Java-Business-Application/C2/Creating-a-Java-web-project/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:10, 14 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Creating-a-Java-web-project

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00:00 Creating a Java Web Project वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:09 Java वेब प्रोजेक्ट बनवणे.
00:12 डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर(Deployment Descriptor)ची माहिती,
00:15 web.xml फाईलची माहिती.
00:19 त्यासाठी वापरणार आहोत,
00:20 उबंटु वर्जन 12.04
00:23 नेटबीन्स IDE 7.3
00:26 JDK 1.7
00:28 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00:32 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:35 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00:39 Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00:42 HTML चे ज्ञान असावे.
00:44 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:50 आता नेटबीन्स IDE द्वारे साधे जावा वेब प्रोजेक्ट कसे बनवायचे ते बघू.
00:56 त्यासाठी नेटबीन्स IDE वर जाऊ.
01:01 IDEच्या डाव्या कोप-यात वरती File खालील New Project वर क्लिक करा.
01:08 New Project विंडो उघडेल.
01:12 कॅटॅगरीजमधून Java Web निवडा आणि Projects मधून Web Application निवडा.
01:18 Next क्लिक करा.
01:20 पुढे उघडलेल्या विंडोवर
01:23 Project Name म्हणूनMyFirstProject टाईप करा.
01:27 प्रोजेक्ट लोकेशन आणि प्रोजेक्ट फोल्डर आहे तोच ठेवा.
01:31 Next क्लिक करा.
01:35 GlassFish server हा सर्व्हर सिलेक्ट करा.
01:39 येथे Context Path हा MyFirstProjectआहे जे प्रोजेक्टचे नाव आहे.
01:47 ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
01:50 Next क्लिक करा. Finishवर क्लिक करा.
01:55 Projectsटॅब वर क्लिक करा.
01:58 येथे अनेक नोडस बघू शकतो. तसेच My First Project नावाचे वेब ऍप्लिकेशन तयार झाले आहे.
02:08 सध्या या सर्व नोडस बद्दल विचार करणार नाही.
02:11 परंतु त्यामधील घटक बघण्यासाठी त्यावर क्लिक करा.
02:16 आता डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर कशाला म्हणतात ते पाहू.
02:21 वेब ऍप्लिकेशनचा डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर पुढील माहिती देतो:
02:25 क्लासेस, रिसोर्सेस आणि ऍप्लिकेशनचे कॉनफिगरेशन,
02:31 वेबवरील मागण्यांना सेवा देताना वेब सर्व्हर ते कसे वापरतो.
02:37 वेब सर्व्हरकडे ऍप्लिकेशनसाठी मागण्या येतात.
02:42 त्या मागणीची URL मॅप करण्यासाठी डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर वापरला जातो .
02:48 या मागणीची पूर्तता करणा-या कोडला हा URL मॅप केला जातो.
02:52 डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर ही web.xml नावाची फाईल आहे.
02:57 आता IDE वर जाऊ.
03:00 येथे उपलब्ध असलेल्या नोडस मधून web.xml फाईल शोधता येत नाही.
03:07 ती शोधण्यासाठी IDEच्या डावीकडे वरती Fileवर क्लिक करा. नंतर New File वर क्लिक करा .
03:16 कॅटॅगरीज मधून वेब निवडा.
03:19 File Typesमधून Standard Deployment Descriptor(web.xml) निवडा.
03:25 Next क्लिक करा.
03:27 आणि Finishक्लिक करा.
03:30 IDE च्या डावीकडे असलेल्या Filesटॅब वर क्लिक करा.
03:34 वेब नोडच्या WEB-INF फोल्डरखाली web.xml फाईल आपल्याला दिसेल .
03:42 आता तुम्ही Source कोड बघू शकता.
03:46 येथे आपल्याकडे xml हेडर आहे.
03:50 तसेच web-app नोड आहे.
03:53 आता ऍप्लिकेशन कार्यान्वित करून बघू.
03:57 त्यासाठी MyFirstProject वर राईट क्लिक करा .
04:02 Clean and Buildवर क्लिक करा .
04:04 हे पूर्वी कंपाईल केलेल्या फाईल्स आणि इतर तयार झालेली आऊटपुटस डिलीट करेल.
04:10 तसेच ऍप्लिकेशन पुन्हा कंपाईल करेल.
04:14 पुन्हा MyFirstProject वर राईट क्लिक करा. नंतरRun क्लिक करा.
04:20 आता सर्व्हर उघडून चालू होईल आणि त्यावर My first Project उघडेल.
04:27 ब्राऊजर विंडो उघडेल आणि Hello World असे दाखवेल.
04:32 कारण प्रोजेक्ट कार्यान्वित केल्यावर वेब ऍप्लिकेशन हे पेज दाखवत आहे.
04:39 आता मिळालेल्या पेजचे URL बघा.
04:44 ते localhost colon 8080 slash MyFirstProject असे आहे.
04:49 MyFirstProject प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यास, डिफॉल्ट रूपात HelloWorld! लिहिलेले JSP पेज मिळते.
04:57 आता IDEवर परत जाऊ.
05:00 WEB-INF फोल्डरखाली index dot jsp ही फाईल बघू शकतो.
05:07 index.jspवर डबल क्लिक करा .
05:10 येथे सोर्स कोड बघू शकतो.
05:12 हे केवळ HTML टॅग्ज असलेले साधे JSP पेज आहे.
05:17 त्याला JSP पेज असे शीर्षक आणि Hello World असे हेडिंग आहे.
05:24 वेब ऍप्लिकेशन कार्यान्वित केल्यावर सर्व्हर डिफॉल्ट रूपात index.jsp प्रदान करतो.
05:30 लक्षात घ्या, पूर्वी आपणContextPath ही संकल्पना पाहिली होती.
05:36 आपण MyFirstProjectनावानेच ContextPath सेट केला होता.
05:41 आता ब्राऊजरवर परत जाऊ.
05:44 URL म्हणून localhost colon 8080टाईप करून एंटर दाबा.
05:50 Glassfish server सर्व्हर होमचे पेज दिसेल.
05:56 येथे संगणकावरील सर्व्हरचा डिफॉल्ट रूपातील पत्ता 8080 आहे .
06:01 ह्या Glassfish serverच्या इन्स्टन्सवर कदाचित अनेक ऍप्लिकेशन्स कार्यान्वित होत असतील.
06:08 विशिष्ट ऍप्लिकेशन ऍक्सेस करण्यासाठी URL मधे ऍप्लिकेशनचे नाव लिहा.
06:15 म्हणजेच, आपल्याला इन्स्टन्सवर ठेवलेल्या विशिष्ट ऍप्लिकेशनचे नाव लिहावे लागते.
06:21 त्यासाठी टाईप करा slash MyFirstProject .
06:26 आणि एंटर दाबा.
06:27 अशाप्रकारे Hello World दिसेल.
06:31 थोडक्यात,
06:32 या पाठात ,
06:35 साधे जावा वेब प्रोजेक्ट बनवणे,
06:38 वेब प्रोजेक्ट कार्यान्वित करणे,
06:41 आणि web.xml फाईलची माहिती घेतली.
06:44 स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी,
06:46 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:04 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:27 http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro
07:34 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
07:44 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
07:48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana