Difference between revisions of "Git/C2/Inspection-and-Comparison-of-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
m
Line 414: Line 414:
 
|-
 
|-
 
| 11:29
 
| 11:29
स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
+
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
  
  

Revision as of 15:29, 29 April 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Inspection and comparison of Git वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
  • git diff
  • git show
  • git blame आणि
  • git help कमांडस.
00:17 या पाठासाठी वापरणार आहोत -
  • उबंटु लिनक्स 14.04
  • Git 2.3.2 आणि
  • gedit टेक्स्ट एडिटर.
00:29 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:33 या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
00:40 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:46 git diff कमांडपासून सुरूवात करू.
00:50 ही कमांड फाईलच्या सध्याच्या स्टेटसमधील बदल दाखवेल.
00:55 हे कसे कार्य करते हे पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
01:03 आपण बनवलेल्या mywebpage या Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
01:09 टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:15 मी येथे html फाईल्सचाच उपयोग करणार आहे.
01:20 तुम्ही तुमच्या पसंतीचा फाईल प्रकार निवडू शकता.
01:24 हे समजून घेण्यासाठी history.html ही फाईल बनवून कमिट करून घेऊ.
01:32 टाईप करा: gedit space history.html space ampersand आणि एंटर दाबा.
01:41 आधीच सेव्ह करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंट मधून काही कोड कॉपी करून या फाईलमधे पेस्ट करू.
01:48 फाईल सेव्ह करून बंद करा.
01:51 लक्षात ठेवा फाईल समाविष्ट करताना किंवा काढून टाकताना आपले काम कमिट करणे गरजेचे असते.
01:58 फाईल staging area मधे समाविष्ट करण्यासाठी टाईप करा: git space add space history.html आणि एंटर दाबा.
02:08 आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added history.html” आणि एंटर दाबा.
02:21 Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log आणि एंटर दाबा.
02:28 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे दोन कमिट्स आहेत.
02:33 mypage.html आणि history.html या फाईल्स उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space history.html space ampersand
02:47 येथील mypage.html ही फाईल आपण मागील पाठात बनवली होती. आता एंटर दाबा.
02:56 या फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा.
03:01 फाईल सेव्ह करून बंद करा.
03:05 काही वेळेला आपण फाईल्समधे काय बदल केले होते हे आपल्याला आठवत नाही.
03:11 Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा.
03:19 हे केवळ बदललेल्या फाईलची नावे दाखवते. परंतु इतर कुठलाही तपशील मिळत नाही.
03:26 या फाईल्समधे प्रत्यक्षात कोणते बदल केले आहेत हे जाणून घ्यायचे आहे. कसे ते पाहू.
03:35 टाईप करा: git space diff आणि एंटर दाबा.
03:40 ही कमांड फाईलची सध्याची स्थिती त्याच्या सर्वात नव्या कमिट सोबत तुलना करेल.
03:46 येथे history.html या फाईलची दोन वर्जन्स दिसतील.
03:51 a slash history.html हे मागील कमिट केलेले वर्जन आहे. आणि हे वजाच्या चिन्हाने दाखवले आहे.
04:00 b slash history.html हे चालू वर्जन आहे. आणि हे अधिकच्या चिन्हाने दाखवले आहे.


04:09 म्हणजे वजाचे चिन्ह असलेली लाल रंगाची ओळ हे जुने वर्जन आहे.
04:15 आणि अधिकचे चिन्ह असलेली हिरव्या रंगाची ओळ हे नवे वर्जन आहे.
04:20 पुढील भाग बघण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा.
04:23 या नव्या वर्जनमधे समाविष्ट केलेल्या काही ओळी आहेत.
04:28 तसेच तुम्ही mypage.html फाईलमधील बदल बघू शकता. डाऊन ऍरोचे बटण दाबा.
04:35 बाहेर पडण्यासाठी q बटण दाबा.
04:38 येथे आऊटपुट रंगीत स्वरूपात दाखवले आहे.
04:42 जर रंगीत ओळी दिसत नसतील तर टाईप करा: git space config space hyphen hyphen global space color dot ui space true आणि एंटर दाबा.
04:57 जर रंगीत ओळी नको असतील तर या कमांडमधे true च्या जागी false वापरा.
05:03 टाईप करा git space diff आणि एंटर दाबा. आता रंग नसलेले आऊटपुट दाखवेल.
05:13 पुढे आपण विशिष्ट फाईलमधे केलेले बदल कसे बघायचे ते पाहू.
05:18 टाईप करा: git space diff space history.html आणि एंटर दाबा.
05:25 येथे केवळ history.html या फाईलमधे केलेले बदल बघू शकतो.
05:31 आता फाईल्स staging area मधे समाविष्ट करू. टाईप करा: git space add space history.html space mypage.html आणि एंटर दाबा.
05:44 पुन्हा Git diff तपासण्यासाठी git space diff टाईप करून एंटर दाबा.
05:52 यावेळी कुठलेही आऊटपुट मिळालेले नाही कारण फाईल्स staging area मधे समाविष्ट आहेत.
05:59 अशावेळी टाईप करा: git space diff space hyphen hyphen staged आणि एंटर दाबा.
06:08 आता तेच आऊटपुट मिळाले आहे जे git diff ही कमांड वापरून मिळाले होते.
06:15 हाच रिझल्ट मिळवण्यासाठी hyphen hyphen staged ऐवजी hyphen hyphen cached देखील वापरू शकतो.
06:23 फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना आधीच्या कुठल्याही कमिट सोबत कशी करता येईल?
06:28 प्रथम Git log पाहू. टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
06:38 समजा फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना Initial commit सोबत करायची आहे.
06:43 त्यासाठी टाईप करा: git space diff space नंतर Initial commit चा commit hash कॉपी आणि पेस्ट करून एंटर दाबा.
06:52 येथे फरक बघू शकतो.
06:55 अशाप्रकारे रिपॉझिटरीमधील मागील कुठल्याही कमिट सोबत फाईलच्या सध्याच्या स्थितीशी तुलना करता येते.
07:02 अशा प्रकारे git diff कमांड वापरून बदल केलेल्या फाईल्समधील सर्व बदल पाहू शकतो.
07:09 कमिट करण्यापूर्वी आपण नेमके काय बदल केले आहेत ते यामुळे कळू शकते.
07:15 या ठिकाणी आपला कोड freeze करू.
07:19 कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added colors” आणि एंटर दाबा.
07:30 दोन कमिटस मधला फरक कसा बघायचा हे जाणून घेऊ.
07:35 Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
07:44 टाईप करा: git space diff space नंतर “Initial commit” चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. आता space देऊन “Added colors” चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
07:58 दिलेल्या दोन कमिटस मधील फरक दिसेल.
08:03 पुढे आपण शेवटची रिविजन आणि शेवटून दुसरी रिविजन यांची तुलना करणार आहोत.
08:08 टाईप करा: git space diff space HEAD space HEAD tilde आणि एंटर दाबा.
08:16 HEAD हे शेवटची रिविजन दाखवते ज्याचा “Added colors” हा कमिट मेसेज आहे.
08:22 HEAD tilde हे शेवटून दुसरी रिविजन दाखवते ज्याचा “Added history.html” हा कमिट मेसेज आहे.
08:30 शेवटची रिविजन नेहेमीच HEAD असते. सर्वात शेवटची रिविजन वजा 1 नेहमीच HEAD tilde असते.
08:39 अशाच प्रकारे सर्वात शेवटची रिविजन वजा 2 म्हणजे HEAD tilde 2 सर्वात शेवटची रिविजन वजा 3 म्हणजे HEAD tilde 3 इत्यादी.
08:50 टर्मिनलवर परत जाऊ.
08:53 आता git show कमांड बद्दल जाणून घेऊ जे कमिटचा संपूर्ण तपशील दाखवेल.
09:00 टाईप करा: git space show आणि एंटर दाबा.
09:04 हे रिपॉझिटरी मधील सर्वात शेवटच्या कमिटचा तपशील दाखवेल.
09:10 यात फाईल्समधे केलेले बदल कमिटच्या तपशीलासहित आपल्याला दिसतील.
09:16 हे फीचर एकत्र काम करताना आपल्याला उपयोगी होते.
09:20 आता Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
09:30 Initial commit चा तपशील बघण्यासाठी टाईप करा: git space show space . नंतर Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
09:42 येथे Initial commit चा तपशील बघू शकतो.
09:46 अशाप्रकारे आपल्या रिपॉझिटरीमधील कुठल्याही कमिटचा तपशील बघू शकतो.
09:51 पुढे फाईलची संपूर्ण हिस्ट्री कशी बघायची हे जाणून घेऊ.
09:56 mypage.html या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघण्यासाठी टाईप करा: git space blame space mypage.html आणि एंटर दाबा.
10:07 येथे mypage.html या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघता येते. म्हणजेच फाईल तयार करण्यापासून त्याच्या सध्याच्या स्थितीपर्यंत.
10:17 अशाप्रकारे रिपॉझिटरी मधील कुठल्याही फाईलचा संपूर्ण तपशील बघू शकतो.
10:22 शेवटी Git मधून मदत कशी मिळवायची ते पाहू.
10:27 मदत मिळवायचा सिंटॅक्स असा आहे-

git help <verb> किंवा

git <verb> hyphen hyphen help किंवा

man git <verb>

10:40 उदाहरणार्थ: git help show.
10:44 हे वापरून पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space help space show आणि एंटर दाबा.
10:55 येथे show कमांडचे मॅन्युअल पाहू शकतो.
10:59 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:03 थोडक्यात,
11:04 आपण या पाठात शिकलो:
  • git diff
  • git show
  • git blame आणि
  • git help कमांडस.
11:15 असाईनमेंट म्हणून या कमांडस वापरून पहा:
  • git reflog
  • git diff HEAD tilde HEAD
  • git show HEAD आणि
  • man git diff.
11:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.


11:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.


11:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


11:55 या मिशन संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:00 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana