Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C3/Advanced-Formatting-and-Protection/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 415: Line 415:
 
पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते,
 
पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते,
 
पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते,
 
पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते,
पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये  
+
स्प्रेडशीट मध्ये  
 
डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे,
 
डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे,
 
सब-टोटल पर्याय वापरणे,
 
सब-टोटल पर्याय वापरणे,

Revision as of 11:45, 26 June 2013

Resources for recording Advanced Formatting and Protection


VISUAL CUE NARRATION
00:00 लिबर ऑफिस कॅल्क मधील अड्वॅन्स्ड फॉरमॅटिंग आणि प्रोटेक्शन वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या मध्ये आपण, पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते,पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये, एक शीट किंवा टॅब चे संरक्षण करते, डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करणे.
00:25 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4. वापरणार आहोत.
00:35 चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडुया.
00:40 सर्वप्रथम पासवर्ड ने ही फाइल सुरक्षित करणे शिकुया.
00:44 हा पर्याय खात्री करेल की, ज्याना पासवर्ड माहीत आहे, फक्‍त तेच लोक हि फाइल उघडू शकतात.
00:51 मुख्य मेन्यू वरुन, File आणि Save As वर क्लिक करा.
00:55 Save डायलॉग बॉक्स दिसेल.
00:58 नंतर, Save with password बॉक्स तपासा.
01:03 नंतर Save वर क्लिक करा.
01:06 Save As , पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाइल च्या स्वरुपात किंवा त्याच फाइल च्या जागी सेव करू शकतो
01:15 येथे फाइल बदलुया.
01:18 Yes वर क्लिक करा.
01:20 नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
01:23 आणि कन्फर्म बॉक्स मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
01:30 नंतर Personal-Finance-Tracker.ods बंद करा.
01:36 आता हि फाइल पुन्हा उघडून काय होते ते पाहुया.
01:41 Enter Password डायलॉग बॉक्स दिसेल.
01:45 येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया.
01:48 OK वर क्लिक करा.
01:50 आपल्याला password is incorrect असा संदेश मिळत आहे.
01:56 आता अचूक पासवर्ड टाइप करा.
01:59 फाइल उघडते.
02:01 पासवर्ड पर्याय काढून टाकणे ही सोपे आहे.
02:07 आपण Save with password पर्याय अनचेक करूया.
02:10 पुन्हा जसे की आपण Save पर्याय वापरत आहोत, आपण त्यास वेगळ्या फाइल च्या रूपात किंवा त्याच फाइल च्या जागी बदलून सेव करू शकतो.
02:18 येथे फाइल बदलुया.
02:21 Yes वर क्लिक करा.
02:23 हि फाइल बंद करूया आणि उघडुया.
02:27 हि फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड ची आवश्यकता नाही.
02:31 पासवर्ड या फाइल च्या विशेष शीट्स ला कसे सुरक्षित करते हे शिकु.
02:37 मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet” वर क्लिक करा.
02:44 “Protect Sheet” डायलॉग बॉक्स दिसेल.
02:47 शीट सुरक्षित करण्यास प्रथम, “Select Locked cells” आणि “Select Unlocked cells” पर्याय अनचेक करा.
02:56 आता, “Password” फील्ड मध्ये , लहान अक्षरात “abc”, प्रविष्ट करा आणि “Confirm” फील्ड मध्ये, पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा.
03:07 OK वर क्लिक करा.
03:08 आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा.
03:15 आपण कोणताही सेल निवडण्यास असमर्थ आहोत.
03:18 शीट बदलू शकत नाही.
03:22 परंतु इतर शीट्स बद्दल काय?
03:24 Sheet2 वर क्लिक करूया.
03:27 सेल निवडुन त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया.
03:30 कॅल्क आपल्यास इतर शीट्स मध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे.
03:35 पहिल्या शीट मध्ये जाऊया.
03:38 आता शीट ला असुरक्षित करूया.
03:41 हे सोपे आहे.
03:43 मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet” वर क्लिक करा.
03:49 पासवर्ड ची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल.
03:53 लहान अक्षरात त्यामध्ये “abc” प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
03:59 आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत.
04:03 “Ranges” बद्दल शिकुया.
04:06 तुम्ही स्प्रेडशीट मध्ये सेल्स ची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरु शकता.
04:12 या डेटा बेस मधील प्रत्येक रो मध्ये डेटाबेस रिकॉर्ड च्या अनुरूपीत असते आणि,
04:17 रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्ड च्या अनुरूपीत असते.
04:22 तुम्ही रेंज वर क्रमवारी, वर्गीकरण, शोध आणि गणन करू शकता, जसे तुम्ही इतर डेटाबेस मध्ये करता.
04:30 “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया.
04:38 प्रथम डेटाबेस मध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया.
04:43 शीर्षक “SN” पासून Account पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा आणि आपण डेटा निवडने अगोदर शिकलो आहोत.
04:53 आता आपल्या डेटा बेस ला नाव देऊया.
04:56 मेन मेन्यु बार वरुन, “Data” वर क्लिक करून नंतर “Define Range” वर क्लिक करा.
05:02 “Name” फील्ड मध्ये, “dtbs” टाइप करा जे डेटा बेस चा शॉर्ट फॉर्म आहे.
05:08 “OK” वर क्लिक करा.
05:10 पुन्हा मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Select Range” वर क्लिक करा.
05:15 लक्ष द्या, “Select Database Range” डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी “dtbs” सूचीबद्ध आहे.
05:24 “OK” बटना वर क्लिक करा.
05:27 आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू.
05:31 मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Sort” वर क्लिक करा.
05:35 Sort डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या “Sort by” फील्ड वर क्लिक करा आणि “SN” निवडा.
05:42 नंतर उजव्या बाजुवरून, “Descending” निवडा.
05:47 पहिल्या “Then by” फील्ड खाली ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून “Cost” निवडा.
05:54 पुन्हा उजव्या बाजुवरून, “Descending” निवडा.
05:58 दुसऱ्या “Then by” फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. “Spent” निवडा आणि नंतर पुन्हा “Descending” निवडा.
06:07 OK वर क्लिक करा.
06:09 डेटा “SN” शीर्षका खाली उतरत्या क्रमा मध्ये सूचीबद्ध झाला आहे.
06:15 या प्रमाणे ,डेटा बेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो.
06:21 क्रम अंडू करण्यासाठी CTRL+Z दाबा मूळ डेटा मिळेल.
06:28 आता कॅल्क मधील “Subtotal” पर्यायाचा उपयोग करणे शिकू.
06:34 “Subtotal” पर्याय, तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षका खालील डेटा च्या एकूण बेरजेची गणना करते.
06:43 “Cost” शीर्षका खालील डेटा चे एकूण बेरीज शोधू.
06:49 प्रथम, रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू.
06:53 SN ते ACCOUNT पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा.
06:59 नंतर मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Subtotals” वर क्लिक करा.
07:04 दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये, “Group by”, फील्ड वरुन “SN” निवडू.
07:11 हे डेटा, चे सीरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते.
07:15 नंतर, “Calculate subtotals for” फील्ड मधील “Cost” पर्याया वर क्लिक करा.
07:21 हे या पर्याया खालील सर्व एंट्रीस च्या बेरजेची गणना करेल.
07:26 “Use function” फील्ड खालील , “Sum” निवडून OK वर क्लिक करू.
07:33 लक्ष द्या, “Costs” शीर्षका खालील एंट्रीस ची “Grand total” स्प्रेडशीट वर दर्शित आहे.
07:41 शीट च्या डाव्या बाजुवर “1” ”2” आणि “3” हे तीन नवीन टॅब्स आहेत.
07:47 हे टॅब्स डेटा चे तीन विविध व्यूस देतात.
07:52 टॅब 1 वर क्लिक करू.
07:54 लक्ष द्या, “Costs” खालील डेटा ची फक्‍त एकूण बेरीज दर्शित आहे.
08:00 टॅब “2” वर क्लिक करा.
08:02 “Costs” खालील डेटा तसेच एकूण बेरीज दर्शित आहे.
08:08 आता “3” वर क्लिक करा.


08:11 आपल्याला “Costs” खालील डेटा ची एकूण बेरीज शीट च्या विस्तृत व्यू सह मिळेल.
08:18 ही फाइल बंद करूया.
08:21 बदलास Save किंवा Discard करण्यासाठी सूचने सहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो.
08:26 Discard वर क्लिक करा.
08:28 आता पुन्हा फाइल उघडू.
08:31 आता लिबर ऑफीस कॅल्क मधिल “Validity” पर्याया बद्दल शीकू.
08:37 “Validity” पर्याय स्प्रेडशीट मधिल डेटास वैधता आणते.
08:41 हे स्प्रेडशीट मधिल निवडक सेल साठी “Validation rules” उल्लेखित करून करू शकतो.
08:49 उदाहरणार्थ, “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये आपण वॅलिडेशन चा वापर करून विकत घेतलेल्या वस्तुच्या भरणे चा उल्लेख करू शकतो.
08:59 आता शीर्षक “Date” आणि त्याचा मजकूर डिलीट करूया.
09:04 शीर्षक “Received च्या पुढे “Mode of Payment” साठी “M-O-P” हे शीर्षक द्या.
09:12 “M-O-P”, शीर्षका खाली, “Items”,शीर्षक मध्ये डेटा एंट्रीस साठी mode of payments दर्शविण्यासाठी सेल्स चा वापर करू शकतो.
09:21 जसे ”Salary”,”Electricity Bills” आणि इतर घटक.
09:27 आता शीर्षक ”M-O-P” च्या जरा खाली रिकाम्या सेल वर क्लिक करूया.
09:33 या मध्ये “Salary” घटका साठी mode of payments असेल.
09:38 आता,मेन्यु बार वरुन “Data” आणि “Validity” वर क्लिक करा.
09:43 “Validity” डायलॉग बॉक्स दिसेल.
09:47 “Criteria” टॅब वर क्लिक करूया.
09:50 “Allow” , फील्ड ड्रॉप डाउन वरुन “List” वर क्लिक करा.
09:55 “Entries”बॉक्स पॉप्स-अप होतो.
09:58 निवडक सेल वॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया.
10:05 पहिल्या मोड ऑफ पेमेंट्स साठी “In Cash”, आणि नंतर कीबोर्ड वरील एंटर की दाबा.
10:13 नंतर, दुसऱ्या मोड ऑफ पेमेंट्स साठी “Demand Draft” टाइप करू.
10:19 OK वर क्लिक करा.
10:21 निवड लेले सेल वॅलिडेटेड आहेत.
10:25 आता, बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा.
10:30 तुम्ही“Entries” बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहु शकता का?
10:36 सेल्स ला खाली वॅलिडेट करण्यासाठी, प्रथम टूल बार वरील “Format Paintbrush” पर्याया वर क्लिक करा.
10:43 नंतर, वॅलिडेट सेल च्या खालच्या सेल्स ला माउस चे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा.
10:53 आता माउस चे बटन सोडा.
10:57 निवडलेले सर्व सेल त्या प्रमाणे वॅलिडेट झाले आहेत.
11:09 “M-O-P” शीर्षका च्या जरा खाली असलेल्या सेल वर क्लिक करा आणि नंतर डाउन एरो वर क्लिक करा.
11:17 मोड ऑफ पेमेंट्स चे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत.
11:21 आता “In Cash” पर्याय निवडू.
11:25 या प्रमाणे , निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार, प्रत्येक वेलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही “Cash” किंवा “Demand Draft” निवडू शकता.
11:36 हा पाठ येथे संपत आहे.
11:42 या मध्ये आपण,

पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते, पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते, स्प्रेडशीट मध्ये डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करते हे शिकलो.

12:01 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:04 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:07 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
12:11 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
12:13 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:17 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
12:20 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
12:31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
12:39 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:42 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
12:50 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana