Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Import-and-Export-Images/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 383: Line 383:
 
|-
 
|-
 
|08:01
 
|08:01
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Revision as of 11:42, 19 October 2015

Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Import आणि Export Images वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात ड्रॉ पेजवर इमेज इंपोर्ट करणे आणि ड्रॉ फाईल विविध फाईल फॉरमॅटसमधे सेव्ह करण्याबाबत जाणून घेऊ.
00:16 आपण व्हेक्टर, बिटमॅप किंवा raster इमेजेस या दोन्ही, Draw मधे इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो.
00:23 येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू.
00:32 RouteMap उघडू.
00:35 या पाठासाठी WaterCycle या चित्राची JPEG फाईल तयार करून ती डेस्कटॉपवर सेव्ह केली आहे.
00:46 ही इमेज आपल्या ड्रॉ फाईलमधे इंपोर्ट करू.
00:49 ही इमेज बंद करू.
00:52 प्रथम जिथे चित्र इंपोर्ट करायचे आहे ते पान सिलेक्ट करा.
00:57 नवे पान समाविष्ट करून ते सिलेक्ट करा.
01:01 व्हेक्टर किंवा बिटमॅप इमेज इंपोर्ट करण्यासाठी Insert टॅबवर क्लिक करून Picture पर्याय निवडा.
01:08 From File वर क्लिक करा.
01:10 Insert picture डायलॉग बॉक्स उघडेल.
01:14 Water Cycle.jpeg सिलेक्ट करा.
00:17 Openवर क्लिक केल्यास इमेज Draw फाईलमधे प्रत्यक्ष समाविष्ट केली जाईल.
01:24 Link बॉक्स चेक केली असल्यास इमेज त्याच्या पाथद्वारे जोडली जाईल.
01:29 Open वर क्लिक करा.
01:32 इमेज केवळ लिंक म्हणून संचित होईल अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल.
01:37 Keep Link वर क्लिक करा.
01:40 ड्रॉ फाईलमधे चित्र लिंक म्हणून समाविष्ट करण्यात येईल.
01:44 लिंक्स सहजपणे काढून देखील टाकता येतात.
01:48 मुख्य मेनूतील Edit खालील Link वर क्लिक करा.
01:53 Edit Links चा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:57 हा डायलॉग बॉक्स ड्रॉ फाईल मधील सर्व लिंक्सची सूची दाखवेल.
02:02 WaterCycle च्या चित्रासाठी या लिंकवर क्लिक करा.
02:06 Break Link वर क्लिक करा.


02:09 Draw कन्फरमेशन मेसेज देईल. Yes वर क्लिक करा.


02:14 लिंक काढून टाकली जाईल. Close वर क्लिक करा.


02:20 परंतु चित्र अजूनही फाईलमधे उपलब्ध असल्याचे आपल्या लक्षात येईल.
02:25 लिंक काढून टाकल्यास चित्र आपोआप Draw फाईलमधे Embed करून समाविष्ट होते.
02:31 हे चित्र डिलीट करण्यासाठी ते सिलेक्ट करून Delete वर क्लिक करा.


02:39 ही असाईनमेंट करा.
02:42 दोन ड्रॉ फाईल्स बनवा.
02:44 एका फाईलमधे चित्र लिंकद्वारे समाविष्ट करून ती सेव्ह करा.
02:48 दुस-या फाईलमधे चित्र Embed करून समाविष्ट करा आणि ती सेव्ह करा.
02:52 दोन्ही फाईल्सच्या आकारांची तुलना करा.
02:55 इमेज लिंक केलेल्या फाईल मधे इमेजच्या आकारात बदल करा.
03:00 हा बदल मूळ फाईलमधे दिसतो आहे का ते तपासा.
03:05 पुढे या फाईलमधे WaterCycle चे चित्र Draw image म्हणून इंपोर्ट करू.
03:13 मुख्य मेनूतील Insert वर क्लिक करून File पर्याय निवडा.
03:18 Insert File हा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:21 सूचीतून WaterCycle.odg ही ड्रॉ फाईल निवडा.
03:28 Open वर क्लिक करा.


03:30 Insert slides/objects हा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:34 फाईल पाथच्या पुढे असलेल्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा.
03:38 स्लाईडसची सूची बघायला मिळेल.
03:41 WaterCycle चे चित्र असलेली स्लाईड निवडा.
03:46 पेज किंवा ऑब्जेक्ट, लिंक म्हणून देखील समाविष्ट करता येते.
03:51 हे असे करण्यासाठी केवळ Link च्या चेक बॉक्सवर क्लिक करा.
03:55 OK क्लिक करा.
03:57 ऑब्जेक्ट नवीन फॉरमॅटमधे बसवण्यासाठी विचारणा करणारा कन्फरमेशन डायलॉगबॉक्स उघडेल.
04:05 Yes क्लिक करा.
04:07 फाईलमधे नव्या पानावर स्लाईड समाविष्ट होईल.
04:12 ड्रॉ मधून चित्र एक्सपोर्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
04:17 ड्रॉ मधे फाईल एक्सपोर्ट करणे म्हणजे
  • ड्रॉ फाईल किंवा
  • ड्रॉ फाईलचे पान किंवा
  • त्यातले ऑब्जेक्ट इतर फाईल
  • फॉरमॅटमधे रूपांतरित करणे
04:29 उदाहरणार्थ ड्रॉ फाईल PDF, HTML, JPEG किंवा bitmap फाईलमधे रूपांतरित करता येऊ शकते.
04:39 PDF, Flash आणि HTML या फाईल फॉरमॅटसमधे नेहमीच संपूर्ण ड्रॉ फाईल एक्सपोर्ट केली जाते.
04:47 RouteMap फाईल मिनीमाइज करा.
04:51 तुम्हाला आश्चर्य वाटेल की Draw WaterCycle डायग्रॅम JPEG फॉरमॅट मधे कसा रूपांतरित झाला?
04:58 हे कसे करायचे ते पाहू.
05:01 WaterCycle फाईल उघडा.
05:05 नंतर पेजेस पॅनेलमधून WaterCycle चे चित्र असलेले पान निवडा.
05:11 मुख्य मेनूतील File खालील Export वर क्लिक करा.
05:16 Export डायलॉग बॉक्स उघडेल.
05:18 Filename फिल्डमधे WaterCycleDiagram हे नाव टाईप करा.
05:24 Places पॅनेलमधे Desktop वर क्लिक करा.
05:29 File type फिल्डमधे JPEG हा पर्याय निवडणार आहोत. परंतु तुम्ही ड्रॉ फाईल इतर फॉरमॅटमधे देखील सेव्ह करू शकता.
05:38 Selection चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:42 Save क्लिक करा.
05:43 JPEG Options डायलॉग बॉक्स उघडेल.
05:47 डायलॉग बॉक्समधील डिफॉल्ट रूपात असलेल्या पर्यायांमधे बदल करू नका.
05:53 OK क्लिक करा.
05:55 WaterCycle चित्र असलेले ड्रॉ पेज डेस्कटॉपवर JPEG फाईल म्हणून सेव्ह झाले आहे.
06:02 येथे ड्रॉ फाईलमधील केवळ एकच पान JPEG फाईलमधे रूपांतरित झाले आहे.
06:08 फाईल PDF, Flash किंवा HTML फॉरमॅटमधे सेव्ह केल्यास ड्रॉ फाईल मधील सर्व पाने एक्सपोर्ट केली जातात.
06:18 ड्रॉ मधे raster इमेजेस देखील एडिट करता येऊ शकतात.
06:22 Raster इमेजेस Format मेनूच्या सहाय्याने फॉरमॅट करता येतात.
06:26 ही चित्रे एडिट करण्यासाठी तुम्ही Picture टूलबारचा देखील वापर करू शकता.
06:31 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:37 या पाठात इमेजेस इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करायला आणि ड्रॉ ऑब्जेक्टस विविध फाईल फॉरमॅटसमधे सेव्ह करायला शिकलो.
06:47 ही असाईनमेंट करा.
06:50 एखादे ऑब्जेक्ट किंवा निवडलेल्या ऑब्जेक्टसचा संच देखील एक्सपोर्ट करता येतो.
06:56 WaterCycle या ड्रॉ फाईलमधील केवळ ढग आणि डोंगर JPEG फॉरमॅटमधे रूपांतरित करा.
07:05 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:09 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:12 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.


07:17 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:23 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:28 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.


07:40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:48 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
08:01 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana