PERL/C2/Arrays/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:11, 9 June 2014 by Sakinashaikh (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Arrays

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00.01 पर्लमधील Arraysवरील पाठात स्वागत .
00.06 यात शिकणार आहोत
00.09 ऍरेचा इंन्डेक्स
00.11 ऍरेची लेंथ
00.13 ऍरेचे घटक ऍक्सेस करणे
00.16 ऍरे साठी लूप तयार करणे.
00.18 सिक्वेंन्शियल ऍरे
00.20 आणि ऍरे स्लायसिंग
00.22 येथे मी उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे.
00.30 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.34 तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता.
00.37 पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.
00.43 लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00.48 संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.54 ऍरे हे साधे डेटा स्ट्रक्चर आहे ज्यामधे कुठल्याही डेटा टाईपच्या घटकांचा समावेश होतो.
00.59 ऍरे इंडेक्सची सुरूवात नेहमी शून्यापासून होते.
01.03 पर्लमधे ऍरेची लांबी किंवा आकार घोषित करणे गरजेचे नाही.
01.08 ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते.
01.15 ऍरे घोषित करण्याचा सिन्टॅक्स असा आहे
01.18 @myArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma single quote abc single quote comma 10.3 कंस पूर्ण semicolon
01.31 ऍरेचा शेवटचा इंडेक्स मिळवण्यासाठी ही कमांड आहे-
01.35 $#myArray
01.38 सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
01.42 टर्मिनल उघडून टाईप करा
01.44 gedit arrayIndex dot pl space ampersand
01.50 आणि एंटर दाबा.
01.52 हे geditor मधे arrayIndex dot pl ही फाईल उघडेल.
01.57 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
02.02 येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केलेला आहे.
02.07 ऍरे इंडेक्सची सुरूवात शून्यपासून होत असल्याने शेवटची इंडेक्स व्हॅल्यू 4 असेल.
02.14 म्हणजेच एकूण घटक म्हणजे 5, वजा 1.
02.18 Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
02.22 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी
02.26 टाईप करा- perl arrayIndex dot pl
02.30 आणि एंटर दाबा.
02.32 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
02.37 आता पर्लमधे ऍरेची लेंथ कशी मिळवायची ते पाहू.
02.41 ऍरेची लेंथ मिळवण्याच्या अनेक पध्दती आहेत.
02.46 ऍरेचा इंडेक्स + 1 म्हणजेच $#array + 1
02.53 पर्लच्या इनबिल्ट स्केलर फंक्शन द्वारे म्हणजेच scalar कंसात @array कंस पूर्ण
03.02 स्केलर व्हेरिएबलला ऍरे असाईन करा म्हणजेच $arrayLength = @array
03.09 सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरे लेंथ बद्दल अधिक जाणून घेऊ.
03.14 टर्मिनलवर जाऊन टाईप करा
03.18 gedit arrayLength dot pl space ampersand
03.24 एंटर दाबा.
03.27 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
03.32 येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केला आहे.
03.38 त्यामुळे 5 हे आऊटपुट मिळेल.
03.41 पर्लमधील ऍरेची लेंथ काढण्याच्या ह्या विविध पध्दती येथे हायलाईट करून दाखवल्या आहेत.
03.47 लक्षात घ्या कॉमाद्वारे प्रिंट स्टेटमेंटमधे आऊटपुट कंकॅटीनेट केले आहे.
03.53 Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
03.57 आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
03.59 टर्मिनलवर जाऊन टाईप करा-
04.02 perl arrayLength dot pl आणि एंटर दाबा.
04.07 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
04.12 आता ऍरेतील प्रत्येक घटक कसा ऍक्सेस करायचा ते समजून घेऊ.
04.18 ऍरेचा घटक ऍक्सेस करण्यासाठी Indexing चा वापर केला जातो.
04.22 उदाहरणाद्वारे ऍरेचे घटक ऍक्सेस करण्याबद्दल जाणून घेऊ.
04.27 पहिल्या पोझिशनवरील
04.28 शेवटच्या पोझिशनवरील
04.29 कुठल्याही पोझिशनवरील
04.32 टर्मिनलवर जाऊन टाईप करा-
04.35 gedit perlArray dot pl space ampersand
04.42 आणि एंटर दाबा.
04.45 दर्शवलेला कोड टाईप करा.
04.49 लक्षात घ्या-
04.50 myArray हे @ (at the rate) चिन्हाद्वारे घोषित केले आहे.
04.54 पण ऍरे घटक ऍक्सेस करण्यासाठी $ (dollar) चिन्ह वापरावे लागते.
04.59 कुठल्याही पोझिशनचा घटक मिळवण्यासाठी ऍरेला इंडेक्स प्रदान करावा लागतो.
05.07 येथे myArrayचा पहिला घटक मिळवण्यासाठी ,
05.11 इंडेक्स म्हणून शून्य प्रदान केला आहे.
05.16 myArray चा शेवटचा घटक मिळवण्यासाठी myArrayचा शेवटचा इंडेक्स प्रदान केला आहे.
05.24 आपण याबद्दल आधीच जाणून घेतले होते.
05.28 Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
05.30 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा-
05.36 perl perlArray dot pl
05.41 आणि एंटर दाबा.
05.43 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05.47 आता, ऍरेच्या प्रत्येक घटकातून जाणारे लूप कसे करायचे ते पाहू.
05.52 ऍरेच्या सर्व घटकांतून जाणारे लूप दोन प्रकारे बनवतात -
05.56 for loop द्वारे
05.58 foreach loop द्वारे
06.01 ही लूप्स वापरून ऍरेवर आयटरेशन कसे करायचे ते सँपल प्रोग्रॅमद्वारे पाहू.
06.07 टर्मिनलवर जाऊन टाईप करा
06.11 gedit loopingOverArray dot pl space ampersand
06.17 आणि एंटर दाबा .
06.20 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
06.24 येथे आपण इंडेक्स आयटरेट करून ऍरेतील सर्व घटक प्रिंट करणार आहोत.
06.31 व्हेरिएबल i ची व्हॅल्यू ऍरेच्या शेवटच्या इंडेक्सला पोहोचेपर्यंत for लूप कार्यान्वित होत राहिल.
06.38 येथे foreach लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी कार्यान्वित होईल.
06.46 ऍरे त्याच्या शेवटच्या घटकावर पोहोचल्यावर ते foreach लूप मधून बाहेर पडेल.
06.53 टीप: तुम्हाला for आणि foreach लूप्सचे ज्ञान नसेल,
06.58 तर संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
07.04 आता Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
07.07 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
07.12 perl loopingOverArray dot pl
07.15 आणि एंटर दाबा.
07.19 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07.24 पर्लमधे आपण सिक्वेन्शियल ऍरे घोषित करू शकतो.
07.28 @alphaArray = कंसात a dot dot d कंस पूर्ण semicolon
07.37 म्हणजेच alphaArray मधे 'a', 'b', 'c' आणि 'd' हे घटक समाविष्ट होतील.
07.44 तसेच @numericArray equal to कंसात 1 dot dot 5 कंस पूर्ण semicolon जो @numericArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma 4 comma 5 सारखाच आहे.
08.03 पर्ल आपल्याला ऍरे slicing देखील प्रदान करते.
08.06 येथे ऍरेचा काही भाग काढून तो नव्या ऍरेमधे ठेवला जात आहे.
08.13 @array = 19 comma 23 comma 56 comma 45 comma 87 comma 89 कंस पूर्ण semicolon
08.27 @newArray = @array open square bracket 1 comma 4 close square bracket semicolon
08.38 slicingनंतर ऍरे असा दिसेल.
07.38 @newArray = कंसात 23 comma 87 कंस पूर्ण semicolon
08.51 थोडक्यात,
08.52 सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण
08.55 ऍरेचा इंडेक्स शोधणे,
08.57 त्याची लेंथ मिळवणे,
08.59 त्याचे घटक ऍक्सेस करणे,
09.01 ऍरे साठी लूप तयार करणे
09.03 सिक्वेंन्शियल ऍरे
09.05 ऍरे Slicing जाणून घेतले.
09.07 आता असाईनमेंट.
09.10 इंद्रधनुष्याच्या रंगाचा ऍरे घोषित करा.
09.13 ह्या ऍरेचा चौथा घटक प्रिंट करा.
09.16 ह्या ऍरेची लेंथ आणि शेवटचा इंडेक्स प्रिंट करा.
09.19 for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून लूप करा
09.25 असा ऍरे घोषित करा @myArray = कंसात 1..9 कंस पूर्ण semicolon आणि नंतर ऍरे slicing द्वारे वरील ऍरेतून विषम संख्यांचा ऍरे बनवा.
09.41 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.44 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.48 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.58 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.02 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.13 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.31 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10.35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
10.37 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana, Sakinashaikh