Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Polygons-and-Curves/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 290: Line 290:
 
|-
 
|-
 
|11:14
 
|11:14
|हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 12:14, 8 October 2015

Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Creating Curves and Polygons वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात पॉलिगॉन आणि कर्व्हज याबद्दल शिकणार आहोत.
00:14 यासाठी तुम्हाला लिबर ऑफिस ड्रॉचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:25 येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू.
00:34 पॉलिगॉन्स म्हणजे काय? पॉली म्हणजे अनेक. अनेक बाजू असलेली आकृती म्हणजे पॉलिगॉन.
00:43 या स्लाईडवर दाखवल्याप्रमाणे नकाशा कसा काढायचा ते शिकू. हा नकाशा घरापासून शाळेपर्यंतचा रस्ता दाखवत आहे.
00:53 या पाठाच्या शेवटी तुम्ही अशीच दुसरी आकृती काढू शकाल.
01:00 आता ड्रॉ वर जाऊ. मी ही फाईल RouteMap नावाने डेस्कटॉपवर सेव्ह केली आहे.
01:09 प्रथम Grid view सुरू करू. त्यासाठी View वर क्लिक करून Grid खालील Display Grid हा पर्याय निवडा.
01:19 आकृती काढायला सुरूवात करण्यापूर्वी पानाचा समास आणि ओरिएंटेशन सेट करून घेऊ.
01:26 ड्रॉच्या पेजवर कर्सर नेऊन कंटेक्स्ट (Context) मेनूसाठी त्यावर राईट क्लिक करा.
01:33 Page मधील Page Setup पर्याय निवडा.
01:36 Page Setup चा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:40 Format च्या ड्रॉप डाऊन मधून A4 सिलेक्ट करा आणि Portrait हे ओरिएंटेशन निवडा.
01:49 Left, Right, Top आणि Bottom margins 1 वर सेट करून OK क्लिक करा.
01:57 डिफॉल्ट फाँट साईज 24 वर सेट करा.
02:02 मुख्य मेनूतील Format खालील Character पर्याय निवडा.
02:06 Character चा डायलॉग बॉक्स उघडेल.
02:10 Fonts टॅबवर क्लिक करा. Size फिल्डमधे खाली स्क्रॉल करून 24 हा पर्याय निवडून OK

क्लिक करा.

02:18 ह्यामुळे विविध आकृत्यांमधे लिहिलेला मजकूर स्पष्टपणे दिसेल.
02:24 आता घराचे चित्र काढायला सुरूवात करू.
02:28 घर दाखवण्यासाठी एक चौरस काढून त्यात Home असे टाईप करा.
02:37 पुढे घराच्या उजवीकडे बाग काढू.
02:42 ही विषम आकाराची आयताकृती बाग आहे. डावी बाजू ही उजव्या बाजूपेक्षा अधिक रुंद आहे.
02:51 हे दाखवण्यासाठी पॉलिगॉन म्हणजेच बहुभुजाकृती वापरू. त्यासाठी Drawing टूलबारवर जाऊ.
02:58 Curve वर क्लिक करून आयकॉनच्या पुढे असलेल्या छोट्या काळ्या रंगाच्या बाणावर क्लिक करा.
03:04 Polygon filled पर्याय निवडा.
03:08 माऊसचा कर्सर ड्रॉ पेजवर न्या. त्याचे डावे बटण दाबून ठेवा आणि कर्सर खालच्या बाजूला ड्रॅग करून बटण सोडून द्या.
03:18 आपण सरळ रेषा काढली आहे. काटकोन त्रिकोण तयार होईपर्यंत माऊस उजवीकडे ड्रॅग करा.
03:26 माऊसचे डावे बटण दाबून माऊस वरच्या बाजूला ड्रॅग करा. आता माऊसचे डावे बटण दोनदा क्लिक करा.
03:35 अशाप्रकारे पॉलिगॉन तयार झाला आहे. त्यात Park असे टाईप करा.
03:41 Park च्या पुढे Commercial Complex आहे. ही देखील विचित्र आकाराची बहुभुजाकृती आहे. चला काढू या.
03:50 Drawing टूलबारवर जाऊन Curve आयकॉनच्या पुढील छोट्या काळ्या बटणावर क्लिक करा आणि Polygon filled पर्यायावर क्लिक करा.
04:00 कर्सर ड्रॉ पेपरवर नेऊन ठेवा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवा आणि खाली ड्रॅग करा.
04:07 आता माऊसचे बटण सोडा. एक सरळ रेषा दिसेल. आता त्रिकोण तयार होईपर्यंत माऊस पॉईंटर डावीकडे ड्रॅग करा.
04:19 माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करून तो वरच्या दिशेला ड्रॅग करा. आता शिफ्टचे बटण दाबून ठेवा आणि कर्सर आतील बाजूला ड्रॅग करा.
04:31 माऊसचे डावे बटण दोनदा क्लिक करा.
04:35 अशाप्रकारे आणखी एक पॉलिगॉन तयार झाला. त्यामधे Commercial Complex असे टाईप करा.
04:45 याचप्रकारे पार्किंग लॉट देखील काढून घेऊ. ड्रॉईंग टूलबारमधून Polygon filled निवडा. नंतर कर्सर ड्रॉ पेजवर नेऊन पॉलिगॉन काढा.
05:02 त्याच्या आत Parking Lot असे टाईप करा.
05:08 लक्षात घ्या की तुम्ही हव्या तेवढ्या बाजू असलेली बहुभुजाकृती काढू शकता.
05:14 पाठ पॉज करून ही असाईनमेंट करा. पाच बाजू, सहा बाजू आणि दहा बाजू असलेली बहुभुजाकृती काढा.
05:23 घराच्या उजव्या बाजूला Residential Complex आहे जो आयताकृती आहे.
05:30 ड्रॉईंग टूलबारवरून Rectangle निवडा.
05:35 ड्रॉ पेजवर माऊसचा कर्सर ठेवा आणि आयत काढण्यासाठी कर्सर ड्रॅग करा.
05:41 त्याला Residential Complex असे नाव देऊ.
05:45 या परिसरात Play Ground देखील आहे. हे लांबट आयताकृती आहे.
05:53 ड्रॉईंग टूलबारवरून Polygon 45 degree Filled हा पर्याय निवडा.
05:59 ड्रॉ पेजवर कर्सर न्या. माऊसचे डावे बटण क्लिक करून खाली ड्रॅग करा आणि सोडून द्या.
06:07 माऊसचे बटण क्लिक करून ते उजवीकडे ड्रॅग करा आणि सोडून द्या. आता आयत पूर्ण करण्यासाठी माऊस क्लिक करून तो वरच्या बाजूला ड्रॅग करा.
06:17 माऊसचे डावे बटण दोनदा क्लिक करा.
06:21 आणखी एक पॉलिगॉन तयार झाला आहे.
06:25 आतमधे Play Ground असे टाईप करा.
06:30 आता Play Ground च्या पुढे Lake काढू.
06:35 ड्रॉईंग टूलबारवरील Freeform Line filled पर्याय निवडा.
06:40 ड्रॉ पेजवर जाऊन माऊसचे डावे बटण दाबा. माऊस घड्याळाच्या काट्याच्या विरूध्द दिशेने फिरवून माऊसचे डावे बटण सोडून द्या.
06:52 आपला तलाव काढून झाला आहे त्यात Lake असे टाईप करा.
06:58 या परिसरातील शेवटची बिल्डींग म्हणजे शाळा. School campus देखील बहुभुजाकृती आकारात आहे.
07:07 आता हे आपल्या नकाशावर काढू. पुन्हा ड्राईंग टूलबारवरील Polygon 45 degree filled पर्याय निवडा.
07:17 पुढे ड्रॉ पेजवर कर्सर न्या आणि बहुभुजाकृती काढा. ती काढून पूर्ण झाल्यावर माऊस दोनदा क्लिक करा.
07:28 त्याच्या आत School Campus असे टाईप करा.
07:34 आता एक टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करून त्यात School Main Gates असे टाईप करा.
07:44 टेक्स्ट बॉक्स योग्यप्रकारे फिरवून तो योग्य जागेवर नेऊन ठेवा.
07:48 आता मुख्य मेनूतील Modify खालील Rotate पर्याय निवडा.
07:54 हँडल्सचा रंग बदलून तो लाल झालेला लक्षात येईल. याचा अर्थ आपण रोटेट मोडवर आहोत.
08:02 हा बाण असलेला छोटा कंस तुम्हाला दिसला का? ह्याचा उपयोग बॉक्स फिरवण्यासाठी करू.
08:09 आता कर्सर टेक्स्ट बॉक्सच्या उजवीकडील वरच्या बाजूला शेवटच्या हँडलवर न्या.
08:17 रोटेशन कर्व्ह आलेला दिसेल.
08:21 माउसचे डावे बटण दाबा. बॉक्सने अपेक्षित असलेली जागा घेईपर्यंत, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा.
08:30 रोटेट मोड मधून बाहेर पडण्यासाठी ड्रॉ पेजवर कुठेही क्लिक करा.
08:36 शाळेचा बाजूचा एंट्रन्स देखील दाखवू.
08:41 मागील स्टेपप्रमाणे एक टेक्स्ट बॉक्स काढून त्यात School Side Entrance असे टेक्स्ट टाईप करा.
08:50 आता दिशा दाखवणारे बाण दाखवू. घराकडून आपल्याला उजवीकडे वळायचे आहे.
08:57 ड्रॉईंग टूलबारवरील Line Ends with Arrow हा पर्याय निवडा.
09:02 ड्रॉ पेजवर जाऊन एक रेष काढा.
09:08 नंतर Residential Complex ओलांडल्यावर डावीकडे वळा.
09:14 हा रस्ता दाखवण्यासाठी आणखी एक रेष काढू.
09:19 नंतर प्ले ग्राउंडजवळ उजवीकडे वळा आणि खालच्या दिशेला चाला.
09:25 शाळेच्या मुख्य गेटजवळ पोहोचण्यासाठी पुन्हा उजवीकडे वळा.
09:32 आपण पहिला मार्ग येथे दाखवला आहे. येथे दोन प्रकारे कर्व्हस आणि पॉलिगॉन्स काढू शकतो हे तुमच्या लक्षात आले असेल.
09:41 पहिला Filled हा पर्याय वापरून तर दुसरा Fill पर्याय न वापरता. जेव्हा Filled पर्याय वापरतो तेव्हा कर्व्ह रंगवलेला असतो.
09:52 तुमच्या हेही लक्षात आले असेल की, कर्व्ह टूलबारमधील प्रत्येक पर्याय कर्व्ह काढण्यासाठी माऊस ऑपरेशनची वेगळी पध्दत वापरतो.
10:02 असाईनमेंट. कर्व्ह टूलबारमधील सर्व पर्याय वापरून कर्व्ह आणि पॉलिगॉन काढा.
10:10 कर्व्ह किंवा पॉलिगॉनच्या निवडीनुसार कर्सरचा आकार आणि माऊसचे ऑपरेशन बदलते याकडे लक्ष द्या.
10:20 Filled या पर्यायात भरला जाणारा रंग तुम्हाला बदलता येतो का ते बघा.
10:25 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:31 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:45 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10:51 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:04 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
11:14 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana