LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C2/Viewing-a-Presentation-Document/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:56, 2 February 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Viewing a Presentation

Author: Manali Ranade

Keywords: Impress


Visual Clue
Narration
00:00 लिबर ऑफिसच्या 'Viewing a Presentation' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण View मधील उपलब्ध पर्याय, त्याचे उपयोग तसेच Master Pages बद्दल शिकणार आहोत.
00:13 इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:22 प्रथम 'Sample Impress' हे प्रेझेंटेशन उघडण्यासाठी, त्यावर डबल क्लिक करू.
00:27 लिबर ऑफिस इम्प्रेस मध्ये अनेक Views चे पर्याय आहेत जे आपल्याला चांगले प्रेझेंटेशन बनवायला मदत करतील.
00:34 जेव्हा आपण लिबर ऑफिस इम्प्रेस सुरू करतो तेव्हा Default रूपात हा स्क्रीन दिसतो.
00:41 याला 'Normal View' असे म्हणतात.
00:43 जेव्हा प्रेझेंटेशन इतर कुठल्या View मध्ये असेल तर
00:48 तुम्ही 'Normal' Tab वर क्लिक करून 'Normal View' वर पुन्हा येऊ शकता.
00:53 किंवा 'View' वर क्लिक करून नंतर 'Normal' वर क्लिक करा.
00:57 'Normal View' मध्ये आपण स्लाईड बनवून त्यात बदलही करू शकतो.
01:02 उदाहरणार्थ आपण स्लाईडचे डिझाईन बदलू शकतो.
01:05 हे करण्यासाठी 'Overview' असे शीर्षक असलेल्या स्लाईडवर जा.
01:09 उजवीकडील 'Task pane' मध्ये 'Master pages section' च्या अंतर्गत 'used in this presentation खाली आपल्याला the slide design is prs strategy दिसेल.
01:21 यात सध्या उपलब्ध असलेल्या स्लाईड्सची डिझाईन बघता येतात.
01:27 एका डिझाईनवर क्लिक करा.
01:30 'Work Space Pane' मधल्या स्लाईड डिझाईन मध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
01:33 बघा, स्लाईड डिझाईन बदलणे किती सोपे आहे!
01:39 तुम्ही बनवलेले डिझाईनही स्लाईडची बॅकग्राऊंड म्हणून समाविष्ट करता येईल.
01:43 पुढे आपण 'Outline View' बद्दल जाणून घेऊ.
01:47 तुम्ही या Viewवर जाण्यासाठी 'View' वर क्लिक करून मग 'Outline' वर क्लिक करा.
01:53 किंवा 'Outline' या टॅबवर क्लिक करू शकता.
01:57 तुम्हाला दिसेल की या View मध्ये टेबलमधील घटकांप्रमाणे स्लाईड एकाखाली एक मांडलेल्या दिसतात.
02:05 येथे तुम्हाला स्लाईडस् ची हेडिंग्ज दिसतील.
02:08 'Overview' हे हेडिंग हायलाईटेड स्वरूपात दिसेल.
02:12 याचे कारण असे की, आपण 'Outline' tab क्लिक करण्याचे वेळी आपण 'Overview' ह्या स्लाईडवर होतो.
02:18 येथील आयकॉन तुम्हाला bullet points प्रमाणे दिसतील.
02:23 कर्सर या बुलेट पॉईंटवर नेल्यास त्याचे रूपांतर तळहातासारख्या आयकॉन मध्ये होईल.
02:29 याद्वारे स्लाईडमधील ओळींचा क्रम आपण स्लाईडमध्ये वरखाली बदलू शकतो.
02:38 किंवा दुस-या स्लाईडवरही नेऊ शकतो.
02:40 केलेले बदल 'Ctrl + Z' दाबून undo करू या.
02:49 Slide sorter view चा उपयोग स्लाईडस् चा अनुक्रम बदलण्यासाठी करता येतो.
02:53 Slide sorter view मध्ये जाण्यासाठी प्रथम view वर क्लिक करून नंतरsorter वर क्लिक करू.
03:00 किंवा Slide sorter टॅब वर क्लिक करू.
03:04 स्लाईड्सचा क्रम बदलण्यासाठी याचा उपयोग करतात.
03:08 उदाहरणार्थ स्लाईड क्रमांक 9 आणि 10 यांची अदलाबदली करण्यासाठी स्लाईड क्रमांक10 वर क्लिक करून ती स्लाईड, स्लाईड क्रमांक 9 च्या वर ड्रॅग करा.
03:18 आता माऊसचे बटण सोडून द्या.
03:22 स्लाईडस् ची अदलाबदल झालेली दिसेल.
03:26 नोटस् या Viewमध्ये आपण स्लाईडला तळटीप लिहू शकतो.
03:31 नोटस् View वर जाण्यासाठी 'View' मधील 'Notes Page' निवडा.
03:36 किंवा तुम्ही 'Notes' या टॅबवर देखील क्लिक करू शकता.
03:39 स्लाईडस् pane मधील 'Development up to present' ही स्लाईड सिलेक्ट करा.
03:44 तळटीप लिहिण्याच्या जागेत काही मजकूर टाईप करा.
03:49 प्रेझेंटेशन प्रोजेक्टरद्वारे दाखवताना ही तळटीप मॉनिटरवर तुम्हाला दिसेल पण तुमचे दर्शक ती बघू शकणार नाहीत.
03:58 आता 'Normal' Tab वर क्लिक करा.
04:01 प्रेझेंटेशनचा लेआऊट 'Task Pane' मधील लेआऊट विभागात जाऊन बदलता येतो.
04:08 Task pane स्क्रीनवर ठेवण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी,
04:12 view मधील Task pane क्लिक करा.
04:14 यामुळे Task pane दाखवले जाईल किंवा काढून टाकले जाईल.
04:18 स्लाईडचा लेआऊट बदलण्यासाठी लेआऊट या विभागाचा उपयोग करू या.
04:23 'Development up to present' हे शीर्षक असलेली स्लाईड सिलेक्ट करा.
04:26 लेआऊट विभागातून 'Title Content over content' हा पर्याय निवडा.
04:33 त्यामुळे स्लाईडचा लेआऊट बदलला आहे.
04:37 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
04:40 आपण काय शिकलो ते थोडक्यात. View मधील उपलब्ध पर्याय, त्याचे उपयोग तसेच Master Pages
04:46 COMPREHENSION TEST ASSIGNMENT
04:49 नवीन प्रेझेंटेशन तयार करा.
04:52 फिकट निळ्या रंगाचा टायटल एरिया आणि गडद निळ्या रंगाची बॅकग्राऊंड असलेले मास्टर पेज बनवा.
04:58 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:15 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:19 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
05:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
05:30 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
05:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:49 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana