User:Manali

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Array-functions

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Visual Clue
Narration
00.01 पर्लमधीलArray Functions वरील पाठात स्वागत.
00.06 या पाठात पर्लमधीलArray फंक्शन्सबद्दल जाणून घेऊ.
00.11 जसे की push
00.11 pop
00.12 shift
00.14 unshift
00.15 split
00.16 splice
00.17 आणि join
00.18 sort
00.19 qw
00.20 मी उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरत आहे.
00.28 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे.
00.32 तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता.
00.36 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, डेटा स्ट्रक्चरर्स आणि ऍरेजची माहिती असावी.
00.43 कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00.48 संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.54 पर्ल काही इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.
00.57 ही फंक्शन्स ऍरेवर विविध क्रिया करू शकतात.
01.02 प्रथम ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक समाविष्ट करणे आणि काढून टाकणे हे पाहू.
01.08 त्यासाठी आपल्याकडे आहे
01.10 push फंक्शन, जे ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर घटक समाविष्ट करेल.
01.15 आणि pop फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
01.21 सँपल प्रोग्रॅमद्वारे push आणि pop फंक्शन्स समजून घेऊ.
01.26 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit perlArray dot pl space ampersand
01.33 आणि एंटर दाबा.
01.36 gedit मधे perlArray dot pl ही फाईल उघडेल.
01.41 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
01.45 येथे ऍरेची 3 ही लेंथ घोषित केली आहे.
01.50 push फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर म्हणजेच 3 नंतर घटक समाविष्ट करेल.
01.57 तरpop फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
02.04 येथील ऍरेमधून 4 काढले जातील .
02.08 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
02.11 push फंक्शन 2 अर्ग्युमेंटस घेते.
02.14 push फंक्शनचे पहिले अर्ग्युमेंट म्हणजे ऍरे ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.
02.20 दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरेमधे समाविष्ट करायचा आहे.
02.25 pop फंक्शनचा सिन्टॅक्स येथे दिला आहे.
02.29 pop फंक्शन केवळ अर्ग्युमेंट घेते.
02.32 ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.
02.36 टीप: ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर कार्य करतात.
02.41 pop फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक दुस-या व्हेरिएबलमधे संचित करता येतो.
02.46 त्याचा सिन्टॅक्स असा आहे $variable space = space pop कंसात @myArray कंस पूर्ण
02.57 1 आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
03.01 टाईप करा perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
03.07 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03.11 आता ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक कसा समाविष्ट करायचा किंवा काढून टाकायचा ते पाहू.
03.18 ह्यासाठी आपल्याकडे आहे-
03.20 unshift फंक्शन- जे ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक समाविष्ट करते.
03.25 shift फंक्शन- जे ऍरेचा पहिला घटक काढून टाकते.
03.31 आता हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
03.35 मी आधीच तयार केलेली perlArray dot pl ही फाईल उघडत आहे.
03.39 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
03.43 unshift फंक्शन पहिल्या पोझिशनवर म्हणजेच 1 च्या आधी घटक समाविष्ट करेल.
03.52 shift फंक्शन पहिल्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
03.57 आपल्या केसमधे शून्य काढून टाकले जाईल.
04.00 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
04.03 unshift फंक्शन2 अर्ग्युमेंटस घेते -
04.06 पहिले अर्ग्युमेंट म्हणजे ऍरे ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.
04.10 दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरे मधे समाविष्ट करायचा आहे.
04.15 shift फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट घेते.
04.18 ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.
04.22 टीप: ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर कार्य करतात हे लक्षात घ्या.
04.27 shift फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक आपण एखाद्या व्हेरिएबलमधे संचित करू शकतो.
04.33 त्याचा सिन्टॅक्स असा आहे - $variable space = space shift कंसात @myArray कंस पूर्ण
04.44 त्यासाठी टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
04.48 टाईप करा perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
04.54 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
04.59 आता ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक कसा काढून टाकायचा ते पाहू.
05.05 splice फंक्शन ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक काढून टाकते.
05.11 काढून टाकलेल्या घटकांचा ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू आहे.
05.17 सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
05.21 आपण आधी बनवलेल्या perlArray dot pl ह्या फाईलवर जा.
05.26 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
05.30 जेथपासून घटक काढायचे आहेत त्याचा index द्यावा लागेल.
05.35 तसेचoffset, जेथपर्यंत घटक काढायचे आहेत.
05.39 आपल्या केसमधे 5 आणि 6 हे घटक काढून टाकले जातील.
05.44 आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
05.49 perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
05.55 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05.59 आता ऍरेजची अजून काही इनबिल्ट फंक्शन्स पाहू.
06.04 स्ट्रिंग दिलेल्या डिलीमीटरवर वेगळी करण्यासाठी split फंक्शन वापरतात.
06.10 ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू असते .
06.14 या ऍरेचे घटक म्हणजे स्ट्रिंगचे विभाजन केलेले भाग असतात.
06.19 join फंक्शन ऍरेतील घटक दिलेल्या डिलीमीटरद्वारे जोडते.
06.25 हे जोडलेल्या घटकांची स्ट्रिंग आपल्याला देते.
06.28 sort फंक्शन ऍरेला अक्षरांच्या किंवा अंकांच्या क्रमानुसार सॉर्ट करते.
06.34 qw फंक्शन व्हाईट स्पेसने वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे आपल्याला देते.
06.40 आता ही सर्व फंक्शन्स सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
06.45 टर्मिनलवर जाऊन टाईप करा
06.48 gedit ArrayFunctions dot pl space ampersand आणि एंटर दाबा
06.55 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
07.00 ह्या केसमधे स्ट्रिंग व्हेरिएबलचा प्रत्येक शब्द ऍरेचा घटक बनेल.
07.07 येथे newArray चा प्रत्येक घटक कॉमाने जोडला जाईल.
07.12 sort फंक्शन ऍरेतील घटक अक्षरांच्या क्रमानुसार लावेल.
07.19 qw फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे बनवते.
07.25 प्रत्येक फंक्शन समजून घेऊ.
07.28 split फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते.
07.31 पहिले अर्ग्युमेंट म्हणजे डिलीमीटर ज्यांनी आपल्याला स्ट्रिंग विभागायची आहे.
07.36 आणि दुसरे म्हणजे जी स्ट्रिंग विभागायची आहे.
07.39 डिलीमीटर्स हे फॉरवर्ड स्लॅश, सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात.
07.45 join फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते.
07.48 पहिले म्हणजे ज्या डिलीमीटरद्वारे आपल्याला ऍरे घटक जोडायचे आहेत.
07.53 दुसरे म्हणजे ऍरे.
07.55 डिलीमीटर्स हे सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात.
07.58 sort फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट घेते ते म्हणजे ऍरे जो सॉर्ट करायचा आहे.
08.05 qw फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे देईल.
08.11 आपणqw वापरला असल्यास शब्द कोटस मधे लिहिण्याची गरज नाही.
08.17 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
08.23 perl arrayFunctions dot pl
08.26 आणि एंटर दाबा.
08.29 स्क्रीनवर असे आऊटपुट दिसेल.
08.33 थोडक्यात.
08.34 आपण शिकलो-
08.36 ऍरे मधे घटक समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
08.40 सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरेवर बेसिक फंक्शन्सचा वापर.
08.46 आता असाईनमेंट -
08.48 'script.spoken-tutorial.org/index.php/Perl'
08.54 ही दिलेली स्ट्रिंग '/ ' (फॉरवर्ड स्लॅश) डिलीमीटरने स्प्लिट (split) करा.
08.59 नव्या बनवलेल्या ऍरेच्या सुरूवातीला https:// समाविष्ट करा.
09.06 ऍरे मधून “Perl” घटक काढून टाका.
09.09 नंबर ऍरे घोषित करून सॉर्ट करा.
09.12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.19 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.02 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10.04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
10.06 सहभागासाठी धन्यवाद.