BASH/C3/Basics-of-functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:51, 31 December 2014 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Basics-of-functions

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, functions

Visual Cue Narration
00.01 नमस्कार.

Basics of functions in Bash वरील पाठात आपले स्वागत.

00.08 या पाठात शिकणार आहोत,
00.11 * फंक्शनचे महत्व
00.13 * फंक्शन घोषित करणे
00.15 * फंक्शन कॉल करणे
00.17 * फंक्शनचा वर्क फ्लो
00.19 * हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00.22 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00.28 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.

http://www.spoken-tutorial.org

00.34 ह्या पाठासाठी आपण वापरू, उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00.40 आतापर्यंत आपण वापरत होतो GNU BASH वर्जन 4.1.10
00.46 आतापासून GNU BASH वर्जन 4.2 वापरू.
00.52 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00.58 आता फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे उपयोग जाणून घेऊ.
01.03 * फंक्शन म्हणजे कमांडसचा संग्रह किंवा अल्गोरिदम होय.
01.08 * ह्याचा उद्देश विशिष्ट काम करणे असा असतो.
01.12 * फंक्शन वापरून गुंतागुंतीचा मोठा प्रोग्रॅम छोट्या छोट्या कामांत विभागता येतो.
01.18 * ह्यामुळे स्क्रिप्टची वाचनीयता वाढते आणि ते वापरण्यात सहजता येते.
01.24 फंक्शन घोषित करण्यासाठी दोन सिंटॅक्स आहेत.
01.28 पहिला सिंटॅक्स.
01.29 function space function underscore name
01.32 महिरपी कंसात,
01.34 कार्यान्वित करण्याच्या कमांडस.
01.37 दुसरा सिंटॅक्स.
01.39 function underscore name open and close round brackets
01.42 महिरपी कंसात,
01.44 कार्यान्वित करण्याच्या कमांडस.
01.47 फंक्शन कॉल.
01.48 फंक्शन प्रोग्रॅममधे कुठूनही कॉल करता येते.
01.53 तुम्हाला जिथे फंक्शन कॉल करायचे आहे तिथे फंक्शनचे नाव टाईप करा.
01.58 काॅल करण्याचा सिंटॅक्स म्हणजे फंक्शनचे नावच असते.
02.02 आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
02.07 मी function.sh नावाच्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे.
02.12 ही shebang line आहे.
02.14 फंक्शन कीवर्डपुढे फंक्शनचे नाव लिहून फंक्शन घोषित केले आहे.
02.21 येथे machine हे फंक्शन नेम आहे.
02.26 महिरपी कंसातील घटकांना फंक्शनची व्याख्या म्हणतात.
02.32 आपण मशीनची विविध प्रकारची माहिती दाखवत आहोत.
02.36 uname हायफन a मशीनची माहिती देते.
02.41 w हायफन h सिस्टीमवर लॉगिन केलेल्या युजर्सची नावे देते.
02.46 uptime मशीन जेव्हापासून सुरू आहे ती वेळ देते.
02.51 free मेमरी स्टेटस देते.
02.54 df हायफन h फाईल सिस्टीमचे स्टेटस देते.
02.57 मुख्य प्रोग्रॅम येथे सुरू होतो.
03.01 आपण “Beginning of main program” हा मेसेज दाखवू.
03.06 येथे machine हे फंक्शन कॉल केले जाईल.
03.09 नंतर आपण “End of main program” हा मेसेज दाखवू.
03.13 हे कसे कार्य करते ते पाहू.
03.16 #bash interpreter ला फंक्शनची व्याख्या दिसल्यावर तो फंक्शन स्कॅन करतो.
03.23 # जेव्हा फंक्शनचे नाव स्क्रिप्टमधे येते त्यावेळीच फंक्शन कॉल केले जाते.
03.28 # जेव्हा interpreter फंक्शनचे नाव वाचेल तो फंक्शनची व्याख्या कार्यान्वित करेल.
03.36 interpreter फंक्शनचे नाव कमांड म्हणून हाताळतो.
03.41 लक्षात ठेवा की फंक्शन कॉल करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक असते.
03.47 टर्मिनलवर जा. फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी,
03.52 टाईप करा: chmod space plus x space function dot sh
03.59 एंटर दाबा.
04.01 टाईप करा dot slash function dot sh
04.05 एंटर दाबा.
04.07 आऊटपुट म्हणून टर्मिनलवर सिस्टीमची माहिती दाखवण्यात येईल.
04.14 लक्षात ठेवा की सिस्टीम नुसार आऊटपुट बदलेल.
04.19 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
04.22 स्लाईडसवर जाऊ.
04.24 थोडक्यात,
04.25 पाठात शिकलो,
04.28 * फंक्शनचे महत्व
04.30 * फंक्शन घोषित करणे
04.32 * फंक्शन कॉल करणे
04.33 * फंक्शनचा वर्क फ्लो
04.35 * हे उदाहरणांद्वारे समजून घेतले.
04.37 असाईनमेंट म्हणून,
04.38 दोन फंक्शन्स असलेला प्रोग्रॅम लिहा.
04.42 # पहिले फंक्शन diskspace चा वापर वाचता येण्यायोग्य स्वरूपात दाखवेल. (मदत: df हायफन h)
04.51 # दुसरे फंक्शन फाईल सिस्टीमचा वापर वाचता येण्यायोग्य स्वरूपात दाखवेल. (मदत: du हायफन h)
05.00 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
05.03 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05.07 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05.12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05.17 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05.21 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
05.29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05.33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05.41 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05.47 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
05.52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
05.56 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali