C-and-C++/C4/Understanding-Pointers/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:51, 27 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration


00.01 C आणि C++ मधील Pointers वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.08 Pointers.
00.10 Pointers तयार करणे.
00.12 आणि Pointers वर कार्ये करणे.
00.14 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00.18 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10
00.25 आणि उबुंटु वर gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00.31 pointers च्या परिचया सह प्रारंभ करूया.


00.34 Pointers, memory मध्ये स्थाने सूचीत करते.
00.38 Pointers, memory address संचित करते.
00.41 हे अड्रेस वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते.
00.45 आता pointers वरील काही उदाहरणे पाहु.
00.48 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, pointers_demo.c आहे.
00.54 चला कोड पाहु.
00.56 ही stdio.h अशी आपली हेडर फाइल आहे.
01.00 हे main फंक्शन आहे.
01.03 येथे आपल्याकडे long integer num आहे, नियुक्त केलेल्या वॅल्यू 10 सह.
01.09 नंतर आपण पॉइण्टर ptr घोषित केला आहे.
01.12 एस्ट्रिक्स (*) चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते.
01.16 हा पॉइण्टर टाइप long int सूचीत करू शकतो.
01.20 printf statement मध्ये वेरीयेबल चा memory address प्राप्त करण्यासाठी ampersand चा वापर केला जातो.
01.28 म्हणून ampersand num, num चा memory address देईल.
01.33 हे स्टेट्मेंट वेरियेबल num चा अॅड्रेस प्रिंट करेल.
01.37 येथे ptr, num चा address संचित करतो.
01.41 हे स्टेट्मेंट ptr चा अॅड्रेस प्रिंट करेल.
01.45 Sizeof फंक्शन ptr ची साइज़ देईल.
01.49 हे ptr ची वॅल्यू देईल.
01.51 म्हणजेच num चा memory address.
01.54 आणि इथे एस्ट्रिक्स ptr अड्रेस वर वॅल्यू देईल .
01.59 त्यामुळे एस्ट्रिक्स memory address देणार नाही.
02.03 त्याऐवजी तो वॅल्यू देईल.
02.06 %ld हा long int साठी format specifier आहे.
02.10 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02.13 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02.21 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space pointers underscore demo dot c space hyphen o space point
02.32 Enter दाबा.
02.34 टाइप करा, dot slash point. Enter दाबा.
02.39 आउटपुट दर्शविले जाईल,
02.42 आपण पाहतो की, num address आणि ptr वॅल्यू समान आहे.
02.48 या उलट num चा memory address आणि ptr भिन्न आहे.
02.53 त्यानंतर पॉईन्टरची साइज़ 8 bytes आहे.
02.57 तसेच ptr द्वारे सूचीत केलेली वॅल्यू 10 आहे, जी num ला नियुक्त केली होती.
03.03 आता समान प्रोग्राम C++ मध्ये पाहु.
03.07 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव pointer underscore demo.cpp आहे.
03.13 येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून iostream.
03.19 नंतर आपण std namespace वापरत आहोत.
03.23 आणि आपल्याकडे printf function च्या जागी cout function आहे.
03.28 उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत.
03.30 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
03.34 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space pointers_demo.cpp space hyphen o space point1, Enter दाबा.
03.50 टाइप करा, dot slash point1, Enter दाबा.
03.55 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C प्रोग्राम च्या समान आहे.
04.00 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
04.03 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
04.05 संक्षिप्त रूपात,
04.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
04.08 pointer बदद्ल.
04.10 pointer तयार करणे.
04.12 आणि Pointers वर कार्ये करणे.
04.14 असाइनमेंट, वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी,
04.18 C आणि C++ प्रोग्राम लिहा.
04.21 पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा.
04.24 आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा.
04.27 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
04.30 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04.33 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04.37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
04.39 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04.43 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04.47 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
04.53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04.58 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05.06 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05.10 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05.14 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble