OpenFOAM/C2/Creating-simple-geometry-in-OpenFOAM/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:03, 18 October 2017 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या creating simple geometry in OpenFOAM वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण जाणून घेणार आहोत-
00:08 सिंपल जॉमेट्री तयार करणे.
00:11 paraview मधे जॉमेट्री बघणे.
00:15 या पाठासाठी मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 10.04, OpenFOAM वर्जन 2.1.0, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:27 CFD पूर्व-प्रक्रियेच्या भागात जॉमेट्री तयार करून त्याचे मेशिंग (meshing) करावे लागते.
00:33 उदाहरणादाखल आपण मागील पाठातील Lid driven cavity ही केस घेऊ या.
00:38 त्यासाठी मागील पाठातील path घेऊ.
00:40 मी आधीच कमांड टर्मिनल उघडले आहे आणि lid driven cavity चा path टाईप केला आहे.
00:48 येथे '0, constant' आणि 'system' हे तीन फोल्डर्स आहेत. 'Geometry' ची फाईल 'constant' फोल्डरमधील 'polymesh' फोल्डरमधे आहे.
00:55 कमांड टर्मिनलमधे टाईप करा: cd space constant आणि एंटर दाबा.
01:03 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
01:06 यामधे 'polyMesh' नावाचा आणखी एक फोल्डर आहे.
01:10 आता cd space polymesh टाईप करून एंटर दाबा.
01:18 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
01:22 यामधे 'blockMeshDict' नावाची 'geometry' फाईल उपलब्ध आहे.
01:26 'blockMeshDict' ही फाईल तुमच्या पसंतीच्या एडिटरच्या सहाय्याने उघडा.
01:30 टर्मिनलवर टाईप करा: gedit space blockMeshDict( लक्षात घ्या M आणि D हे कॅपिटलमधे लिहिले आहेत) आणि एंटर दाबा.
01:45 आपण हे capture area मधे ड्रॅग करून घेऊ.
01:49 हे मिनिमाईज करा.
01:53 स्लाईडवर परत जाऊ.
01:55 openfoam मधे संपूर्ण geometry ब्लॉक्समधे विभागलेली आहे.
01:59 आकृतीत दाखवल्याप्रमाणे ब्लॉकसना 0 (zero) पासून सुरूवात करून नंबर दिले गेले आहेत.
02:08 लक्षात घ्या, OpenFOAM मधे 2D जॉमेट्री तयार करताना आपल्याला z अक्षावर युनिट सेल थिकनेसची व्हॅल्यू देणे गरजेचे असते.
02:19 lid driven cavity ची लांबी 1 आणि उंची 1 आहे. स्लाईड मिनीमाईज करू.
02:29 तुमच्या डेस्कटॉपवर एक रिकामी फाईल तयार करण्यासाठी राईट क्लिक करून क्रिएट डॉक्युमेंटमधील Empty फाईलवर क्लिक करा. त्याला 'blockMeshDict' असे नाव द्या. (लक्षात घ्या M आणि D येथे कॅपिटलमधे आहेत)
02:48 ही फाईल उघडा. lid driven cavity 'blockMeshDict' फाईल मधील मूळ डेटा कॉपी करून तो नव्या 'blockMeshDict' फाईलमधे लाईन 0 वर पेस्ट करा.
02:59 वरती स्क्रॉल करून लाईन 0 पासून 'convertTometers' पर्यंत कॉपी करून येथे पेस्ट करा.
03:15 खाली स्क्रॉल करा. आता 'converttometers' नंतर थोडी स्पेस सोडा.
03:21 ही जॉमेट्री मीटर्समधे असल्यामुळे येथे 1 टाईप करा. सेमीकोलन देऊन एंटर दाबा.
03:30 पुन्हा एंटर दाबा. फाईलमधे टाईप करा "vertices" आणि एंटर दाबा.
03:39 ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा.
03:43 टॅबचे बटण दाबा. पॉईंट 0 पासून सुरूवात करा, ओपन क्लोज ब्रॅकेटस समाविष्ट करून टाईप करा,
03:52 0 space 0 space 0 एंटर दाबा. पुन्हा टॅबचे बटण दाबून टाईप करा ओपन व क्लोज ब्रॅकेटस.
04:02 धन x अक्षावर पुढे point 1 वर जा आणि 1 space 0 space 0 टाईप करून एंटर दाबा.
04:12 पुन्हा टॅबचे बटण दाबा आणि ओपन क्लोज ब्रॅकेट टाईप करा. धन x-y plane मधे पुढे point 2 वर जा आणि 1 space 1 space 0 टाईप करून एंटर दाबा.
04:26 पुन्हा टॅबचे बटण दाबा. ओपन क्लोज ब्रॅकेट टाईप करा. धन y अक्षावर तिसरा बिंदू देण्यासाठी 0 space 1 space 0 टाईप करून एंटर दाबा.
04:39 पुन्हा टॅबचे बटण दाबा. ओपन क्लोज ब्रॅकेटमधे front face वर चौथा पॉईंट देण्यासाठी 0 space 0 space 0.1 टाईप करून एंटर दाबा.
04:51 अशा प्रकारे धन z अक्षावर 1 युनिट व्हॅल्यू असलेले इतर पॉईंटस द्या.
04:56 क्लोज ब्रॅकेट टाईप करून त्यानंतर सेमीकोलन द्या. एंटर दाबून पुन्हा एकदा एंटर दाबा.
05:03 vertices च्या खाली ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स टाईप करून एंटर दाबा. ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा.
05:16 स्लाईडसवर परत जाऊ.
05:19 लक्षात घ्या Lid driven cavity हा एक सिंगल ब्लॉक म्हणून घेण्यात आला आहे.
05:24 'blockmeshdict' वर परत जाऊ.
05:27 ब्लॉकसाठीचे पॉईंट क्लॉकवाईज पध्दतीने टाईप करा.
05:31 येथे आपण मेशिंगसाठी hexa hedral ब्लॉक्स वापरत आहोत.
05:34 आता "hex" टाईप करा. थोडी स्पेस सोडा. कंसात, 0 space 1 2 3 4 5 6 7 टाईप करून पुन्हा थोडी स्पेस सोडा.
05:53 लक्षात घ्या, एकापेक्षा अनेक ब्लॉक्स असल्यास पॉईंटस अनेक असतील.
05:58 त्यानंतर x, y आणि z डायरेक्शन्समधे grid पॉईंटस द्या.
06:02 ओपन क्लोज ब्रॅकेटसमधे 30 space 30 space 1 असे टाईप करा. थोडी स्पेस सोडा. तुम्ही ग्रीडमधे गरजेनुसार बदल करू शकता.
06:16 z अक्षामधे ग्रीड पॉईंट 1 घेता येऊ शकतो.
06:22 आता काही स्पेस सोडून "simple Grading" असे टाईप करा. थोडी स्पेस सोडून ओपन क्लोज ब्रॅकेटमधे 1 space 1 space 1 टाईप करा.
06:36 हे x, y आणि z डायरेक्शनमधील ग्रीड स्पेसिंग आहे. एंटर दाबा.
06:43 क्लोज ब्रॅकेट समाविष्ट करून पुढे सेमीकोलन द्या आणि एंटर दाबा.
06:48 पुन्हा एंटर दाबा. आता "edges" टाईप करून एंटर दाबा.
06:55 ही सिंपल जॉमेट्री असल्यामुळे edges रिकाम्या ठेवता येऊ शकतात.
07:00 ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. क्लोज ब्रॅकेट देऊन पुढे सेमीकोलन द्या आणि एंटर दाबा.
07:07 पुन्हा एंटर दाबा. edges खाली बाऊंडरी कंडिशन्स आहेत.
07:11 येथे फेसेससाठी बाऊंडरी नेम्स देणे गरजेचे आहे.
07:15 "boundary" टाईप करून एंटर दाबा .
07:19 ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा.
07:23 स्लाईडसवर परत जाऊ.
07:26 जॉमेट्रीमधे वरची वॉल स्थलांतर करत आहे आणि इतर तीन वॉल्स स्थिर आहेत.
07:31 हा 2D प्रॉब्लेम असल्यामुळे फ्रंट अँड बॅक फेसेसला 'empty' नाव दिले आहे.
07:39 पुन्हा नवी 'blockMeshDict' फाईल उघडा.
07:42 boundary मधे 'moving wall' असे patch चे नाव द्या. एंटर दाबा.
07:51 आता ओपन कर्ली ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा.
07:56 आता moving wall साठी type देण्यासाठी "type" space "wall" असे लिहा.
08:06 सेमीकोलन समाविष्ट करून एंटर दाबा.
08:09 आता ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. टॅबचे बटण दाबून ओपन क्लोज ब्रॅकेटस द्या.
08:20 या ब्रॅकेटमधे फेसेससाठीचे पॉईंटस भरा.
08:24 स्लाईडसवर परत जाऊ.
08:27 लक्षात घ्या, पॉईंटसचा क्रम असा असेल की अंगठा फेसशी काटकोनात असेल,
08:34 आणि बोटे आकृतीत दाखवल्याप्रमाणे वळलेली असतील.
08:39 कर्ल हे क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज असू शकतात.
08:43 शिवाय लक्षात घ्या, vertices मधे समाविष्ट केलेल्या पॉईंटसशी हे बिंदू मॅच होतील.
08:48 आता मी नव्या 'blockMeshDict' फाईलवर परत जात आहे.
08:52 आता फेसेसमधे टाईप कराः 3 space 7 space 6 space 2.
09:01 स्लाईडसवर परत जाऊ. 3, 7, 6, 2 हे स्थानांतरित होणा-या वॉलचे पॉईंटस आहेत.
09:09 हे मिनिमाईज करा. लक्षात घ्या, त्या फेसवर तुम्ही कुठल्याही पॉईंटपासून सुरूवात करू शकता. आता एंटर दाबा.
09:17 क्लोज ब्रॅकेट द्या. पुन्हा एंटर दाबा. क्लोज कर्ली ब्रॅकेट द्या.
09:22 आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की फेसेससाठी पॉईंटस समाविष्ट केल्यावर सेमीकोलन देणे गरजेचे आहे. आता कर्ली ब्रॅकेटसनंतर एंटर दाबून पुन्हा एकदा एंटर दाबा.
09:35 आता अशाचप्रकारे स्थिर वॉल्ससाठी बाऊंडरी कंडिशन्स आणि फेसेसच्या व्हॅल्यूज भरा.
09:40 हा 2D प्रॉब्लेम असल्यामुळे फ्रंट अँड बॅक फेसेसची type of boundary रिकामी ठेवता येईल.
09:46 स्लाईडमधे दाखवलेल्या आकृतीचा संदर्भ घ्या. पॉईंटस एंटर करण्यासाठी हे मिनिमाईज करून घ्या.
09:52 क्लोज ब्रॅकेटस समाविष्ट करून सेमीकोलन द्या आणि एंटर दाबा, पुन्हा एंटर दाबा.
09:59 आता "mergePatchPairs" टाईप करून एंटर दाबा.
10:04 कोणतेही पॅचेस मर्ज करायचे नसल्यामुळे हे रिकामे ठेवता येऊ शकते.
10:08 ओपन आणि क्लोज ब्रॅकेटस समाविष्ट करून सेमीकोलन समाविष्ट करा. एंटर दाबा.
10:14 आपली 'blockMeshDict' फाईल तयार झाली आहे. ही सेव्ह करा.
10:18 येथे ही संपूर्ण 'blockMeshDict' फाईल आहे.
10:26 दोन्ही 'blockMeshDict' फाईल्स बंद करा.
10:29 लक्षात घ्या, blockMeshDict फाईल बंद केल्याशिवाय कमांड टर्मिनल कार्य करणार नाही.
10:35 टर्मिनलवर परत जा. आता cd space दोन वेळा (dot) (dot) टाईप करा. हे 'cavity' फोल्डरवर घेऊन जाईल. आता Mesh the geometry.
10:45 त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: "blockMesh" आणि एंटर दाबा.
10:53 आता geometry बघण्यासाठी कमांड टर्मिनलवर paraFoam टाईप करून एंटर दाबा.
10:59 हे ParaView विंडो उघडेल.
11:03 आता डावीकडील ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूवरील Apply वर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही जॉमेट्री बघू शकता.
11:13 स्लाईडसवर परत जाऊ.
11:16 या पाठात आपण शिकलो:
11:18 OpenFOAM मधे सिंपल जॉमेट्री तयार करणे.
11:22 Paraview मधे ती जॉमेट्री बघणे.
11:25 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:29 असाईनमेंट म्हणून -
11:31 lid driven cavity ची डायमेंशन्स बदला. ग्रीड साईज बदलून तो 50 50 1 करा आणि paraView मधे ती जॉमेट्री बघा.
11:41 [1] या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:44 यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.


11:46 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
11:51 स्पोकन ट्युटोरियला प्रोजेक्ट टीम:


11:53 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.


11:55 ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.
11:59 अधिक माहितीसाठी कृपया

contact@spoken-tutorial.org वर लिहा.


12:05 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे
12:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. URL:http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro


12:19 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana