OpenFOAM/C2/Installing-Running/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Installing and running OpenFOAM and paraView वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात आपण,
00:11 OpenFOAM , Paraview इन्स्टॉल आणि कार्यान्वित कसे करायचे तसेच
00:15 Lid driven cavity case कशी सोडवायची हे जाणून घेऊ.
00:19 या पाठासाठी मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 10.04,
00:26 OpenFOAM वर्जन 2.1.0, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:33 ओपन फोम विंडोज प्लॅटफॉर्मवर कार्यान्वित होत नाही याची नोंद घ्या.
00:37 तसेच ओपन फोम वर्जन 2.1.0 हे उबंटुच्या 10.04 आणि त्यावरील वर्जनवरच कार्य करते याची नोंद घ्या.
00:45 या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला Computational Fluid Dynamics
00:52 आणि लिनक्स कमांडसचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:55 आता OpenFOAM बद्दल जाणून घेऊ.
00:57 हे एक ओपन सोर्स Computational Fluid Dynamics Software आहे.
01:02 यामधे 2 डायमेन्शन्स आणि 3 डायमेन्शन्सचे CFD प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी,
01:08 मोठ्या संख्येने solvers उपलब्ध आहेत.
01:11 आता आपण Paraview बद्दल जाणून घेऊ.
01:14 याचा उपयोग OpenFOAM मधील मिळवलेले रिझल्ट दृश्य स्वरूपात बघण्यासाठी होतो.
01:19 OpenFOAM आणि paraView हे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने इन्स्टॉल करता येतात.
01:24 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरसाठी सिस्टीममधील ऍडमिनिस्ट्रेशन खालील सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरवर जा.
01:33 तुमचा पासवर्ड टाईप करा.
01:41 सर्च बॉक्समधे "OpenFOAM" टाईप करा.
01:49 तुम्ही openfoam तसेच paraView बघू शकता.
01:54 इन्स्टॉलेशन करण्यासाठी हे दोन्ही निवडा.
02:06 नंतर इन्स्टॉल करण्यासाठी Apply वर क्लिक करा.
02:12 इन्स्टॉलेशनसाठी हे थोडा वेळ घेऊ शकते.
02:15 OpenFOAM आणि Paraview इन्स्टॉल झाले आहेत.
02:21 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरच्या अधिक माहितीसाठी कृपया,
02:25  :http://www.spoken-tutorials.org या आमच्या URL वरील वेबसाईटला भेट द्या.
02:29 किंवा http://www.openfoam.com/download या url वरील openfoam च्या वेबसाईटवरूनदेखील OpenFOAM आणि paraView इन्स्टॉल करू शकता.
02:38 आता ब्राऊजर उघडू या.
02:45 ब्राऊजरमधे URL,  : http://www.openfoam.com/download टाईप करून एंटर दाबा.
03:10 खाली स्क्रॉल करून Ubuntu Deb pack वर जा. मी हे झूम करून घेत आहे.
03:23 "Ubuntu Deb Pack Installation" वर जाऊन त्यावर क्लिक करा.
03:33 मी हे पुन्हा झूम आऊट करून घेत आहे. खाली स्क्रॉल करून इन्स्टॉलेशनवर जा.
03:40 इन्स्टॉलेशनच्या पहिल्या पायरीमधून,
03:43 ही कमांड लाईन कॉपी करा आणि
03:46 टर्मिनल विंडोमधे पेस्ट करा.
03:49 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी,
03:52 तुमच्या कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि t ही बटणे एकत्रितपणे दाबा.
03:59 किंवा ऍप्लिकेशनमधील ऍक्सेसरीजखालील टर्मिनल Applications > Accessories > Terminal वर जा.
04:06 टर्मिनल विंडो उघडेल.
04:10 आता ही कमांड लाईन कॉपी करून टर्मिनल विंडोमधे पेस्ट करा.
04:20 लक्षात ठेवा "lsb_release -cs" या जागी,
04:26 तुम्ही वापरत असलेल्या लिनक्सच्या वर्जनचे नाव वापरायचे आहे.
04:30 ब्राऊजरवर परत जा. इन्स्टॉलेशनच्या वरती आपल्याला उबंटुची विविध वर्जन्स आणि कोडची नावे दिसत आहेत.
04:40 मी लिनक्स 10.04 वापरत असल्याने,
04:45 मी "lsb_release-cs" च्या जागी "lucid" लिहित आहे.
04:53 टर्मिनल विंडो उघडा.
04:55 मी या ठिकाणी "lucid" वापरत आहे. एंटर दाबा.
05:04 येथे इन्स्टॉलेशन अपूर्ण आहे हे लक्षात घ्या.
05:08 जर तुम्ही येथील पाय-यांचे
05:10 1-2-3 आणि 4 अशा क्रमाने अनुसरण केले तर तुम्ही OpenFoam आणि paraViewचे इन्स्टॉलेशन पूर्ण होईल.
05:19 मी काही वेळापूर्वीच सिनॅप्टिक मॅनेजरमधून OpenFOAM आणि Paraview आधीच इन्स्टॉल केले आहे.
05:27 आता आपल्याला इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर कॉनफिगर करणे आवश्यक आहे.
05:31 हे करण्यासाठी आपल्याला bash फाईलमधे बदल करावे लागतील.
05:35 नवी कमांड टर्मिनल उघडा.
05:39 कमांड टर्मिनलमधे टाईप करा : "gedit ~/.bashrc". एंटर दाबा.
05:50 हे bash फाईल उघडेल.
05:54 मी हे capture area मधे ड्रॅग करत आहे. खाली स्क्रॉल करून bash फाईलच्या खालच्या भागात जा.
06:05 ब्राऊजरवर परत जाऊ.
06:09 खाली स्क्रॉल करा आणि User Configration वर जा.
06:13 आता दुसरी पायरी पाहू.
06:15 ही लाईन कॉपी करा आणि ही bash फाईलच्या खाली पेस्ट करा.
06:25 सेव्ह करून bash फाईल बंद करा .
06:31 आता आपल्याला इन्स्टॉल केलेले ऍप्लिकेशन तपासून बघणे आवश्यक आहे.
06:35 त्यासाठी नवे कमांड टर्मिनल उघडा.
06:40 मी हे capture area मधे ड्रॅग करत आहे.
06:49 कमांड टर्मिनलमधे टाईप करा: "icoFoam" (येथे 'F' कॅपिटल आहे हे लक्षात ठेवा) space -(dash) help
06:59 एंटर दाबा.
07:03 युसेज मेसेज आलेला दिसेल.
07:06 आता तुम्ही ओपन फोम वापरण्यासाठी तयार आहात.
07:10 आता आपण वर्किंग डिरेक्टरी कशी सेट अप करायची ते पाहू.
07:14 "run" हे नाव देऊन प्रोजेक्ट किंवा युजर डिरेक्टरी तयार करा.
07:21 नवे कमांड टर्मिनल उघडा. मी हे पुन्हा capture area मधे ड्रॅग करून घेत आहे.
07:36 कमांड टर्मिनल मधे टाईप करा : mkdir (space) -p (space) $FOAM_RUN ( 'FOAM' आणि 'RUN' हे शब्द कॅपिटलमधे लिहिलेले हे लक्षात घ्या). एंटर दाबा.
07:55 ओपनफोम डिस्ट्रीब्युशनमधून tutorial डिरेक्टरी run डिरेक्टरीमधे कॉपी करा.
08:01 त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: cp (space) -r (space) $FOAM_TUTORIALS (space) $FOAM_RUN
08:18 (लक्षात घ्या येथे 'FOAM', 'TUTORIALs' आणि 'RUN' हे कॅपिटलमधे लिहिलेले आहे) आणि एंटर दाबा.
08:28 दोन्ही डिरेक्टरीज आता तयार झाल्या आहेत.
08:31 डिरेक्टरीज बघण्यासाठी प्लेसेसमधील होम फोल्डरमधील 'OpenFOAM' फोल्डरवर जा.
08:40 तुम्हाला 'ttt-2.1.0' दिसेल, त्यावर क्लिक करा.
08:44 येथे Run मधे tutorials हा फोल्डर दिसेल.
08:48 हे बंद करा.
08:51 स्लाईडसवर परत जाऊ.
08:56 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमधून OpenFOAM आणि Paraview डाऊनलोड करताना किंवा
09:00 वेबसाईटवरून Ubuntu Debian pack डाऊनलोड करताना जर काही एरर आल्यास,
09:05 सोर्स पॅक इन्स्टॉलेशनमधून तुम्ही OpenFoam आणि paraView डाऊनलोड करू शकता.
09:11 सोर्स पॅक इन्स्टॉल करण्यासाठी ओपनफोम वेबसाईटच्या Download पेजवर जा.
09:18 मी हे झूम करत आहे.
09:21 खाली स्क्रोल करून "Source Pack Installation" वर जा आणि त्यावर क्लिक करा.
09:32 आता खाली स्क्रोल करून Packs वर जा.
09:38 या 2 'tar' फाईल्स डाऊनलोड करून सेव्ह करून घ्या. मी हे आधीच करून घेतले आहे.
09:48 त्यानंतर तुमच्या होम डिरेक्टरीमधे जा.
09:51 ह्यासाठी प्लेसेसमधील होम फोल्डरवर जा.
09:56 आता हे capture area मधे ड्रॅग करणार आहोत.
10:00 तुमच्या होम डिरेक्टरीमधे तुम्ही कुठल्याही नावाने एक फोल्डर तयार करा.
10:09 मी त्याला 'abc' असे नाव देत आहे.
10:15 डाऊनलोड केलेल्या दोन्ही फाईल्स तुम्ही आत्ताच तयार केलेल्या फोल्डरमधे कॉपी करा.
10:20 हे करण्यासाठी या दोन 'tar' फाईल्स कॉपी करा आणि तुम्ही आत्ताच तयार केलेल्या फोल्डरमधे पेस्ट करा.
10:37 त्याच फोल्डरमधे या दोन्ही फाईल्स Unzip किंवा Untar करा. येथे Extract वर क्लिक करा. यासाठी काही मिनिटे लागू शकतात.
10:47 त्यानंतर नवे कमांड टर्मिनल उघडा.
10:51 यामधे तुमच्या home फोल्डरवर जा.
10:54 "ls" टाईप करून एंटर दाबा.
11:00 आता tar फाईल जेथे untar केल्या आहेत त्या फोल्डरवर जा.
11:06 आता टाईप करा: cd (space) abc आणि एंटर दाबा.
11:13 आता 'abc' मधील घटक बघण्यासाठी "ls" टाईप करून एंटर दाबा.
11:24 आता सोर्स पॅक इन्स्टॉलेशनसाठी ओपन फोम वेबसाईटच्या डाऊनलोड पेजवर परत जा.
11:32 आणि OpenFOAMParaview च्या उबंटु डिस्ट्रीब्युशनसाठी खाली दिलेल्या पाय-यांचे अनुसरण करा.
11:39 आपल्याला येथे OpenFOAM आणि Paraview कंपाईल करणे गरजेचे आहे.
11:43 याला 4 ते 5 तास लागू शकतात. परंतु हे नेहमीच यशस्वी होते.
11:50 आता आपण एक उदाहरण घेऊन ते OpenFOAM मधे कसे सोडवायचे ते पाहू.
11:56 उदाहरण म्हणून Lid Driven Cavity, हा प्रॉब्लेम घेऊ.
11:59 हा 2D प्रॉब्लेम आहे जिथे प्लेटचा वरचा भाग विशिष्ट गतीने स्थलांतरित होत आहे आणि प्लेटच्या इतर तीन बाजू स्थिर आहे.
12:09 येथे मी जो Solver वापरत आहे त्याचे नाव "icoFoam" असून तो incompressible flow साठी वापरला जातो.
12:17 आता पुन्हा नवे कमांड टर्मिनल उघडा.
12:22 आपण capture areaमधे ड्रॅग करणार आहोत.
12:31 lid driven cavity या प्रॉब्लेमसाठीचा पाथ टाईप करा.
12:35 लक्षात ठेवा OpenFOAM मधे हा प्रॉब्लेम आधीपासूनच सेट अप केला गेला आहे.
12:41 कमांड टर्मिनलमधे "run" टाईप करा.
12:45 हे तुम्हाला OpenFOAM च्या run डिरेक्टरीमधे घेऊन जाईल. एंटर दाबा.
12:53 आता: cd (space) tutorials टाईप करून एंटर दाबा.
12:59 cd (space) incompressible एंटर दाबा.
13:07 cd (space) icoFoam(लक्षात ठेवा येथे 'F' कॅपिटल आहे). एंटर दाबा.
13:15 cd (space) cavity. एंटर दाबा.
13:20 cavity मधील घटक बघण्यासाठी "ls" टाईप करून एंटर दाबा.
13:27 आपल्याला : '0', 'constant' आणि 'system' या तीन फाईल्स दिसतील.
13:33 आता आपल्याला भूमिती mesh करावी लागेल.
13:35 हे ओपन फोमच्या blockMesh या युटिलिटीद्वारे करता येऊ शकते.
13:40 टर्मिनल विंडोमधे टाईप करा: "blockMesh" (लक्षात घ्या येथे 'M' कॅपिटल आहे). एंटर दाबा.
13:52 Meshing पूर्ण झाले आहे.
13:56 आता 'icoFoam' हा सॉल्व्हर कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा "icoFoam" (लक्षात घ्या येथे 'F' कॅपिटल आहे) एंटर दाबा.
14:09 टर्मिनल विंडोमधे कार्यान्वित होणारी iterations बघता येऊ शकतात.
14:13 येथे आपण सॉल्व्हिंग पॉईंट पूर्ण केल्याचे आपल्याला दिसेल.
14:16 हा रिझल्ट दृश्य स्वरूपात बघण्यासाठी paraview विंडो उघडू.
14:21 paraView उघडण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: “paraFoam”. (लक्षात घ्या येथे 'F' कॅपिटलमधे आहे ). एंटर दाबा.
14:42 हे paraView ची विंडो उघडेल.
14:45 आता डाव्या बाजूला,
14:48 object inspector मेनूमधे,
14:50 भूमिती बघण्यासाठी Apply वर क्लिक करा.
14:54 तुम्हाला Lid Driven Cavity दिसेल.
14:57 आता बाऊंड्री कंडिशन्स बघण्यासाठी, Object inspector मेनूखाली स्क्रॉल करा Mesh Parts या पर्यायावर जा.
15:08 Internel Mesh पर्याय अनचेक करून Apply वर क्लिक करा.
15:13 भूमिती दिसेनाशी होईल.
15:15 आता हलणा-या आणि स्थिर वॉल्स बघण्यासाठी,
15:19 दोन्ही बॉक्सेस चेक करून Apply वर क्लिक करा.
15:30 आता Movingwall पर्याय अनचेक करून Apply वर क्लिक करा.
15:35 आपण तीन स्थिर वॉल्स बघू शकतो आणि हलणारी वॉल दिसेनाशी झालेली आहे.
15:44 अशाप्रकारे आपले openFoam आणि paraView चे कार्य पूर्ण झाले आहे.
15:49 पुढे आणखी काही प्रॉब्लेम्स सोडवणा-या आणि ओपन फोमचे रिझल्ट बघण्यासाठीच्या पाठांचा सराव करणारच आहोत.
15:56 स्लाईडस वर परत जाऊ.
16:01 या पाठात आपण शिकलो,
16:05 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर आणि वेबसाईटमधून OpenFOAM आणि Paraview इन्स्टॉल करणे तसेच lid driven cavity हा प्रॉब्लेम सोडवणे.
16:12 असाईनमेंट म्हणून OpenFOAM आणि Paraview इन्स्टॉल करा.
16:17 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
16:21 यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
16:24 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
16:29 स्पोकन ट्युटोरियला प्रोजेक्ट टीम:
16:31 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
16:34 ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.
16:38 अधिक माहितीसाठी कृपया : sptutemail@gmail.com वर लिहा.
16:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
16:49 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे
16:56 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. URL:http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
17:01 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali