Java-Business-Application/C2/Java-servlets-and-JSPs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:15, 14 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Java-servlets-and-JSPs

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00:01 Java Servlets आणि JSPsवरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
00:09 Web server
00:10 Web container
00:12 तसेच आपणJava Servlet आणि JSP बनवणार आहोत.
00:18 आपण वापरणार आहोत,
00:20 उबंटु वर्जन 12.04
00:23 नेटबीन्स IDE 7.3
00:27 JDK 1.7
00:29 फायरफॉक्स वेबब्राऊजर 21.0
00:33 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:37 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00:41 नेटबीन्स IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00:45 HTML चे ज्ञान असावे.
00:42 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:52 Servlets आणि JSPला जाण्यापूर्वी आपण वेब सर्व्हरची माहिती घेऊ.
00:58 वेब सर्व्हर म्हणजे इंटरनेटवरील युजरला माहिती पुरवणारी प्रणाली.
01:05 ह्याला इंटरनेट सर्व्हरसुध्दा म्हणतात.
01:10 वेब कंटेनर हा वेब सर्व्हरचा घटक असून Java servletsशी संवाद साधतो.
01:18 ह्याला सर्व्हलेट कंटेनरसुध्दा म्हणतात.
01:22 सर्व्हलेट कंटेनर त्याच्या आतservletsकार्यान्वित करण्याची परवानगी देतो.
01:28 आता साधी servlet कशी लिहायची ते पाहू.
01:32 नेटबीन्स IDE वर जाऊ.
01:35 IDEच्या डावीकडे असलेल्या प्रोजेक्टस टॅबवर क्लिक करा.
01:40 मागे आपण MyFirstProject नावाचे एक साधे प्रोजेक्ट बनवले होते.
01:46 तुम्ही IDEच्या डावीकडे ते बघू शकता.
01:50 आपण प्रोजेक्टच्या आत servletबनवू.
01:55 MyFirstProjectवर राईट क्लिक करा.
01:59 New खालील Servlets वर क्लिक करा.
02:03 New Servlet विंडो उघडेल.
02:05 Class Nameम्हणून MyServlet द्या.
02:09 Package Name म्हणून org.spokentutorial असे टाईप करा.
02:16 Next वर क्लिक करा.
02:18 Add information to deployment descriptor (web.xml) क्लिक करा.
02:23 आपण org.spokentutorial.MyServlet हे क्लासनेम पाहू शकतो.
02:30 Servlet नेम हे क्लासनेम प्रमाणे आहे जे MyServlet आहे.
02:37 URL pattern देखील क्लासनेम प्रमाणेच MyServlet आहे.
02:45 आपण हे बदलून MyServletPath करू शकतो.
02:50 Finish वर क्लिक करा.
02:53 IDEने MyServlet.java साठी बनवलेला सोर्स कोड सोर्स एडिटर विंडोमधे बघता येतो.
03:01 आपल्याला MyServlet.javaहे पॅकेज org.spokentutorial मधे बनलेले दिसेल.
03:09 servlet हे इतर Java class प्रमाणेच असते.
03:14 फक्त servlet मधे main मेथड नसते.
03:19 आता Glassfish सर्व्हर बद्दल अधिक जाणून घेऊ.
03:24 सर्व्हलेट कंटेनरमधे servlet ठेवली जाते.
03:28 आपण सर्व्हर म्हणून Glassfish वापरत आहोत.
03:32 सर्व्हलेट कंटेनर हा Glassfishचा घटक असून servlets शी संवाद साधतो.
03:39 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
03:42 लक्षात घ्या, MyServlet हा HttpServletचा विस्तार करतो.
03:48 कोडच्या शेवटी HttpServlet मेथडस बघू शकतो.
03:54 ह्या मेथडस बघण्यासाठी डाव्या बाजूच्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा.
03:59 doGet, doPost आणि getServletInfo मेथडस बघू शकतो.
04:09 ह्या मेथडस ओव्हरराईड करता येतात.
04:12 आपल्याकडे वर processRequestनावाची आणखी मेथड आहे.
04:18 गोंधळ टाळण्यासाठी processRequest आणि getServletInfo ह्या मेथडस डिलिट करणार आहोत.
04:25 आपल्याकडे doGet आणि doPost या दोन मेथडस उरल्या आहेत.
04:31 आता doGet मेथड पाहू.
04:35 कुठल्याही साध्या URL रिक्वेस्टसाठी doGetही डिफॉल्ट मेथड असते.
04:41 doGet मेथड मधे काही कोड टाईप करू.
04:45 आपण processRequest मेथड आधीच डिलीट केली होती.
04:49 त्यामुळे processRequest मेथडसाठीचा मेथड कॉल काढून टाकू.
04:54 तसेच doPost मेथडनधून देखील काढून टाकू.
04:58 आता doGet मेथडवर जाऊ.
05:01 आपण doGet मेथडला दोन पॅरॅमीटर्स पास केलेली आहेत.
05:07 request हे पहिले आणि response object हे दुसरे.
05:12 लक्षात घ्या request हे HttpServletRequest टाईपचे आहे.
05:18 आणि response ऑब्जेक्ट HttpServletResponseटाईपचे आहे.
05:22 आपण response object हे क्लायंटला HTML response परत देण्यासाठी वापरू.
05:30 त्यासाठी PrintWriter object बनवणे आवश्यक आहे.
05:35 आपण PrintWriter classआधीच इंपोर्ट केला आहे.
05:40 आता doGet method मधे टाईप करा PrintWriter space writer equal to response dot getWriter open and close brackets semicolon
05:57 एंटर दाबा.
05:59 पुढच्या ओळीवर टाईप करा
06:02 writer dot println कंसात आणि डबल कोटसमधे welcome.
06:09 Ctrl S दाबून फाईल सेव्ह करा.
06:14 आता सर्व्हलेट कार्यान्वित करू.
06:17 त्यासाठी डाव्या बाजूला Projects टॅब मधे MyServlet dot java राईट क्लिक करा.
06:24 Run File वर क्लिक करा.
06:27 Set Servlet Execution URL डायलॉग बॉक्स उघडेल.
06:32 OK क्लिक करा.
06:35 ब्राऊजर विंडो उघडल्यावरURL कडे लक्ष द्या.
06:39 येथे localhost colon 8080 slash MyFirstProject slash MyServletPath असे दिसेल.
06:47 येथे MyFirstProject हे context नेम आणि MyServletPath हा आपण सेट केलेला URL पॅटर्न आहे.
06:55 ब्राऊजरवर welcomeहे टेक्स्ट प्रिंट झालेले दिसेल.
07:00 नेटबीन्स IDE वर जाऊ.
07:03 आपण println मेथडमधे html कोड पास करू शकतो.
07:07 उदाहरणार्थh3 टॅगमधे welcome लिहा.
07:12 फाईल सेव्ह करा.
07:14 हे सर्व्हलेट आधीच डिप्लॉय केलेले असल्यामुळे पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता नाही.
07:20 वेब कंटेनर हे आपोआप शोधतो.
07:23 आता browser वर परत जा.
07:27 रिफ्रेश करा.
07:28 Welcome हा मेसेज वेगळ्या फॉरमॅटमधे बघू शकता.
07:32 IDE वर परत जा.
07:35 अशारितीने आपण सर्व्हलेट बनवले आहे.
07:39 सर्व्हलेट्स वापरून कुठलेही वेब अॅप्लिकेशन बनवू शकतो.
07:45 HTML कोड दाखवण्यासाठी सर्व्हलेटचा वापर केला आहे.
07:49 HTML कोड Java कोडमधे आहे हे लक्षात घ्या.
07:54 हे शक्य असले तरी, मोठ्या वेब अॅप्लिकेशनसाठी लिहिणे कठीण होऊ शकते
08:00 आणि म्हणून वापरले जात नाही.
08:03 त्याऐवजी जावा सर्व्हर पेजेस (JSP) वापरणे योग्य ठरते.
08:10 servlets आणि jspsचा उपयोग पाहू.
08:13 प्रेझेंटेशन कंटेंट पासून वेगळे करण्यासाठी Servlets आणि JSPs एकत्रित वापरले जातात.
08:20 Servlets कंट्रोलर म्हणून आणि JSPs व्ह्यू म्हणून कार्य करते.
08:25 Servlets मधे जावा कोडमधे HTML कोड असतो.
08:30 JSPमधे HTMLकोडच्या आत Java चा समावेश होतो.
08:35 याबद्दल अधिक पुढील पाठांत जाणून घेणार आहोत.
08:39 आता नेटबीन्स IDEवर जाऊ.
08:42 आपण साधे JSP पेज बनवू.
08:47 MyFirstProject वर राईट क्लिक करा.
08:50 New वर जा.
08:51 आणि JSP क्लिक करा.
08:54 नवी JSPविंडो उघडेल.
08:57 Welcome असे फाईलनेम द्या.
09:01 Finish वर क्लिक करा.
09:04 डावीकडील Projects tab वर क्लिक करा.
09:07 वेब Pages फोल्डरमधे Welcome.jsp बघू शकतो.
09:13 आता एडिटरमधे Hello World च्या जागी Welcome करू.
09:19 Welcome हे h1 टॅग्जमधे आहे.
09:23 आता फाईल सेव्ह करा.
09:25 Browser वर जाऊ.
09:27 url मधे MyFirstProject slash च्या पुढे welcome.jsp असे टाईप करा.
09:35 Welcome असे आऊटपुट दिसेल.
09:38 म्हणून प्रेझेंटेशनसाठी jsp ला प्राधान्य दिले जाते.
09:42 थोडक्यात,
09:44 या पाठात आपण शिकलो,
09:47 वेब सर्व्हर, वेब कंटेनर
09:49 साधे सर्व्हलेट बनवणे.
09:52 साधे jsp बनवणे.
09:55 पुढे जाण्यापूर्वी हा पाठ तुम्ही समजून घेतल्याची खात्री करा.
10:01 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:04 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:08 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:15 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:19 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:22 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:28 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:32 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:50 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
11:00 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
11:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana