Blender/C2/How-to-Change-Window-types-in-Blender/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:49, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: How To Change Window Types in Blender

Author: Bhanu Prakash, Monisha Banerjee

Keywords: 3D view, toggle, split, merge

Reviewers: Namita Lobo, Leena Mulye

Visual Cue
Narration
00:03 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मध्ये विंडो चे प्रकार कसे बदलायचे या बद्दल आहे.
00:16 या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:26 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, ब्लेंडर इंटरफेस मधील कोणत्याही विण्डोचा आकार बदलणे,
00:36 विविध विंडोच्या मध्ये टॉगल करणे,
00:40 विंडोस चे विभाजन करणे आणि पुन्हा त्याना एकत्र सम्मिलित करणे,
00:46 आणि कोणत्याही विंडो ला फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ करणे शिकू.
00:55 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस चे मुलतत्वे माहीत आहेत.
01:01 जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल पहा.
01:05 ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन.
01:10 आपण ब्लेंडर इंटरफेस मधील उपस्तित असलेले विविध प्रकारचे विंडो अगोदर पाहिलेले आहेत.
01:17 या विंडो चा आकार बदलला जाऊ शकतो.
01:21 माउस चे कर्सर आउटलाइनर विंडो च्या डाव्या किनार वर घ्या.
01:28 आपल्याला दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेल.
01:32 आता लेफ्ट-क्लिक करून माउस ड्रग करा.
01:37 जस-जसा माउस हलेल तसा आउटलाइनर विंडो चा आकार बदलतो.
01:45 आता, आउटलाइनर च्या तळ भागाच्या किनार वर माउस चे कर्सर घ्या.
01:51 पुन्हा आपल्याला दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेल.
01:55 लेफ्ट-क्लिक करून माउस ड्रग करा.
01:59 जस-जसा माउस हलेल तसा आउटलाइनर विंडो चा आकार बदलतो.
02:07 अशा प्रकारे आपण ब्लेंडर इंटरफेस मध्ये कोणत्याही विंडो चा आकार बदलू शकतो.
02:14 आता पाहुया की ब्लेंडर इंटरफेस च्या विविध विंडो मध्ये टॉगल कसे करायचे.
02:22 3D व्यू च्या डाव्या कोपऱ्यावर जा.
02:27 येथे,अप आणि डाउन एरो चे बटन आहे, जे सध्याचा संपादक प्रकार दर्शवित आहे.
02:35 बटना वर लेफ्ट-क्‍लिक करा.
02:38 विविध विंडो पर्याया सह एक मेन्यु उघडेल.
02:42 हा एडिटर टाइप मेन्यु आहे.
02:46 हा मेन्यु ब्लेंडर इंटरफेस मध्ये प्रत्येक विंडोच्या डाव्या कोपऱ्यावर उपस्थित आहे.
02:52 आणि हा विविध विंडोज मध्ये टॉगल होतो.
02:59 माउस ला मेन्यु पर्यायावर घ्या.
03:04 शॉर्टकट साठी, तुम्ही कीबोर्ड वरील अप आणि डाउन कीज चा वापर करू शकता.
03:12 UV/Image Editor वर लेफ्ट-क्‍लिक करा.
03:16 3D व्यू UV/Image editor मध्ये बदलतो.
03:25 editor typeमेन्यु वर पुन्हा लेफ्ट-क्लिक करा आणि 3Dव्यू निवडा.
03:31 आता आपण पुन्हा 3Dव्यू मध्ये आहोत.
03:36 या प्रमाणे तुम्ही एडिटर टाइप मेन्यु च्या उपयोगाने विविध विंडोज मध्ये टॉगल करू शकता.
03:47 डिफॉल्ट 3Dव्यू 4 भागामध्ये विभाजित आहे.
03:53 3Dव्यू ला विभाजित करण्याच्या दोन पद्धती आहेत.
03:57 पहिली पद्धत, editor type मेन्यु पुढे 3Dव्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यावर View वर लेफ्ट-क्लिक करा
04:07 सर्वात वर असलेला दुसरा पर्याय ‘Toggle Quad view’ निवडा.
04:13 शॉर्टकट साठी Ctrl, Alt आणि Q दाबा.
04:20 3D व्यू 4 विविध व्यूस मध्ये विभाजित आहे.
04:26 Top view, Front view, Right view आणि Camera view.
04:38 ब्लेंडर मध्ये मॉडेलिंग आणि एनीमेटिंग करताना हे तुम्हाला अधिक उपयोगी पडेल.
04:47 Quad व्यू अक्षम करण्यासाठी Ctrl, Alt आणि Q दाबा.
04:55 स्पेस बार दाबा आणि सर्च एरिया मध्ये ‘Toggle’ टाइप करा.
05:05 सूची मधून Toggle Quad view पर्याय निवडा.
05:12 ही Quad व्यू ला सक्षम बनविण्याची दुसरी पद्धत आहे.
05:18 Quad व्यू ला पुन्हा अक्षम करण्यासाठी Ctrl, Alt आणि Q दाबा.
05:27 आपण पुन्हा ब्लेंडर डिफॉल्ट Camera view वर आहोत.
05:33 ब्लेंडर इंटरफेस मध्ये डिफॉल्ट द्वारे उपस्थित असलेल्या पाच विविध विंडोज शिवाय,
05:39 तुम्ही ब्लेंडर इंटरफेस मध्ये क्षेत्र विभाजना द्वारे नवीन विंडोज ही add करू शकता.
05:46 पुन्हा हे करण्यासाठी दोन पद्धती आहेत.
05:50 मी आउटलाइनर विंडो मध्ये हे प्रदर्शित करून दाखविते.
05:55 माउस चे कर्सर आउट लाइनर विंडो च्या खाली डाव्या कोपऱ्यावर तिरप्या रेषेवर प्लस चिन्ह प्रदर्शित होईपर्यंत घेऊन जा.
06:07 लेफ्ट-क्लिक पकडा आणि उजवीकडे माउस ड्रॅग करा.
06:12 आउट लाइनर विंडो आता दोन नवीन पॅनल मध्ये विभाजित झाली आहे.
06:19 प्रत्येक नवीन पॅनल मध्ये त्यांचा स्वतः चा टूल्स चा सेट आहे.
06:26 दोन नवीन पॅनल पुन्हा एक सोबत विलीन (merge) करण्यासाठी, आपण समान पद्धत वापरु.
06:33 उजव्या पॅनल ला डाव्या पॅनल सोबत पुन्हा विलीन करण्याची आवश्यकता आहे.
06:39 माउस चे कर्सर आउट लाइनर विंडो च्या खाली डाव्या कोपर्यावर तिरप्या रेषेवर प्लस चिन्ह प्रदर्शित होईपर्यंत घेऊन जा.


06:50 लेफ्ट-क्लिक पकडा आणि माउस ला डाव्या पॅनल च्या दिशेने ड्रॅग करा.
06:56 पॅनल छायांकित झाला आहे आणि स्पष्ट एरो चिन्ह त्यावर दिसत आहे.
07:02 लेफ्ट-क्लिक सोडा.
07:05 दोन विंडो विलीन झाले आहेत.
07:10 आता विंडो क्षेत्र विभाजित करणारी दुसरी पद्धत पाहु.
07:15 अगोदर आपण आउटलाइनर विंडो चे आडवे विभाजन करू.
07:21 माउस चे कर्सर आउटलाइनर विंडो च्या डाव्या किनार जवळ, दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या.
07:29 एरो चिन्हा वर राइट-क्लिक करा.
07:33 ‘Split area’ वर लेफ्ट क्लिक करा.
07:37 माउस ला आउटलाइनर विंडो च्या मध्य भागी ड्रॅग करा.
07:43 आडवी रेष दुहेरी मस्तक असलेल्या एरो सह दिसेल.
07:48 स्थानास लॉक करण्यासाठी लेफ्ट-क्लिक करा.
07:54 आउटलाइनर विंडो दोन नवीन आडव्या पॅनल्स मध्ये विभाजित झाले आहे.
08:01 मागील प्रमाणे, जसे की प्रत्येक पॅनल ला स्वःताचे टूल्स चे सेट आहेत.
08:07 या प्रमाणे आता नवीन पॅनल्स ना पुन्हा एक सोबत विलीन करू.
08:14 माउस चे कर्सर दोन नवीन पॅनल्स च्या मध्ये आडव्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या.
08:26 राइट-क्लिक करा आणि Join area निवडा
08:31 कोणत्याही एका पॅनल वर माउस घ्या. वर किंवा खाली
08:35 मी खालील पॅनल निवडते.
08:40 निवडलेला पॅनल छायांकित झाला आहे आणि त्यावर एरो चे चिन्ह स्पष्ट दिसत आहे.
08:47 छायांकित पॅनल वर लेफ्ट-क्लिक करा.
08:50 दोन पॅनल पुन्हा एकत्र विलीन झाले आहेत .
08:54 आता आउट लाइनर विंडो ला उभे विभाजित करण्याचा आणि पुन्हा नवीन पॅनल्स एकत्र विलीन करण्याचा प्रयत्न करा.
09:03 माउस चे कर्सर आउट लाइनर विंडो च्या खालच्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या.
09:12 एरो चिन्हावर राइट-क्लिक करा
09:16 ‘Split area’ वर लेफ्ट-क्लिक करा.
09:21 माउस ला आउटलाइनर विंडो च्या मध्य भागी ड्रॅग करा.
09:26 उभी रेष दुहेरी मस्तक असलेल्या एरो सह दिसेल.
09:33 स्थानास लॉक करण्यासाठी लेफ्ट-क्लिक करा.
09:36 आउट लाइनर विंडो दोन नवीन उभ्या पॅनल्स मध्ये विभाजित झाले आहे.
09:45 माउस चे कर्सर दोन नवीन पॅनल्स च्या मध्ये उभ्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या.
09:55 राइट- क्लिक करा आणि Join area निवडा.
10:01 कोणत्याही एका पॅनल वर माउस घ्या - डावा किंवा उजवा.
10:05 मी उजवा पॅनल निवडते.
10:10 निवडलेला पॅनल छायांकि झाला आहे आणि त्यावर एरो चे चिन्ह स्पष्ट दिसत आहे.
10:16 छायांकित पॅनल वर लेफ्ट-क्लिक करा.
10:19 दोन पॅनल पुन्हा एकत्र विलीन झाले आहेत.
10:24 आता आपण, प्रॉपर्टीस विंडो मध्ये विविध पॅनल्स चे स्थान पुन्हा कसे व्यवस्तीत करायचे पाहुया.
10:32 उदाहरणार्थ, आपल्याला Layer पॅनल Render पॅनल च्या सर्वात वर हवे आहे.
10:40 लेयर पॅनल च्या वर उजव्या कोपऱ्यात तीन तिरप्या रेषेवर माउस कर्सर घ्या.
10:50 लेफ्ट क्लिक दाबून पकडून ठेवा आणि माउस ला वरच्या दिशेने ड्रॅग करा.
11:00 Layer पॅनल Render पॅनल च्या सर्वात वर स्थानांतरित होईल.
11:07 आता पाहुया की ब्लेंडर मध्ये कोणत्याही एका विशेष विंडो ला मॅक्सिमाइज़ कसे करायचे किंवा फुल्ल स्क्रीन मोड मध्ये स्थालांतर कसे करायचे.
11:20 कोणत्याही एका विंडो वर माउस चे कर्सर घ्या.
11:23 मी 3Dव्यू निवडत आहे.
11:28 कीबोर्ड वरील Ctrl आणि up एरो बटन दाबा.
11:33 3D व्यू आता फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ झाले आहे.
11:41 फुल्ल स्क्रीन मोड च्या बाहेर येण्यास कीबोर्ड वरील Ctrl आणि डाउन एरो की दाबा.
11:48 आपण पुन्हा बलेंडर डिफॉल्ट व्यू वर आलो आहोत.
11:51 हे कोणत्याही विंडो साठी केले जाऊ शकते.
11:59 अशा प्रकारे आपण ब्लेंडर मध्ये कोणत्याही विंडो चा आकार बदलणे, विविध विंडो मध्ये टॉगल करणे, विंडो चे विभाजन करून पुन्हा त्याना एकत्र करू शकतो.
12:11 आता नवीन फाइल तयार करा आणि 3D व्यू ला Quad view मध्ये टॉगल करण्याचा प्रयत्न करा.
12:19 आउट लाइनर विंडो चे विभाजन करा आणि नवीन पॅनल पुन्हा एकत्र विलीन करा.
12:27 प्रॉपर्टीस विंडो मध्ये, Output पॅनल ला Render पॅनल च्या सर्वात वर स्थानांतरित करा,
12:35 आणि 3D व्यू ला फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ करा.
12:44 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
12:52 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:57 oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
13:10 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
13:13 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:17 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
13:21 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:29 आमच्या सह जुडण्यासाठी
13:31 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble