यास, Avogadro इंटरफेसची माहिती असणे आवश्यक आहे.
00:41 नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 येथे मी Avogadro विंडो उघडली आहे.
00:51 Insert Fragment Library मधून butane चे रेणू समाविष्ट करा.
00:57 Build मेनू वर नंतर Insert ->fragment वर क्लीक करा.
01:04 alkanes फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल क्लीक करा. butane.cml निवडा.
01:11 Insert बटण वर क्लीक करा .
01:14 डायलॉग बॉक्स बंद करा.
01:17 पॅनल वर n-butane चे मॉडेल प्रदर्शित आहे.
01:21 Select मेनू मधून Select none पर्याय वापरून सिलेक्शन काढून टाका.
01:26 आपण रेणूचे आण्विक गुणधर्म दाखवूया.
01:30 View मेनू वर क्लीक करा, Properties पर्याय निवडा.
01:35 सब-मेनू मधून, Molecule Properties वर क्लीक करा.
01:39 Molecule Properties विंडो माहितीसह उघडते जसे की,

IUPAC Molecule Name, Molecular weight, Chemical Formula, Dipole moment इत्यादी.

01:54 विंडो बंद करण्यास OK वर क्लीक करा.
01:57 त्याचाप्रमाणे Atom Properties पाहण्यासाठी: properties मेनू मधून Atom properties पर्याय वर क्लीक करा.
02:04 रेणू मध्ये प्रत्येक अणू साठी गुणधर्मांची व्हॅल्यूज सह एक सूची उघडते जसे Element, Type, Valence, Formal charge इत्यादी.
02:17 डायलॉग बॉक्स बंद करा.
02:20 सूचीमधून इतर गुणधर्म जसे Angle, Torsion आणि Conformer ला शोधा.
02:27 आता partial charge सह रेणू मध्ये अणूंना लेबल करणे शिकूया.
02:33 Display settings वर क्लीक करा: Display Types सूची मधून Label च्या समोरील बॉक्स वर चेक करा.
02:43 Label चेक बॉक्सच्या उजव्या बाजूच्या Spanner चिन्ह वर क्लीक करा.
02:48 Label Settings विंडो उघडेल.
02:51 atom labels टेक्स्ट ड्रॉप डाउन मधून Partial charge पर्याय वर क्लीक करा. आता रेणू मधील सर्व अणू partial charge सह लेबल झाले आहेत.
03:01 partial charge डिस्ट्रिब्युशन, कार्बन अणुंच्या रीएक्टिविटीचा अंदाज लावण्यात मदत होते.
03:07 Inductive effect ला partial charge सह अणूंना लेबल करून समजावून सांगितले जाऊ शकते.
03:14 hydrogen ला chlorine शी बदला. carbon चैन सह partial charge च्या व्हॅल्यू मधील बदलाकडे लक्ष द्या.
03:22 inductive effect च्या कारणामुळे chlorine च्या जवळील carbons अधिक पॉजिटीव्ह होतात.
03:28 आपल्याकडे बॉन्ड्सला लेबल करण्यास एक पर्याय देखील आहे. bond labels टेक्स्ट बॉक्स वर क्लीक करा.
03:35 ड्रॉप-डाउन मध्ये बॉन्ड्सना लेबल करण्याचे पर्याय आहे.
03:39 bond length वर क्लीक करा. सर्व बॉन्ड्स साठी bond lengths पॅनल वर दर्शविली जाते.
03:46 लेबलचा रंग बदलण्यासाठी, रंगाने भरलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
03:51 Select atoms label color विंडो मधून तो रंग निवडा. OK बटण वर क्लीक करा.
03:59 आपण 'X', 'Y' आणि Z या दिशेने लेबल्स शिफ्ट करू शकतो.
04:04 label shift मेनू मध्ये increment or decrement buttons वर क्लीक करा. डायलॉग बॉक्स बंद करा.
04:12 Avogadro चे अन्य एक अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य आहे, ज्यात सरफेसेसची निर्मिती करण्याची क्षमता आहे.
04:18 extensions मेनूमध्ये सरफेसेस तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
04:24 extensions मेनू वर क्लीक करा, नंतर create surfaces पर्याय वर क्लीक करा.
04:30 स्क्रीन वर create surfaces डायलॉग बॉक्स उघडेल.
04:34 सरफेस टाईप ड्रॉप-डाउन मध्ये दोन पर्याय आहेत: Van der waals आणि electro-static potential.
04:42 Electrostatic potential surfaces', Avogadro मध्ये अजून समर्थित नाहीत.
04:48 Van der waals पर्याय निवडा. Color By ड्रॉप डाउन मध्ये Nothing निवडा.
04:55 Resolution ला Medium वर सेट करा.
04:58 Iso value ला शुन्य वर सेट करा. Calculate बटण वर क्लीक करा.
05:04 डायलॉग बॉक्स बंद करा.
05:07 पॅनल वर van der waals सरफेस दर्शवली जाते.
05:11 Van der waals सरफेस, सरफेसचे एक प्रतिनिधित्व आहे, ज्याद्वारे एक रेणू इतर रेणूंशी क्रिया प्रतिक्रिया करतो.
05:19 सरफेसचे सेटिंग्स बदलण्यास: सरफेसशी निगडित स्पेनर चिन्हावर क्लिक करा.
05:26 सरफेस सेटिंग डायलॉग बॉक्स उघडेल. opacity समायोजित करण्यासाठी slider ड्रॅग करा.
05:34 Render ड्रॉप-डाउन मध्ये निवडण्यासाठीचे विविध प्रदर्शन पर्याय आहेत जसे कि: Fill, lines आणि points.
05:42 डीफॉल्ट पर्याय fill आहे.
05:45 सरफेसचा रंग बदलण्यासाठी: positive पर्यायाच्या पुढे रंगाने भरलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
05:52 रंगावर क्लीक करून मूलभूत रंग चार्टमधून रंग निवडा. OK बटण वर क्लीक करा.
06:00 Create surface विंडोच्या पुढे: Color by ड्रॉप-डाउन द्वारे Electrostatic potential निवडा.
06:07 resolution ला medium वर सेट करा. Iso value ला 0.02 वर सेट करा.
06:14 कमी Iso value सेट केल्याने एक उत्कृष्ट सरफेस मिळते.
06:18 Calculate बटण वर क्लीक करा.
06:21 पॅनल वर आपण अणूंच्या electro-static potential values प्रमाणे 1-chloro butane रंगाची सरफेस पाहतो.
06:31 Electrostatic potential surface रेणूचे charge distributions स्पष्ट करते.
06:37 ते रेणूंच्या वर्तणुकीचा अंदाज घेण्यात देखील वापरले जातात.
06:42 डिफॉल्ट रूपात, electronegativity चे उच्च क्षेत्र लाल रंगात आणि कमीतकमी निळ्या रंगात असते.
06:49 येथे electro-static potential surfaces सह अणूंचे आणखी काही उदाहरणे आहेत.
06:56 Aniline आणि cyclohexylamine.
07:00 cyclohexylamine च्या Nitrogen वर electron density हे aniline च्या तुलनेत अधिक स्थानिक आहे.
07:08 म्हणून cyclohexylamine मजबूत पाया आहे.
07:12 थोडक्यात. ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो: रेणूचे गुणधर्म पाहणे.
07:20 partial charge सह अणूंना लेब करणे.
07:24 Van der waals सरफेस तयार करणे.
07:27 electrostatic potential ऊर्जेच्या अनुसार सरफेस रंगीत करणे.
07:33 असाइन्मेंट म्हणून: electro-static potential surface वापरून acetaldehyde आणि formamide च्या रीऐक्टिवटीची (प्रतिक्रियात्मक) तुलना करा.
07:43 partial charge सह अणूंना लेबल करा.
07:47 आपली पूर्ण असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसणे आवश्यक आहे.
07:51 लाल रंगात नेगेटिव्ह चार्ज acetaldehyde च्या oxygen अणूवर अधिक स्थानिक आहे.
07:58 formamide मध्ये नेगेटिव्ह चार्ज अधिक स्थलांतरित केले आहे.
08:02 म्हणूनच Acetaldehyde, हे Formamide पेक्षा अधिक रीऐक्टिवटी आहे.
08:07 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
08:15 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:29 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana