PHP-and-MySQL/C2/Loops-While-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:47, 6 May 2013 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: While Loop

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 नमस्कार. आपण लूप स्टेटमेंटच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळी ट्युटोरियल्स बनवणार आहोत.
0:07 त्यामुळे समजण्यासाठी व लूपचा एखादा प्रकार वापरताना संदर्भ बघण्यासाठीही ती अधिक उपयोगी ठरतील.
0:17 या ट्युटोरियलमध्ये आपण WHILE loop बद्दल जाणून घेणार आहोत.
0:21 WHILE loop सुरूवातीला कंडिशन True आहे की Falseहे तपासते. त्यानुसार code कार्यान्वित करते.
0:38 उदाहरणार्थ आपण येथे WHILE loop सुरू करू या आणि येथे कंडिशन देऊ या. तसेच हा आपला codeचा block आहे.
0:51 आपण आपला ब्लॉक महिरपी कंसात दर्शवणार आहोत.
0:56 येथे आपली कंडिशन लिहू या. उदाहरणार्थ 'IF statement' मध्ये 1==1
1:04 आपण 'test' किंवा 'loop' एको करू या.
1:07 येथे लूप असे लिहून नंतर ब्रेक असे लिहू या. आता 1==1 असेपर्यंत ते लूप करत राहिल.
1:17 आपण हे तपासून बघू.
1:22 बहुधा आपला ब्राऊजर काम करणे बंद करणार आहे! कारण एक बरोबर एक असेपर्यंत म्हणजेच अगणित वेळा हे लूप चालू राहणार आहे . कारण 1बरोबर1 कायमच असणार आहे.
1:34 लूप सतत कार्यान्वित होत असल्यामुळे आपला ब्राऊजर क्रॅश होईल.
1:40 आता while a variable, 'num' is smaller or equal to 10 असे टाईप करून echo च्या खाली 'num ++' असे टाईप करा.
1:57 '++' हा arithmetical operator आहे. आपला num व्हेरिएबल1 ने वाढला. म्हणजेच 'num =num +1' असे लिहिण्यासारखे आहे.
2:16 म्हणजे हा num व्हेरिएबल घेईल आणि त्याची व्हॅल्यू num plus 1 अशी करेल.
2:23 हा पुन्हा arithmetical operator आहे. त्यामुळे येथे काय होणार आहे ते पाहू.
2:29 आपल्याकडे 'num' lesser than or equal to '10' ही कंडिशन आहे. जर ही खरी असेल तर एको लूप होईल आणि वरील numया व्हेरिएबल मध्ये 1ने वाढ होईल.
2:41 त्यासाठी आता आपण येथे numया व्हेरिएबलला 1ही व्हॅल्यू देऊ या म्हणजे 1वर एकदा लूप होईल आणि मग दोन, तीन, चार अशा प्रकारे 10 पर्यंत होऊन ते थांबेल.
3:01 यानंतर याच्याखालील code कार्यान्वित होईल.
3:06 म्हणजे जर येथे 1असेल तर आपल्याला Loop असे 1,2,3,4,5,6,7,8,9,10 वेळा एको झालेले दिसेल.
3:20 नीट समजण्यासाठी आपण Loop 1असा रिझल्ट मिळवू. त्यासाठी शेवटी num concatenate करू या.
3:27 अधिक सोपे करण्यासाठी आपण num हे व्हेरिएबल आतील बाजूस लिहू या म्हणजे आपल्याला ते नीट वाचता येईल.
3:37 असे आपल्याला Loop 1मिळेल. आणि येथे 1मिळवला जाऊन Loop 2, अजून 1 मिळाल्यावर Loop3 असे करतLoop10 पर्यंत मिळेल.
3:49 आता ही फाईल उघडून रिफ्रेश करू या. आपल्याला हवा असलेला रिझल्ट म्हणजेच Loop 1पासून Loop10 पर्यंत आपण बघू शकतो.
3:58 ही व्हॅल्यू बदलून 100 करा. रिफ्रेश केल्यावर हा Loop 100 पर्यंत गेलेला दिसेल. जेवढा मोठा नंबर तेवढा लूपला लागणारा वेळ जास्त.
4:08 व्हॅल्यू 6000 करून पुन्हा रिफ्रेश करा. हे बराच वेळ घेईल. आपल्याला 6000 पर्यंत आकडे मिळतील. असे हे अतिशय कार्यक्षम आहे.
4:20 हे array ला जोडून आपण त्यातील अक्षरे एको करू शकतो.
4:27 प्रत्येक व्हॅल्यू एको करण्यासाठी आपण लूपचा वापर करू.
4:32 तुम्ही हे करून बघा. आपण याचा पुढील ट्युटोरियलमध्ये समावेश करू या.
4:40 ही प्राथमिक रचना असल्यामुळे मी तुम्हाला असे सूचविते की येथे 'max' नामक व्हेरिएबल बनवू या. आणि त्याची व्हॅल्यू आधी सेट करू या.
4:53 हा code तसेच कार्य करतो आणि सुटसुटीतही आहे. हे सर्व तुम्हाला इथे declare करून, इथून वापरता येईल.
5:03 अनेक पर्यायांपैकी, WHILE लूप कंडिशन सुरूवातीस तपासत असल्याने प्रोग्रॅम समजण्यास व बदल करण्यास सोपा होतो.
5:17 ही कंडिशन True असल्यास हा code असलेला ब्लॉक कार्यान्वित होऊन आपल्याला अपेक्षित रिझल्ट 'echo ' करते.
5:24 मग आपल्या व्हेरिएबलमध्ये वाढ होते हे पहा. व्हेरिएबलची वाढ न झाल्यास लूप संपणारच नाही.
5:32 या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana