Drupal/C2/User-group-and-Entity-Reference/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:24, 7 September 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या User Group and Entity Reference वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत:

User Group Content type बनवणे,

00:11 User Group फिल्ड समाविष्ट करणे आणि Content types हे Entity reference ला कनेक्ट करणे.
00:18 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
  • उबंटु ऑपरेटिंग सिस्टम
  • Drupal 8 आणि
  • Firefox वेब ब्राउजर.
00:27 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:32 मागील पाठात बनवलेला Events Content type आठवा.
00:38 आपण येथे दिसणारी पहिली पाच fields बनवली आहेत.
00:42 Event Sponsor फिल्ड बनवण्यासाठी, आपल्याला User Groups Content type बनवावे लागेल.
00:48 User Groups हा People चा असा ग्रुप आहे, जो इवेंट आयोजित करण्यास एकत्र येतो.
00:54 जसे की, Cincinnati User group, Drupal Mumbai group, Bangalore Drupal group, इत्यादी.
01:03 प्रथम, कागदावर User Groups बनवू.
01:07 ग्रुपला वेबसाईट, काँटॅक्ट पर्सन, त्याचा इमेल आणि experience level असू शकते.
01:15 ड्रुपलमधे URL आणि Email साठी डिफॉल्ट फिल्ड्स आहेत. म्हणून आपण ही field types निवडली.
01:23 व्यक्तीचे नाव Name field द्वारे मिळवता येईल. परंतु आतासाठी आपण ते Text (plain) ठेवू.
01:31 User experience levels च्या फिल्डमधे Beginner, Intermediate किंवा Advanced यापैकी एक असू शकेल.
01:39 हे अमलात आणण्यासाठी List (text) field type निवडू.
01:45 येथील शेवटचे field, या ग्रुप द्वारे प्रायोजित सर्व इवेंट्स कॅप्चर करण्यासाठी वापरता येईल.
01:51 यासाठी, आपण सध्याच्या Events Content type ला लिंक करण्यास Entity reference field चा उपयोग करू शकतो.
02:01 User Groups Content type ला सेट करू.
02:05 Add content type क्लिक करा. याला User Groups नाव द्या.
02:11 लक्षात घ्या की Machine name हे user underscore groups आहे.
02:16 Description मधे, टाईप करा - This is where we track the Drupal groups from around the world
02:23 Title field label मधे, आपण ह्यास User Group Name नाव देऊ.
02:29 Events Content type प्रमाणेच हे सेट करू.
02:35 Publishing options टॅब क्लिक करा.
02:38 Default options मधे,
  • Create new revision,
  • Published आणि
  • Promoted to front page ला चेक करा.
02:48 आता Display settings टॅब क्लिक करा.
02:52 पुन्हा Display author and date information बॉक्स अनचेक करा.
02:58 शेवटी, Menu settings टॅब क्लिक करा आणि Main navigation बॉक्स अनचेक करा.
03:05 हे सेट करून झाल्यावर आपण खालील Save and manage fields बटन क्लिक करू शकतो.
03:13 आपण Manage fields पेजवर पोचलो आहोत.
03:17 येथे Body मधील Label बदला.
03:21 Operations कॉलम खालील Edit बटन क्लिक करा.
03:26 Label फिल्ड मधे User Group Description टाईप करा आणि पुन्हा खालील Save settings बटन क्लिक करा.
03:36 वर हिरव्या रंगाचा success मेसेज आपल्याला दिसेल.
03:40 या Content type साठी आपण फक्त 5 fields सेट करू.
03:46 आपण एक field आधीच बनवले आहे. आता आणखी एक बनवू.
03:52 Add field बटन क्लिक करा.
03:55 येथे आपण Reuse an existing field ड्रॉपडाउन क्लिक करू.
04:02 पहा की Link: field_event_ website field लिंक उपलब्ध आहे.
04:08 कारण आपण आधीच हिला Event website नाव दिले आहे.
04:13 field चा पुन्हा उपयोग आपल्याला Drupal database मधे table परत वापरण्याची अनुमती देतो.
04:20 हे त्याच field साठी भिन्न सेटिंग्ज ठेवून केले जाते.
04:25 या स्थितीत नवीन field सेट करणे जास्त चांगले.
04:30 Add a new field ड्रॉपडाउन मधे Link field type निवडा.
04:35 Label मधे टाईप करा Group Website
04:39 Save and continue, क्लिक करा आणि पुन्हा Save field settings क्लिक करा.
04:45 यावेळी आपण External links only निवडू कारण कुठल्याच User Groups चे Drupalville मधे कोणतेही पेज नाही.
04:54 खाली Save settings बटन क्लिक करा.
04:57 एकदा पुन्हा Add field क्लिक करा.
05:01 यावेळी आपण contact person’s name साठी Text field वापरू.
05:07 Add a new field ड्रॉपडाउन क्लिक करा आणि field type Text (plain) निवडा.
05:14 आपण Label ला Group Contact नाव देऊ.
05:18 Save and continue क्लिक करा आणि पुन्हा Save field settings क्लिक करा.
05:24 पुन्हा खालील Save settings बटन क्लिक करा.
05:28 पुन्हा एकदा Add field बटन क्लिक करा. यावेळी ड्रॉपडाउन मधे Email field निवडा.
05:37 आपण Label ला Contact Email नाव देऊ. Save and continue बटन क्लिक करा.
05:44 Allowed number of values मधे आपल्याला फक्त 1 हवी आहे. Save field settings क्लिक करा.
05:52 येथे आणखी काही सेटिंग नाहीत. म्हणून खाली Save settings क्लिक करू.
05:59 पुन्हा एकदा Add field बटन क्लिक करा.
06:03 यावेळी Field type ड्रॉपडाउन मधे List (text) पर्याय निवडा.
06:09 Label field मधे Group Experience टाईप करू आणि पुन्हा Save and continue बटन क्लिक करू.
06:16 या Field type बद्दल लक्षात ठेवण्याची गोष्ट या मेसेज मधे दिलेली आहे.
06:23 These settings impact the way the data is stored in the database and cannot be changed once data has been created.
06:32 नियोजनावर भर देण्याचे हेच एक कारण आहे.
06:37 येथे आपल्या व्हॅल्यूज लिहा -Beginner, Intermediate, Advanced, आणि Expert
06:44 आपला User Group सोप्या पध्दतीने एकापेक्षा अधिक व्हॅल्यूज त्यांना लागू करू शकतो.
06:51 Allowed number of values मधे Limited च्या ऐवजी Unlimited करा आणि पुन्हा Save field settings क्लिक करा.
07:01 आता Save settings क्लिक करा.
07:04 येथे आपल्याकडे समाविष्ट करण्यास आणखी एक फिल्ड आहे जे Entity reference field आहे.
07:10 आता आपण Entity Reference म्हणजे काय आणि ते कसे बनवायचे हे पाहू.
07:17 आपल्या वेबसाइट मधे आपण एक काम करू इच्छितो की इवेंटस User Groups द्वारे प्रायोजित होतील आणि User Groups, इवेंटसना प्रायोजित करू शकेल.
07:28 वेबसाईटमधे हे सर्रास केले जाते जेथे एकाच वेळी दोन वेगवेगळी कंटेंटस लिंक करायची असतात.
07:35 इवेंटस User Groups द्वारा प्रायोजित केल्या जातात. म्हणून आपण User Group ची माहिती प्रत्येक इवेंटसाठी उपलब्ध करू इच्छितो.
07:45 आता हे सेट करू. Add field क्लिक करू.
07:49 आपण डेटाबेसशी संबंधित व्यक्ती असल्यास या प्रकारास many to many relationship च्या रूपात बघू शकाल.
07:57 Add a new field ड्रॉपडाउन वर क्लिक करा. यावेळी Reference च्या खालील Content निवडा.
08:04 Label फिल्ड मधे Events Sponsored टाईप करू आणि पुन्हा Save and continue क्लिक करू.
08:12 पुन्हा आपल्याला Type of item to reference निवडण्यास सांगेल.
08:17 आपल्याला येथे खूप सारे पर्याय दिसतील.
08:21 आपण हे खूप सोपे ठेवू- Content निवडा.
08:26 Allowed number of values मधे Unlimited पर्याय निवडा.
08:31 परत Save field settings क्लिक करा.
08:34 येथे Settings पेजवर User Groups द्वारा रेफरन्स केले गेलेले Content types आपण निवडू शकतो.
08:42 आपण Events Content type ला रेफरन्स करत आहोत.
08:46 येथे जेव्हा आपण एक इवेंट समाविष्ट करत असू त्यावेळी Events title टाईप करायला सुरूवात केल्यावर इवेंट्सची नावे दिसू लागतील.
08:55 अशाप्रकारे आपण योग्य Content Type निवडला असल्याची येथे खात्री करायची आहे.
09:01 Events निवडा आणि Save settings क्लिक करा.
09:05 आता आपल्याला Events Content type मधेही असेच करायचे आहे.
09:10 Structure क्लिक करा. पुन्हा Content types क्लिक करा.
09:16 परत Events Content type साठी Manage fields निवडा.
09:21 आणखी एक field समाविष्ट करा. Add a new field ड्रॉपडाउन मधील Content निवडा.
09:28 Label फिल्ड मधे टाईप करा Event Sponsors
09:32 Save and continue क्लिक करा.
09:34 Allowed number of values बदला. येथे Unlimited पर्याय निवडा.
09:39 कारण एकाहून अधिक User Group एखादी इवेंट प्रायोजित करू शकते. आता Save field settings क्लिक करा.
09:48 यावेळी REFERENCE TYPE खाली User groups निवडा.
09:53 याचे कारण की आपण Events Sponsors फिल्ड साठी User Groups ला रेफरन्स देत आहोत.
09:59 Save settings क्लिक करा.
10:01 आता हे या दोन Content Types ना many to many relationship पध्दतीने लिंक करते.
10:08 हे events आणखी किती User Group द्वारा प्रायोजित केले जातात यावर आधारित आहे.
10:16 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
10:22 या पाठात आपण User Group Content type बनवणे
10:28 User Group फिल्ड्स समाविष्ट करणे आणि Content types ना Entity reference ला कनेक्ट करण्यास शिकलो.
10:40 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्या आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:51 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:58 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:21 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana