PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:06, 14 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: MySQL-Part-1

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time Narration
00:00 नमस्कार.
00:01 हे My SQL php चे ट्युटोरियल आहे.
00:07 जोडणी, डेटा वाचणे, त्यात बदल करणे, चुका दुरूस्त करणे हे आपण शिकणार आहोत.
00:15 ह्यात काही SQL code आणि queries समाविष्ट असतील.
00:21 आता सुरूवात करू या.
00:24 "mysql" डिरेक्टरीची रचना बघू .
00:27 आपण काही फाईल्स बनवू.
00:29 प्रथम "connect.php" ही फाईल तयार करू.
00:34 येथील My SQL फोल्डर निवडून त्यात "connect.php" नावाने सेव्ह करा.
00:40 आपण वापरणार असलेले प्रत्येक पेज ह्या फाईलमध्ये समाविष्ट करणार आहोत.
00:46 हे डेटाबेसला जोडणे अगदी सोपे आहे.
00:50 "include" function टाईप करून त्यात ह्या फाईलचा संदर्भ देऊ.
00:55 आपण एक नवीन फाईल बनवू जी आपली मुख्य "mysql" file असेल, त्यासाठी
01:02 code लिहू.
01:03 mysql dot php उघडली आहे.
01:07 यात php tags वापरून php code लिहिलेला आहे जो phpला जोडला जाईल .
01:13 हे "include" function समजून घेऊ.
01:18 प्रथम डेटाबेसशी जोडणी कशी करायची ते पाहू.
01:23 डेटाबेस webserver वर कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी phpmyadmin application पाहू.
01:38 हा डेटाबेस interface म्हणजे php मध्ये लिहिलेला प्रोग्रॅम किंवा स्क्रिप्ट आहे.
01:44 येथे आपण my databaseमधीलmy service कडे लक्ष देऊ.
01:51 विशेषतः आपला server, My SQL server बघा. हा आपल्याला table information, डेटाबेस आणि serverइत्यादींची माहिती देतो.
02:03 जर तुम्ही php mysqlप्रथमच वापरत असाल तर अशी सुरूवात करणे योग्य ठरते.
02:10 डेटाबेससाठी command line चा वापर करण्यापेक्षा interfaceचा वापर करणे चांगले.
02:17 नवीन शिकणा-यांना command line चा वापर करणे कठीण वाटू शकते.
02:21 आपण येथे डेटाबेसेस बघत आहोत.
02:25 "phpacademy" आणि "phplogin" आपल्याला दिसत आहेत. जे मी दुस-या ट्युटोरियल्समध्ये वापरले आहेत.
02:30 इतर गोष्टी नेहमीच्याच आहेत.
02:32 ह्यात डेटा ठेवतात.
02:33 ते डिलीट करू नका.
02:36 आपल्याला नवे डेटाबेसेस बनवायचे आहेत.
02:39 त्यासाठी हा बॉक्स आहे.
02:41 आता डेटाबेसेस बनवू.
02:43 आपण php academy ह्या डेटाबेसमध्ये काम करणार आहोत.
02:51 तो खूप साधा आहे.
02:53 डेटाबेस असा बनवतात.
02:55 हे सोपे आहे.
02:56 नाव टाईप करून "Create" निवडा .
02:59 My php आधीच बनवली आहे.
03:00 आपण तीच वापरू.
03:02 येथे क्लिक केल्यावर आत अनेक टेबल्स दिसतील.
03:06 phpmyadmin मधे हे असे दाखवले आहे.
03:09 हे guestbook tutorial मधील guestbook आहे.
03:12 ह्या ट्युटोरियलसाठी ह्या डेटाबेसमध्ये "people" नावाचे टेबल बनवू.
03:28 येथील number of fields महत्त्वाचे आहे.
03:31 ते रिकामे ठेवता येत नाही.
03:32 टेबलमधली फिल्डस ही विविध कॉलममध्ये डेटा साठवण्यासाठी वापरली जातात.
03:41 रेकॉर्डस बघताना ID हे numerical value असलेले पहिले फिल्ड असते.
03:47 हा नंबर प्रत्येक रेकॉर्डसाठी वाढत जातो.
03:50 ह्या unique number ने रेकॉर्डशी संपर्क साधता येतो.
03:59 हे primary key म्हणून सेट केले जाते.
04:01 जर तुम्ही डेटाबेसशी परिचित नसाल तर primary key सारख्या संज्ञा समजून घ्या.
04:08 secondary keysबद्दल मी येथे बोलणार नाही. mysql databaseमध्ये हे विविध पध्दतीने वापरता येते.
04:16 जर तुमच्याकडे Microsoft access किंवा इतर database program असल्यास त्याची माहिती वाचा.
04:25 डेटाबेसेस बद्दल माहिती समजून घ्या.
04:29 आपल्याला कुठला व किती डेटा संचित करायचा आहे त्यावर number of fields अवलंबून असतात.
04:36 fields बनवताना मी blank document चा वापर करते.
04:40 आणि fields ची नावे टाईप करते.
04:43 पहिले field नेहमीच ID असते.
04:45 नवीन रेकॉर्ड समाविष्ट करताना हे प्रत्येक वेळी वाढेल.
04:50 म्हणजे पहिल्या रेकॉर्डसाठी 1 नंतर 2, 3, 4 अशाप्रकारे डेटा संचित करेल.
04:58 हे अतिशय उपयोगी फिल्ड आहे.
05:01 आपण "people" ह्या टेबलमध्ये लोकांसंबंधी माहिती ठेवणार आहोत.
05:07 प्रथम firstname, नंतरlastname, नंतर age, नंतर gender टाईप करा.
05:16 हे पान आपण असेच सोडून देऊ.
05:20 आपल्याकडे एकूण 5फिल्डस आहेत.
05:23 येथे मागे जाऊन 5 टाईप करून "Go" वर क्लिक करा.
05:28 आपल्याला लगेचच pop up आलेला दिसेल.
05:32 परंतु field names न दिल्यामुळे आपल्याला ती दिसणार नाहीत.
05:35 आपल्याकडे काही standard आहेत.
05:37 त्यासाठी अनेक पर्यायही आहेत.
05:40 येथे field म्हणजे fieldname
05:41 "ID" हे पहिले फिल्ड.
05:43 टाईप म्हणजे फिल्डमध्ये संचित करण्याचा डेटा टाईप.
05:47 येथे डेटाटाईप निवडणे आवश्यक आहे.
05:50 "varchar" म्हणजे variable characters. त्याची लांबी लिहिणे आवश्यक आहे.
05:57 येथे 25 characters ही लांबी असू शकते.
06:00 250 characters
06:02 किंवा 100 characters
06:04 किंवा 1 character
06:06 आपण केवळ साठवणार असलेल्या डेटाचा टाईप व लांबी लिहित आहोत.
06:14 उदाहरणार्थ हे फिल्ड firstname संचित करेल.
06:19 fieldname मध्ये "firstname" असून "varchar" टाईप आहे.
06:24 500 charactersलिहिण्यात अर्थ नाही कारण नावासाठी येवढ्या लांबीची गरज नाही.
06:33 firstname हे 25 charactersकिंवा
06:37 30 किंवा 35 characters पेक्षा जास्त नसते.
06:42 आपण "firstname" साठी 20 characters ही लेंथ निश्चित करू.
06:48 "ID" हा number असल्यामुळे येथे integer पर्याय निवडू.
06:54 जो self increment होईल.
06:55 1,2,3,4
06:56 रेकॉर्डसची संख्या.
06:57 येथे इतरही काही पर्याय आहेत.
07:02 ही primary key आहे.
07:04 ही सिलेक्ट करू. extra खाली "auto underscore increment" दिसेल.
07:09 हे auto increment
07:11 हे विशिष्ट फंक्शन प्रदान करेल.
07:13 जेव्हा नवीन रेकॉर्ड एंटर करू आपोआप पुढील ID आलेला दिसेल.
07:19 येथे "firstname" आहे.
07:21 "lastname" टाईप करून लांबी 30 निश्चित करू.
07:26 अजून आपल्याकडे काय आहे?
07:28 "age" ज्याचा टाईप integer आहे. तसेच "gender" देखील आहे.
07:34 ठीक आहे.
07:36 "age"ऐवजी "Date of birth" घेऊ.
07:40 हे "Date of birth" आहे.
07:44 हे Date म्हणून सेट करू.
07:46 Date हा डेटाटाईप निवडू आणि ते कसे काम करते ते पाहू.
07:52 Dateची लांबी सांगण्याची गरज नाही.
07:55 आपल्याकडे ह्याचा standard format आहे.
08:00 "gender" साठी "varchar" हा डेटाटाईप व लांबी 1 निश्चित करू.
08:07 आपणmaleसाठी "M" आणि female "F" लिहू शकतो.
08:12 उजवीकडे स्क्रॉल केल्यावर अनेक पर्याय दिसतील.
08:18 येथे टीप लिहिता येते.
08:19 त्यावरून फिल्डची माहिती समजते.
08:22 fieldname डेटाबद्दल अर्थबोध होणारी असावी.
08:26 Save" वर क्लिक केल्यावर "people" हे टेबल तयार झालेले दिसेल.
08:35 तसेच query तयार झालेली दिसेल.
08:38 command line द्वारे काम करताना हे टाईप करावे लागेल.
08:41 graphic user interface वापरून वेळ वाचवता येतो.
08:45 येथे आपल्याला आपली fields, types, collation attributes इत्यादी दिसत आहे.
08:52 येथे default value संचित करता येते. उदाहरणार्थ "Has the user registered?" असे फिल्ड लिहिले जाईल.
09:02 किंवा असेच दुसरे काही तुम्ही default म्हणून लिहू शकता.
09:13 उदाहरणार्थ रजिस्टर करणा-या सर्वांना default, "M" किंवा "F" म्हणजेच पुरूष किंवा स्त्री लिहू शकतो.
09:21 आपणauto increment व इतर गोष्टी येथे बघणार नाही.
09:26 आपण टेबल बनवले आहे. दुस-या भागात php च्या सहाय्याने डेटाबेसमध्ये डेटा कसा भरायचा व वाचायचा ते पाहू.
09:39 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana