LibreOffice-Suite-Draw/C3/Working-with-Objects/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 23:17, 28 October 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Working with Objects वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
00:08 * Grids आणि Guide lines वापरून ऑब्जेक्टस योग्य जागेवर ठेवणे.
00:12 * snap functions वापरणे.
00:14 * lines आणि arrowheads कस्टमाईज करणे.
00:18 * तसेच ऑब्जेक्टसची प्रतिकृती बनवणे.
00:21 * ऑब्जेक्टस अचूकपणे लहानमोठ्या (Resize) करणे.
00:24 * ऑब्जेक्टसचे वाटप (डिस्ट्रीब्युट) करणे.
00:25 * ऑब्जेक्टस कंबाईन, मर्ज, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट करणे.
00:30 आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरणार आहोत.
00:40 Grids म्हणजे काय?
00:42 Grids चा उपयोग ऑब्जेक्टसची जागा
00:45 ड्रॉ पेजवर अचूक ठरवण्यासाठी होतो.
00:48 आपण डेस्कटॉपवर सेव्ह केलेली 'RouteMap' ही फाईल उघडू.
00:53 मागील पाठात आपण ग्रीडसचा थोडा वापर केला होता.
00:57 grids बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
01:01 मुख्य मेनूतील View खालील Grid वर क्लिक करा.
01:05 नंतर Display Grid वर क्लिक करा.
01:08 ड्रॉ पेज हे अनेक उभ्या आडव्या तुटक रेषांनी भरले आहे. यापासून ग्रीड बनते.
01:17 ग्रीडस ह्या केवळ दाखवण्यापुरत्या आहेत, त्या प्रिंट होत नाहीत.
01:22 ग्रीडसचा आकार कस्टमाईज म्हणजेच आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो.
01:30 मुख्य मेनूतील Tools खालील Options वर क्लिक करा.
01:35 Options चा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:38 LibreOffice Draw वर क्लिक करून Grid पर्याय निवडा.
01:42 Resolution खाली या व्हॅल्यू भरा:
01:46 Horizontal – 7 cm
01:49 Vertical – 5 cm.
01:53 Subdivision हे ग्रीडमधील स्पेसेसची संख्या ठरवते.
01:57 Subdivision च्या व्हॅल्यूज देऊ.
02:00 Horizontal – 3
02:02 Vertical – 4.
02:05 Synchronize axes चा पर्याय अनचेक करा.
02:09 OK वर क्लिक करा.
02:11 आता ड्रॉ पेज बघा. ग्रीडमधील प्रत्येक बॉक्सचा आकार बघा.
02:17 सबडिव्हीजनमधे सेट केलेल्या स्पेसेस मोजू.
02:22 येथे आडव्या 1, 2, 3 स्पेसेस आणि उभ्या 1, 2, 3, 4 स्पेसेस आहेत.
02:33 आता Guides बद्दल जाणून घेऊ.
02:36 Guides म्हणजे काय?
02:38 Guides म्हणजे ऑब्जेक्टसच्या कडांच्या वाढविलेल्या रेषा किंवा हेल्पर लाईन्स
02:43 ज्यांचा उपयोग ऑब्जेक्ट हलवताना होतो.
02:47 गाईड लाईन्स देण्यासाठी,
02:50 मुख्य मेनूतील View खालील Guides हा पर्याय निवडा.
02:55 Display Guides वर क्लिक करा.
02:59 मुख्य मेनूतील Tools खालील Options वर क्लिक करा.
03:03 Options चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:06 डाव्या पॅनेलमधे LibreOffice Draw जवळच्या काळ्या छोट्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून View क्लिक करा.
03:15 उजव्या पॅनेलमधे Guides when moving पर्याय निवडा. अशाप्रकारे ऑब्जेक्टस हलवल्यावर guides बघू शकता.
03:23 OK वर क्लिक करा.
03:27 आता बाग थोडी उजवीकडे सरकवू.
03:29 बागेची जागा बदलताना त्या ऑब्जेक्टच्या बाजूंच्या एक्सटेन्शन लाईन्स दिसतील. त्या गाईड लाईन्स आहेत.
03:39 Snap Lines म्हणजे काय?
03:41 Snap Lines देखील निश्चित केलेल्या जागेत दोन किंवा अधिक ऑब्जेक्टस बसवण्यास मदत करतात.
03:48 युजर Snap lines आणि Snap points बनवतात.
03:53 Snap lines या तुटक रेषांच्या रूपात असून त्या उभ्या आणि आडव्या कार्यान्वित होतात.
03:59 Snap Lines बनवण्यापूर्वी स्नॅप लाईन्स हा पर्याय सुरू करणे आवश्यक आहे.
04:05 ड्रॉच्या पानावर जा. context menu साठी राईट क्लिक करून Snap Lines पर्याय निवडा.
04:12 त्यातील हे तिन्ही पर्याय निवडा:
04:16 Snap Lines Visible,
04:18 Snap to Snap Lines,
04:20 Snap Lines to Front.
04:22 बनवलेल्या Snap lines आता दिसू शकतील.
04:26 स्नॅप लाईन्सनी एक भाग घोषित करू, ज्यात स्लाईड प्रमाणे नकाशातील ऑब्जेक्टस बसवायचे आहेत.
04:34 माऊसचा कर्सर उभ्या मोजपट्टीवर न्या.
04:38 माऊसचे डावे बटण दाबा.
04:41 कर्सर दोन्ही बाजूनी बाण असलेल्या आकारात बदललेला दिसेल.
04:46 माऊस ड्रॉ पेजच्या दिशेला ड्रॅग करा.
04:50 एक तुटक रेषा दिसेल.
04:53 माऊसचे बटण सोडू नका.
04:55 माऊसचे डावे बटण दाबून ठेवून तुटक रेषा या पानापर्यंत ड्रॅग करा.
05:01 आता माऊसचे बटण सोडा.
05:04 ही रेषा दिसत आहे का?
05:06 ही Snap Line आहे.
05:07 सर्वात खालची मर्यादा निश्चित करण्यासाठी रेषा पानाच्या तळापर्यंत ड्रॅग करा.
05:13 घोषित केलेल्या जागेत नकाशा बंदिस्त करण्यासाठी आणखी तीन स्नॅप लाईन्स काढू.
05:24 आपण उभ्या आणि आडव्या स्नॅप लाईन्स बनवल्या आहेत.
05:29 आता ही स्नॅप लाईन वापरून तुम्ही ऑब्जेक्टस ठेवू शकता.
05:34 तुम्ही हव्या तितक्या स्नॅप लाईन्स काढू शकता.
05:40 उभ्या आणि आडव्या स्नॅप लाईन्स ग्राफवरील X आणि Y अक्षाप्रमाणे कार्य करतात.
05:48 या दोन अक्षांमधे तुम्ही ऑब्जेक्टस अचूक पध्दतीने ठेवू शकता.
05:54 ग्रीड लाईन्स सोबत स्नॅप फंक्शन वापरून ऑब्जेक्टस अचूक ठेवता येतात.
05:59 तसेच * Snap to Grid पर्याय ऑब्जेक्ट नेमके ग्रीड पॉईंटसवर नेऊन ठेवतो.
06:06 * Snap to Snap lines पर्याय ऑब्जेक्ट, अचूक स्नॅप लाईनवर ठेवतो.
06:11 * Snap to Page margin पर्याय ऑब्जेक्ट अचूक पेज मार्जिनवर ठेवतो.
06:18 पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
06:21 ग्रीडचे सर्व पर्याय वापरून बघा.
06:24 ऑब्जेक्टसाठी snap to Grid, snap lines आणि page margins हे पर्याय वापरून काय होते ते पहा.
06:31 School Campus जवळ या तलावाच्या आकाराचाच आणखी एक तलाव समाविष्ट करू.
06:38 त्यासाठी Duplicate हा पर्याय वापरू.
06:43 प्रथम Lake सिलेक्ट करा.
06:45 मुख्य मेनूतील Edit' खालील Duplicate वर क्लिक करा.
06:51 Duplicate चा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:54 Number of copies फिल्डमधे 1 ही व्हॅल्यू टाईप करून OK वर क्लिक करा.
06:59 दुसरा तलाव तयार होईल.
07:03 आता lake ड्रॅग करून school जवळ नेऊन ठेवा.
07:06 ऑब्जेक्टसची मापे आवश्यकतेनुसार देऊन हवा तसा आकार मिळवता येतो.
07:11 या स्लाईडमधे दाखवल्याप्रमाणे नेमकी मापे देऊन घराचा आकार बदलू.
07:18 उंची आणि रुंदी सारखीच ठेवून त्याचे कोपरे थोडेसे तिरपे करा आणि हे फिरवून घ्या.
07:24 प्रथम Home सिलेक्ट करून context menu साठी राईट क्लिक करून Position and Size पर्याय निवडा.
07:31 Position and Size डायलॉग बॉक्स उघडेल.
07:35 Position and Size च्या टॅबवर क्लिक करा.
07:38 Size खालील Width आणि Height या दोन्ही फिल्डसमधे 3 टाईप करा.
07:43 नंतर Rotation टॅब वर क्लिक करा.
07:46 Angle फिल्डमधे 10 टाईप करा.
07:50 शेवटी Slant Corner and Radius टॅबवर क्लिक करा.
07:55 Slant Angle फिल्डमधे 5 degrees टाईप करा.
07:59 OK वर क्लिक करा.
08:01 आपण घराचा आकार बदलला आहे!
08:05 पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
08:08 # ड्रॉईंग टूलबार वापरून विविध आकार काढून बघा.
08:11 # सर्व आकारांसाठी Corner radius हा पर्याय वापरता येतो का हे तपासा.
08:16 आता काही ऑब्जेक्टसच्या उजव्या कडांमधे सारखे अंतर ठेवू.
08:21 यासाठी Distribution हा पर्याय वापरणार आहोत.
08:26 हा पर्याय वापरण्यासाठी किमान तीन ऑब्जेक्टस निवडणे गरजेचे आहे.
08:32 प्रथम Residential Complex, Parking Lot आणि Commercial Complex सिलेक्ट करा.
08:39 Select arrow ड्रॅग करून सर्व ऑब्जेक्टसचा ग्रुप बनवा.
08:45 आता राईट क्लिक करून Distribution सिलेक्ट करा.
08:50 Horizontal खालील Right पर्याय निवडून OK वर क्लिक करा.
08:56 ऑब्जेक्टसच्या कडांमधे सारखे अंतर राखले जाईल.
09:01 Distribution पर्याय ऑब्जेक्टसचे आडवे किंवा उभे डिस्ट्रीब्युशन करत नाही.
09:07 Horizontal Distribution पर्याय,
09:10 * उजव्या आणि डाव्या कडा
09:12 * हॉरिझाँटल सेंटर्स आणि
09:14 * ऑब्जेक्टसचे स्पेसिंग डिस्ट्रीब्यूट करतो.
09:17 Vertical Distribution पर्याय,
09:21 * वरच्या आणि खालच्या कडा
  • व्हर्टिकल सेंटर्स आणि
  • ऑब्जेक्टसचे स्पेसिंग डिस्ट्रीब्यूट करतो.
09:26 आता या नकाशासाठी स्वतःची लाईन स्टाईल तयार करू.
09:32 मुख्य मेनूतील Format खालील Line वर क्लिक करा.
09:35 Line चा डायलॉग बॉक्स उघडेल.
09:38 Line Styles टॅब वर क्लिक करा.
09:41 Line Styles च्या ड्रॉप डाऊनमधून Three dashes and three dots पर्याय निवडा.
09:47 Type फिल्ड आहे तसेच ठेवा.
09:50 Number मधे 10 आणि 5 आणि Length मधे 8% ह्या व्हॅल्यू भरा.
09:57 Add वर क्लिक करा. "My Line Style" असे नाव देऊन OK वर क्लिक करा.
10:06 पुन्हा OK वर क्लिक करा.
10:08 हा ऍरो सिलेक्ट करा. राईट क्लिक करून Line पर्याय निवडा. Line चा डायलॉग बॉक्स उघडेल.
10:13 Line टॅब वर क्लिक करा.
10:16 Style च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
10:19 आपण बनवलेली नवी स्टाईल दिसत आहे.
10:22 ती सिलेक्ट करून OK वर क्लिक करा.
10:26 आपण नवीन लाईन स्टाईल बनवली आहे!
10:29 शाळेच्या कँपसच्या डावीकडे छोटे स्टेडियम काढू.
10:34 Drawing toolbar मधील Basic Shapes वर क्लिक करून Circle सिलेक्ट करा.
10:40 ते ड्रॉ पेजवर समाविष्ट करा.
10:44 वर्तुळाच्या आऊटलाईनसाठी My Line Style ही स्टाईल निवडा.
10:49 याच्या आत “Stadium” असे टाईप करा.
10:53 आता ऑब्जेक्टस कंबाईन, मर्ज, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट कसे करायचे ते पाहू.
10:59 ऑब्जेक्ट ग्रुपींग आणि कंबाइनिंग यात काय फरक आहे?
11:03 ऑब्जेक्टसचा ग्रुप केल्यावर अनेक ऑब्जेक्टस केवळ एकत्रित ठेवली जातात.
11:09 आणि कंबाईन केल्यावर नवे ऑब्जेक्ट तयार होते.
11:13 हे पर्याय बघण्यासाठी आपण तीन ऑब्जेक्टस वापरणार आहोत.
11:18 प्रथम ड्रॉ फाईलमधे नवे पान समाविष्ट करा.
11:23 वर्तुळ काढण्यासाठी Drawing toolbar वरील Basic Shapes वर क्लिक करून Circle निवडा.
11:32 ड्रॉ पेजवर माऊस नेऊन तो खाली ड्रॅग करा.
11:35 आता Diamond हे दुसरे ऑब्जेक्ट काढू.
11:38 ड्रॉईंग टूलबारवरील Basic Shapes वर क्लिक करून Diamond निवडा.
11:43 कर्सर ड्रॉ पेजवर नेऊन खाली ड्रॅग करा आणि मेनूबारमधील Area Style / Filling च्या ड्रॉप डाऊन बटणावर क्लिक करून Red 3 हा रंग निवडा.
11:55 रेक्टँगल हे तिसरे ऑब्जेक्ट काढून त्याला Green 6 हा रंग द्या.
12:02 तिन्ही ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी Shift चे बटण दाबून प्रत्येक ऑब्जेक्ट वर क्लिक करा.
12:11 Context menu साठी राईट क्लिक करून Combine वर क्लिक करा.
12:14 नवे ऑब्जेक्ट तयार होईल!
12:18 नव्या ऑब्जेक्टने सगळ्यात शेवटी आणि मागच्या बाजूला असलेल्या ऑब्जेक्टचा रंग घेतला आहे.
12:24 हे undo करण्यासाठी CTRL+Z दाबा.
12:29 या आकृत्या पुन्हा सिलेक्ट करा आणि context menu साठी राईट क्लिक करा.
12:35 Shapes सिलेक्ट करून Merge वर क्लिक करा.
12:38 आणखी एक नवा आकार तयार होईल!
12:41 ही फंक्शन्स वापरून जेवढे जास्त प्रयोग कराल तेवढे जास्त तुम्हाला शिकायला मिळेल.
12:48 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
12:51 यामधे ऑब्जेक्टस अचूक अलाईन करण्यासाठी ग्रीडस, गाईडस आणि स्नॅप लाईन्स वापरायला
12:59 तसेच ऑब्जेक्टस डुप्लीकेट, रिसाईझ आणि डिस्ट्रीब्युट करायला शिकलो.
13:06 नवी लाईन स्टाईल बनवायला तसेच
13:12 कंबाईन, मर्ज, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट वापरून नवे ऑब्जेक्ट बनवायला शिकलो.
13:17 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
13:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
13:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
  • Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  • परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:37 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
13:43 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:48 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
14:06 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
14:10 सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana