Arduino/C2/Arduino-with-Tricolor-LED-and-Push-button/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Interfacing Arduino with Tricolor LED and Pushbutton वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:09 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: tricolor LED Arduino बोर्डशी जोडणे.
00:17 ट्रायकलर LED लुकलुकण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे आणि लुकलुकणे नियंत्रित करण्यासाठी Push button वापरणे.
00:27 येथे मी वापरत आहे: Arduino UNO Board,
00:31 उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Arduino IDE.
00:39 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि C किंवा C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:52 आम्हाला काही बाह्य डिव्हाइसेसची देखील आवश्यकता आहे जसे की Tricolor LED, Resistor,
01:01 Breadboard, Jumper Wires आणि Pushbutton.
01:08 या प्रयोगासाठी आवश्यक बाह्य डिव्हाइसेसची प्रतिमा आम्हाला पाहू द्या.
01:16 याला Common Cathode Tricolor LED असेही म्हणतात.
01:22 ह्यात चार पिन्स आहेत. Cathode हा सर्वात लांब पिन आहे.
01:27 उर्वरित तीन पिन्स लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाचे LEDs साठी असतात.
01:34 Cathode pin हा ground pin लाल, हिरवा आणि निळ्या LEDs साठी सामान्य आहे.
01:42 Resistor हा एक विद्युतीय घटक आहे जो इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये विद्युत् प्रवाह मर्यादित करतो.
01:50 Resistors चा वापर सक्रिय डिव्हाईससाठी विशिष्ट व्होल्टेज पुरवण्यासाठी केला जाऊ शकतो.
01:57 हे breadboard आहे जे सामान्यपणे इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करण्यासाठी वापरले जाते.
02:03 त्यात अनेक छिद्रे आहेत. या छिद्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक घटक घातले जातात आणि तार्यांचा वापर करून जोडले जातात.
02:12 Jumper wires हे प्रत्येक बाजूस एक ठोस टीप असलेल्या लहान विद्युत तारा आहेत.
02:19 Jumper wires हे breadboard मधील घटकांना एकमेकांशी जोडण्यासाठी वापरले जातात.
02:25 आता आपण कनेक्शन सर्किटचे तपशील पाहू.
02:30 हे सर्किट अतिशय सोपे आहे. Cathode pin हे अशे काळे तार वापरून Arduino बोर्डमध्ये ground pin शी जोडलेले आहे.
02:41 resistors वापरून लाल, हिरवा आणि निळ्या पिन्स, पिन क्रमांक 12, 11 आणि 10 शी जोडलेले आहेत.
02:51 आपल्याला येथे resistors ची आवश्यकता का आहे? हे voltage ला LEDs शी नियंत्रण ठेवण्यासाठी आहे.
02:58 आपल्याला प्रत्येक रंगासाठी तीन विद्युत्-मर्यादित resistors आवश्यक आहेत.

येथे मी 100 ohm resistors वापरत आहे.

03:08 मी तुम्हाला थेट demo दर्शविते.
03:11 हे मिनी (छोटा) breadboard आहे जेथे मी ट्रायकलर LED आणि resistors जोडलेले आहे.
03:18 circuit diagram मध्ये आपण अगदी हेच पहिले आहे.
03:23 आता आपल्याला हा circuit कार्यरत होण्यासाठी एक प्रोग्राम लिहावा लागेल.
03:28 आता आपण Arduino IDE उघडू.
03:32 आम्हाला माहित आहे की Arduino प्रोग्राम दोन मूलभूत फंक्शन्ससह येतो -

Void setup आणि Void loop.

03:41 microcontroller सेट करण्यासाठीVoid setup function आहे.
03:46 येथे, आपण आपल्या प्रयोगात वापरत असलेल्या pins सेट करण्याची गरज आहे.
03:52 आता आपण Void setup function साठी code लिहूया.
03:57 सर्किट आकृतीमध्ये, लक्षात घ्या की pin क्रमांक 10 निळ्या LED शी जोडलेला आहे.
04:05 Arduino IDE मध्ये, टाईप करा: pinMode कंस उघडा 10 कॉमा OUTPUT कंस बंद करा Semicolon.
04:16 तसेच, दर्शविल्याप्रमाणे इतर pins साठी कोड टाईप करा:
04:21 Pin क्रमांक 11 , हिरवा LED आणि 12 , लाल LED चा प्रतिनिधित्व करतो .

आता आपण pins कॉन्फिगर केले आहे.

04:32 पुढे आपण Void loop function साठी कोड लिहू.

Void loop function हे अनिश्चित ‘while’ loop आहे .

04:42 हा कोड तोच आहे जसे आपण Blink LED प्रोग्रामसाठी लिहिले आहे.

परंतु आपल्याला तीनही LEDs साठी समान ओळींचा कोड लिहावा लागेल.

04:54 कोडच्या ह्या चार ओळी निळ्या LED ला 500 milliseconds च्या delay सह ब्लिंक करेल.
05:02 इतर pins साठी सामान कोड कॉपी आणि पेस्ट करा.
05:07 पिन क्रमांक 11 हिरव्या LED साठी आणि 12 लाल LED साठी बदला.
05:16 आता प्रोग्राम सेव्ह करू.
05:19 File आणि Save वर क्लिक करा.

फाईलचे नाव tricolor hyphen LED म्हणून प्रविष्ट करा.

05:28 आता मायक्रोकंट्रोलर पर्यायी सिग्नल HIGH आणि LOW madhye पाठविण्यासाठी, 10, 11 आणि 12 पिनला प्रोग्राम केले आहे.
05:40 पुढील स्टेप प्रोग्राम कंपाइल करणे आणि अपलोड करणे आहे.
05:44 Sketch मेनू मधून, Compile वर क्लिक करा.
05:49 आपण IDE च्या तळाशी कंपाइलेशन स्थिती पाहू शकतो.
05:56 microcontroller वर प्रोग्राम अपलोड करण्यासाठी, Sketch मेनू वर आणि नंतर Upload वर क्लिक करा.
06:04 आपण पाहू शकतो की लाल, निळे आणि हिरवे LEDs चमकत आहेत.
06:10 ब्लिंकिंग(लुकलुकणे) सतत आहे.

हे असे आहे कारण आपला प्रोग्राम अनिश्चित लूपमध्ये void loop function कार्यान्वित करतो.

06:20 पुढे, ब्लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याच सर्किटवर push button कसे इंटरफेस करायचे ते पाहू.
06:28 Pushbutton हा एक घटक आहे जो दोन बिंदूंना circuit मध्ये जोडतो जेव्हा तुम्ही ते दाबणार.
06:35 तुम्ही वरच्या बाजूला एक बटण पाहू शकता जे दाबले जाऊ शकते.

आमच्या प्रोयोगात, जेव्हा तुम्ही बटण दाबणार तेव्हा हे ट्रायकलर LED चालू होते.

06:48 आम्ही या प्रयोगासाठी pushbutton सह समान सर्किट वापरत आहोत.
06:54 Pushbutton हे momentary switch म्हणूनही ओळखले जाते. ज्या क्षणी तुम्ही ते दाबाल, ट्रायकलर LED चमकेल.
07:03 आपण स्विच सोडल्यास ट्रायकलर LED काम करणार नाही.

आम्ही pushbutton बोर्डवर जोडले आहे.

07:11 Pushbutton चा एक पाय 5 व्होल्टशी जोडलेला आहे.

हे तपकिरी रंगाच्या तार्यामध्ये येथे दर्शविले आहे.

07:20 आणि दुसरा पाय पिन क्रमांक 4 शी जोडलेला आहे जो येथे पिवळ्या रंगाच्या तार्यामध्ये दर्शविला आहे.
07:27 येथे, तुम्ही resistor, pushbutton शी जोडलेला पाहू शकता.
07:32 येथे आपल्याला resistor का आवश्यक आहे?

Pin 4 इनपुट म्हणून कॉन्फिगर केले आहे. याचा अर्थ, काही input voltage अपेक्षित आहे.

07:42 जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा ते pi n 4 ते 5 व्होल्ट्स जोडतो आणि रिडींग HIGH होते.
07:50 या पॉईंट वर, resistor, ground pin वर विद्युत प्रवाह जाण्यापासून रोखण्यास मदत करते.
07:58 जर pushbutton दाबले नाही तर, नंतर आपल्याला काही voltage पास करण्याची देखील आवश्यकता आहे.
08:05 resistor जो ground pin द्वारे जोडलेला आहे zero volt देईल.
08:12 यामुळे microcontroller सक्रिय होईल कारण त्यात काही इनपुट मिळते.
08:18 कनेक्शनसाठी आमचा थेट व्हिडिओ पाहू.
08:22 अशाप्रकारे push button दिसेल.
08:25 मी सर्किट आकृतीमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आपण इतर कनेक्शन देखील पाहू शकता.
08:32 आता circuit कार्यरत होण्यासाठी आपल्या प्रोग्राम मध्ये बदल करू .
08:37 Arduino IDE वर जाऊ. हा आपला मागील प्रोग्राम आहे.
08:44 मी पिन क्रमांक 4 साठी एक नवीन सेट अप जोडेल.
08:47 आपण mode INPUT म्हणून का द्यावा?

हे असे आहे कारण - जेव्हा Pushbutton दाबले जाते तेव्हा सर्किट पूर्ण होते आणि पिन क्रमांक 4 ला input मिळते.

09:02 switch दाबले आहे कि नाही हे तपासण्यासाठी आपल्याला conditional statement लिहावे लागेल.
09:09 void loop function मध्ये, आपण 'if' statement लिहितो.
09:15 येथे दर्शविल्याप्रमाणे कोड टाईप करा.

याचा अर्थ काय आहे हे मी स्पष्ट करेल.

09:22 जर पिन क्रमांक 4 ला input मिळते, तर हे कर्ली ब्रेसेस दरम्यान निर्दिष्ट केलेला कोड कार्यान्वित करेल.
09:31 मीdelay 100 मिलीसेकंदाने कमी करते, म्हणजे आपण आऊटपुट त्वरित पाहू.
09:39 कोडिंग आता पूर्ण झाले आहे.
09:42 आपण आपला प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू.
09:47 पुढे आपण pushbutton दाबू आणि ते कसे कार्य करते ते पाहू.
09:53 आपण tricolor LED ON आहे पाहू शकतो.
09:58 आणखी एक वेळ दाबा. हे कार्य करते.
10:02 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
10:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: tricolor LED Arduino बोर्डशी जोडणे.
10:13 ट्रायकोलर LED लुकलुकण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे

आणि लुकलुकणे नियंत्रित करण्यासाठी Push button वापरणे.

10:22 पुढील असाइन्मेंट करा.

त्याच प्रोग्रामला उलट्या पद्धतीने बदला.

10:28 बटण दाबल्यास, इनपुट LOW म्हणून ठेवा. प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा.
10:35 tricolor LED मध्ये ब्लिंकिंगचे निरीक्षण करा.
10:39 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
10:46 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

10:55 कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
10:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:10 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana