Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:29, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search


Visual Cue Narration
00.04 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.08 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00.15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00.28 हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00.35 प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल काय आहे?
00.42 प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू.
00.52 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00.57 जर नसेल तर आमचे अगोदर चे -ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन (Basic Description of the Blender Interface) हे ट्यूटोरियल पहा.
01.05 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे.
01.11 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे.
01.17 प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु.
01.21 प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा.
01.27 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01.37 आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो.
01.42 ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01.51 प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे scene पॅनल आहे.
02.02 Camera हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो.
02.08 Units- scene मध्ये, ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते.
02.14 ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे.
02.20 डिफॉल्ट द्वारे, Units - none आणि degrees मध्ये सेट आहे.
02.26 Metric वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या scene मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील.
02.35 Gravity कडे पहा.
02.38 लक्ष द्या gravity चे यूनिट्स xyz metres per second square मध्ये बदलले आहेत.
02.46 जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये Physics वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस Gravity चा उपयोग होतो.
02.52 आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
02.56 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
03.03 हे World panelआहे. येथे आपण ब्लेंडर ची वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो.
03.12 Blend Sky वर लेफ्ट-क्लिक करा प्रीव्यू gradient colour मध्ये बदलला आहे.
03.21 परंतु 3D व्यू तसाच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल?
03.30 सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
03.36 आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो.
03.40 Render Display बंद करा.
03.46 Zenith colour वर लेफ्ट-क्लिक करा. menu वरुन रंग निवडा. मी पांढरा निवडते.
03.58 आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर झाले आहे.
04.03 World panel मधील इतर सेटिंग्स - Ambient Occlusion, environment lighting, Indirect lighting, Gather, Mist, Stars आहेत.
04.21 ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे, जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
04.29 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
04.37 हे Object Panel आहे. येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत.
04.45 डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत.
04.54 Transform सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन, रोटेशन आणि स्केल निर्धारित करते.
05.04 लोकेशन च्या खाली X 0 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि एंटर दाबा
05.14 क्यूब x अक्षावर 1 unit ने पुढे जाते.
05.20 अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव, रोटेट आणि प्रमाणा साठी, Object पॅनल चा वापर करू शकतो.
05.28 ब्लेंडर मध्ये keyframes एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे.
05.35 3D व्यू मध्ये Camera वर राइट-क्लिक करा.
05.40 Object पॅनल मध्ये Transform च्या खाली असलेले location, rotation आणि scale यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या.
05.50 हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत.
05.55 पुढील सेट्टिंग्स Relations आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी layer आणि parent उल्लेख करू शकतो.
06.07 Layers खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा. कॅमरा आता दडलेला आहे.
06.13 प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे. जो पर्यंत लेयर दडलेले आहे, कॅमरा सुद्धा दडलेला राहील.
06.23 3D व्यू च्या खाली डाव्या कोपर्‍यात View वर जा. मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
06.32 show all layers निवडा. व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो.
06.42 एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना Layers अतिशय उपयुक्त आहे.
06.50 Object पॅनल मध्ये Relations च्या खाली Parent वर लेफ्ट क्लिक करा.
06.55 Parent हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे, सर्व 3D एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते.
07.03 याचा वापर आपण Blender Animation ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू.
07.10 cube निवडा.
07.13 कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे.
07.16 क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे. आता याचा अर्थ काय हे पाहु.
07.24 3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
07.28 निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा, माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा.
07.36 कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो.
07.44 क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
07.51 3D व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट-क्लिक करा. आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये Parent वर जा.
08.02 Parent वर लेफ्ट-क्लिक करा. कीबोर्ड वरील Backspace आणि enter दाबा.
08.11 आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही.
08.15 हे 3D व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे. क्यूब ही नवीन स्थानावर असते.
08.22 याचा अर्थ, पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही.
08.29 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण, Properties window खालील, scene panel, world panel आणि Object panel या बद्दल शिकलो.
08.39 उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ.
08.45 आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा. scene units ला Metric मध्ये बदला.
08.52 world colour ला Blend sky लाल आणि काळ्या रंगात बदला.
08.58 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09.08 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09. स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09.30 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.33 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09.38 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09.45 आमच्या सह जुडण्यासाठी
09.47 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana