Difference between revisions of "Drupal/C3/Drupal-Site-Management/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 188: Line 188:
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
| '''Manage Servers ''टॅबवर क्लिक करा आणि मग '''Stop All''' बटणावर क्लिक करा.
+
| '''Manage Servers''' टॅबवर क्लिक करा आणि मग '''Stop All''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:56
 
|  06:56

Revision as of 17:22, 14 September 2016

Time Narration
00:01 Drupal Site Management वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत ड्रुपल साईट मॅनेजमेंट
  • रिपोर्ट पाहणे
  • Drupal अपडेट करणे
  • मोड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि
  • जुने वर्जन पुर्नस्थापित करणे.
00:18 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
  • उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम
  • ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊझर

तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राऊझर वापरू शकता.

00:33 साईट मॅनेजमेंट काय आहे ?

साईट मॅनेजमेंट म्हणजे ड्रुपल मागील कोड अपडेट करणे जे आहेत कोर, मॉड्युल्स आणि थिम्स.

00:44 एरर्स बारकाईने पाहणे आणि फिक्स करणे, युजर्सच्या वर्तनाचा अभ्यास करणे इत्यादी.
00:51 आपली पूर्वी बनवलेली वेबसाईट उघडा.
00:56 साईट मॅनेजमेंट सुरवातीला आहे 'रिपोर्ट्स' मेनू. जर तुम्हाला अतिरिक्त सहाय्यक हवा असेल तर तुम्ही हेल्प मेनू पाहू शकता.
01:07 'रिपोर्ट्स' वर क्लिक करा. आपण ड्रुपल साईटवरील रिपोर्ट्सची एक यादी पाहू शकतो.
01:14 Available Updates वर क्लिक करा.
01:17 जर काहीही लाल पार्श्वभूमीत असेल तर याचा अर्थ असा होतो की इथे सिक्युरिटी अपडेटची गरज आहे आणि आपण ते लवकर अपडेट केले पाहिजे.
01:25 जर ते पिवळे असेल तर ते सिक्युरिटी अपडेट नाही, पण तिथे एक सुधारित वर्जन उपलब्ध आहे.
01:33 सेटिंग्स टॅबवर, आपण ड्रुपल ला अपडेट तपासण्यासाठी वारंवार सांगू शकतो.
01:40 जर तिथे अपडेट्स उपलब्ध असतील तर आपण त्याला आपल्याला ई-मेल पाठवायलादेखील सांगू शकतो. हे करण्यासाठी हे अत्यंत शिफारसीय आहे.
01:50 रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले रिसेंट लॉग मेसेजेस आपल्याला ड्रुपल ला आढळलेल्या एरर्सची सूची देतो.
02:01 रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेला स्टेटस रिपोर्ट ड्रुपल ने ओळखलेल्या इन्टॉलेशन किंवा कॉन्फिरगेशनच्या समस्या दर्शविते.
02:10 उदाहरणार्थ
  • मी MySQL 5.6.30, वर आहे.
  • माझे ड्रुपल कोर स्टेटस आधुनिक नाही आहे. माझा डेटाबेस आधुनिक आहे, इत्यादी.
02:25 रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले ‘टॉप एक्सेस डिनायड एरर्स’ आणि ‘टॉप पेज नॉट फाऊंड एरर्स’ देखील महत्त्वाचे आहेत.
02:34 आपली साईट शक्य तितकी सर्वोत्तम चालू शकते ह्याची खात्री करून घेण्यासाठी हे सोपे मार्ग आहेत.
02:41 टॉप सर्च फ्रेजेस आपल्या साईटच्या सर्च फॉर्ममध्ये वारंवार वापरलेले शब्द उपलब्ध करून देतो.
02:49 आपली साईट चालू ठेवण्यासाठी आपल्या ड्रुपल वेबसाईटवरील रिपोर्टिंग सेक्शन समजून घेणे ही पहिली पायरी आहे.
02:57 ड्रुपल अपडेट करणे शिकू.
03:01 Available updates वर क्लिक करा.
03:04 आपण पाहू शकतो की ड्रुपल कोरचे सध्याचे वर्जन 8.1.0 आहे आणि आपल्याला हवे आहे 8.1.6
03:15 ही रेकॉर्डिंगच्या वेळची स्थिती आहे.
03:20 तुम्ही इथे सांगितलेले वेगवेगळे वर्जन पाहू शकता.
03:24 लक्षात घ्या की ड्रुपल वर वर्तमान वर्जन शोधण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.
03:32 ड्रुपल कोर अपडेट करण्यासाठी स्वतः कोड फाईल्स डाऊनलोड करण्याची आवश्यकता आहे आणि ती तुमच्या साईटवर लागू करत आहे.
03:40 आपण एकानंतर एक अशी अपग्रेटींग(upgrading) प्रक्रिया पाहू.
03:45 खालील स्टेप्स (bitnami) ड्रुपल स्टॅक ला लागू आहेत
03:50 पण ब-याचश्या स्टेप्स इतर कोणत्याही ड्रुपल इन्टॉलेशनसाठी लागू आहे.
03:57 स्टेप नं. 1

प्रथम तुमची साईट मेन्टनन्स मोड मध्ये टाका.

04:03 त्यासाठी Configuration वर जा आणि Development मधील Maintenance mode वर क्लिक करा.
04:11 मेन्टनन्स मोडवर साईट टाकण्यासाठी ऑप्शन तपासा.
04:16 Save configuration बटणावर क्लिक करा.
04:19 जेव्हा मेन्टनन्स मोड एक्टिव्ह असेल तेव्हा फक्त एडमिनीस्ट्रेटर्स लॉगिन करू शकतात.
04:26 समजा, चुकून तुम्ही एडमिनमधून लॉग आऊट (बाहेर पडलात) झालात, तर तुम्ही तुमच्या होमपेजवरील युजरनंतर असलेल्या युआरएलवर लॉगिन करू शकता.
04:37 इतरांना मेसेज दिसेल की साईटचे काम चालू आहे.
04:42 स्टेप नं २

वर्तमान वर्जनच्या डेटाबेसचे बॅकअप घेऊ.

04:47 तुमचे बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडो उघडा.
04:52 कंट्रोल विंडो कशी उघडावी ह्यासाठी इन्टॉलेशन ऑफ ड्रुपल वरील ट्युटोरिअल पाहा.
05:00 Open PhpMyAdmin बटणावर क्लिक करा.
05:05 आपण पीएचपीएडमिन पान पुनर्निर्देशित करत आहोत.
05:10 डिफॉल्ट युजरनेम आहे root
05:13 ड्रुपल एडमिन आणि पीएचपीमाय एडमिन ह्यांचे पासवर्ड एकच आहेत.
05:20 म्हणून युजरनेम म्हणून root आणि तुमचे ड्रुपल एडमिन पासवर्ड टाईप करा, मग Go बटणावर क्लिक करा.
05:29 बॅकअपसाठी प्रथम सर्वात वरच्या पॅनलवरील Export बटण क्लिक करा.
05:36 कस्टम म्हणून एक्सपोर्ट मेथड निवडा.
05:40 डेटाबेस लिस्टमधील bitnami_drupal8 निवडा.
05:45 आऊटपूट सेक्शनमध्ये टेंपलेटला drupal-8.1.0 हे नाव द्या आणि कंप्रेशन gzipped म्हणून सेट करा.
05:58 फाईलीचे नाव तुमच्या वर्तमान वर्जनवर आधारित वेगळे असू शकते.
06:03 ऑबजेक्ट क्रिएशन ऑप्शन्समधील Add DROP DATABASE statement ऑप्शनवर चेकमार्क लावा.
06:12 Add DROP TABLE ऑप्शनवर चेकमार्क लावा.
06:16 स्क्रोल करून खाली या आणि तळाशी Go बटणावर क्लिक करा.
06:21 फाईल सेव्ह करण्यासाठी 'OK बटणावर क्लिक करा.
06:25 तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि बॅकअप फाईल drupal-8.1.0.sql.gz तपासा.
06:36 स्टेप नं ३

सर्व सर्व्हर्स शटडाऊन कराव्यात.

06:42 सर्व चालू सर्व्हर्स थांबविण्यासाठी, बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
06:49 Manage Servers टॅबवर क्लिक करा आणि मग Stop All बटणावर क्लिक करा.
06:56 स्टेप नं. 4

Welcome टॅबवर क्लिक करा आणि मग Open Application Folder बटणावर क्लिक करा.

07:04 हे फाईल ब्राऊजरमध्ये उघडेल.
07:07 अ‍ॅप्स, मग ड्रुपल आणि शेवटी एचटीडॉक्स फोल्डर्समध्ये जा.
07:15 स्टेप नं. 5

ड्रुपल च्या वर्तमान वर्जनच्या कोडच्या बॅकअपसाठी आपल्याला फोल्डर तयार करायचे आहे.

07:24 ह्या फोल्डरला वर्तमान वर्जनचा क्रमांक नाव म्हणून द्या.
07:29 नंतर drupal-8.1.0 फोल्डरमध्ये बॅकअप डेटाबेस फाईल हलवा.
07:36 स्टेप नं. 6

एचटीडॉक्स फोल्डरवर पुन्हा जा.

07:42 नंतर कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर सर्व फाईल्स कट आणि पेस्ट करून drupal-8.1.0 फोल्डरमध्ये हलवा.
07:55 हे डेटाबेस आणि कोड दोन्ही एका ठिकाणी ठेवेल.
08:00 ही कोरच्या जुन्या वर्जनची बॅकअप कॉपी आहे, जर ती तुम्हाला कॉपी परत मिळवायची असेल.
08:07 स्टेप नं 7

आपल्या एचटीडॉक्स फोल्डरवर परत जा.

08:13 नंतर आपल्याला ड्रुपलचे नवीन वर्जन डाऊनलोड करायचे आहे.
08:18 तुमचे वेब ब्राऊझर उघडा आणि दाखवलेल्या : https://www.drupal.org/project/drupal लिंक वर जा.
08:24 ड्रुपल 8 चे सांगितलेले नवीन वर्जन डाऊनलोड करा.
08:28 हे रेकॉर्डिंग करताना, ते आहे Drupal core 8.1.6
08:35 तुम्ही पाहताना हे वर्जन वेगळे असू शकते.
08:40 उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
08:43 फाईल डाऊनलोड करण्यासाठी tar.gz किंवा zip वर क्लिक करा.
08:49 सेव्ह करण्यासाठी OK बटणावर क्लिक करा.
08:53 आता तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि ड्रुपल झिप फाईल तुमच्या एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
09:01 ह्या ट्युटोरिअच्या वेबपेजच्या कोड फाईल्समध्ये drupal-8.1.6.zip फाईल दिली आहे.
09:11 जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कृपया ते डाऊनलोड करा आणि वापरा.
09:18 स्टेप नं 8

फाईल अनझीप करा. हे एचटीडॉक्स फोल्डरमध्ये drupal-8.1.6 नावाचे फोल्डर तयार करेल.

09:30 उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
09:34 नवीन ड्रुपल फोल्डरमधून कोर आणि वेंडर आणि इतर नेहमीच्या फाईली एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
09:44 स्टेप नं. 9

बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.

09:51 आता Manage Servers टॅबवर जा आणि Start All बटणावर क्लिक करून सर्व सर्व्हर्स सुरू करा.
10:00 स्टेप नं. 10

आमच्या साईटला भेट देण्यासाठी Welcome टॅबवर Go to Application आणि Access Drupal लिंक बटणावर क्लिक करा.

10:12 Reports आणि Status report वर जा.
10:17 इथे आपण ड्रुपल वर्जनचा क्रमांक (क्रमांक) नक्की करू शकतो आणि तो नवीन आहे.
10:24 पण आपला डेटाबेस आऊट ऑफ डेट (कालबाह्य) झाला आहे.
10:27 प्रत्येकवेळी तिथे कोर, मोड्युल किंवा थिम अपडेट आहे, डेटाबेसदेखील अपडेट असायला हवा.
10:36 स्टेप नं. 11

डेटाबेस अपडेट करणे शिकू.

10:42 'एक्सटेंड' मेनूवर जा आणि update script लिंकवर क्लिक करा.
10:47 Continue बटणावर क्लिक करा.
10:51 ते सांगते की आपले काही अपडेट्स बाकी आहेत. तुमच्यासाठी हे कदाचित वेगळे असू शकते.
10:58 Apply pending updates बटणावर क्लिक करा.
11:04 आता Administration pages लिंकवर क्लिक करा.
11:08 जर कोणतीही एरर नसेल तर आपण यशस्वीरित्या कोर अपडेट केला आहे.
11:14 स्टेप नं १२

Go online लिंकवर क्लिक करा.

11:18 Put site to maintenance mode ऑप्शनवरून चेकमार्क काढून टाका.
11:25 Save configuration बटणावर क्लिक करा.
11:29 हे सर्व युजर्सना ऑनलाईन मोडवरील साईटवर पुन्हा आणेल.
11:34 आतापर्यंत चर्चिलेल्या पाय-या बिटनामी इन्टॉलेशनसाठी काम करतात.
11:40 जर तुम्ही इतर मेथड्स वापरले आहेत, तर बिटनामी सेक्शन्स वगळता सर्व पाय-या सारख्या असतील.
11:48 थिम्स आणि मॉड्युलस अपडेट करणे शिकू.
11:53 हे कोर अपडेट करण्यापेक्षा सोपे आहे कारण ड्रुपल हे बटणाच्या एका क्लिकवर करते.
12:01 काहीवेळेस, आपल्याकडे कोणत्याही कोर अपडेटशिवाय फक्त मोड्युल्स किंवा थिम्सचे अपडेट्स असतील.
12:09 स्टेप नं 1

Reports मेनूवर क्लिक करा आणि मग Available updates

12:15 Update टॅबवर क्लिक करा.
12:19 इथे आपण पाहू शकतो की आपल्याला काही थिम्स आणि मोड्युल्स अपडेट करायचे आहेत.
12:25 ती सर्व सिलेक्ट करा.
12:28 Download these updates बटणावर क्लिक करा.
12:33 अपडेट्स मेन्टनंस मोडवर चालण्यासाठी चेकबॉक्स चालू आहे ह्याची खात्री करून घ्या.
12:39 अपडेट्स करण्यासाठी Continue बटणावर क्लिक करा
12:43 हे कोड अपडेट करेल आणि साईटला ऑनलाईन मोडवर आणेल.
12:49 स्टेप नं. 2

Run database updates लिंकवर क्लिक करा.

12:55 जर तुम्ही डेटाबेसचा बॅकअप घेतला नसेल तर पूर्वी केल्याप्रमाणे करा.
13:01 Continue बटणावर क्लिक करा.
13:04 हे डेटाबेस अपडेट करेल ज्याप्रमाणे आपण कोर अपडेट केले.
13:09 Apply pending updates बटणावर क्लिक करा.
13:14 Administration pages लिंकवर क्लिक करा.
13:18 ड्रुपल साधारणपणे साईटला पुन्हा ऑनलाईन मोडवर आणेल.
13:24 जर असे नसेल तर तुम्ही Go online पानाच्या वरच्या बाजूस एक ऑप्शन पाहाल.
13:33 स्टेप नं. 3

शेवटी सर्व अद्यायावत आहे हे तपासू.

13:39 रिपोर्ट्स मेनू आणि अवेलेबल अपडेट्सवर क्लिक करा.
13:44 इथे आपण पाहू शकतो की आपले ड्रुपल कोर, मोड्युल्स आणि थिम्स सर्वकाही अद्यायावत आहेत.
13:51 आता आपल्या जुन्या वर्जनवर पुन्हा कसे यावे हे शिकू.
13:56 जर काही कारणास्तव आपले अपडेट अयशस्वी होते आणि ते तुम्हाला माहित नसेल तर आपण आधीच्या वर्जनवर पुन्हा जाऊ शकतो.
14:05 त्यासाठी आपल्याला जुने कोर आणि डेटाबेस पुनर्संचयित (रिस्टोर) करणे गरजेचे आहे.
14:10 स्टेप नं. 1

साईटला मेन्टनन्स मोडवर टाका.

14:17 स्टेप नं. 2

ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोतून सर्व सर्व्हर्स थांबवा.

14:25 स्टेप नं. 3

आपले एचटीडॉक्स फोल्डर उघडा.

14:30 कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स drupal-8.1.6 फोल्डरमध्ये हलवा.
14:40 एचटीडॉक्स फोल्डर वर पुन्हा जा आणि आधीच्या वर्जनचे फोल्डर उघडा.
14:44 नंतर drupal-8.1.0 फोल्डरमधून कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स एचटीडॉक्स फोल्डरमध्ये हलवा.
15:00 स्टेप नं. 4

ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोमधून अपॅचे आणि मायस्क्वेल सर्व्हर्स सुरू करा.

15:11 स्टेप नं. 5

जुना डेटाबेस पुनर्संचयित करणे.

05:15 ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोमधून पीएचपीमायएडमीन पान उघडा.
15:23 सर्वात वरच्या पॅनलमधील Import वर क्लिक करा.
15:27 Browse बटणावर क्लिक करा.
15:30 इथे बॅकअप डेटाबेस फाईल निवडा.
15:34 नंतर तळाशी असलेल्या Go बटणावर क्लिक करा.
15:38 स्टेप नं. 6

शेवटची पायरी तपासत आहे की आपण जुन्या वर्जनमध्ये तर परत नाही आहोत.

15:45 आपल्या ड्रुपल साईटवर जा.
15:49 रिपोर्ट्स मेनू आणि स्टेटस रिपोर्टवर क्लिक करा.
15:52 इथे तुम्ही पाहू शकता की आपले ड्रुपल वर्जन आहे 8.1.0.
15:59 लक्षात घ्या की आपण फक्त जुन्या वर्जनच्या कोर आणि डेटाबेसवर पुन्हा जाऊ शकतो.
16:05 ड्रुपल ने मोड्युल्स आणि थिम्स अपडेट केल्या आहेत.
16:10 आपण स्टेप नं. 6 मध्ये ह्याची एक प्रत (कॉपी) तयार केली नाही, म्हणून आपल्याला इथे जुने वर्जन दिसणार नाही.
16:18 आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
16:22 सारांशित करूया.
16:25 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण साईट मॅनेजमेंटच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत शिकलो.
  • रिपोर्ट्स पाहणे आणि रिपोर्ट्स विश्लेषण करणे.
  • डेटाबेस आणि कोडचे बॅकअप घेणे.
16:39 * ड्रुपल कोर अपडेट करणे
  • मॉड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि बॅकअप वर्जन पुनर्स्थापित करणे.
16:49 ह्या लिंकवरील विडियोवर तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
16:54 कृपया डाऊनलोड करून पाहा.
16:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.
17:03 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
17:06 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
17:22 हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana