Arduino/C2/Introduction-to-Arduino/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Introduction to Arduino वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Arduino डिव्हाइस बद्दल |
00:12 | Arduino चे वैशिष्ट्य , Arduino board चे घटक जाणून घेऊ. |
00:18 | microcontrollers आणि उबंटू लिनक्स OS वर Arduino IDE चे इंस्टॉलेशन . |
00:26 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Arduino UNO Board |
00:31 | उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम |
00:36 | आणि Arduino IDE वापरत आहे. |
00:39 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. |
00:45 | हा Arduino board आहे.
Arduino UNO board Arduino प्रकल्पाच्या लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे. |
00:53 | त्यात ATMEGA328 microcontroller, Digital input/output pins, |
01:02 | Analog input pins आणि USB power adapter समाविष्ट आहे. |
01:08 | USB power adapter board च्या प्रोग्रामिंगसाठी वापरले जाऊ शकते. |
01:13 | हा microcontroller आहे.
पोर्टेबल म्युजिक डिव्हाइसपासून वॉशिंग मशीन आणि कारपर्यंत हे बर्याच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये आढळू शकते. |
01:25 | तर micro-controller काय आहे?
micro-controller हे mini computer आहे. |
01:31 | त्यात 'CPU म्हणजे सेंट्रल प्रोसससिंग युनिट, मेमरी, सिस्टिम क्लॉक' आणि peripherals. |
01:41 | Micro-controller एकाच वेळी केवळ एक टास्क करण्यासाठी आणि एक विशिष्ट ऍप्लिकेशन कार्यान्वित करण्यात समर्पित आहे. |
01:51 | आपण काही उदाहरण पाहू, जेथे Micro-controller वापरला जातो. |
01:56 | याचा वापर प्रिंटर, कार, ट्रॅफिक सिग्नल आणि मोशन डिटेक्टर्स मध्ये केला जातो. |
02:04 | पुढे, आपण Arduino चे काही वैशिष्ट्य पाहू. |
02:09 | Arduino IDE हे open-source सॉफ्टवेअर आहे. |
02:13 | कोड लिहिणे आणि त्यास प्रत्यक्ष(फिजिकल) बोर्डवर अपलोड करणे सोपे आहे. |
02:19 | प्रोग्रॅमिंग भाषा inbuilt functions सह शिकणे खूप सोपे आहे. |
02:25 | हे Windows, Mac OSX आणि Linux वर रन करते.
हे सॉफ्टवेअर कोणत्याही Arduino board च्या सहाय्याने वापरले जाऊ शकते. |
02:35 | पुढे, आपण Arduino IDE कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू. |
02:40 | इंस्टॉलेशन करण्यास, वेबसाइटवर जा: 'www.arduino.cc' |
02:48 | Download लिंकवर क्लिक करा. |
02:51 | Windows, Mac operating systems आणि Linux साठी Arduino डाउनलोड करण्यासाठी विविध लिंक्स आहेत. |
03:00 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्याच्या वेळी, आपल्याकडे Arduino व्हर्जन 1.6.9
भविष्यात व्हर्जन भिन्न असू शकते. |
03:10 | मी Windows Operating System साठी “Windows for non admin install” इन्स्टॉल करण्याची शिफारस करेल. |
03:18 | आता, मी Linux Operating System वर Arduino कसे इन्स्टॉल करायचे दाखवेल. |
03:24 | मी Linux 64bit लिंकवर क्लिक करेल कारण माझे मशीन आर्किटेक्चर 64- bit चे आहे. |
03:32 | आपल्या सिस्टम आर्किटेक्चरवर आधारित Linux 32-bit किंवा 64-bit वर क्लिक करा. |
03:39 | Just Download वर क्लीक करा.
एक डायलॉग बॉक्स उघडेल. Save File वर क्लीक करा. |
03:47 | हे डाउनलोड होण्यास काही वेळ घेईल. ते पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. |
03:52 | माझ्या Downloads फोल्डरमध्ये, डाउनलोड केलेली zip file उपलब्ध आहे.
Zip फोल्डरमधील फायली एक्सट्रॅक्ट(काढा) करा. |
04:02 | आता आपण Terminal मधून Arduino IDE लाँच करूया. |
04:07 | Terminal उघडण्यासाठी CTRL +ALT + T दाबा. |
04:12 | cd Downloads' टाईप करून Downloads डायरेक्टरी वर जा. |
04:19 | Arduino फोल्डरचे नाव पाहण्यासाठी ls टाईप करा. |
04:23 | येथे, माझ्या सिस्टिममध्ये ते Arduino 1.6.9 दर्शवते. |
04:29 | आता डायरेक्टरी Arduino 1.6.9 ने बदला.
टाईप करा cd arduino 1.6.9 |
04:40 | उपलब्ध फायलींची सूची पाहण्यासाठी ls टाइप करा. |
04:46 | या फोल्डरमध्ये आपल्याकडे Arduino IDE च्या कंपाइलरशी संबंधित विविध फायली आहेत जसे की: Arduino backend files आणि configuration files. |
05:00 | आता arduino फाईल कार्यान्वित करू या. या साठी टाईप: dot slash arduino आणि Arduino IDE उघडण्यासाठी एंटर दाबा. |
05:16 | आपण Arduino IDE विंडो पाहू शकतो. |
05:20 | आता माझ्या कॉम्पुटरच्या USB port शी Arduino जोडला आहे.
आता कनेक्शन तपासू. |
05:27 | Tools मेनू वर क्लिक करा.
हे दर्शविते की Arduino UNO बोर्ड आधीच निवडलेला आहे. |
05:36 | Port मेनूमध्ये, आपण port नंबर पाहू शकतो. |
05:41 | आता, मी Arduino IDE बंद करते. |
05:45 | File वर क्लिक करून Close वर क्लिक करा. |
05:49 | टर्मिनल मध्ये apt hyphen get कमांड वापरून Linux Operating System मध्ये Arduino इन्स्टॉल करण्याची आणखी एक पद्धत. |
05:59 | विचारल्यावर sudo पासवर्ड एंटर करा. |
06:03 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
06:08 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो Arduino डिव्हाइस बद्दल, Arduino चे वैशिष्ट्य , Arduino board चे घटक. |
06:17 | microcontrollers आणि उबंटू लिनक्स OS वर Arduino IDE चे इंस्टॉलेशन. |
06:25 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
06:34 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
06:49 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
06:55 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
07:03 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
07:07 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
07:12 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. |
07:20 | फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
07:27 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:38 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |