OpenFOAM/C3/Downloading-and-installing-Salome/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:09, 3 October 2017 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Downloading and Installing Salome वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात Salome डाउनलोड करून इन्स्टॉल करण्याविषयी जाणून घेणार आहोत.
00:15 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12. 10 आणि Salome वर्जन 6.6.0 वापरत आहे.
00:26 आपण Salome बद्दल जाणून घेऊ. हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. न्युमरिकल सिम्युलेशनसाठी प्री आणि पोस्ट प्रोसेसिंगमधे याचा उपयोग केला जाऊ शकतो. याचा फायदा OpenFOAM मधे blockMesh युटिलिटीपेक्षा गुंतागुंतीची 'CAD' जॉमेट्री काढण्यासाठी होतो.
00:47 Salome इन्स्टॉल करण्यासाठी फायरफॉक्स ब्राउजर उघडा.
00:52 लिंकबार मधे http://www.salome-platform.org टाईप करून एंटर दाबा. आता आपण Salome च्या वेबसाईटवर आहोत.
01:07 डाव्या बाजूला आपल्याला Navigation बार दिसेल.
01:12 नेव्हिगेशन बारच्या खालच्या भागातील New user पर्यायावर क्लिक करा.
01:22 हे तुमच्या वैयक्तिक माहितीची विचारणा करणा-या विंडोवर तुम्हाला घेऊन जाईल.
01:32 सर्व वैयक्तिक माहिती भरून झाल्यावर खाली असलेल्या Register टॅबवर क्लिक करा.
01:40 "you have been registered" हा मेसेज दाखवणा-या स्क्रीनवर घेऊन जाईल. हे असे देखील दाखवते की, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला इमेल अकाउंटवर लॉगिन करणे गरजेचे आहे.
01:58 तुमच्या इमेल अकाउंटमधील Salome कडून आलेला इमेल उघडा.
02:06 त्यामधे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
02:12 ही लिंक आपल्याला एका विंडोवर घेऊन जाईल जिथे आपण पासवर्ड सेट करायचा आहे.
02:19 पासवर्ड दिल्यावर आणि नंतर त्याची खात्री केल्यावर Set my password वर क्लिक करा.
02:26 हे "Your password has been set successfully." असा मेसेज दाखवणा-या विंडोवर घेऊन जाईल. आता नव्या पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करू शकतो.
02:37 NAVIGATION बारच्या खालील भागात तुम्ही लॉगिन नेम आणि पासवर्ड देऊन लॉगिन करू शकता.
02:46 आता नेव्हिगेशन बारमधे Downloads वर क्लिक करा.
02:54 हे आपल्याला एका पेजवर घेऊन जाईल जिथे डाउनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या लिनक्स प्लॅटफॉर्मसाठी विविध बायनरीज दिसतील.
03:05 मी 64-bit architecture वापरत असल्यामुळे Debian 6.0 Squeeze 64 bit binary डाउनलोड करणार आहे.
03:15 त्यावर क्लिक करा. Save File पर्यायावर क्लिक करून OK वर क्लिक करा. हे डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
03:27 आता खाली स्क्रॉल करा. आपल्याला Universal Binaries for Linux दिसेल.
03:32 आपल्याला योग्य वर्जन डाउनलोड करणे गरजेचे आहे. मी 64 bit Linux डाउनलोड करत आहे.
03:40 पुन्हा एकदा Save file वर क्लिक करून Ok वर क्लिक करा. हे थोडा वेळ घेईल. मी फाईल्स आधीच डाउनलोड करून घेतल्या आहेत.
03:51 आता Home फोल्डर उघडा. डाव्या बाजूला असलेल्या पर्यायांमधे Downloads वर जा.
03:57 येथे डाउनलोड झालेल्या फाईल्स दिसतील. एक tar फाईल आणि दुसरी self-extracting फाईल आहे.
04:05 या दोन्ही फाईल्स कॉपी करा.
04:09 आता Home फोल्डरवर परत जाऊन त्या दोन्ही फाईल्स येथे पेस्ट करा.
04:14 आता install Wizzard टार फाईलवर डबल क्लिक करा.
04:20 नवी विंडो उघडेल. वरच्या भागात असलेल्या Extract मेनूवर क्लिक करा.
04:25 आता Extract टॅबवर क्लिक करा. एक्स्ट्रॅक्शन पूर्ण झाल्यावर Quit वर क्लिक करा.
04:34 Home फोल्डरमधे Intall Wizzard एक्स्ट्रॅक्ट केले गेले आहे.
04:38 आता Home फोल्डर मिनीमाईज करा.
04:41 कमांड टर्मिनल उघडा.
04:44 "ls" टाईप करून एंटर दाबा. आपण Home फोल्डरमधे आहोत.
04:51 Install Wizard फोल्डरमधे जाण्यासाठी टाईप करा cd (space) (capital) I आणि फाईलचे संपूर्ण नाव आपोआप मिळवण्यासाठी टॅबचे बटण दाबा. एंटर दाबा.
05:05 "ls" टाईप करून एंटर दाबा.
05:08 इन्स्टॉलेशनला सुरूवात करण्यासाठी . (dot) / (slash) runInstall (space) - (hyphen) b टाईप करून एंटर दाबा.
05:24 debian इन्स्टॉलसाठी 1 (one) टाईप करा. इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल.
05:31 हे इन्स्टॉल झाल्यावर टर्मिनल बंद करा आणि नवे टर्मिनल उघडा.
05:38 आता Universal binaries' इन्स्टॉल करणार आहोत. आपण आधीच Home फोल्डरमधे आहोत.
05:44 आता . (dot) / (slash) (capital) S टाईप करून फाईलचे नाव आपोआप मिळवण्यासाठी टॅबचे बटण दाबा आणि एंटर दाबा.
05:55 पुन्हा एकदा एंटर दाबा.
05:58 आपल्याला Salome फ्रेंचमधे डाउनलोड करायचे का असे विचारले जाईल. नाही उत्तर असल्यास 'N' टाईप करून एंटर दाबा.
06:06 इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. ह्याला थोडा वेळ लागू शकतो.
06:12 इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर टर्मिनल बंद करा.
06:16 डेस्कटॉपवर Salome चा आयकॉन दिसेल. Salome सॉफ्टवेअर उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
06:25 Salome सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले असून ते वापरण्यासाठी तयार आहे. आपण ते वापरू शकतो.
06:33 हे सॉफ्टवेअर बंद करू.
06:36 या पाठात Salome सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याबद्दल शिकलो.
06:40 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

06:49 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

07:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे:
http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
07:18 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana