Digital-Divide/C2/Introduction-to-Gmail/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:54, 12 February 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of the tutorial: Introduction to Gmail Author: Manali Ranade Key words: Gmail, Google account, email account

Time
Narration
00:01 Introduction to Gmail वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत-
00:09 नवा गुगल अकाऊंट उघडणे
00:12 त्याच्या द्वारे gmail मधे लॉगिन करणे
00:16 इमेल लिहीणे
00:18 इमेल पाठवणे
00:20 इमेल बघणे
00:22 gmail मधून लॉग आउट करणे.
00:24 तसेच Inbox सारख्या महत्वाच्या मेलबॉक्सेस बद्दल जाणून घेऊ.
00:30 या पाठासाठी - चालू असलेले इंटरनेट कनेक्शन
00:35 आणि वेब ब्राऊजरची गरज आहे.
00:37 येथे फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरू.
00:42 नुकताच गुगलने सर्व गुगल प्रॉडक्टसाठी एक अकाऊंट प्रदान केला आहे. जसे की,
00:48 Gmail
00:49 YouTube
00:50 Google Play
00:51 Google Docs/Drive
00:53 Google Calendar आणि आणखी इतर.
00:57 म्हणजेच एकाच लॉगिनद्वारे यापैकी कोणतेही प्रॉडक्ट वापरता येते.
01:02 आता नवा गुगल अकाऊंट उघडण्यापासून सुरूवात करू.
01:06 वेब ब्राऊजर उघडा. येथे टाईप करा http colon slash slash gmail dot com (http://gmail.com)
01:16 ह्याद्वारे उजवीकडे वरती 2 पर्याय असलेले पान दाखवले जाईल.
01:22 Create an account आणि Sign in.
01:25 तुमच्या मशीनवरून हे पान प्रथमच उघडत असाल तर हे असे दिसेल.
01:32 जर हे पान तुमच्या मशीनवरून आधीही उघडले गेले असेल तर हे असे दिसेल.
01:39 येथे इमेल युजरनेम आणि पासवर्ड देण्यासाठी टेक्स्ट बॉक्सेस
01:46 तसेच Sign In चे बटण दिसेल.
01:50 त्याखाली Create an account अशी लिंक बघू शकतो.
01:55 Create an account ह्या लिंकवर क्लिक करा.


01:59 आपण google account उघडणा-या पानावर आहोत.
02:03 उजवीकडे फॉर्म दिसेल ज्यात अकाऊंटसंबंधी आणि व्यक्तिगत माहिती भरावी लागते.
02:11 आपले फर्स्ट आणि लास्ट नेम संबंधित टेक्स्ट बॉक्सेसमधे लिहू.
02:17 मी Rebecca Raymond असे माझे नाव देत आहे.
02:23 नंतर आपण आपले युजरनेम निवडू.
02:27 युजरनेम हे एकमेव असावे. तसेच अक्षरे किंवा अंक व अक्षरांनी मिळवून बनलेले असावे.
02:37 becky0808 हे युजरनेम देऊन बघू.
02:43 हे युजरनेम आधीच वापरले गेले असेल तर असा मेसेज मिळेल:
02:49 Someone already has that user name, Try another”.
02:54 तुम्ही दिलेल्या फर्स्ट आणि लास्ट नेमवरून गुगल काही युजरनेम्स आपल्याला सुचवते.
03:01 तुम्ही तुमच्या पसंतीचे युजरनेम देऊन त्याची उपलब्धता तपासू शकता.
03:07 मी ray.becky.0808 हे युजरनेम देत आहे.
03:18 आता हे युजरनेम उपलब्ध असल्याचे दाखवत आहे.
03:24 आपल्याला ह्या अकाउंटसाठी पासवर्ड बनवायचा आहे.
03:30 डावीकडे माहिती देणारा एक बॉक्स पासवर्ड किती मोठा असावा हे आपल्याला सांगतो.
03:36 तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा.
03:41 खात्री करण्यासाठी हा पासवर्ड पुन्हा टाईप करा.
03:44 आता पुढे Birthday आहे.
03:48 ड्रॉपडाऊनमधून महिना निवडा.
03:51 नंतर तारीख, वर्ष संबंधित टेक्स्टबॉक्सेसमधे टाईप करा.
03:57 आता तुमचे जेन्डर निवडा.
04:00 मी Female निवडत आहे.
04:03 पुढील फिल्ड Mobile phone असे आहे.
04:06 आत्ता हे सोडून देऊ.
04:08 ह्यानंतर आपला करंट इमेल ऍड्रेस विचारणारा टेक्स्ट बॉक्स आहे.
04:14 तुम्ही आत्ता बनवत असलेल्या ऍड्रेस शिवाय पर्यायी इमेल ऍड्रेस असल्यास तो येथे टाईप करा.
04:21 नसल्यास हा भाग रिकामा ठेवा.
04:23 आता उर्वरित माहिती भरू.
04:26 पुढील “Prove you're not a robot” ह्या भागात व्हेरिफिकेशनच्या 2 पाय-या आहेत.
04:32 Phone verification आणि
04:34 Puzzle verification
04:36 ह्या दोन पर्यायांपेकी एक पर्याय वापरून पुढे जाऊ शकतो.
04:40 मी पझल व्हेरिफिकेशन वापरत आहे.
04:43 इमेज मधे दाखवलेले टेक्स्ट किंवा नंबर Type the text ह्या टेक्स्ट बॉक्समधे टाईप करा.
04:49 Location च्या ड्रॉप डाऊनमधे डिफॉल्ट रूपात तुम्ही स्थायिक असलेला देश दाखवला जाईल.
04:55 मी भारतात स्थायिक असल्याने माझ्या Location च्या ड्रॉप डाऊनमधे India दिसत आहे.
05:02 शेवटी I Agree to the Google Terms and Privacy Policy हा चेक बॉक्स सिलेक्ट करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
05:10 एकदा फॉर्ममधील सर्व माहिती भरून झाली की Next Step बटणावर क्लिक करा.
05:17 आत्ता आपण असे करणार नाही.
05:20 Phone Verification” निवडल्यास काय होते ते पाहू.
05:25 Skip this verification (Phone Verification may be required)” या चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:32 India (भारत) हे लोकेशन निवडा.
05:35 नंतर I Agree to the Google Terms and Privacy Policy या चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:41 शेवटी Next Step वर क्लिक करा.
05:45 हे Phone verification ह्या पानावर घेऊन जाईल.
05:50 ड्रॉप डाऊनमधून देशाचा झेंडा निवडा. मी India निवडत आहे.
05:55 दिलेल्या टेक्स्ट बॉक्समधे तुमचा मोबाईल नंबर लिहा.
06:00 Text message (SMS) हा पर्याय निवडा. सामान्यतः डिफॉल्ट रूपात हे सिलेक्ट केलेले असते.
06:07 नंतर Continue बटणावर क्लिक करा.
06:10 तुमच्या फोनवर SMS मिळेल.
06:13 आता हे तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या पुढील भागात घेऊन जाईल.
06:17 गुगलकडून SMS द्वारे मिळालेला व्हेरिफिकेशन कोड, दिलेल्या टेक्स्ट बॉक्समधे टाईप करा.
06:24 Continue वर क्लिक करा.
06:27 आपण Create your public Google+ profile ह्या पानावर आहोत.
06:32 येथे तुमचे नाव दिसेल.
06:35 त्याच्याखाली “Add a photo” असा पर्याय आहे.
06:39 Google profile साठी फोटो समाविष्ट करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता.
06:44 तसेच येथे “Create your profile” नावाचेही बटण आहे.
06:48 आपण आत्ता त्याबद्दल जाणून घेणार नाही.
06:51 त्याऐवजी इमेल अकाऊंटवर जाण्यासाठी No Thanks बटणावर क्लिक करा.
06:58 आपण welcome page वर आहोत.
07:02 मला “ Welcome, Rebecca” असे दिसत आहे.
07:06 ray.becky.0808@gmail.com हा माझा नवा इमेल ऍड्रेसही दाखवत आहे.
07:16 आता Continue to Gmail बटणावर क्लिक करा.
07:22 तुमचा इमेल अकाऊंट उघडू लागेल.
07:24 इंटरनेटच्या गतीनुसार ह्याला थोडा वेळही लागू शकतो.
07:28 तुमचे इंटरनेट स्लो असल्यास Load basic HTML वर क्लिक करू शकता.
07:33 हा पर्याय उजवीकडे खाली उपलब्ध आहे.
07:37 यात कुठल्याही ग्राफिकल दृश्यांशिवाय gmail उघडेल.
07:41 काही माहिती देणारे बॉक्सेस स्क्रीनवर pop-up होतील.
07:46 ते वाचा किंवा Next बटणावर क्लिक करून अधिक जाणून घ्या. नंतर ते बंद करा.
07:53 हा gmail अकाऊंटचा डिफॉल्ट किंवा स्टँर्डड व्ह्यू आहे.
07:58 मधला भाग डिस्प्ले एरिया आहे जिथे आपण सर्व मेल्स बघू शकतो.
08:04 येथे एकूण तीन टॅब्ज आहेत. पुढील पाठांत याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
08:12 डावीकडे विशिष्ट लेबल असलेले काही मेनू आयटम आहेत.
08:16 Inbox, Starred, Sent Mail, Drafts, आणि More हे Gmail चे काही प्रमुख मेलबॉक्सेस आहेत.
08:29 डिफॉल्ट रूपात Inbox सिलेक्ट केलेले असते आणि त्यातील घटक डिस्प्ले एरियामधे दाखवले जातात.
08:36 Inbox च्या पुढे कंसात 3 हा आकडा दिसत आहे.
08:41 हे तुम्हाला आलेल्या नव्या मेल्सचा आकडा दाखवते.
08:46 जेव्हा आपण नवे गुगल अकाऊंट बनवतो तेव्हा Gmail Team कडून काही मेल्स येतात.
08:52 Gmail च्या सुविधांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही ते वाचू शकता.
08:58 आता इमेल कसा लिहायचा ते पाहू.
09:02 डाव्या बाजूच्या COMPOSE बटणावर क्लिक करा.
09:06 New Message नावाची विंडो उघडेल.
09:10 ह्यात चार भाग असतात.
09:13 To – येथे ज्या व्यक्तीला इमेल पाठवायचा आहे तिचा इमेल ऍड्रेस टाईप करतात.


09:21 येथे आपण आत्ताच बनवलेला ray.becky.0808@gmail.com हा इमेल आयडी टाईप करू.
09:35 ह्याचाच अर्थ मी स्वतःलाच मेल पाठवत आहे.
09:39 पुढील भाग म्हणजे Subject.
09:42 मेलसंबंधीचा विषय संक्षिप्त रूपात येथे टाईप करू शकतो.
09:46 Welcome mail” असे टाईप करू.
09:50 पुढील भाग म्हणजे content area.
09:53 जो मेसेज पाठवायचा आहे तो येथे लिहीला जातो.
09:57 Greetings to all from the Spoken Tutorial Project” असे टाईप करा.
10:03 शेवटच्या भागात Send हे निळे बटण आहे.
10:08 इमेल पाठवण्यासाठी त्यावर क्लिक करा.
10:11 Inbox मधे मेल्सची संख्या आता 4 झाली आहे.
10:16 एखादा विशिष्ट मेल वाचण्यासाठी केवळ त्यावर क्लिक करा.
10:20 हा मी स्वतःलाच पाठवलेला मेल आहे.
10:23 आता तो पाहू.
10:26 Show Details च्या ऍरोवर क्लिक करा.
10:29 येथे ज्याने इमेल पाठवला आणि ज्याला पाठवला त्यांचे इमेल ऍड्रेसेस आहेत.
10:34 येथे इमेल पाठवला ती तारीख व वेळ दाखवत आहे.
10:39 येथे इमेलचा विषय दाखवत आहे.
10:43 आणि येथे हा इमेलचा मुख्य भाग.
10:47 आता इनबॉक्समधील न वाचलेल्या इमेल्सची संख्या 3 आहे.
10:54 आता Gmail मधून साईन आऊट कसे करायचे ते पाहू.
10:58 उजवीकडे वरती तुमचा email-id दिसेल.
11:03 अकाऊंट बनवताना तुम्ही फोटो अपलोड केलेला असेल तर येथे तो दिसेल.
11:08 त्यावर क्लिक करा.
11:10 येथे Sign Out चे बटण आहे. साईन आऊट करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
11:17 तुम्ही Gmail मधून साईन आऊट होण्यात यशस्वी झाला आहात.
11:21 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:25 आपण शिकलो ते थोडक्यात,
11:28 नवे गुगल अकाऊंट उघडणे
11:31 त्याच्या द्वारे gmail मधे लॉगिन करणे
11:34 इमेल लिहीणे
11:36 इमेल पाठवणे
11:37 इमेल बघणे
11:39 gmail मधून लॉग आउट करणे.


11:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टची माहिती देणारा व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:45 तो डाउनलोड करून पहा.
11:49 स्पोकन ट्युटोरियल टीम कार्यशाळा घेते आणि online परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
11:55 अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
11:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे.


12:05 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:10 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले आहे.
12:12 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana