LibreOffice-Suite-Writer/C4/Using-track-changes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:48, 2 January 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Track Changes while editing a document

Author: Manali Ranade

Keywords: Writer


Visual Clue
Narration
00:00 नमस्कार.
00:03 लिबर ऑफिस रायटरच्या Track changes while Editing a document वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमधील डॉक्युमेंटचे peer review कसे करता येते ते शिकणार आहोत.
00:15 आपण उपलब्ध डॉक्युमेंट उघडू या.
00:18 Record Changes या पर्यायाच्या सहाय्याने डॉक्युमेंटमध्ये बदल आणि peer review कसा करायचा ते पाहू.
00:25 या फीचरचा फायदा म्हणजे रिव्ह्यूअर काही comments देऊ शकतो. टेक्स्ट समाविष्ट, डिलिट करू शकतो. उपलब्ध टेक्स्टमध्ये बदल करू शकतो. हे बदल आपल्याला त्याच डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे दिसतात.
00:40 हे बदल ऑथर सहजपणे बघू शकत असल्यामुळे तो हे बदल मान्य किंवा अमान्य करू शकतो आणि या comments, डॉक्युमेंटमध्ये पुन्हा बदल करण्याचा त्रास न घेता त्यांचा समावेश करू शकतो.
00:52 फाईल सेव्ह केल्यावर त्या comments चा समावेश झालेला असतो.
00:56 हे सर्व कसे करायचे ते बघू या.
01:01 येथे आपण उबंटू लिनक्स 10.04 ही operating system आणि LibreOffice Suite चे version 3.3.4 चा वापर करणार आहोत.
01:09 या ट्युटोरियलमध्ये आपण आधीच बनवलेल्या आणि सिस्टीमवर असलेल्या काही डॉक्युमेंटसचा वापर करणार आहोत.
01:16 Seven-reasons-to-adopt-FOSS.odt
आणि Government-support-for-FOSS-in-India.odt



01:24 रायटर सुरू करण्यासाठी Applications, Office आणि नंतर LibreOffice Writer वर क्लिक करा.
01:33 Seven-reasons-to-adopt-FOSS.odt ही फाईल उघडा.
01:40 record changes हा पर्याय सुरू करण्यासाठी
01:43 Edit मेनूखाली Changes मधील Record हा पर्याय निवडा.
01:52 Show हा पर्याय सुध्दा निवडलेला असावा. यामुळे केलेले बदल वेगळ्या स्वरूपात दाखवले जातील.
02:00 डॉक्युमेंटमध्ये मुद्दा क्रमांक 2 समाविष्ट करा.
02:05 दुस-या क्रमांकाच्या मुद्यावर जाऊन टाईप करा.
02:08 Linux is a virus resistant operating system since each user has a distinct data space and cannot directly access the program files.
02:35 एंटर दाबा.
02:36 म्हणजे मुद्दा क्रमांक 2 हा आता क्रमांक 3 होईल.
02:41 समाविष्ट केलेले टेक्स्ट नव्या रंगात बदलल्याचे दिसेल.
02:45 टेक्स्टवरून कर्सर फिरवा. आपल्याला एक मेसेज दिसेल.
02:50 Inserted Sriranjani: आणि पुढे समाविष्ट केल्याची तारीख आणि वेळ .
02:55 अशा प्रकारे डॉक्युमेंटमध्ये comment करणारी व्यक्ती ओळखली जाऊ शकते. हे नाव संगणकावर लिबर ऑफिस इन्स्टॉलेशनच्या वेळी दिलेल्या user चे नाव असते.
03:07 पहिल्या ओळीतीलavalable हे स्पेलिंग दुरूस्त करा. आपल्याला केलेली दुरूस्ती दिसेल.
03:16 पहिला मुद्दा डिलिट करा:-
03:18 It can be installed on all computers without restriction or needing to pay license fees to vendors
03:30 आपल्याला दिसेल की डिलिटनंतर मूळ ओळ डिलिट न होता, डिलिट करण्यासाठी सुचवलेली ओळ म्हणून ती मार्क केली जाते.
03:39 त्यावरून कर्सर फिरवा. आपल्याला एक मेसेज दिसेल.
03:43 Deleted Sriranjani: आणि पुढे डिलिट केल्याची तारीख आणि वेळ दिसेल.
03:48 समाविष्ट करणे, डिलिट करणे, टेक्स्टमध्ये बदल करणे अशा काही सुधारणा डॉक्युमेंटमध्ये करता येतात.
04:00 एकापेक्षा अधिक व्यक्ती एकाच डॉक्युमेंटमध्ये बदल करू शकतात.
04:03 LO Writer प्रत्येक बदल वेगवेगळ्या रंगानी दाखवतो. ज्यामुळे प्रत्येक रिव्ह्यूअरचे काम वेगळे ओळखण्यास मदत होते.
04:12 तसेच बदल केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर ते आपल्याला रिव्ह्यूअरचे नाव दाखवते.
04:18 माझा सहकारी Guru याने आधीच काही बदल केलेले डॉक्युमेंट उघडून मी त्यावर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे.
04:26 Government-support-for-FOSS-in-India.odt हे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडा.
04:34 या डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आणि डिलिट झाल्याचे आपल्याला दिसत आहे.
04:41 समाविष्ट आणि डिलिट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर हे बदल Guru याने केला असल्याचा मेसेज दिसत आहे.
04:51 खाली CDAC, NIC, NRC-FOSS are institutions of Government of India which develop and promote FOSSहा मुद्दा समाविष्ट करा.
05:17 आपल्याला दिसेल की Guru याने बदल केलेल्या आणि आपण समाविष्ट केलेल्या टेक्स्टचा रंग वेगवेगळा आहे.
05:23 समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर Inserted: Sriranjani हा मेसेज दिसत आहे.
05:28 ऑथरकडे डॉक्युमेंट परत जाण्यापूर्वी एका डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती बदल करू शकतात.
05:34 डॉक्युमेंट सेव्ह न करता ते बंद करा.
05:44 आता reviewer ने केलेले बदल author मान्य किंवा अमान्य कसे करू शकतो ते बघू .
05:49 Government-support-for-FOSS-in-Indiaया डॉक्युमेंटमध्ये आपण असे समजू या की मी author आहे आणि Guru ने केलेले बदल मी मान्य किंवा अमान्य करू शकतो.
06:11 दुस-या मुद्यावर जा. reasons या डिलिट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करा आणि Accept Change पर्याय निवडा.
06:22 आपल्याला टेक्स्ट डिलिट झालेले दिसेल, जो बदल reviewer ने सुचवला होता.
06:27 needsया समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून Accept Change सिलेक्ट करा.
06:34 reviewer ने सुचवलेला बदल स्वीकारला जाऊन, आपल्याला टेक्स्ट नेहमीच्या स्वरुपात दिसेल.
06:39 अशा प्रकारे reviewer ने सुचवलेले, समाविष्ट किंवा डिलिट करणे हे दोनही बदल आपण मान्य करू शकतो.
06:48 पहिल्या मुद्यावर जाऊन The OpenOffice document standard has been notified under this policyया डिलिट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून Reject change निवडा.
07:01 टेक्स्ट पुन्हा नेहमीसारखे होईल. reviewer ची डिलिशनची सूचना author ने नाकारली आहे.
07:08 मुद्दा क्रमांक 5 मधील Government Schools in these states and in Orissa, Karnataka and Tamil Nadu learn Linuxवर राईट क्लिक करून Reject change निवडा. हे reviewer ने समाविष्ट केलेले टेक्स्ट डिलिट करेल.
07:26 अशा प्रकारे प्रत्येक समाविष्ट किंवा डिलिट केलेले टेक्स्ट author मान्य किंवा अमान्य करू शकतो.
07:33 शेवटी बदल मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर Edit मेनूमधील Changes या पर्यायामधील Record आणि Show हे पर्याय uncheck करा.
07:55 unchecked केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये केले जाणारे बदल मार्क केले जाणार नाहीत.
08:00 reviewer ने दिलेल्या सर्व comments मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर त्यांचा फाईलमध्ये समावेश होण्यासाठी ती सेव्ह करायला विसरू नका.
08:08 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आता ASSIGNMENT करू.
08:15 डॉक्युमेंट उघडून त्यातील स्पेलिंगच्या चुका Record Changes mode मध्ये दुरूस्त करा.
08:24 येथे ही ASSIGNMENT आधीच करून ठेवली आहे.
08:30 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
08:40 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:44 *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा.
08:53 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
09:02 *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.
09:13 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana