Java-Business-Application/C2/Creating-a-Java-web-project/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:02, 10 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Creating-a-Java-web-project

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00.00 Creating a Java Web Project वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.09 Java वेब प्रोजेक्ट बनवणे.
00.12 डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर(Deployment Descriptor)ची माहिती,
00.15 web.xml फाईलची माहिती.
00.19 त्यासाठी वापरणार आहोत,
00.20 उबंटु वर्जन 12.04
00.23 नेटबीन्स IDE 7.3
00.26 JDK 1.7
00.28 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00.32 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00.35 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00.39 Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00.42 HTML चे ज्ञान असावे.
00.44 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.50 आता नेटबीन्स IDE द्वारे साधे जावा वेब प्रोजेक्ट कसे बनवायचे ते बघू.
00.56 त्यासाठी नेटबीन्स IDE वर जाऊ.
01.01 IDEच्या डाव्या कोप-यात वरती File खालील New Project वर क्लिक करा.
01.08 New Project विंडो उघडेल.
01.12 कॅटॅगरीजमधून Java Web निवडा आणि Projects मधून Web Application निवडा.
01.18 Next क्लिक करा.
01.20 पुढे उघडलेल्या विंडोवर
01.23 Project Name म्हणूनMyFirstProject टाईप करा.
01.27 प्रोजेक्ट लोकेशन आणि प्रोजेक्ट फोल्डर आहे तोच ठेवा.
01.31 Next क्लिक करा.
01.35 GlassFish server हा सर्व्हर सिलेक्ट करा.
01.39 येथे Context Path हा MyFirstProjectआहे जे प्रोजेक्टचे नाव आहे.
01.47 ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
01.50 Next क्लिक करा. Finishवर क्लिक करा.
01.55 Projectsटॅब वर क्लिक करा.
01.58 येथे अनेक नोडस बघू शकतो. तसेच My First Project नावाचे वेब ऍप्लिकेशन तयार झाले आहे.
02.08 सध्या या सर्व नोडस बद्दल विचार करणार नाही.
02.11 परंतु त्यामधील घटक बघण्यासाठी त्यावर क्लिक करा.
02.16 आता डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर कशाला म्हणतात ते पाहू.
02.21 वेब ऍप्लिकेशनचा डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर पुढील माहिती देतो:
02.25 क्लासेस, रिसोर्सेस आणि ऍप्लिकेशनचे कॉनफिगरेशन,
02.31 वेबवरील मागण्यांना सेवा देताना वेब सर्व्हर ते कसे वापरतो.
02.37 वेब सर्व्हरकडे ऍप्लिकेशनसाठी मागण्या येतात.
02.42 त्या मागणीची URL मॅप करण्यासाठी डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर वापरला जातो .
02.48 या मागणीची पूर्तता करणा-या कोडला हा URL मॅप केला जातो.
02.52 डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर ही web.xml नावाची फाईल आहे.
02.57 आता IDE वर जाऊ.
03.00 येथे उपलब्ध असलेल्या नोडस मधून web.xml फाईल शोधता येत नाही.
03.07 ती शोधण्यासाठी IDEच्या डावीकडे वरती Fileवर क्लिक करा. नंतर New File वर क्लिक करा .
03.16 कॅटॅगरीज मधून वेब निवडा.
03.19 File Typesमधून Standard Deployment Descriptor(web.xml) निवडा.
03.25 Next क्लिक करा.
03.27 आणि Finishक्लिक करा.
03.30 IDE च्या डावीकडे असलेल्या Filesटॅब वर क्लिक करा.
03.34 वेब नोडच्या WEB-INF फोल्डरखाली web.xml फाईल आपल्याला दिसेल .
03.42 आता तुम्ही Source कोड बघू शकता.
03.46 येथे आपल्याकडे xml हेडर आहे.
03.50 तसेच web-app नोड आहे.
03.53 आता ऍप्लिकेशन कार्यान्वित करून बघू.
03.57 त्यासाठी MyFirstProject वर राईट क्लिक करा .
04.02 Clean and Buildवर क्लिक करा .
04.04 हे पूर्वी कंपाईल केलेल्या फाईल्स आणि इतर तयार झालेली आऊटपुटस डिलीट करेल.
04.10 तसेच ऍप्लिकेशन पुन्हा कंपाईल करेल.
04.14 पुन्हा MyFirstProject वर राईट क्लिक करा. नंतरRun क्लिक करा.
04.20 आता सर्व्हर उघडून चालू होईल आणि त्यावर My first Project उघडेल.
04.27 ब्राऊजर विंडो उघडेल आणि Hello World असे दाखवेल.
04.32 कारण प्रोजेक्ट कार्यान्वित केल्यावर वेब ऍप्लिकेशन हे पेज दाखवत आहे.
04.39 आता मिळालेल्या पेजचे URL बघा.
04.44 ते localhost colon 8080 slash MyFirstProject असे आहे.
04.49 MyFirstProject प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यास, डिफॉल्ट रूपात HelloWorld! लिहिलेले JSP पेज मिळते.
04.57 आता IDEवर परत जाऊ.
05.00 WEB-INF फोल्डरखाली index dot jsp ही फाईल बघू शकतो.
05.07 index.jspवर डबल क्लिक करा .
05.10 येथे सोर्स कोड बघू शकतो.
05.12 हे केवळ HTML टॅग्ज असलेले साधे JSP पेज आहे.
05.17 त्याला JSP पेज असे शीर्षक आणि Hello World असे हेडिंग आहे.
05.24 वेब ऍप्लिकेशन कार्यान्वित केल्यावर सर्व्हर डिफॉल्ट रूपात index.jsp प्रदान करतो.
05.30 लक्षात घ्या, पूर्वी आपणContextPath ही संकल्पना पाहिली होती.
05.36 आपण MyFirstProjectनावानेच ContextPath सेट केला होता.
05.41 आता ब्राऊजरवर परत जाऊ.
05.44 URL म्हणून localhost colon 8080टाईप करून एंटर दाबा.
05.50 Glassfish server सर्व्हर होमचे पेज दिसेल.
05.56 येथे संगणकावरील सर्व्हरचा डिफॉल्ट रूपातील पत्ता 8080 आहे .
06.01 ह्या Glassfish serverच्या इन्स्टन्सवर कदाचित अनेक ऍप्लिकेशन्स कार्यान्वित होत असतील.
06.08 विशिष्ट ऍप्लिकेशन ऍक्सेस करण्यासाठी URL मधे ऍप्लिकेशनचे नाव लिहा.
06.15 म्हणजेच, आपल्याला इन्स्टन्सवर ठेवलेल्या विशिष्ट ऍप्लिकेशनचे नाव लिहावे लागते.
06.21 त्यासाठी टाईप करा slash MyFirstProject .
06.26 आणि एंटर दाबा.
06.27 अशाप्रकारे Hello World दिसेल.
06.31 थोडक्यात,
06.32 या पाठात ,
06.35 साधे जावा वेब प्रोजेक्ट बनवणे,
06.38 वेब प्रोजेक्ट कार्यान्वित करणे,
06.41 आणि web.xml फाईलची माहिती घेतली.
06.44 स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी,
06.46 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06.50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06.58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07.00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.04 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.27 http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro
07.34 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
07.44 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
07.48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana