Digital-Divide/D0/First-Aid-on-Snake-Bite/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:29, 9 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: First-Aid-on-Snake-Bite

Author: Manali Ranade

Keywords: Digital-Divide


Time Narration
00:01 गावातील मैदानात खेळणा-या मुलांचे द्रुश्य तुमच्यापैकी बहुतेकांना परिचित असेलच.
00:09 चेंडूच्या मागे धावणारा हा मुलगा पहा.
00:12 तो जवळच्या दाट झुडुपात शिरला.
00:16 त्याला एक साप दिसला.
00:18 क्षणात तो साप बिळातून सरपटत पुढे आला.
00:21 सापाने निघून जावे यासाठी घाबरलेल्या मुलाने त्यावर दगड भिरकवला.
00:26 साप मागे फिरला नाही.
00:29 त्याऐवजी त्याने मुलाच्या पायाला दंश केला.
00:34 मुलगा मदतीसाठी किंचाळला.
00:36 त्याचे मित्र मदतीसाठी त्याच्या दिशेने धावले.
00:39 त्यांना त्याच्या पायावर दोन लाल खुणा दिसल्या.
00:42 त्यांनी मुलाला झाडीतून बाहेर आणले.
00:45 आणि एकच धांदल उडाली.
00:47 सर्व मुले प्राथमिक उपचाराबद्दल वेगवेगळी मते देऊ लागली.
00:52 आता सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचारांचे महत्त्व जाणून घेऊ.
00:57 First Aid on Snake Bites वरील ट्युटोरियलमधे स्वागत.
01:02 ह्यात आपण पाहू.
01:04 * प्राथमिक उपचाराचे महत्त्व आणि
01:07 * सर्पदंश झाल्यास योग्य प्राथमिक उपचार कसे द्यायचे?
01:11 प्राथमिक उपचारांबद्ल जाणून घेण्यापूर्वी,
01:15 मित्राचे प्राण वाचवण्यासाठी इतरांनी काय केले ते पाहू.
01:20 त्यांनी मुलाला जमिनीवर झोपवले.
01:22 त्याला हॉस्पिटलमधे नेण्यासाठी मोठ्यांची मदत घेतली.
01:28 नंतर त्यांनी जखमेच्या वरती कापड गुंडाळले.
01:32 हा योग्य प्राथमिक उपचार आहे का?
01:35 हो! एका परीने ही योग्य पध्दत आहे.
01:39 ह्या बाबतीत हॉस्पिटल फार लांब नव्हते.
01:42 त्यामुळे मुलाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.
01:46 सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचाराची योग्य पध्दत म्हणजे,
01:51 त्या व्यक्तीला सपाट पृष्ठभागावर झोपवा.
01:55 जखम झालेल्या भागावर कापड गुंडाळा.
01:59 विष शरीरात पसरू नये हा ह्या प्रथमोपचाराचा प्राथमिक उद्देश आहे.
02:07 जखमेवर कापड गुंडाळण्याची योग्य पध्दत काय?
02:10 पायाच्या वरच्या भागापासून खाली येत कापड गुंडाळा.
02:15 पुढील उपचारांसाठी त्या व्यक्तीला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमधे हलवा.
02:20 वेळेत प्रथमोपचार दिल्यास अनेक धोके टळू शकतात.
02:26 लक्षात ठेवा चुकीच्या प्रथमोपचारांमुळे त्या व्यक्तीची स्थिती वाईट होऊ शकते.
02:32 सर्पदंश झाल्यास हे करावे,
02:34 - प्रथम त्या व्यक्तीला आडवे झोपवा.
02:37 - कापड गुंडाळत असताना थोडा दाब द्या.
02:41 सर्पदंश झाल्यावर हे करू नये.
02:44 - दंश झालेल्या भागाची त्वचा किंवा मांस कापू नका.
02:49 - दंश झालेल्या भागावर किंवा त्याच्या भोवती बर्फ लावू नका.
02:52 - त्या व्यक्तीला विजेचा झटका देऊ नका.
02:56 - दंश झालेल्या भागातून रक्त किंवा विष तोंडाने शोषण्याचा प्रयत्न करू नका.
03:01 - कापड खूप घट्ट बांधू नका. त्यामुळे गँग्रीन होण्याची शक्यता असते.
03:07 हा व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल च्या पुढाकाराने डिजिटल डिव्हाईड मधील अंतर दूर करण्याच्या संकल्पाचा एक भाग आहे.
03:13 प्रकल्पाची अधिक माहिती,
03:15 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
03:21 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
03:25 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
03:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
03:33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
03:37 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
03:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
03:48 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
03:54 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. Spoken-tutorial.org/NMEICT-Intro
04:01 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana