GeoGebra-5.04/C2/Congruency-of-Triangles/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 जिओजेब्रा मधील Congruency of Triangles वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत, एकरुप त्रिकोण काढण्याविषयी आणि त्यांची एकरूपता सिद्ध करण्याविषयी.
00:17 येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04 GeoGebra version 5.0.438.0-d
00:29 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी .
00:35 संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 पहिल्यांदा मी त्रिकोणाच्या एकरूपतेबद्दल सांगेन.
00:45 दोन त्रिकोण जर समान मापाचे आणि आकाराचे असतील तर ते एकरूप असतात.
00:51 सर्व संबंधित बाजू आणि अंतर्गत कोन एकरूप असतात.
00:56 आपण एकरूपतेच्या साइड साइड साइड नियमांसह सुरवात करू.
01:02 ही एकरूपतेच्या साइड साइड साइड नियमांची व्याख्या आहे.
01:08 मी माझ्या मशीनवर GeoGebra इंटरफेस आधीच उघडला आहे.
01:13 या ट्यूटोरियलसाठी मी axes disable करते.
01:17 स्पष्टदिसण्यासाठी मी फॉन्टचा आकार 18pt पर्यंत वाढविते.
01:22 आता त्रिकोण ABC काढू.
01:26 पॉलिगॉन टूल वर क्लिक करा आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्रिकोण ABC काढा.
01:34 आपण त्रिकोण ABC प्रमाणेच आणखी एक त्रिकोण तयार करू.
01:40 मूव्ह टूल वापरुन मी त्रिकोण ABC डाव्या बाजूला ड्रॅग करेन.
01:46 नवीन आकृतीसाठी हि जागा तयार करेल.
01:50 सर्कल विथ सेंटर आणि रेडियस टूल वर क्लिक करा, त्यानंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
01:57 सर्कल विथ सेंटर आणि रेडियस text बॉक्स उघडेल.
02:02 रेडियस text बॉक्समध्ये, a टाइप करा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
02:10 केंद्रबिंदू D आणि त्रिज्या a सह एक वर्तुळ काढले आहे.
02:15 पॉईंट टूल वापरुन, वर्तुळ d च्या परिघावर बिंदू E चिन्हांकित करा.
02:23 सेगमेंट टूल वापरुन बिंदू D आणि E जोडा.
02:30 लक्षात घ्या, Algebra view मध्ये, रेषाखंड DE हा रेषाखंड BC प्रमाणेच आहे.
02:37 सर्कल विथ सेंटर आणि रेडियस टूल निवडा आणि बिंदू E वर क्लिक करा.
02:44 रेडियस टेक्स्ट बॉक्समध्ये b टाइप करा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
02:51 केंद्रबिंदू E आणि त्रिज्या b सह एक वर्तुळ काढले आहे.
02:56 पुन्हा बिंदू D वर क्लिक करा.रेडियस टेक्स्ट बॉक्समध्ये c टाइप करा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
03:06 केंद्रबिंदू D आणि त्रिज्या c सह एक वर्तुळ काढले आहे.
03:10 आता आपल्याकडे ग्राफिक्स व्यू मध्ये तीन वर्तुळे आहेत.
03:14 आपण वर्तुळ g आणि e आणि वर्तुळ d आणि e चे छेदनबिंदू चिन्हांकित करू.
03:22 इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा.
03:25 वर्तुळ g आणि e च्या छेदनबिंदूवर क्लिक करा आणि एफ लिहा.
03:31 नंतर वर्तुळ d आणि e च्या छेदनबिंदूवर क्लिक करा आणि G लिहा.
03:37 सेगमेंट टूल वापरुन बिंदूं D, F आणि F, E जोडा.
03:46 येथे आपण आवश्यक असलेले त्रिकोण मिळवण्यासाठी g आणि e च्या वर्तुळाचा छेदनबिंदू वापरत आहोत.
03:53 जर आपण d आणि e वर्तुळाचा छेदनबिंदू वापरला तर आपल्याला आवश्यक त्रिकोण मिळणार नाही.
04:00 बिंदूं डी, जी आणि जी, ई जोडा.
04:04 Algebra view मध्ये रेषाखंडाच्या लांबीची तुलना करा.
04:08 आता आपण त्रिकोण DEF पाहण्यासाठी वर्तुळे लपवू.
04:13 वर्तुळ d वर राइट क्लिक करा.सब मेनू उघडेल.
04:19 सब-मेनूमध्ये, शो ऑब्जेक्ट चेक बॉक्सवर क्लिक करा.
04:24 त्याचबरोबर मी वर्तुळ e आणि g लपवेन .
04:30 आता आपण त्रिकोण ABC आणि  DEF च्या बाजूंची तुलना करू.
04:36 Algebra view मध्ये सेगमेंट खाली a वर राइट-क्लिक करा.
04:41 उघडलेल्या सब-मेनूमधून ऑब्जेक्ट प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
04:46 प्रेफरन्सेस विंडो उघडेल.
04:49 लक्षात घ्या की a आधीच निवडलेले आहे.
04:53 Ctrl key दाबून धरा आणि b, c, f, h आणि i निवडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
05:06 शो लेबल ड्रॉप-डाउन मध्ये, Name & Value पर्याय निवडा.
05:11 Preferences विंडो बंद करा.
05:14 निरीक्षण करा AB = DF, BC = DE आणि AC = EF.
05:25 मूव्ह टूल वापरुन बिंदू A, B किंवा C हलवू.
05:35 लक्षात घ्या की ड्रॅग केल्यानंतर सर्व लांबी त्यानुसार बदलतात.
05:40 हे सिद्ध करते की, त्रिकोण ABC आणि DEF एकरूप आहेत.
05:46 आता आपण एकरूपतेचे एंगल साइड एंगल नियम बनविणे आणि सिद्ध करणे शिकू.
05:53 ही एकरूपतेच्या एंगल साइड एंगल नियमांची व्याख्या आहे.
05:59 आपण नवीन GeoGebra विंडो उघडू.
06:03 फाईलवर क्लिक करा आणि New Window निवडा.
06:08 मी Polygon टूल वापरून त्रिकोण काढेन
06:14 पुढे आपण त्रिकोणाचे दोन कोन मोजू
06:18 एंगल टूल वर क्लिक करा आणि बिंदू C B A आणि A C B वर क्लिक करा.
06:35 अल्फा आणि बीटाच्या कोनांची मापे अल्जीब्रा व्यू मध्ये दिसत आहेत.
06:41 मूव्ह टूल वापरुन मी त्रिकोण ABC डाव्या बाजूला ड्रॅग करेन.
06:47 हे एकरूप त्रिकोण तयार करण्यासाठी काही जागा तयार करेल.
06:52 Segment with Given Length  टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये क्लिक करा.
06:58 Segment with Given Length text बॉक्स उघडेल.
07:02 Legnth म्हणून a टाइप करा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
07:07 रेषाखंड DE काढला आहे.
07:10 लक्षात घ्या की रेषाखंड DE ची लांबी रेषाखंड BC ला समान आहे.
07:16 आता आपण एकरूप त्रिकोणासाठी अल्फा आणि बीटासारखे कोन तयार करू.
07:23 Angle with Given Size टूलवर क्लिक करा, बिंदू E वर आणि नंतर बिंदू D वर क्लिक करा.
07:32 Angle with Given Size text बॉक्स उघडेल.
07:36 text बॉक्समधून 45 अंश हटवा.
07:40 symbols table मधून अल्फा निवडा.तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
07:47 लक्षात घ्या की अल्फाच्या बरोबरीचा कोन गामा D येथे तयार केलेला आहे.
07:53 बिंदू D वर आणि नंतर बिंदू E वर क्लिक करा.
07:59 Angle with Given Size text बॉक्समधून 45 अंश हटवा.
08:04 symbols table मधून बीटा निवडा.
08:08 यावेळी clockwise radio बटण निवडा आणि ओके बटणावर क्लिक करा.
08:15 लक्षात घ्या की बीटाच्या बरोबरीचा कोन डेल्टा E येथे तयार झाला आहे.
08:21 बिंदू E prime आणि D prime कोन गामा आणि डेल्टा सोबत काढले गेले ते पहा
08:29 लाइन टूल वापरुन आपण बिंदू D, E प्राइम आणि E, D प्राइम जोडू.
08:39 एखादे विशिष्ट tool वापरल्यानंतर, त्यास निष्क्रिय करण्यासाठी मूव्ह टूलवर क्लिक करा.
08:45 हे Graphics view मधील अनावश्यक बिंदूंच्या रेखांकनास प्रतिबंधित करते.
08:50 रेषा g आणि h एका बिंदूत छेदतात.
08:54 इंटरसेक्ट टूल वापरुन, त्या छेदन बिंदूला F म्हणून चिन्हांकित करा.
09:01 आपण रेषा g आणि h लपवू कारण आपल्याला केवळ रेषेच्या छेदनबिंदूची आवश्यकता आहे.
09:08 रेषा g वर राइट-क्लिक करा आणि शो ऑब्जेक्ट चेक बॉक्स वर क्लिक करा.
09:15 त्याचबरोबर रेषा h लपवा.
09:19 सेगमेंट टूल वापरुन D, F आणि F, E जोडा.
09:26 तयार केलेला त्रिकोण DEF हा त्रिकोण ABC ला एकरूप आहे.
09:32 Algebra view मध्ये, त्रिकोणाची लांबी आणि त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची तुलना करा.
09:40 मापे सूचित करतात की कोन आणि बाजू एकरूप आहेत.
09:45 हे Angle Side Angle एकरूपतेचा नियम सिद्ध करते.
09:50 आता सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू.सर्व ऑब्जेक्ट निवडण्यासाठी Ctrl + A की दाबा.
09:57 कीबोर्डवरील डिलिट की दाबा.
10:01 आता आपण साइड एंगल साइड एकरूपतेचे नियम बनविणे आणि सिद्ध करणे शिकू.
10:07 ही एकरूपतेच्या साइड एंगल साइड नियमाची व्याख्या आहे.
10:13 Polygon tool वापरुन, एक त्रिकोण ABC काढू.
10:20 कोन A C B मोजू.एंगल टूल वर क्लिक करा आणि बिंदू A C B वर क्लिक करा.
10:33 आपण एकरुप त्रिकोणाचा पाया काढू
10:37 Segment with Given Length tool वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये क्लिक करा.
10:43 Segment with Given Length text बॉक्समध्ये, लांबी a टाइप करा.नंतर ओके बटणावर क्लिक करा.
10:51 रेषाखंड DE काढला आहे.
10:54 बिंदू E वर कोन अल्फा ((ACB) कॉपी करू.
10:58 Angle with Given Size टूलवर क्लिक करा.
11:02 बिंदू D वर आणि नंतर बिंदू E वर क्लिक करा
11:07 Angle with Given Size Text बॉक्स उघडेल
11:11 Angle Text बॉक्समध्ये, 45 अंश हटवा आणि symbols table मधून अल्फा निवडा.
11:19 clockwise रेडिओ बटण निवडा आणि ओके बटणावर क्लिक करा.
11:25 कोन बीटा जो कोन अल्फा सारखा आहे तो बिंदू E वर काढलेला आहे.
11:31 लाइन टूल वापरुन बिंदू E आणि D प्राइम जोडा.
11:38 आता आपल्याला b आणि c सामान लांबीचे दोन रेषाखंड काढण्याची गरज आहे.
11:45 Segment with Given Length toolवर क्लिक करा आणि नंतर बिंदू D वर क्लिक करा.
11:51 Segment with Given Length text बॉक्स उघडेल.
11:55 legnth टेक्स्ट बॉक्समध्ये c टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा.
12:01 AB च्या समान लांबीचा रेषाखंड DF आडव्या दिशेने काढला आहे.
12:07 आता Circle with Centre through Point टूलवर क्लिक करा.
12:11 बिंदू D वर क्लिक करा आणि नंतर बिंदू F वर क्लिक करा.
12:16 मध्यबिंदू D मधून एक वर्तुळ काढला आहे जो F मधून जातो.
12:21 वर्तुळ d रेषा g ला दोन बिंदूंवर छेदते हे पहा.
12:26 इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि प्रतिच्छेदन बिंदू वर क्लिक करा.
12:33 आकृती पूर्ण करण्यासाठी आपण वर्तुळ d, रेषा g,बिंदू D प्राइम आणि F आणि रेषाखंड h लपवू
12:42 लपविण्यासाठी, Algebra viewमध्ये ऑब्जेक्ट्सशी संबंधित निळ्या ठिपक्यांवर क्लिक करा.
12:50 सेगमेंट टूलचा वापर करून, बिंदू D G, G, E आणि D, H जोडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
13:01 येथे आपण दोन त्रिकोण DGE आणि DHE पाहू.
13:08 Algebra view मधून लक्षात घ्या की त्रिकोण DGE त्रिकोण ABC शी जुळत आहे.
13:15 आता आपण बाजूंच्या लांबीची तुलना करू.
13:19  Distance or Length  टूलवर क्लिक करा.आणि मग रेषाखंड AB, BC, AC, DG, DE आणि GE वर क्लिक करा.
13:35 पहा की  AB = DG,BC=DE, AC=GE.
13:45 हे सूचित करते की सर्व बाजू एकरूप आहेत.तसेच कोन अल्फा आणि कोन बीटा समान आहे.
13:53 त्रिकोण ABC आणि DGE एसएएस नियमानुसार एकरूप आहेत.
14:01 आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहू.
14:04 आपण या पाठात शिकलो आहोत ,एकरूप त्रिकोण तयार करणे आणि त्यांची एकरूपता सिद्ध करणे .
14:13 असाईनमेंट म्हणून, दोन त्रिकोण तयार करा आणि सिद्ध करा, 1. एकरूपतेचा Angle Angle Side नियम 2. एकरूपतेचा हायपोटेन्युज लेग नियम
14:26 तुमची असाइनमेंट पुढीलप्रमाणे दिसली पाहिजे.
14:31 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा.
14:39 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम: कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
14:47 कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
14:51 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:02 मी राधिका आपला निरोप घेते.धन्यवाद

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika