C-and-C++/C2/First-C++-Program/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:00, 20 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: First-C++-Program

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00:01 C++ program च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत.
00:10 C++ मध्ये program लिहिणे.
00:12 तो compile करणे.
00:14 व execute करणे.
00:16 आपण common errors आणि त्यावरील solutions सुध्दा बघू.
00:21 Ubuntu operating system 11.10 आणि G++ Compiler चे version 4.5.2 वापरू.
00:34 ट्युटोरियलच्या सरावासाठी
00:36 तुम्हाला Ubuntu OS आणि Editor ची माहिती असणे आवश्यक आहे.
00:42 vim आणि gedit हे एडिटर्स आहेत.
00:46 येथे आपणgedit वापरू.
00:49 संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या website वर बघू शकता.
00:54 उदाहरणाच्या सहाय्याने C++ program कसा लिहायचा ते पाहू.
00:59 Ctrl, Alt आणि T बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
01:08 text editor उघडण्यासाठी prompt वर लिहा.
01:12 gedit space talk dot cpp space ampersand "&".
01:20 ampersand (&), promptला मुक्त करण्यास वापरतात.
01:24 C++ files चे extension .cpp असे असते.
01:30 एंटर दाबा.
01:32 टेक्स्ट एडिटर उघडेल.
01:35 प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा.
01:38 double slash “//” space टाईप करा,
01:41 My first C++ program
01:44 ओळीस कमेंट देण्यास, double slash वापरतात.
01:49 प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो.
01:53 हे documentation साठी उपयोगी पडते.
01:55 त्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात.
01:58 double slash ला single line comment म्हणतात. एंटर दाबा.
02:04 hash “#include” space opening angle bracket , closing angle bracket टाईप करा.
02:13 प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे.
02:20 कंसात iostream असे टाईप करा.
02:24 iostream ही header file आहे.
02:28 ह्या फाईलमध्ये C++ मधील standard input output फंक्शन्स स्पष्ट केलेली असतात. एंटर दाबा.
02:36 टाईप करा. using space namespace space std semicolon ";".
02:48 using statement, compilerला सांगते की आपण std namespace वापरणार आहोत.
02:54 namespace मुळे समान नावांचा संभ्रम टाळता येतो.
02:58 identifiers च्या नावांचे स्थानिकीकरण केले जाते.
03:02 त्यांचे प्रभाव क्षेत्र ठरवून घोषित केले जाते.
03:05 namespace मध्ये define केलेल्या सर्व गोष्टींचा SCOPE namespace ने निश्चित होतो.
03:11 येथे stdही namespaceअसून त्यात संपूर्ण standard C++ library घोषित आहे. एंटर दाबा.
03:20 टाईप करा. int space main opening bracket "(" closing bracket ")".
03:28 main हे विशिष्ट function आहे.
03:31 प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो.
03:36 opening bracket आणि closing bracket ला parenthesis म्हणतात.
03:41 main पुढे Parenthesis असणे म्हणजे main हे function असल्याचे दाखवते.
03:48 Int main function कुठेलही argument घेत नाही. हे integer टाईपची व्हॅल्यू परत देते.
03:55 data types आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू.
04:00 main function बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडस बघू.
04:06 program मध्ये main function आवश्यक असते.
04:09 पण एकापेक्षा अधिक main function चालत नाहीत.
04:13 नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात compiler ला सापडणार नाही.
04:17 कंसाची रिकामी जोडी main function मधे argument नसल्याचे दाखवते.
04:23 arguments बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू. program मध्ये जाऊ. एंटर दाबा.
04:34 opening curly brace “{” टाईप करा.
04:37 opening curly bracket main function ची सुरूवात दाखवते.
04:42 closing curly bracket “}” टाईप करा.
04:45 closing curly bracket main function संपल्याचे दाखवते.
04:50 आता ह्या कंसांमध्ये दोन वेळा एंटर दाबा.
04:54 नंतर कर्सर एक ओळ वर न्या.
04:57 Indentation मुळे code सहज वाचता येतो.
05:00 errors ही पटकन सापडतात.
05:03 येथे एक स्पेस द्या.
05:06 टाईप करा. cout space दोन opening angle bracket '
05:13 cout हे टर्मिनलवर output print करणारे C++ चे standard फंक्शन आहे.
05:20 कंसानंतर double quotes मध्ये लिहा.
05:26 cout functions मधील double quotesमधे असलेले काहीही प्रिंट केले जाते. आता quote मधे "Talk to a teacher backslash \n" टाईप करा.
05:39 Backslash n “\n” म्हणजे नवी ओळ.
05:43 cout function कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल.
05:50 C ++ statement हे semicolon “;” ने संपविणे आवश्यक आहे.
05:54 ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा.
05:57 Semicolon स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो. एंटर दाबा.
06:03 return” space “0” आणि semicolon;” टाईप करा.
06:10 ही ओळ integer zero देईल.
06:14 या फंक्शन साठी integer व्हॅल्यू परत केली आहे
06:17 कारण ह्या function चा टाईप int आहे.
06:21 फंक्शनमधील return statement, कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते.
06:26 returned values संबंधी दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू.
06:31 फाईल "Save" करा.
06:36 सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
06:39 वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते.
06:42 प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते.
06:47 प्रोग्रॅम compile करू.
06:50 त्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06:53 g++ space talk.cpp space hyphen -o space output, टाइप करा.
07:05 C++ programs compile करण्यासाठी g++ compiler वापरतात.
07:12 talk.cpp हे फाईलचे नाव आहे.
07:16 -o output म्हणजे कार्यान्वित झालेले आऊटपुट ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे. एंटर दाबा.
07:25 प्रोग्रॅम compile झालेला दिसेल.
07:27 ls -lrt, टाईप केल्यावर सर्वात शेवटी output ही फाईल तयार झालेली दिसेल.
07:37 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी dot slash "./" output टाईप करा.
07:43 एंटर दाबा.
07:46 Talk To a Teacher” हे आऊटपुट दिसेल.
07:50 common errors पाहू.
07:54 त्यासाठी एडिटरवर जाऊ.
07:57 समजा closing curly bracket { देण्यास विसरलो आहोत.
08:01 हे सेव्ह करा.
08:04 execute करण्यासाठी टर्मिनलवर जा.
08:08 पूर्वी वापरलेल्या कमांडसच्या सहाय्याने compile आणि execute करा.
08:15 talk.cpp ह्या फाईलच्या सातव्या ओळीवर एरर मिळाली आहे.
08:22 Expected curly bracket at the end of input.
08:28 टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ.
08:31 closing curly bracket हे मेन फंक्शनच्या शेवटी दिले आहे.
08:36 ते पुन्हा टाईप करून सेव्ह करा.
08:41 कार्यान्वित करा.
08:44 up arrow key दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो.
08:49 ते आता मी केले आहे.
08:56 आणखी एक error पाहू.
08:59 टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ.
09:02 समजा std टाईप केले नाही. सेव्ह करा.
09:08 टर्मिनलवर जाऊन compileकरा
09:13 talk.cpp च्या तिस-या व सहाव्या ओळीवर एरर मिळाली आहे.
09:21 expected identifier before semicolon and cout was not declared in this scope.
09:30 cout हे standard C++ library function आहे.
09:33 संपूर्णC++ library function हे std namespace खाली घोषित असते.
09:39 म्हणून एरर मिळाली आहे.
09:42 एरर दुरूस्त करू.
09:44 Text editor वर जाऊन तिस-या ओळीवर std टाईप करू.
09:50 सेव्ह करा.
09:52 compileकरा. हे कार्य करत आहे. पुन्हा स्लाईडसवर जाऊ.
10:02 Assignment
10:04 तुमचे आणि शहराचे नाव प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा.
10:07 ह्यात single line comment वापरले आहेत.
10:10 आता multiline comment देण्याचा प्रयत्न करा.
10:14 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:17 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:22 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:26 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:28 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:31 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:35 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:43 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:47 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:58 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
11:01 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana