QGIS/C2/Plugins/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:56, 27 January 2022 by Radhika (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 QGIS मधील Plugins वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,कोर प्लगइन एनेबल करणे.
00:13 External Plugin इंस्टॉल करणे.
00:16 QGIS इंटरफेसवर प्लगइन शोधणे.
00:20 QuickMapServices प्लगइन इंस्टॉल करणे.
00:23 OpenStreetMap डेटा डाउनलोड करणे.
00:26 OSM डेटा शेपफाईलमध्ये रूपांतरित करण्यासाठी QuickOSM प्लगइन वापरणे.
00:32 Qgis2threejs प्लगइन वापरून नकाशा लेयरचे 3D व्हिज्युअलायझेशन पहाणे.
00:39 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे.उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04
00:47 QGIS आवृत्ती 2.18
00:51 Mozilla Firefox ब्राउझर 54.0 आणि
00:55 कार्यरत इंटरनेट कनेक्शन
00:58 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे.
01:06 पूर्वआवश्यक QGIS ट्यूटोरियलसाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या.https://spoken-tutorial.org/
01:12 प्लगइन बद्दल,
01:14 QGIS Plugins  उपयुक्त फीचर्स सॉफ्टवेअरमध्ये जोडतात.
01:19 ते डेवलपर्स आणि इतर स्वतंत्र यूजर्सनी लिहिलेले आहेत.
01:24 QGIS इंटरफेसवरील मेनू बारवर Plugins पर्याय उपलब्ध आहे.
01:30 Plugins मध्ये इंटरफेसवर विविध ठिकाणी मेनू आयटम घालण्याची आणि नवीन पॅनेल आणि टूलबार तयार करण्याची क्षमता असते.
01:42 येथे मी QGIS इंटरफेस उघडला आहे.
01:46 मेनू बारवरील Plugins वर क्लिक करा.
01:50 ड्रॉप-डाउनमधून, Manage and Install plugins निवडा.
01:55 Plugins डायलॉग बॉक्स उघडतो.
01:58 येथे तुम्हाला असे मेनू सापडतील जे वापरकर्त्याला Plugins सक्षम/अक्षम, इंस्टॉल/अनइंस्टॉल आणि अपग्रेड करण्यास अनुमती देतात.
02:08 तुम्ही विशिष्ट प्लगइन शोधण्यासाठी डाव्या पॅनलवरील फिल्टर वापरू शकता.
02:14 बाय डीफॉल्ट All मेनू निवडलेला असतो.
02:18 कृपया उजव्या पॅनेलवर दिलेली माहिती वाचा.
02:22 येथे सर्व उपलब्ध Plugins सूचीबद्ध आहेत.
02:25 यामध्ये Core plugins आणि external pluginss समाविष्ट आहेत.
02:30 डाव्या पॅनलमधून  Installed केलेल्या मेनूवर क्लिक करा.
02:34 उजव्या पॅनेलवर दिलेल्या सूचना वाचा.
02:38 प्लगइन सक्रिय किंवा निष्क्रिय करण्यासाठी चेक-बॉक्सवर क्लिक करा किंवा नावावर डबल-क्लिक करा.
02:45 तुमच्या QGIS वर इंस्टॉल केलेले Plugins येथे सूचीबद्ध आहेत.
02:50 यापैकी काही Plugins हे QGIS इंस्टॉलेशन दरम्यान इंस्टॉल केलेले Core plugins आहेत.
02:57 Core plugins वापरण्यासाठी, आपल्याला प्लगइन सक्षम किंवा सक्रिय करणे आवश्यक आहे
03:03  Processing plugin शोधूया.
03:06 सर्च बारमध्ये प्रोसेसिंग टाइप करा.
03:10 नाव शोध बारच्या खाली दिसते.
03:13 प्लगइनच्या नावावर क्लिक करा.
03:16 तुम्हाला त्याचे तपशील उजव्या पॅनेलवर दिसतील.
03:20 प्रोसेसिंग प्लगइन हेCore plugin आहे.
03:23 प्लगइन सक्षम किंवा सक्रिय करण्यासाठी प्लगइन नावाच्या पुढील चेक-बॉक्सवर क्लिक करा.
03:30 Plugins  डायलॉग बॉक्स बंद करा.
03:33 प्रोसेसिंग प्लगइन आता मेनू बारवर सक्षम केले आहे.
03:37 पुन्हा  Plugins डायलॉग बॉक्स उघडा.
03:41 search bar साफ करा आणि  Spatial Query टाइप करा.
03:46 प्लगइनचे नाव search bar च्या खाली दिसते.
03:50 हे प्लगइन आधीपासून एनेबल केलेले आहे.
03:54 प्लगइनच्या नावावर क्लिक करा.
03:57 हे कोर प्लगइन आहे जे QGIS इंस्टॉलेशन दरम्यान इंस्टॉल केले जाते.
04:03 Core plugin  फक्त एनेबल किंवा डिसेबल केले जाऊ शकतात.
04:08 ते QGIS वरून अनइंस्टॉल केले जाऊ शकत नाहीत.
04:12 त्यामुळे येथे बटणे हायलाइट केलेली नाहीत.
04:16 प्लगइन वर्णनामध्ये, Category  हे वेक्टर आहे.
04:20 याचा अर्थ असा की हे प्लगइन एकदा एनेबल केल्यावर आपण व्हेक्टर मेनूमध्ये शोधू शकतो.डायलॉग बॉक्स बंद करा.
04:29 Spatial Query टूल व्हेक्टर मेनूमध्ये आणि टूल बारवर टूल म्हणून देखील उपलब्ध आहे.
04:37 आता  external plugin इंस्टॉल करूया.
04:40 पुन्हा Plugins डायलॉग बॉक्स उघडा.search bar साफ करा.
04:46 डाव्या पॅनलमधून Not installed  मेनूवर क्लिक करा.
04:50 इंस्टॉल न केलेल्या सर्व उपलब्ध plugins ची सूची येथे दर्शविली आहे.
04:56 चला आता QuickMapServices प्लगइन इंस्टॉल करूया.
05:00 Plugins डायलॉग बॉक्सच्या शीर्षस्थानी असलेल्या search बॉक्समध्ये, QuickMapServices टाइप करा.
05:07 खालील search परिणामांमध्ये QuickMapServices प्लगइन वर क्लिक करा.
05:13 QuickMapServices प्लगइनमध्ये जोडण्यास सुलभ बेसमॅप्सचा संग्रह आहे.
05:19 तळाशी-उजव्या कोपर्‍यात Install plugin करा बटणावर क्लिक करा.
05:24 स्थापना पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.  Plugins  डायलॉग बॉक्स बंद करा.
05:30 मेनू बारवरील वेब मेनूवर क्लिक करा.
05:34 तुम्हाला ड्रॉप-डाउनमध्ये नवीन इंस्टॉल केलेले QuickMapServices प्लगइन दिसेल.
05:40 QuickMapServices वर क्लिक करा.
05:43 लँडसॅट, नासा, ओएसएम इत्यादी पर्यायांसह सब-मेनू उघडतो.
05:51 ओएसएम हे ओपन स्ट्रीट मॅपचे संक्षिप्त रूप आहे.
05:55 सब-मेनूमधून,OSM Standard वर क्लिक करा.
05:59 जगाचा Open Street Map  कॅनव्हासवर लोड केला जाईल.
06:05 हे जमिनीवरील भौतिक वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करते उदाहरणार्थ रस्ते, इमारती इ.
06:13 Mumbai area मध्ये झूम इन करण्यासाठी केंद्रातील माऊस बटण स्क्रोल करा.
06:19 Thane region पुन्हा झूम करा.
06:23 स्टेटस बारवरील Current CRS बटणावर क्लिक करा.
06:28 CRS निवडक मध्ये,  Enable On-The-Fly CRS transformation पर्याय च्या चेक-बॉक्स वर चेक करा.
06:36 Coordinate Reference system मधून WGS 84 EPSG 4326 निवडा.
06:45 बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा.
06:49 नकाशा डाउनलोड करण्यासाठी, वेक्टर मेनूवर क्लिक करा.
06:53 ड्रॉप-डाउनमधून, ओपनस्ट्रीटमॅप पर्यायावर क्लिक करा.सब-मेनूमधून Download Data निवडा.
07:03 Download OpenStreetMap data डायलॉग बॉक्स उघडेल.
07:08 डीफॉल्टनुसार Extent from map canvas  निवडला जातो.असेच राहू द्या.
07:15 आउटपुट फाइल फील्डच्या पुढील 3 ठिपके असलेल्या बटणावर क्लिक करा.
07:20 एक डायलॉग बॉक्स उघडेल, फाईलचे नाव Thane.osm असे टाइप करा.
07:28 योग्य स्थान निवडा.
07:31 मी डेस्कटॉप निवडेन. सेव्ह बटणावर क्लिक करा.
07:36 Download OpenStreetMap data  डायलॉग बॉक्समध्ये, ओके बटणावर क्लिक करा.
07:42 स्टेटस बारवर तुम्ही डाउनलोडची प्रगती आणि फाइल आकार पाहू शकता.
07:49 डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, यशस्वी डाउनलोड संदेश प्रदर्शित केला जाईल.ओके बटणावर क्लिक करा.
07:58  Download OpenStreet Map डायलॉग बॉक्स बंद करा.
08:02 तुम्ही डाउनलोड केलेली OSM फाइल फक्त डेटा फाइल आहे.
08:07 हा डेटा शेपफाईलमध्ये रूपांतरित करण्यासाठी, तुम्हाला QuickOSM नावाच्या प्लगइनची आवश्यकता आहे.
08:14 हे प्लगइन QGIS मध्ये OSM डेटा इंपोर्ट करण्यात मदत करेल.
08:20 QGIS इंटरफेसवर परत या.
08:23 plugins मेनूवर क्लिक करा.
08:26 Manage and Install Plugins निवडा. Plugins विंडो उघडते.
08:33 Not installed मेनू अंतर्गत search बॉक्समध्ये QuickOSM टाइप करा.
08:39 खालील शोध परिणामांमध्ये, QuickOSM वर क्लिक करा.
08:44 ते इंस्टॉल करण्यासाठी तळाशी-उजव्या कोपर्‍यातील Install plugin बटणावर क्लिक करा.
08:50 स्थापना पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.Close बटणावर क्लिक करा.
08:57 मेनू बारवरील वेक्टर मेनूवर क्लिक करा.
09:01 QuickOSM वर क्लिक करा.सब-मेनूमधून, QuickOSM वर क्लिक करा.
09:09 QuickOSM डायलॉग बॉक्स उघडतो.
09:13 डाव्या पॅनलमधील OSM फाइल पर्यायावर क्लिक करा.
09:17 OSM फाइलमध्ये, ब्राउझवर क्लिक करा आणि Thane.osm फाइलवर नेव्हिगेट करा.Open बटणावर क्लिक करा.
09:27 पॉइंट्स, लाइन्स, मल्टीलाइनस्ट्रिंग्स, मल्टीपॉलीगॉन्स आधीच चेक केलेले नसल्यास चेक बॉक्सवर क्लिक करा.
09:37 QuickOSM डायलॉग बॉक्समध्ये, Open बटणावर क्लिक करा.
09:42 प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो.
09:45 प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्टेटस बार 100 टक्के दाखवतो.
09:50 QuickOSM डायलॉग बॉक्स बंद करा.
09:54 OSM डेटा कॅनव्हासवर लोड केला जातो.
09:58 लक्षात घ्या की लेयर्स पॅनेलमध्ये  layers जोडले आहेत.
10:03 आता आपण वेक्टर लेयर्सचे त्रिमितीय व्हिज्युअलायझेशन तयार करू.
10:09 मेनू आयटम Plugins वर क्लिक करा.
10:12  Manage and Install Plugins निवडा.Plugins विंडो उघडते.
10:19 Plugins डायलॉग बॉक्सच्या शीर्षस्थानी असलेल्या  search बॉक्समध्ये, Qgis2threejs टाइप करा.
10:26 Qgis2threejs वर क्लिक करा.
10:30 उजव्या पॅनेलमध्ये, Qgis2threejs चे वर्णन दिले आहे.
10:36 ते इंस्टॉल करण्यासाठी तळाशी उजव्या कोपऱ्यातील  Install plugin बटणावर क्लिक करा.
10:42 स्थापना पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. Close  बटणावर क्लिक करा.
10:48 Qgis2threejs प्लगइन टूल टूलबारवर पाहिले जाऊ शकते.
10:54 प्लगइन मेनू बारवरील वेब मेनू अंतर्गत देखील आढळू शकते.
10:59 लेयर्स पॅनेलमधील,  Point, Linesआणि Multilinestrings layers लपवा.
11:06 लाइन्स, पॉइंट्स, मल्टीलाइनस्ट्रिंग लेयर्सच्या पुढील चेक-बॉक्स अनचेक करा.
11:14 कॅनव्हासवर केवळ Multipolygons layer दृश्यमान आहे.
11:19 टूलबारवरून Qgis2threejs वर क्लिक करा.
11:24 Qgis2threejs डायलॉग बॉक्स उघडतो.
11:29 डायलॉग बॉक्समध्ये,  Polygon विभागातील OSMFile च्या पुढील चेक-बॉक्सवर क्लिक करा.
11:36 Output HTML file path टेक्स्ट बॉक्सच्या पुढील ब्राउझ बटणावर क्लिक करा.
11:42 Output filename डायलॉग बॉक्स उघडतो.फाइलला  Buildings असे नाव देऊ या.
11:50 फाइल सेव्ह करण्यासाठी योग्य स्थान निवडा.
11:54 मी डेस्कटॉप निवडेन.
11:57 डायलॉग बॉक्सच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा
12:03 Qgis2threejs डायलॉग बॉक्समध्ये, टेक्स्ट बॉक्समध्ये फाइल पाथ दिसेल.रन बटणावर क्लिक करा.
12:13 तळाशी स्टेटस बारवर दाखवल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा.
12:19 Buildings html फाइल नवीन ब्राउझर विंडोमध्ये उघडते.
12:24 त्रिमितीय इमारती पाहण्यासाठी जूमइन वाढवा.
12:29 QGIS कॅनव्हासवर परत या .
12:33 Plugins  डायलॉग बॉक्स पुन्हा उघडा.
12:36 डाव्या पॅनलमधील सेटिंग्ज मेनूवर क्लिक करा.
12:40 या मेनू अंतर्गत तुम्ही खालील पर्याय वापरू शकता.1. Check for updates, 2. Show also experimental plugins, 3. Show also deprecated plugins.
12:52 येथे आपल्याकडे बाह्य लेखक repositories जोडण्यासाठी बटणे देखील आहेत.
12:58 नवीन प्लगइन कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक आगामी ट्यूटोरियलमध्ये समाविष्ट केले जाईल.डायलॉग बॉक्स बंद करा.
13:08 चला थोडक्यात बघू ,
13:10 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो,Core Plugins एनेबल करणे ,  External Plugin स्थापित करणे, QGIS इंटरफेसवर प्लगइन शोधणे, QuickMapServices प्लगइन स्थापित करणे.
13:27 OpenStreetMap डेटा डाउनलोड करणे
13:30 OSM डेटा शेपफाईलमध्ये रूपांतरित करण्यासाठी QuickOSM प्लगइन वापरणे.
13:35 Qgis2threejs प्लगइन वापरून नकाशा लेयरचे 3D व्हिज्युअलायझेशन पहा.
13:41 असाइनमेंट म्हणून,बंगलोर क्षेत्रासाठी त्रिमितीय इमारतींचा नकाशा तयार करा.
13:47 बंगलोर परिसरात झूम इन केलेला OpenStreetMap डेटा वापरा.
13:53 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा.
14:01 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि ऑनलाइन चाचण्या उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा.
14:13 कृपया या फोरमवर तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
14:17 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे.या मिशनची अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
14:31 या ट्यूटोरियलचे योगदान कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथील वैष्णवी होनप, स्नेहलता कलिअप्पन आणि IIT बॉम्बे मधील हिमांशी कारवांजी यांनी दिले आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.



Contributors and Content Editors

Radhika