OpenFOAM/C3/Creating-and-meshing-a-curved-pipe-geometry-in-Salome-for-OpenFOAM/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:26, 27 December 2017 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFOAM वापरून Creating and meshing a Curved-Pipe Geometry in Salome वरील पाठात आपले स्वागत.
00:10 या पाठात शिकणार आहोत:

Salome मधे curved pipe geometry तयार करणे Salome मधे जॉमेट्री मेश करणे submesh च्या सहाय्याने मेशमधे बदल करणे

00:23 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12. 10 आणि Salome वर्जन 6.6.0 वापरत आहे.
00:35 या पाठाच्या सरावासाठी तुमच्या कॉम्प्युटरवर Salome इन्स्टॉल असणे गरजेचे आहे. नसल्यास तुम्ही Downloading and Installing Salome वरील पाठाचा संदर्भ घेऊ शकता.
00:51 डेस्कटॉपवरील Salome आयकॉनवर क्लिक करून Salome सॉफ्टवेअर उघडा.
00:57 मॉड्युल्स बारमधील जॉमेट्री मॉड्युलवर क्लिक करा.
01:00 आणि New वर क्लिक करा.
01:03 वरील मेनू बारमधे New Entity वर क्लिक करा.
01:06 त्यातील ड्रॉपडाउन पर्यायांमधे Basic वर जाऊन नंतर 2d sketch पर्याय निवडा.
01:12 डिफॉल्ट रूपात पहिला पॉईंट झिरो झिरो आहे. Apply क्लिक करा. आता 'Y' च्या पुढे 30 टाईप करा.
01:22 आणि Apply क्लिक करा. आता Arcs हे दुसरे Element Type निवडा.
01:26 Type साठी Direction आणि Direction मधे Tangent हे पर्याय निवडा.
01:32 रेडियसची व्हॅल्यू -10 (वजा दहा) आणि अँगलची व्हॅल्यू 90 टाईप करा. Apply क्लिक करा. आता Element Type मधे Lines सिलेक्ट करा.
01:43 Type साठी Direction आणि Direction मधे Tangent हे पर्याय निवडा.
01:47 लेंथची व्हॅल्यू 30 टाईप करून Apply वर क्लिक करा आणि Close वर क्लिक करा.
01:54 स्पष्ट दिसण्यासाठी मी झूम-इन करत आहे.
01:58 ऑब्जेक्ट ब्राउजरमधे जॉमेट्री ट्री उघडा. आपल्याला sketch_1 दिसेल.
02:04 स्केच हाईड करण्यासाठी आपण चेक ऑफ आणि पुन्हा बघण्यासाठी चेक ऑन करू शकतो.
02:09 आता New Entity खालील Blocks मधील Divided Disk हा पर्याय निवडा.
02:16 ओरिएंटेशनमधे OZX हा पर्याय निवडून Radius मधे 1 टाईप करा.
02:21 आता Apply and Close वर क्लिक करून New Entity खालील Generation मधील Extrusion Along Path पर्याय निवडा.
02:31 बेस ऑब्जेक्टसाठी Divided Disk_1 आणि पाथ ऑब्जेक्टसाठी Sketch_1 हे पर्याय जॉमेट्री ट्री मधून निवडा.
02:38 Apply and Close वर क्लिक करा. Pipe_1 तयार झाल्याचे दिसेल.
02:45 आता New Entity खालील Explode पर्याय निवडा. Main Object साठी Pipe_1 निवडा. Sub-shapes Type च्या ड्रॉपडाऊन मेनूमधून Face पर्याय निवडा. Select sub-shapes चा चेकबॉक्स निवडा.
03:03 मी ही विंडो हलवत आहे आणि वरच्या बाजूला स्क्रॉल करून हे झूम-इन करून घेत आहे. या Rotation मेनूवर क्लिक करून आपण ऑब्जेक्ट फिरवू शकतो.
03:16 ऑब्जेक्ट फिरवण्यासाठी माऊसचे डावे बटण दाबून ठेवा आणि माऊस वरच्या बाजूला सरकवा. स्क्रीनवर दाखवलेल्या जागी माऊसचा पॉईंटर न्या.
03:28 माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.
03:30 आता माऊस ड्रॅग करा म्हणजे सर्व इनलेट फेसेस त्या आयताकृती भागात येतील.
03:37 माऊसचे बटण सोडा.
03:41 आता सर्व inlet faces सिलेक्ट झाल्याची खात्री करून घेण्यासाठी Show only selected हे बटण दाबा.
03:49 Apply and Close वर क्लिक करा. आपल्याला जॉमेट्री ट्रीमधे पाच फेसेस एक्सप्लोड झालेले दिसतील.
03:58 आता New Entity खालील ग्रुपमधील Create पर्यायावर क्लिक करा.
04:05 Main shape साठी जॉमेट्री ट्री मधून Pipe_1 निवडा.
04:11 Shape Type साठी Face पर्याय निवडा.
04:16 आता जॉमेट्री ट्री मधून पाच फेसेस सिलेक्ट करा. Add वर क्लिक करून ते समाविष्ट करून घ्या. ग्रुपला inlet नाव द्या.
04:30 Apply and close वर क्लिक करा. inlet हा ग्रुप तयार झालेला दिसेल.
04:38 pipe च्या दुस-या टोकासाठी हीच कृती पुन्हा करा. आऊटलेट म्हणून त्या फेसेसचा ग्रुप बनवा.
04:45 मी outlet face ग्रुप तयार केला आहे. आता ऑब्जेक्ट मेश करण्यासाठी मॉड्युल्सच्या ड्रॉपडाऊनमधे जाऊन Mesh निवडा.
04:57 आता वरील मेनूबारमधील Mesh खालील Create Mesh पर्यायावर क्लिक करा.
05:04 जॉमेट्रीसाठी जॉमेट्री ट्रीमधून Pipe_1 हा पर्याय निवडा.
05:09 Assign a set of hypotheses बटणावर क्लिक करून 3D: Automatic Hexahedralization वर क्लिक करा.
05:20 Number of Segments पुढे 12 टाईप करा.
05:23 OK वर क्लिक करून Apply and Close वर क्लिक करा. जॉमेट्री ट्री मधे Mesh_1 दिसेल.
05:32 त्यावर राईट क्लिक करा. Compute वर क्लिक करा. विंडो बंद करा.
05:40 मेश तयार झालेला दिसेल.
05:43 मी झूम-इन करत आहे.
05:45 हा panning चा पर्याय वापरून आपण ऑब्जेक्ट हलवू शकतो.
05:51 आता आपण फ्लो डायरेक्शनमधे मेश रिफाईन करणार आहोत.
05:56 त्यासाठी मॉड्युल्सच्या ड्रॉपडाऊन मेनूमधे जॉमेट्री हे मॉड्युल निवडा.
06:03 panning आणि rotation हे पर्याय वापरून योग्य व्ह्यू मिळवू. मी झूम-आऊट करत आहे.
06:15 New Entity मधे जाऊन Explode पर्याय निवडा.
06:20 Main Object साठी Pipe_1 पर्याय निवडा.
06:24 Sub-shapes Type साठी Edge पर्याय निवडा.
06:29 Select sub-shapes चा चेकबॉक्स निवडा.
06:34 ही विंडो मी कोप-यात हलवत आहे.
06:37 आता स्क्रीवर दाखवलेल्या ठिकाणी माऊसचा पॉईंटर न्या. माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.
06:43 आता विंडोच्या आत सर्व आऊटलेट फेस edges येतील अशाप्रकारे माऊस ड्रॅग करा.
06:50 माऊसचे डावे बटण सोडा. सिलेक्ट झालेल्या edges चा रंग पांढरा दिसेल.
06:57 Hide selected वर क्लिक करा. अशाचप्रकारे आणखी 3 face edges आहेत, ज्या आपल्याला एकेक सिलेक्ट करून हाईड करायच्या आहेत.
07:14 यानंतर आपल्याला फ्लो डायरेक्शनमधील केवळ edges बघायच्या आहेत. मी झूम-आऊट करून ऑब्जेक्ट हलवत आहे.
07:25 या सर्व edges याच पध्दतीने सिलेक्ट करा आणि Apply and Close वर क्लिक करा.
07:33 जॉमेट्री ट्री मधे outlet खाली 24 edges एक्सप्लोड झालेल्या बघू शकतो.
07:40 edges ग्रुप करण्यासाठी New Entity खालील Group मधील Create पर्याय निवडा.
07:46 Shape Type मधे Edge पर्याय निवडा.
07:50 Main Shape मधे जॉमेट्री ट्री मधून Pipe_1 हा पर्याय निवडा.
07:56 आता या सर्व edges सिलेक्ट करा आणि त्या समाविष्ट करण्यासाठी Add बटणावर क्लिक करा.
08:04 ग्रुपला flow edges असे नाव द्या. Apply and close वर क्लिक करा.
08:11 flowedges हा ग्रुप तयार झालेला दिसेल.
08:17 मॉड्युल्स ड्रॉपडाउनमधून Mesh हे मॉड्युल निवडा.
08:22 Mesh_1 राईट क्लिक करा आणि Create Sub-mesh वर क्लिक करा.
08:28 जॉमेट्रीमधे flowedges हा पर्याय निवडा.
08:33 अल्गोरिदममधे wire discretization हा पर्याय निवडा.
08:37 आता योग्य Hypothesis निवडण्यासाठी ड्रॉपडाऊन मेनूच्या उजवीकडील पहिले बटण दाबा.
08:47 Nb. Segments वर क्लिक करा.
08:50 नंबर ऑफ सेगमेंटसपुढे 30 टाईप करा.
08:54 Ok क्लिक करून Apply and Close वर क्लिक करा.
09:00 आता Mesh_1 वर क्लिक करून Compute वर क्लिक करा. Refined मेश तयार होईल. विंडो बंद करा.
09:12 फ्लो डायरेक्शनमधील रिफाईन झालेला मेश आपण बघू शकतो.
09:18 हे काम सेव्ह करण्यासाठी फाईलखालील Save As वर क्लिक करा. File name पुढे "Curved-geometry" असे टाईप करा.
09:28 मी ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करत आहे. Save वर क्लिक करा. Salome मिनिमाईज करून घ्या.
09:37 फाईल Curved-geometry.hdf नावाने सेव्ह झालेली दिसेल.
09:43 या पाठात शिकलो:

Salome मधे curved pipe geometry तयार करणे. Salome मधे जॉमेट्री मेश करणे. submesh च्या सहाय्याने मेशमधे बदल करणे.

09:55 असाईनमेंट म्हणून- बाहेरील व्यास व आतील व्यासात 6 एककांचा फरक असलेला पाईप तयार करा. त्याचा अँगल ऑफ बेंट बदला.
10:06 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:18 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

10:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro

10:57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana