Git/C2/Stashing-and-Cleaning/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:24, 16 June 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Git मधील stashing and cleaning वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत स्टॅशिंग.
00:11 तसेच शिकणार आहोत:
  • स्टॅश बनवणे
  • स्टॅश लागू करणे
  • स्टॅश क्लीन करणे
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत:
  • उबंटु लिनक्स 14.04
  • Git 2.3.2 आणि
  • gedit टेक्स्ट एडिटर
00:32 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:36 या पाठासाठी Git च्या मूलभूत कमांडस आणि Git मधील ब्रँचिंगचे ज्ञान असावे.
00:43 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:48 स्टॅशिंग बद्दल जाणून घेऊ.
00:51 स्टॅशिंगचा उपयोग ब्रँचमधील तात्पुरते बदल सेव्ह करण्यासाठी होतो.
00:57 याद्वारे एका ब्रँच मधून दुस-या ब्रँचमधे जाताना कमिट न करता चालू काम थांबवता येते.
01:04 तात्पुरत्या बदलांचे Stash कुठल्याही वेळी रद्द करता येतात.
01:08 Git वरील मागील पाठांत आपण स्टॅश ही संज्ञा पाहिली होती.
01:16 याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
01:20 टर्मिनल उघडून सुरूवात करू.
01:25 आपण बनवलेली mywebpage ही Git रिपॉझिटरी उघडणार आहोत.
01:30 टाईप करा:cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:35 मी येथे html फाईल्सचा वापर करणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता.
01:44 यापुढे टर्मिनलवर टाईप केलेल्या प्रत्येक कमांडनंतर एंटर दाबा.
01:52 प्रथम ब्रँचची सूची बघण्यासाठी टाईप करा git space branch.
01:58 अगोदरच chapter-three नावाची ब्रँच तयार केली आहे.
02:03 मी याच्या आत कमिट केले आहे.
02:08 तुम्ही देखील नवी ब्रँच बनवल्याची खात्री करून त्यामधे कमिट करा.
02:15 chapter-three ब्रँचमधे जाण्यासाठी टाईप करा git space checkout space chapter-three.
02:23 Git लॉग तपासू.
02:26 उदाहरण स्पष्ट करण्यासाठी हे chapter-three ब्रँचमधे आपण केलेले कमिट आहे.
02:31 फोल्डरमधील घटक तपासण्यासाठी टाईप करा "ls".
02:35 तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असल्यास, "ls" कमांडच्या जागी "dir" कमांड वापरा.
02:43 आपल्याकडे येथे तीन html फाईल्स आहेत.
02:47 आता mypage.html फाईलमधे काही बदल करू.
02:53 mypage.html फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space ampersand.
03:03 मी सेव्ह करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही ओळी कॉपी करून येथे पेस्ट करणार आहे.
03:11 फाईल सेव्ह करून बंद करा.
03:14 Git स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा:git space status
03:19 आपल्याला कळेल की हे बदल अजून स्टेज केलेले नाहीत.
03:24 मोठ्या प्रोजेक्टवर काम करताना एका ब्रँच मधून दुस-या ब्रँचमधे वारंवार जावे लागते.
03:30 समजा आपल्याला दुस-या कशावर तरी काम करण्यासाठी मास्टर ब्रँचमधे परत जायचे आहे.
03:37 टाईप करा:git space checkout space master.
03:41 केलेले बदल कमिट केल्याशिवाय इतर ब्रँचमधे जाता येत नाही अशी एरर दाखवत आहे.
03:48 मला हे बदल आत्ता कमिट करायचे नाहीत कारण माझे केवळ अर्धेच काम झाले आहे.
03:55 जर hyphen hyphen force या फ्लॅगच्या सहाय्याने जबरदस्तीने बाहेर पडलो तर केलेले बदल रद्द होतील.
04:04 पण मला हे बदल तात्पुरते सेव्ह करायचे असतील तर काय? हे स्टॅशिंगद्वारे करता येते.
04:11 बदल तात्पुरते सेव्ह करण्यासाठी टाईप करा git space stash space save space डबल कोटसमधे “Stashed mypage.html”.
04:24 येथे “Stashed mypage.html” हे मी दिलेले स्टॅशचे नाव आहे. तुम्ही तुमच्या पसंतीचे देऊ शकता.
04:34 टर्मिनलवर स्टॅशचे नाव आणि जिथे आपण स्टॅश बनवला त्या ब्रँचचे नाव दिसत आहे.
04:42 Git स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा git space status. आपण “nothing to commit” असा मेसेज बघू शकतो.
04:51 त्यामुळे आता दुस-या ब्रँचमधे जाऊ शकतो.
04:55 आता git space checkout space master टाईप करून मास्टर ब्रँचमधे जाण्याचा प्रयत्न करू.
05:03 स्टॅशिंग नंतर एका ब्रँचमधून दुस-या ब्रँचमधे जाऊ शकतो.
05:07 पुढे स्टॅशिंगची आणखी एक पध्दत पाहू.
05:11 त्यासाठी पुन्हा chapter-three ब्रँचमधे जाऊ. टाईप करा git space checkout space chapter-three.
05:20 आता history.html मधे काही बदल करू. टाईप करा:gedit space history.html space ampersand.
05:31 येथे मी रायटर डॉक्युमेंट मधून काही ओळी समाविष्ट करत आहे.
05:35 फाईल सेव्ह करून बंद करा.
05:38 Git स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा git space status.
05:44 उदाहरणार्थ, स्टॅशमधे मला हे बदल दुस-या पध्दतीने सेव्ह करायचे आहेत. टाईप करा:git space stash.
05:54 आपण येथे स्टॅशचे नाव दिलेले नाही.
05:58 आपण स्टॅशला नाव दिले नाही तर स्टॅश सर्वात शेवटच्या कमिटच्या नावाने सेव्ह होते.
06:04 पुढे स्टॅशचे नाव आणि सर्वात शेवटचे कमिट सारखेच आहेत का ते तपासू.
06:10 प्रथम Git लॉग तपासू.
06:14 स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा:git space stash space list.
06:20 सर्वात शेवटचे कमिट आणि सर्वात शेवटच्या स्टॅशचे नाव सारखेच आहे.
06:25 सर्वात शेवटचे स्टॅश हे सूचीत सर्वात पहिले दिसते म्हणजे स्टॅशेस त्यांच्या कालक्रमानुसार सूचीमधे दिसतात.
06:35 हा स्टॅश id आहे जो आपोआप तयार झाला आहे.
06:40 आता मी आणखी एक स्टॅश बनवणार आहे.
06:45 त्यासाठी मी story.html या फाईलमधे थोडे बदल करणार आहे. टाईप करा: gedit space story.html space ampersand.
06:55 मी story.html या फाईलमधे काही ओळी समाविष्ट करणार आहे.
07:00 फाईल सेव्ह करून बंद करा.
07:03 आता मी स्टॅशमधे हे बदल सेव्ह करणार आहे.
07:07 टाईप करा:git space stash space save space डबल कोटसमधे “Stashed story.html”.
07:17 स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा git space stash space list.
07:24 आता chapter-three ब्रँचमधे तीन स्टॅशेस बघू शकतो.
07:30 काही वेळा स्टॅशेसमधे कोणते बदल सेव्ह केले आहेत हे आपल्या लक्षात नसते.
07:36 ते कसे तपासायचे ते पाहू.
07:40 उदाहरणार्थ, stash@{0} चा तपशील बघायचा आहे.
07:45 टाईप करा:git space diff space stash at the rate symbol (@) महिरपी कंसात zero.
07:54 आपण story.html मधील बदल बघू शकतो. हेच stash@{0} मधे सेव्ह केले होते.
08:01 पुढे स्टॅश केलेल्या फाईल्सवर काम करू.
08:06 त्यासाठी स्टॅशेस लागू करणे गरजेचे आहे.
08:10 स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा:git space stash space list.
08:17 उदाहरणार्थ, आता stash@{1} लागू करणार आहोत.
08:21 त्यासाठी टाईप कराgit space stash space apply space stash @ (at the rate symbol) महिरपी कंसात one.
08:33 तुम्ही स्टॅश id नमूद केलेला नसल्यास सर्वात शेवटचे स्टॅश म्हणजेच stash@{0} लागू केले जाईल.
08:40 स्टॅश यशस्वीरित्या लागू झाल्याचे दिसेल.
08:44 स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा git space stash space list.
08:51 सूचीमधे अजूनही stash@{1} दिसत आहे ज्यामुळे भविष्यात आपला गोंधळ होऊ शकतो.
08:58 त्यामुळे स्टॅश लागू केल्यानंतर हे स्वतःच डिलिट करून टाकणे चांगले.
09:03 stash@{1} डिलिट करण्यासाठी टाईप करा: git space stash space drop space stash@ (at the rate symbol) महिरपी कंसात one.
09:16 स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा:git space stash space list.
09:22 stash@{1} काढून टाकल्याचे दिसेल. आणि stash@{2} आता stash@{1} झाले आहे.
09:30 आता स्टॅश लागू करण्याची दुसरी पध्दत पाहू. टाईप करा:git space stash space pop.
09:39 stash@{0} लागू झाल्याचे दिसेल.
09:43 stash pop कमांडचा वापर केला तर सर्वात नवे stash म्हणजेच stash@{0} लागू होईल.
09:52 पुन्हा स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा git space stash space list.
09:59 stash@{0} काढून टाकलेले दिसेल. आणि stash@{1} आता stash@{0} बनले आहे.
10:07 म्हणजेच stash pop कमांड stash@{0} लागू करेल आणि ते आपोआप डिलिट करेल.
10:15 पुढे आपण सर्व स्टॅशेस एकाच वेळी कसे डिलिट करायचे ते जाणून घेऊ.
10:20 रिपॉझिटरीतून सर्व स्टॅशेस डिलिट करण्यासाठी टाईप करा: git space stash space clear.
10:28 पुन्हा स्टॅशची सूची तपासण्यासाठी टाईप करा git space stash space list.
10:36 आपली स्टॅशची सूची रिकामी झाल्याचे दिसेल.
10:40 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:44 थोडक्यात,
10:46 आपण या पाठात शिकलो स्टॅशिंग.
10:51 तसेच आपण शिकलो:
  • स्टॅश बनवणे
  • स्टॅश लागू करणे
  • स्टॅश क्लीन करणे
10:58 असाईनमेंट - तुमच्या रिपॉझिटरीमधे तीन स्टॅशेस बनवा.
11:03 git stash show ही कमांड वापरून बघा.
11:07 git stash show आणि git stash show stash@{1} या कमांडसमधील फरक समजून घ्या.
11:14 सर्वात शेवटचे स्टॅश लागू करा (git stash pop चा उपयोग करा)
11:21 आणि रिपॉझिटरीतून सर्व स्टॅशेस डिलिट करा.

( git stash clear कमांड वापरून बघा)

11:28 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:55 या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:01 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana