Advanced-Cpp/C2/Abstract-Class/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | C++ मधील abstract class आणि pure virtual function वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | यात शिकणार आहोत, |
00:10 | अॅबस्ट्रॅक्ट क्लास , प्युअर व्हर्च्युअल फंक्शन |
00:13 | उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. |
00:16 | ह्या पाठासाठी, |
00:19 | उबंटु OS वर्जन 11.10 आणि |
00:23 | g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:27 | प्रथम अॅबस्ट्रॅक्ट क्लासबद्दल जाणून घेऊ. |
00:31 | अॅबस्ट्रॅक्ट क्लास हा नेहमीच बेस क्लास असतो. |
00:35 | त्यामधे किमान एक तरी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन समाविष्ट असते. |
00:39 | अॅबस्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स बनवता येत नाही. |
00:43 | आता प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहू. |
00:45 | प्युअर व्हर्च्युअल फंक्शनला स्वतःची बॉडी नसते. |
00:49 | हे बेस क्लासमधे डिफाईन करता येत नाही. |
00:52 | हे असे घोषित करतातः |
00:54 | virtual void virtualfunname()=0; |
01:00 | derived क्लास ने हे फंक्शन ओव्हरराईड करणे आवश्यक असते. |
01:04 | अन्यथा कंपाईलर एरर देतो. |
01:07 | derived क्लासमधे फंक्शनची कार्यवाही सांगितलेली असते. |
01:11 | त्याचे उदाहरण पाहू. |
01:13 | मी एडिटरमधे कोड टाईप करून ठेवला आहे. |
01:16 | तो उघडू. |
01:18 | abstract.cpp हे फाईलनेम आहे. |
01:22 | ह्या उदाहरणात दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समाविष्ट आहे. |
01:28 | कोड समजून घेऊ. |
01:30 | iostream ही हेडर फाईल आहे. |
01:33 | येथे std namespace वापरू. |
01:36 | येथे abstractinterface क्लास घोषित केला आहे. |
01:41 | आपल्याकडे पब्लिक स्पेसीफायर आहे. |
01:44 | यात "numbers" नावाचे वर्च्युअल फंक्शन घोषित करून, |
01:49 | त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली. |
01:51 | आपल्याकडे एक नॉन-वर्च्युअल फंक्शन आहे. |
01:55 | a आणि b ही दोन इंटिजर व्हेरिएबल्स आहेत. |
01:59 | येथे input फंक्शन अॅक्सेस करू. |
02:01 | ह्यात a आणि b च्या व्हॅल्यूज घेऊ. |
02:05 | हा add नावाचा derived क्लास आहे. |
02:09 | त्याला "abstractinterface" ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत. |
02:14 | येथे "numbers" हे फंक्शन ओव्हरराईड करू. |
02:18 | ह्यात a आणि' b ह्या दोन संख्यांची बेरीज करू. |
02:21 | आणि तो रिझल्ट "sum" या इंटिजर व्हेरिएबलमधे संचित करू. |
02:25 | नंतर रिझल्ट प्रिंट करू. |
02:27 | येथे sub हा आणखी एक derived क्लास आहे. |
02:31 | त्यालाही "abstractinterface" ह्या बेस क्लासचा वारसा मिळाला आहे. |
02:35 | त्यामधे पुन्हा "numbers" हे फंक्शन ओव्हरराईड करू. |
02:39 | येथे a आणि b ह्या दोन संख्यांमधील फरक काढू. |
02:43 | नंतर तो प्रिंट करू. |
02:45 | हे main फंक्शन आहे. |
02:48 | येथे obj1 हे "add" फंक्शनचे ऑब्जेक्ट बनवले आहे. |
02:53 | obj1 ऑब्जेक्ट द्वारे "input" आणि "numbers" ही फंक्शन्स कॉल करू. |
02:59 | obj2 हे "sub" ह्या क्लासचे आणखी एक ऑब्जेक्ट बनवले आहे. |
03:04 | पुन्हा obj2 ह्या ऑब्जेक्ट द्वारे दोन्ही फंक्शन्स कॉल करू. |
03:08 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे . |
03:10 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03:13 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T की एकत्रितपणे दाबा. |
03:21 | कंपाईल करण्यासाठी टाईप करा: g++ space abstract dot cpp space hyphen o space abs |
03:31 | एंटर दाबा, टाईप करा: dot slash abs |
03:34 | एंटर दाबा. |
03:36 | असे दिसेलः Enter the numbers |
03:38 | मी 9 आणि 4 देत आहे. |
03:42 | Sum is 13 असे आऊटपुट दिसेल. |
03:46 | Enter the numbers असे दिसेल. |
03:49 | मी 8 आणि 3 देत आहे. |
03:52 | Diff is 5 असे आऊटपुट दिसेल. |
03:56 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
03:59 | स्लाईडसवर जाऊ. |
04:01 | थोडक्यात, |
04:03 | या पाठात शिकलो,अॅबस्ट्रॅक्ट क्लास उदा. क्लास abstractinterface |
04:09 | प्युअर व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual void numbers()=0; |
04:14 | असाईनमेंट म्हणून student हा अॅबस्ट्रॅक्ट क्लास बनवा. |
04:17 | Info हे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बनवा. |
04:20 | फंक्शन मधे विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर घ्या. |
04:25 | marks आणि sports हे दोन derived क्लास बनवा. |
04:29 | marks मधे तीन विषयांचे मार्क्स स्वीकारा. |
04:32 | sports मधे खेळात मिळवलेले मार्क्स स्वीकारा. |
04:35 | सर्व मार्कांची बेरीज करा. |
04:38 | नंतर रिझल्ट हा आणखी derived क्लास बनवा. |
04:41 | ह्यात विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर आणि एकूण मार्क्स दाखवा. |
04:47 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04:50 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:03 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:07 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
05:14 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05:18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:30 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . धन्यवाद. |