Difference between revisions of "LibreOffice-Suite-Math/C2/Introduction/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
|| Time
+
|| '''Time'''
|| Narration
+
|| '''Narration'''
  
 
|-
 
|-

Revision as of 15:37, 15 July 2014

Time Narration
00:02 लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबर ऑफीस Math चा परिचय आणि फॉर्मुला एडिटर या बदद्ल शिकू.
00:12 आपण खालील विषय शिकू:
00:15 LibreOffice Math म्हणजे काय?
00:18 फॉर्मुला एडिटर चा वापर करून Mathवापरण्यासाठी सिस्टम ची आवश्यकता.
00:23 साधारण फॉर्मुला लिहीणे.
00:26 LibreOffice Math म्हणजे काय?
00:29 लिबर ऑफीस Math, गणितीय सूत्राना तयार करणे आणि संपादित करण्यासाठी संकल्पित केलेले एक सॉफ्टवेअर एप्लिकेशन आहे.
00:38 हे लिबर ऑफीस सूट च्या आतमध्ये आहे, म्हणून हे ओपन सोर्स, विनामूल्य आणि वितरणासाठी आहे.
00:47 Math चा वापर करून तयार केलेले सूत्र आणि समीकरण एकटे कार्य करू शकतात,
00:53 किंवा लिबर ऑफीस सूट मध्ये इतर डॉक्युमेंट्स मध्ये हे वपरू शकता.
00:58 सूत्र(Formula), Writer किंवा Calc डॉक्युमेंट्स मध्ये अंतःस्थापित केले जाऊ शकतात.
01:05 सूत्राचे काही उदाहरणार्थ- fractions, integrals, equations आणि matrices.
01:13 Mathच्या वापरासाठी सिस्टम आवश्यकता पाहु.
01:17 विंडोस साठी तुम्हाला Microsoft Windows 2000 (Service Pack 4 or higher), XP, Vista, किंवा Windows 7; ची गरज आहे.
01:28 Pentium-compatible PC 256 Mb RAM (512 Mb RAM recommended);
01:36 Ubuntu Linux साठी सिस्टम आवश्यकता आहेत- Linux kernel version 2.6.18 or higher; Pentium-compatible PC 512Mb RAM recommended.
01:51 सिस्टम आवश्यकते वरील संपूर्ण माहिती साठी libreoffice वेबसाइट ला भेट द्या.
01:58 जर तुमच्या कडे अगोदरच लिबर ऑफीस सूट प्रतिष्ठापीत असेल, तर लिबर ऑफीस सूट प्रोग्राम मध्ये तुम्हाला Math मिळेल.
02:06 जर तुमच्याकडे लिबर ऑफीस सूट प्रतिष्ठापीत नसेल तर, तर तुम्ही official वेबसाइट वरुन यास डाउनलोड करू शकता.
02:14 linux मध्ये तुम्ही, synaptic package manager वरुन प्रतिष्ठापीत करू शकता.
02:18 मी लिबर ऑफीस वर्जन 3.3.3 प्रतिष्ठापीत केले आहे.
02:24 ठीक आहे, आता सुरवात करू आणि Math एप्लिकेशन उघडू.
02:28 Windows मध्ये Start मेन्यू वर जा. All Programs>> LibreOffice Suite>> LibreOffice Math वर क्लिक करा.
02:39 आपण यास लिबर ऑफीस राइटर डॉक्युमेंट्स मधून सुद्धा घेऊ शकतो.
02:46 नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी LibreOffice Writer वर क्लिक करा.
02:53 आता Writer विंडो मध्ये, Math वर जा.
02:57 Main मेन्यू बार वरील Insert मेन्यू वर क्लिक करू आणि नंतर खालच्या दिशेने असलेल्या Object वर आणि नंतर Formula वर क्लिक करा.
03:09 आता आपण Writer विंडो मध्ये तीन क्षेत्र पाहु शकतो.
03:14 पहिले सर्वात वर Writer क्षेत्र आहे.
03:18 येथे लहान करडा बॉक्स वर लक्ष द्या.
03:22 येथे आपण लिहिलेले समीकरण किंवा सूत्र गणितीय आकारात(form) दिसतील.
03:30 दुसरे, फॉर्मुला एडिटर क्षेत्र किंवा समीकरण, खाली आहे.
03:37 येथे आपण विशेष मार्कप लॅंग्वेज मध्ये गणितीय सूत्र टाइप करू शकतो.
03:44 आणि तिसरे एलिमेंट्स विंडो आहे जे उजव्या बाजुवर आहे.
03:50 जर तुम्हाला Elements विंडो दिसत नसेल तर, View मेन्यू वर क्लिक करून आणि नंतर Elements निवडून त्यास एक्सेस करू शकतो.
04:01 ही विंडो आपल्यास गणितीय चिन्हे आणि वक्यप्रायोग पुरविते.
04:08 जर आपण Writer क्षेत्रा मध्ये करड्या बॉक्स च्या बाहेर एकदा क्लिक करू, तर विंडो अदृश्य होते .
04:17 Math formula Editor आणि Elements window ला पुन्हा आणण्यासाठी करड्या बॉक्स वर डबल क्लिक करा. आता एक साधे गुणाकार सूत्र लिहु, 4x3 =12. (4 multiplied by 3 is equal to 12')
04:37 आता विंडो मध्ये वर आणि खाली चिन्हांच्या श्रेणी आहेत.
04:46 चला सर्वात वर डाव्या आयकॉन वर क्‍लिक करू. टूल टिप येथे Unary किंवा Binary ऑपरेटर्स दर्शविते.
04:57 आणि खाली, आपण काही मूलभूत गणितीय ऑपरेटर्स जसे की, अधिक, वाजाबकी, गुणाकार आणि भागाकार पाहु शकतो.
05:08 दुसऱ्या रो मध्ये गुणाकार दर्शविणाऱ्या ‘a into b’ वर क्लिक करू.
05:17 आता फॉर्मुला एडिटर विंडो कडे लक्ष द्या.
05:20 हे ‘Times’ शब्दा द्वारे विभक्त असलेले दोन प्लेस होल्डर्स दर्शविते.
05:27 आणि सर्वात वर राइटर ग्रे बॉक्स क्षेत्रा मध्ये, गुणाकार चिन्हाद्वारे विभक्त असलेले दोन चौकोन कडे लक्ष द्या.
05:37 डबल क्लिक द्वारे फॉर्मुला एडिटर मध्ये पहिला प्लेस होल्डर चिन्हांकित करू आणि नंतर 4टाइप करा.


05:46 पुढे, फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये दुसरा प्लेस होल्डर चिन्हांकित करून नंतर फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये 3 टाइप करू.
05:54 लक्ष द्या, राइटर ग्रे बॉक्स आपोआप रिफ्रेश होऊन ‘4 into 3’ दर्शवित आहे.
06:03 आपण वर असलेल्या View मेन्यू वर क्लिक करून Update निवडू शकतो.
06:10 किंवा विंडो रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट F9 चा वापर ही करू शकता.
06:16 पुढे , सूत्र पूर्ण करू आणि त्यात =12 (‘is equal to 12’) जोडू.
06:24 यासाठी दुसर्या आयकॉन वर क्‍लिक करू जे, Elements विंडो मध्ये Categories सेक्शन मध्ये ‘Relations’ दर्शविते.
06:35 येथे विविध रिलेशन्स एलिमेंट्स वर लक्ष द्या.
06:38 पहिला: a=b (‘a is equal to b’ )निवडू.
06:44 आपण पहिला प्लेस होल्डर डिलीट करू आणि दुसऱ्या प्लेस होल्डर मध्ये 12 टाइप करू.
06:53 आणि हे आपले राइटर क्षेत्रा मधील पहिले सूत्र आहे- ‘4 times 3 is equal to 12’.
07:02 आता आपण सोप्या पद्धतीत, सूत्र लिहिण्यासाठी एलिमेंट्स विंडो चा वापर कसा करायचा हे शिकलो.
07:09 आपण फॉर्मुला एडिटर विंडो वर राइट क्लिक करून आणि येथे चिन्ह निवडून सूत्र ही लिहु शकतो.
07:19 एलिमेंट्स विंडो मध्ये, कॉंटेक्स्ट मेन्यू सिंबल च्या समान केटेगरीस दर्शविते.
07:26 कोणतीही कॅटेगरी निवडने, हे त्या कॅटेगरी मध्ये उपलब्ध असलेले सिंबल दर्शविते.
07:33 सूत्र लिहिण्याची तिसरी पद्धत आहे,
07:37 आपण फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये प्रत्यक्षात सूत्र लिहु शकतो.
07:42 येथे आपण, Math अप्लिकेशन समजू शकेल, अशी विशेष मार्क अप लॅंग्वेज वापरुया.
07:50 आपण मार्क अप लॅंग्वेज चे एक सोपे उदाहरण अगोदर पहिले आहे.
07:56 4 times 3 equals 12’.
07:59 येथे ‘times’ हा शब्द लक्षात घ्या.
08:03 या प्रमाणे, 4 divided by 4 equals 1, लिहिण्यासाठी मार्क अप: 4 over 4 equals 1’ आहे.
08:15 आपण हे केले आहे. तुमच्यासाठी येथे assignment आहे.
08:20 राइटर विंडो मध्ये खालील सूत्र लिहा.
08:24 4 divided by 4 = 1.
08:29 तुमच्या सूत्रा च्या मध्ये रिकामी रेष एंटर करण्यासाठी ‘newline’ मार्कअप चा वापर करा.
08:36 A Boolean AND b
08:40 4 is greater than 3
08:43 x is approximately equal to y.
08:47 And 4 is not equal to 3
08:51 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:59 संक्षिप्त रूपात , आपण खालील विषय शिकलो.
09:03 LibreOffice Math म्हणजे काय?
09:06 Mathवापरण्यासाठी सिस्टम ची आवश्यकता.
09:10 Formula Editor चा वापर,
09:12 साधारण फॉर्मुला लिहीणे.
09:16 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र हि दिले जाते .
09:28 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
09:33 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:39 या टयूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे यानी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya