Git/C2/Merging-and-Deleting-branches/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:56, 24 May 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Merging and deleting branches वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत मर्जिंग,
00:10 मर्जिंग रद्द करणे आणि ब्रँचेस डिलिट करणे
00:14 या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04
00:20 Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर.
00:26 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:29 या पाठासाठी Git च्या मूलभूत कमांडस आणि Git मधील ब्रँचिंगचे ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:42 मागील पाठात आपण ब्रँचेस बनवायला शिकलो.
00:47 आता दोन ब्रँच एकत्रित करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:51 ही आकृती "new-module" ब्रँच, मास्टर ब्रँचमधे कशाप्रकारे मर्ज होईल हे स्पष्ट करेल.
00:58 हे C9 या कमिटमधे केले गेले आहे.
01:01 मर्जिंग नंतर new-module ची कमिटस मास्टर ब्रँचमधे समाविष्ट झाली आहेत.
01:06 हे कसे कार्य करते ते पाहू.
01:09 प्रथम आपण बनवलेली mywebpage ही Git रिपॉझिटरी उघडणार आहोत.
01:16 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
01:20 Git रिपॉझिटरीमधे जाण्यासाठी टाईप करा:cd space mywebpage. एंटर दाबा.
01:29 मी येथे html फाईल्स वापरणार आहे.
01:33 तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता.
01:38 यापुढे टर्मिनलवर प्रत्येक कमांड टाईप केल्यावर एंटरचे बटण दाबायचे लक्षात ठेवा.
01:45 git मधील ब्रँचची सूची बघण्यासाठी टाईप करा git space branch.
01:51 आपण मास्टर आणि new-chapter या नावांच्या दोन ब्रँचेस बघू शकतो.
01:57 new-chapter ब्रँच आपण मागील पाठात बनवली होती. मास्टर ही डिफॉल्ट ब्रँच आहे.
02:05 सध्या आपण मास्टर ब्रँचमधे आहोत.
02:08 Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline.
02:17 new-chapter ब्रँचमधे जाऊन Git लॉग तपासू.
02:21 टाईप करा:git space checkout space new-chapter
02:27 टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline
02:33 आता आपण मास्टर ब्रँचच्या आणि new-chapter ब्रँचच्या कमिटसची तुलना करू.
02:38 या चार कमिटस दोन्ही ब्रँचेसमधे सामायिक आहेत.
02:42 "Added story.html in new-chapter branch" ही new-chapter ब्रँचमधे आहे.
02:48 आणि "Added chapter two in history.html" ही मास्टर ब्रँचमधे आहे.
02:54 मर्जिंग केल्यानंतर “Added story.html in new-chapter branch” हे कमिट मास्टर ब्रँचमधे समाविष्ट होईल.
03:02 आता मर्ज कसे करायचे ते पाहू.
03:05 टाईप करा:git space merge space master
03:09 कमिट मेसेज घेण्यासाठी gedit आपोआप उघडेल.
03:14 आपण Git चा मुख्य एडिटर म्हणून gedit कॉनफिगर केले होते.
03:20 तुम्ही दुसरा एडिटर कॉनफिगर केला असल्यास तो उघडेल.
03:26 तुम्ही Git चे 1.9 पेक्षा खालील वर्जन वापरत असाल तर कदाचित एडिटर उघडणार नाही.
03:33 तसे असल्यास तुम्ही पुढची पायरी वगळू शकता.
03:36 मी डिफॉल्ट रूपात दिलेल्या कमिट मेसेजचा उपयोग करणार आहे.
03:40 तुम्हाला मर्जिंगशी संबंधित इतर कुठला मेसेज द्यायचा असेल तर तो येथे टाईप करा.
03:46 आता सेव्ह करून एडिटर बंद करा.
03:50 आपण पुन्हा Git लॉग तपासू.
03:54 मास्टर ब्रँचची कमिटस ही new-chapter ब्रँच सोबत मर्ज झाली आहेत.
04:00 आपण मर्जिंगसाठीचा कमिट मेसेज देखील बघू शकतो.
04:04 पुढे मास्टर ब्रँचमधे जाऊ आणि कमिटस पाहू.
04:09 टाईप करा:git space checkout space master
04:14 आता Git लॉग तपासू.
04:17 येथे मास्टर ब्रँचची कमिटस new-chapter च्या कमिटस सोबत दिसली पाहिजेत.
04:22 परंतु Git लॉग केवळ मास्टर ब्रँचमधील कमिटस दाखवत आहे.
04:27 खरे तर आपण new-chapter ही ब्रँच, मास्टर ब्रँचमधे मर्ज करणे गरजेचे आहे.
04:32 परंतु आपण ते दुस-या पध्दतीने मर्ज केले.
04:36 त्यामुळे मास्टर ब्रँचमधील मर्जिंग कमिट आपण बघू शकत नाही.
04:41 मग आपण हे मर्जिंग कसे रद्द करू शकतो?
04:45 त्यासाठी new-chapter ब्रँचमधे जाणे आवश्यक आहे.
04:50 टाईप करा:git space checkout space new-chapter
04:54 मर्ज केलेले रद्द करण्यासाठी टाईप करा:git space reset space hyphen hyphen hard space HEAD tilde
05:04 मागे पाहिले की सर्वात शेवटची रिविजन नेहमीच HEAD तर शेवटून दुसरी नेहमीच HEAD tilde असते.
05:12 त्यामुळे मर्जिंगची मागील रिविजन मिळवण्यासाठी आपण HEAD tilde चा वापर केला आहे.
05:18 Git लॉग पुन्हा एकदा तपासू.
05:22 आता आपण बघू शकतो की मर्जिंग रद्द केले गेले आहे.
05:26 आता new-chapter ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करणार आहोत.
05:31 त्यासाठी प्रथम मास्टर ब्रँचमधे जाण्यासाठी टाईप करा git space checkout space master
05:38 पुन्हा Git लॉग तपासू.
05:42 मर्ज करण्यासाठी टाईप करा:git space merge space new-chapter.
05:48 gedit मधे मर्जिंगचा कमिट मेसेज द्या.
05:52 नंतर सेव्ह करून एडिटर बंद करा.
05:55 पुन्हा Git लॉग तपासू.
05:58 new-chapter ब्रँच यशस्वीरित्या मास्टर ब्रँचमधे मर्ज झाल्याचे आपण बघू शकतो.
06:05 पुन्हा मर्ज करण्याचा प्रयत्न करू.
06:08 टाईप करा: git space merge space new-chapter
06:13 “Already up-to-date” असा मेसेज बघू शकतो.
06:17 मर्ज झाले की नाही हे तपासून बघण्याची ही चांगली पध्दत आहे.
06:22 मर्जिंग केल्यानंतर Git रिपॉझिटरीमधून new-chapter ब्रँच डिलिट करता येते.
06:28 ब्रँच डिलिट करण्यासाठी टाईप करा:git space branch space hyphen d space new-chapter
06:36 ब्रँचची सूची तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप करा git space branch
06:43 new-chapter ब्रँच आता बघू शकणार नाही कारण ती डिलिट झाली आहे.
06:48 मर्जिंग केल्याशिवाय ब्रँच डिलिट करण्यासाठी लोअर केसमधील hyphen d वापरण्याऐवजी अप्पर केसमधील hyphen D वापरा.
06:56 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:00 थोडक्यात,
07:02 आपण या पाठात शिकलो, मर्जिंग, मर्जिंग रद्द करणे आणि ब्रँचेस डिलिट करणे.
07:09 असाईनमेंट- मागील असाईनमेंटमधे बनवलेली chapter-two या ब्रँचची कमिटस तपासा.
07:16 ही ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करा आणि chapter-two ब्रँच डिलिट करा.
07:22 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:27 व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:38 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:48 या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:53 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana