Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-2/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': MySQL-Part-2 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narration…')
 
Line 7: Line 7:
  
  
{| style="border-spacing:0;"
+
{| border
! <center>Visual Clue</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Revision as of 13:08, 14 July 2014

Title of script: MySQL-Part-2

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time Narration
0:00 नमस्कार. पहिल्या भागात आपण "php academy" ह्या डेटाबेसमध्ये टेबल बनवले. तसेच त्यात डेटा भरण्यासाठी योग्य डेटाटाईप्स वापरून फिल्डस बनवली.
0:14 काही dummy data आपल्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करू.
0:21 आपण "Insert" बटण वापरणार नाही. कारण त्यामुळे अगदी सोपा interface मिळेल जिथे firstname, lastname, तसेच calender ने date of birth भरू शकतो.
0:33 हा पॉप अप पहा.
0:35 येथे gender भरू शकतो.
0:37 हे mysql php tutorial असल्यामुळे mysql किंवा php च्या सहाय्याने डेटा insert कसा करायचा ते पाहू .
0:49 प्रथम डेटाबेसला कनेक्ट करू.
0:52 "connect dot php" फाईल include करण्यासाठी आपण "mysql dot php" मधील "include" function वापरू.
1:00 जर तुम्ही त्याच डिरेक्टरीत नसाल तर "subdirectory आणि नंतर connect" असे लिहू.
1:07 ते व्यवस्थित लिहा.
1:09 जर "Rest of the page" कार्यान्वित करायचे नसेल तर आपण "require" function वापरू शकतो.
1:18 "required" गोष्ट न सापडल्यास पेज संपुष्टात आणले जाते.
1:23 "include" फंक्शन ते समाविष्ट करून echo करेल किंवा उरलेले पेज दाखवेल.
1:29 "require" फंक्शन मधील गोष्ट न सापडल्यास पेज "kill" होते.
01:34 आपण "require connect dot php" लिहू. डेटाबेस कनेक्ट न झाल्यास पुढील पान निरर्थक आहे.
1:41 आपल्या पानावर गार्बेज लिहून येईल.
1:44 प्रथम "require connect dot php" आणि connect dot php मध्ये php mysql functions लिहू.
1:52 आपण "connect" ह्या व्हेरिएबलने सुरूवात करू आणि ते "mysql_connect" हे फंक्शन वापरेल.
2:01 हे फंक्शन समजून घेऊ.
2:03 ह्या फंक्शनमुळे mysql डेटाबेसला आपण जोडले जातो.
2:08 हे तीन parameters घेते.
2:11 पहिला parameter म्हणजे webserver चा address.
2:17 माझ्या संगणकावरील local webserver, local host मी वापरणार आहे.
2:22 आपण local host ऐवजी 127.0.0.1 IP address देखील लिहू शकतो.
2:32 मी local host लिहिणे पसंत करीन.
2:35 मी standard username आणि password वापरणार आहे.
2:41 म्हणजेच "root".
2:42 पासवर्ड दिलेला नसल्यामुळे तो अस्तित्वात नाही.
2:50 आपण कनेक्शन प्रस्थापित केले आहे पण जर हे नीट झाले नाही,
2:56 तर येथे "or die" असे लिहून कंसात error message देता येतो. उदाहरणार्थ "connection failed".
3:02 कनेक्शन काम करत आहे असे समजू.
3:11 "connected" असे echo करू या.
3:18 कनेक्शन प्रस्थापित झाले असल्यास उरलेले script रन होईल व "connected" असे echo होईल
3:26 आता येथे backup उघडू.
3:30 Refresh केल्यावर "connect dot php" तसेच "mysql dot php" दिसेल त्यावर क्लिक करा.
3:37 mysql मध्येही आपण "connect dot php" लिहिल्यामुळे connect क्लिक केले नाही.
3:44 दोन्ही सेव्ह केल्यावर mysql dot php रन करू.
3:48 आपण कनेक्ट झालो आहोत.
3:50 जर आपणhost च्या जागी "I dont exist" टाईप केले तर या नावाचा host आपल्या computer वर उपलब्ध नसल्यामुळे एरर मेसेज मिळेल.
4:08 refresh करू. हा मेसेज दिसेल. याला वेळ लागत आहे..... ठीक आहे.
4:14 आपल्याला mysql error मिळाली आहे. connection failed हा text मेसेज दिसत आहे.
4:21 unknown mysql server host असे दिसत आहे.
4:25 ही एरर तुम्हाला कळली आहे.
4:27 हा आपला host आहे आणि या ओळीवर हे लिहिले आहे. इथे debugging message code दिसत आहे.
4:36 मी तुम्हाला आणखी एक उपयोगाची गोष्ट सांगतो. आपण इथे "die" लिहून त्यात दुसरे फंक्शन लिहू शकतो.
4:46 हे दुसरे फंक्शन समजून घेऊ.
4:50 "I don't exist" डेटाबेस नाव तसेच ठेवून पेज रिफ्रेश करू.
4:57 हे थोडा वेळ घेत आहे.
5:06 आपल्याला हे दिसेल.
5:07 आधी php ने दिलेला error message परतecho झाला आहे.
5:12 जर error reporting युजरसाठी बंद केलेले असेल तर ही पध्दत तुम्हाला योग्य तो संदेश देईल.
5:24 हे आपणecho करणार नाही.
5:26 येथे "error reporting" लिहू.
5:30 कृपया error reporting वरील ट्युटोरियल पहा.
5:33 आपण हे शून्य वर सेट करू.
5:40 त्यामुळे error reporting बंद होईल.
5:43 येथील ही error दाखविली न जाता ही विशिष्ट error दाखविली जाईल.
5:49 हे रिफ्रेश करू. हे थोडा वेळ घेत आहे.
5:58 आपल्याला हे दिसेल. आता ही विशिष्ट error मिळालेली आहे.
6:03 ह्या फंक्शनद्वारे आपण कनेक्ट झालो आहोत. नसेल तर एरर मेसेज मिळेल. आता डेटाबेस निवडायचा आहे.
6:13 हे करण्यासाठी "mysql_select db" हे फंक्शन वापरू.
6:20 हे केवळ डेटाबेसचे नाव हा एकच parameter घेते.
6:24 "php myadmin" वर पुन्हा क्लिक करू जेथे "phpacademy" हा डेटाबेस दिसेल.
6:31 केवळ phpacademy टाईप केले तरी ते चालले पाहिजे.
6:36 पुन्हा or die feature चा वापर करू.
6:40 डेटाबेस उपलब्ध नसल्यास die function च्या सहाय्याने mysql_error स्पष्ट करू शकतो.
6:47 हे रिफ्रेश करू.
6:50 "local host" टाईप करून नंतर ते रिफ्रेश करायला हवे. म्हणजे ते योग्य कार्य करेल.
6:59 हे कनेक्ट झाले आहे. डेटाबेस उपलब्ध नसल्यास error मिळेल.
7:04 "I don't exist" हे डेटाबेसचे नाव लिहून refresh करा. "Unknown database "idon'texist" असे दिसेल.
7:12 हे नीट काम करत आहे.
7:14 अशाप्रकारे एरर समजणे युजरला उपयोगाचे असते.
7:20 आपल्याकडे "phpacademy" आहे.
7:23 सर्व ठीक आहे असे समजून रिफ्रेश करू.
7:29 पुन्हा "phpacademy" टाईप करून सेव्ह करा.
7:33 रिफ्रेश करा. हे कनेक्ट झाले आहे.
7:36 ह्याचा log ठेवू. आपण कनेक्ट झालो आहोत.
7:41 उरलेला code सुरू रहाण्यासाठी हा paragraph संपवू.
7:42 पुढील ट्युटोरियलमध्ये डेटाबेसमध्ये डेटा लिहिण्याबद्दल आपण जाणून घेऊ.
7:56 धन्यवाद. या टयूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केला असून मी रंजना भांबळे अपला नीरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana