Difference between revisions of "GIMP/C2/Selecting-Sections-Part-1/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 |'''Time''' 1 |'''Narration''' |- | 00.23 | Meet The GIMP ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |- | 00.25 |हे ट…')
 
Line 2: Line 2:
  
 
|'''Time'''
 
|'''Time'''
1
+
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
  

Revision as of 10:59, 7 March 2014

Time Narration


00.23 Meet The GIMP ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.25 हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.


00.31 आजच्या ची सुरवात या इमेज ने करू.
00.34 आज मी या इमेज ला केवळ एक उदाहरण स्वरुपात वापरुन त्यासहित कार्य करणार आहे.
00.44 सिलेक्शन सहित कार्याची सुरवात करण्यापूर्वी , तुम्हाला सिलेक्शन म्हणजे खरोखर काय आहे या बदद्ल किंचित समजायला हवे.
00.57 हा चौकोन एक सिलेक्शन आहे आणि हा भाग सिलेक्शन च्या बाहेरील भाग आहे.
01.06 येथील गतिमान लाइन्स सिलेक्शन चे काठ आहेत.
01.15 GIMP लोक, सिलेक्शन ला channel असे म्हणतात.
01.19 चॅनेल जसे की लाल, हिरवे किंवा निळे किंवा अल्फा चॅनेल जे पारदर्शकता नियंत्रित करतात.
01.28 सिलेक्शन च्या बाहेर या चॅनेल ची वॅल्यू शून्य आहे.
01.33 आणि आत ती 255 आहे. आणि त्या मध्ये काठ आहे आणि त्या मध्ये 255पेक्षा कमी आणि शून्य पेक्षा जास्त वॅल्यू असु शकतात.
01.48 तर सिलेक्शन बदलणे किंवा सिलेक्शन बनविणे म्हणजे काही क्रमांक बदलणे होय.
01.55 आणि आता सिलेक्शन कसे बनवायचे ते पाहु.
02.01 सिलेक्शन डि-सिलेक्ट करण्याच्या दोन पद्धती आहेत.
02.05 पहिली पद्धत Select आणि None वर जा.
02.11 तुम्ही Shift + Ctr l+ A की चे एकत्रीकरण वापरु शकता आणि सिलेक्शन काढून टाकु शकता.
02.22 आता Rectangle Select टूल निवडा आणि पर्याय dialog मध्ये पहा.


02.33 सर्वात वर चार निवड पर्याय आहेत.
02.36 सध्याच्या सिलेक्शन च्या जागी पहिले आहे.
02.40 तर मी येथे विविध क्षेत्र निवडते आणि तुम्ही पाहु शकता, जेव्हा मी नवीन क्षेत्र निवडते, जुने सिलेक्शन डिलीट होते.


02.52 दुसरा पर्याय आहे, add to the current selection.
02.58 त्या पर्यायच्या निवडीने, मी इमेज मधील विविध क्षेत्र निवडू शकते आणि अगदी किचकट सिलेक्शन मिळवू शकते.
03.17 आणि जेव्हा मी कलर टॅब वर जाते आणि केवळ सिलेक्शन वर रंग घेते, तुम्ही पाहु शकता, सर्व निवडलेले क्षेत्र त्या रंगाने भरले गेले आहे आणि जे क्षेत्र निवडलेले आहे आणि जोडलेले नाही तेही भरले गेले आहेत.
03.44 सिलेक्शन मध्ये काही जोडणे, हे सर्व सिलेक्शन ला एकप्रमाणे ठेवते, जरीही सिलेक्शन च्या भागामध्ये काही संबंध नसेल तरीही.
03.57 हे जरासे किचकट आहे.
03.59 रंग भरण अंडू करण्यासाठी Ctrl + Z दाबा आणि सर्व डि-सिलेक्ट करण्यासाठी shift + Ctrl + A दाबा आणि पर्याय dialog वर पुन्हा जा.
04.11 येथे एक चौकोन निवडा आणि Subtract from the Current Selection निवडा.
04.21 मी हे क्षेत्र निवडले परंतु काहीच होत नाही.
04.27 आणि जेव्हा मी हे क्षेत्र निवडते, तुम्ही पाहु शकता काठ कापल्या गेले आहेत.
04.36 तुम्ही पाहु शकता सिलेक्शन ची चौकट येथे आहे, जेव्हा मी स्थानांतरित करते, बदल केले जाऊ शकतात.
04.47 आणि तुम्ही बनविलेले शेवटचे सिलेक्शन बदलल्या जावू शकते, जोपर्यंत तुम्ही नवीन सिलेक्शन मिळविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी क्लीक करत नाही तोपर्यंत, तुम्ही केलेले कार्य तुम्ही कधीही बदलू शकता.
05.07 आता शेवटचा पर्याय Intersect with the current selection आहे.
05.14 त्यास करण्याचा प्रयत्न करू.
05.17 मी येथे एक आयत निवडते आणि या बाहेरील क्षेत्र निवडलेले नाही आणि या अगोदर केलेले सिलेक्शन्स डिलीट झाले आहेत.
05.32 आणि केवळ या आयतातील सिलेक्शन ठेवले जाईल.
05.38 मी या आयतामध्ये बदल करू शकते, जोपर्यंत माझ्याकडे मला हवे असलेले क्षेत्र निवडलेले आहे.
05.49 तर आता आपण चार पद्धती पूर्ण केल्या आहेत, त्या म्हणजे: Replace, Add, Subtract आणि Intersect.
06.06 तुम्ही केवळ क्लिक द्वारे सिलेक्शन रीप्लेस करू शकता.
06.11 जोडणे Click आणि Shift द्वारे केल्या जाऊ शकते.
06.17 तर चला ते करू, मी shift की दाबते आणि नंतर क्लिक द्वारे मी नवीन सिलेक्शन जोडण्यास सुरवात करते.
06.29 आणि जेव्हा मी shift की आणि mouse की दाबते एक अधिकचे (+) चिन्ह दिसते.


06.39 जर मला सिलेक्शन कमी करायचे असेल तर, मी ctrl की दाबु शकते आता मी mouse की दाबून स्थानांतर सुरू करते, तुम्ही वाजाबाकीचे चिन्ह पाहु शकता.
06.57 तर आता मी सिलेक्शन कमी करू शकते.
07.02 छेदन बिंदू साठी Shift, Ctrl एकत्रित दाबावेत आणि नंतर छेदन बिंदू साठी एक क्षेत्र निवडा.
07.26 जा तुम्ही हे की चे एकत्रीकरण लक्षात ठेवाल तर तुम्ही क्षेत्र अधिक जलद निवडू शकता.
07.33 आणि इतर सिलेक्शन tool द्वारे समान की वापरल्या जातात.
07.38 तुम्हाला त्यास फक्त एकदाच शिकायला हवे.


07.44 Shift, Ctrl, A, सर्व सिलेक्शन नाहीसे करतात आणि सामान्य मोड मध्ये पुन्हा आणतात आणि आता चला इतर स्टफ सहित सुरवात करू.
07.56 पुढील पर्याय आहे Feather Edges, आणि जेव्हा मी हे सिलेक्ट करते तुम्हाला Radius Count असा दुसरा पर्याय मिळेल.
08.09 मी यास किंचीतसे वाढवून क्षेत्र निवडते.
08.15 तुम्ही येथे पाहु शकता येथे rounded corner आहे.
08.21 मला येथे rounded corner नको हवेत.
08.25 काय झाले आहे हे तुम्हाला दाखविण्यासाठी, मी हे काळ्या ने भरते आणि इमेज मध्ये झूम करते.


08.37 तुम्ही येथे मधे काळा रंग पाहु शकता, हा काठा जवळ निस्तेज झाला आहे आणि ही मार्जिन खरोखर काळ्या आणि मूळ इमेज च्या मध्ये वाहने थांबली आहे आणि येथे सिलेक्शन ची वॅल्यू 128 आहे.
09.09 तर अर्धा काळा रंग सिलेक्शन च्या आत आणि अर्धा बाहेर निस्तेज झाला आहे.
09.19 मार्जिन चा शेवट हे तुमच्या सिलेक्शन ची खरी काठ आहे, जेव्हा तुमच्या कडे उठावदार सिलेक्शन असेल.
09.29 मऊ सिलेक्शन मिळण्यासाठी Feather edges हा एक चांगला पर्याय आहे.
09.35 feather सिलेक्शन सहित तुम्ही कमी तीक्ष्ण चित्र मिळवू शकता आणि हे अधिक सोपे आहे.


09.45 तांत्रीक बुद्धीचे लोक feather सिलेक्शन ला Gaussian blur असे म्हणतात आणि मी येथे निवडलेला radius हा Gaussian Blur चा radius आहे.
10.04 पुढील पर्याय आहे Rounded Corners.
10.09 हा rounded corner सहित एक आयत आहे आणि तुम्ही rounded corner चा radius सेट करू शकता.
10.20 येथे rounded भाग आहे आणि ही मार्जिन एक सरळ भाग आहे.
10.28 येथील पुढील पर्याय Antialiasing आहे.
10.34 हा पर्याय corner पेंटिंग सेट करतो.
10.40 मी हे सिलेक्शन काळ्या ने भरते आता मी selection टूल वर जाते आणि मी antialiasing डि-सिलेक्ट करते आणि दुसरे सिलेक्शन बनविते आणि त्यालाही काळ्या ने भरते.


11.09 zoom टूल निवडा आणि Shift + Ctrl + A ने सर्व सिलेक्शन डि-सिलेक्ट करा आणि या क्षेत्रा मध्ये झूम करा.
11.24 आणि येथे काठ antialiasing शिवाय आहेत आणि हे काळ्या ने भरले जाते किंवा नाही भरले जात.
11.37 आणि येथे तुम्ही करड्या पायऱ्या पाहु शकता.
11.42 येथे तुम्ही jaggis शिवाय मऊ कॉर्नर पाहु शकता आणि त्यास Antialiasing म्हणतात.
11.53 या सिलेक्शन ला rounded corner नाही परंतु, पायऱ्यांचा क्रम आहे.
12.04 आणि जेव्हा मी 100% झूम वर पुन्हा जाते, मी येथे jaggies पाहु शकते आणि हे मऊ नाही परंतु येथे मऊ कॉर्नर आहेत आणि हे तुम्ही स्वतः साठी सहजपणे प्रयत्न करू शकता.


12.32 जर तुम्हाला मऊ कॉर्नर हवे असतील तर Antialiasing निवडा.
12.42 आणि जर तुम्हाला करडी tones येथे हवी असेल तर तो पर्याय डी-सिलेक्ट करा.
12.55 मी तो पर्याय निवडते आणि येथे Expand From Centreनामक एक उप-पर्याय आहे.
13.04 मी हे निवडून त्या सहित कार्य करण्यास सुरू करते.
13.13 तर पोइंन्ट येथे ठेवा आणि सिलेक्शन मी येथून ओढण्यास सुरु करते.
13.21 तुम्ही पाहू शकता हे त्या पोइंन्ट पासून वाढत आहे आणि हे पोइंन्ट नेहेमी सिलेक्शन च्या मधे असते.
13.31 जेव्हा मी तो पर्याय डी-सिलेक्ट करते, मी सिलेक्शन येथे ओढू शकते आणि माझ्या सिलेक्शन नुसार मी कोपऱ्याचे ठिकाण बदलू शकते.
13.46 या साठी येथे एक की कोड आहे.
13.51 जेव्हा मी या पॉइण्ट जवळ क्लिक करते आणि ctrl दाबते, माझ्या कडे मध्यावरून एक सिलेक्शन आहे आणि ते सिलेक्शन मध्यतून आकाराने मोठे होते.
14.06 आणि जेव्हा मी ctrl की सोडते सिलेक्शन नाहीसे होते.


14.16 जेव्हा मी माउस चे बटन दाबण्या पूर्वी Ctrl कि दाबते, तर मी सिलेक्शन कमी करू शकते, परंतु जेव्हा मी माउस कि अगोदर दाबेल आणि नंतर Ctrl कि, तर मला मध्यातून सिलेक्शन मिळते.
14.42 पुढील पर्याय आहे Fixed Aspect Ratio आणि माझ्याकडे पूर्वी निवडलेला 1 by 1 असा aspect ratio आहे. आणि जेव्हा मी हे रेखाटते हे नेहेमी चौकोना मध्ये असते.
15.08 मी येथे 2 by 3 ratio निवडू शकते आणि मला नेहेमी 2 by 3 ratio मध्ये सिलेक्शन मिळते. 2 by 3 हे मला landscape mode मध्ये सिलेक्शन देते.
15.31 परिपूर्ण चौकोन तयार करण्यासाठी येथे एक दुसरी पद्धत आहे.
15.36 मी या पॉइण्ट पासून सिलेक्शन ची सुरवात करते, ओढून नंतर shift दाबते.
15.46 येथे निवडलेल्या वॅल्यू सहित fixed aspect ratio आता निवडलेला आहे.
15.54 आणि ही एक जलद पद्धत आहे, मी shift दाबून मला हव्या असलेल्या aspect ratios सहित क्षेत्र निवडू शकते.


16.08 आणि पुढील पर्याय आहे highlight. आणि जेव्हा मी हे वापरते, न निवडलेले क्षेत्र करडे आणि सर्व क्षेत्र जे निवडले आहे ते पांढरे होते.
16.24 आणि हे केवळ सध्याच्या सिलेक्शन संबंधित आहे, तर यास डी-सिलेक्ट करून दुसरा पर्याय पहा.
16.35 येथे तुम्ही हाताने वॅल्यू सेट करू शकता, आणि जर तुम्ही येथे fix वर क्लिक केले तर, मी सिलेक्शन चा आकार बदलू शकत नाही.
16.47 आणि जर मला width दोन पिक्सल ने कमी आणि height एक पिक्सल ने जास्त सेट करायची आहे, तर हे सिलेक्शन चे चांगले ट्यून आहे.


16.59 मी X ची वॅल्यू वाढवून, जो ऑरिजिन चा पॉइण्ट आहे, मी सिलेक्शन ला किंचितसे उजव्या बाजूला स्थानांतरित करू शकते.
17.10 आणि जेव्हा मी fix वर क्लिक करते, मी संपूर्ण सिलेक्शन स्थानांतरित करू शकते.
17.17 तर ‘X’ आणि‘Y’ हे सर्वात वरच्या डाव्या पोईंटच्या ऑरिजिन चे पॉइण्ट आहे आणि fix बटना ने मी हालचालींना खंडित करू शकते.
17.30 पुढील पर्याय आहे guides.
17.34 मी Centre Line निवडू शकते, जे मला सिलेक्शन चे मध्य पॉइण्ट दाखवेन.
17.44 माझ्या कडे Rule Of Thirds आहे, जे आलेखी कार्या साठी वापरता येते किंवा मी Golden Selections ही वापरु शकते जे Rule Of Thirds च्या समान आहे.
18.00 खाली तळावर Auto Shrink Selection आणि Shrink Merged आहे.
18.08 Auto Shrink Selection हे फारसे उपयुक्त नाही.
18.14 परंतु Shrink Merged हा एक पर्याय आहे जे निवडल्यास algorithm सर्व लेयर जवळ दिसते आणि जर तुम्ही कार्य करत असलेल्या लेयर डि-सिलेक्ट कराल तर ते तर ते विचारात घेतले जाईल.
18.34 या पर्यायांचे पुनर्विलोकन करण्यापूर्वी आपणEllipse Selection बद्दल बोलूया.
18.42 सर्व सिलेक्शनShift+ctrl+A दाबून डि-सिलेक्ट करा.
18.49 सर्वात वर तुम्हाला काही पर्याय मिळतील जसे, Replace current selection, Add to the selection with Shift key क्लिक करण्यापूर्वी आणि Subtract with Ctrl key क्लिक करण्यापूर्वी आणि Intersect with Shift आणि Ctrl key क्लिक करण्यापूर्वी.
19.12 मऊ काठा साठी पुन्हा Antialiasing .
19.17 हे आयता पेक्षा हे अंडाकृती सहित महत्वाचे आहे कारण, अंडाकृती नेहिमी गोलाकार असते.
19.26 आयता मध्ये असल्या प्रमाणे Feather edges हा समान पर्याय आहे.
19.32 जर मी हे काळ्या ने भरते, तुम्ही काळ्या आणि पंढर्या मध्ये एक मऊ gradient पाहु शकता आणि ही मर्जिन काळ्या आणि पंढर्या मध्ये संपते.
19.54 माउस बटन क्लिक केल्या नंतर Ctrl की ने Expand from centre ही समान कार्य करते.
20.05 Fixed aspect ratio हे ही समान आहे, माउस बटन क्लिक केल्या नंतर तुम्हाला aspect ratio 1 by 1सहित एक परिपूर्ण वर्तुळ मिळेल.
20.19 आता शेवटच्या टूल वर येऊ, मला आज तुम्हाला दाखवायचा आहे आणि तो आहे, Free Select tool.
20.29 जेव्हा मी तो टूल निवडते मला तेच पर्याय इथे दिसतो आणि Add, Replace, Subtract आणि Intersect

साठीही किज समान कार्य करतात.

20.44 या पुढे केवळ दोन पर्याय आहेत, ते म्हणजे Antialiasing आणि feather edges with same functions.
20.54 येथे मला वर्तुळाची त्रिज्या मिळाली आहे मी त्यास आता डि-सिलेक्ट करते.
21.00 मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखविण्यासाठी पानाचा खलचा भाग निवडते.
21.08 आणि मी इमेज मध्ये क्लिक करते, जेथे मला सिलेक्शन ची सुरवात करायची आहे आणि एक रेष काढते आणि पानाच्या काठा ला अनुसरते.
21.33 आता मी हे क्षेत्र निवडलेले आहे.
21.38 चांगल्या टूनिंग साठी मी इमेज मध्ये झूम करते.
21.43 आणि माझ्या सिलेक्शन dialog मध्ये मी Add To The Current Selection निवडते आणि सिलेक्शन अड्जस्ट करण्यास सुरू करते.


22.10 algorithm काही काळा साठी दिसते, त्या पॉइण्ट वर जेथे तुम्ही सिलेक्शन ची सुरवात केली आहे.
22.19 सिलेक्शन सोपे करण्यासाठी मी Quick Maskवापरू शकते.
22.26 खाली डाव्या कोपऱ्यावर Toggle Quick Mask हा पर्याय आहे आणि मी ते Toggle करते आणि आता तुम्ही पाहता कि माझी संपूर्ण इमेज लाल आहे.
22.38 हा गोंधळात टाकणारा पर्याय आहे कारण जे क्षेत्र निवडलेले आहे आणि जे निवडलेले नाही ते लाल मध्ये दाखवीत आहे.
22.51 मी toggle वर जाते आणि मी त्या वर राइट क्लिक करते, हे मला Configure, Colour आणि Opacity देते आणि येथे मी रंग सेट करू शकते तर मी त्यास निळ्या मध्ये सेट करते.
23.07 आणि जे क्षेत्र निवडलेले आहे ते लाल आहे आणि सर्व निळे आहे.
23.19 आणि आता पेन निवडा आणि निवडलेले क्षेत्र पेंट करण्यास सुरु करा, परंतु त्या अगोदर मी ’X’की ने foreground आणि background रंग बदलते.
23.38 मी आता पेंटिंग सुरु करते.
23.48 आणि जेव्हा मी काठ अधिक पेंट करते, मी background रंगा सहित पेंट करू शकते.
24.00 पेंटिंग साठी मला ब्रश चा अचूक आकार निवडायला हवा.
24.23 आणि जेव्हा मी mask untoggle करते तुम्ही पाहू शकता येथे सिलेक्शन मध्ये चूक आहे आणि येथेही.
24.35 toggle निवडा आणि चुका दुरुस्त करा.


24.44 Fixed.


24.50 किचकट सिलेक्शन ला बरोबर मिळविण्याकरिता Quick Mask हि एक चांगली पद्धत आहे.
24.59 quick mass सिलेक्शन ला तुम्ही टूल प्रमाणे वापरु शकता.


25.05 तुम्ही mask ची opacity बदलू शकता आणि जे भाग निवडलेले नाही ते तुम्ही क्वचितच पाहु शकता.
25.19 50% opacityहे बहुसंख्य बाबतीत अचूक प्रमाण असते.


25.28 तुम्ही अवेचीत क्षेत्रा साठी तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता.


25.36 येथे mask selected areas नामक दुसरा पर्याय आहे.
25.43 हा quick mask च्या अगदी विरुद्ध परिणाम आहे.
25.48 निवडलेले क्षेत्र निळ्या ने पेंट केले आहे आणि या बाबतीत हे अधिक चांगले दिसत आहे.
25.59 आणि जेव्हा तुम्ही quick mask डि-सिलेक्ट कराल, तुम्ही तुमचे सिलेक्शन पाहु शकता.
26.08 तर आपण येथे असे समजूया की, मी परिपूर्ण सिलेक्शन बनविले आहे आणि पुढील कार्या साठी मला हे सिलेक्शन सेव करायचे आहे आणि मला यास गमावायचे नाही.


26.29 केवळ Selectआणि Save to Channel वर जा कारण सिलेक्शन हे मुळात चॅनेल्स आहेत.


26.45 मी यास Mask 1 असे सेव करते आणि हे ’XCF’ फाइल मध्ये संग्रहीत होईल.
26.55 तर आता मी Shift + Ctrl + A ने सर्व काही डि-सिलेक्ट करू शकते.
27.02 दुसरा भाग निवडा आणि जेव्हा मी माझ्या सिलेक्शन वर पुन्हा जाते येथे मी सिलेक्शन जोडू शकते किंवा सिलेक्शन वरुन कमी करू शकते किंवा सिलेक्शन ने छेदू शकते. माझे सिलेक्शन पुन्हा येथे आले आहे.
27.23 जर तुम्हाला ते सेव करायचे असेल तर केवळ select आणि Save to Channel वर जा.


27.34 Spoken Tutorial Project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana