BASH/C2/Case-statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:51, 30 December 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Case Statement in BASH

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, case

Time Narration
00:01 नमस्कार. Case statement in Bash. वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात case स्टेटमेंटचे मह्त्व आणि उदाहरणासहित त्याचा सिंटॅक्स समजून घेऊ.
00:17 ह्या पाठासाठी, Shell स्क्रिप्टींगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:23 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:29 ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स 12.04 OS आणि GNU BASH वर्जन 4.1.10 वापरू.
00:39 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:47 Bash shell मधे दोन प्रकारची कंडिशनल स्टेटमेंटस असतात. if स्टेटमेंट आणि case स्टेटमेंट.
00:56 if-else स्टेटमेंटच्या जागी Case स्टेटमेंट वापरता येऊ शकते.
01:03 अनेक गोष्टींमधून निवड करायची असल्यास case स्टेटमेंटला पसंती दिली जाते.
01:09 सहसा स्क्रिप्टमधील मेनूज कार्यान्वित करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
01:14 आता सिंटॅक्स पाहू.
01:15 case space $(dollar)VARIABLE space in match_1 close round brackets space commands and semicolon twice
01:27 match_n close round bracket space commands and semicolon twice asterisk close round bracket space command_to_execute_by_default and semicolon twice esac
01:45 VARIABLE match_1बरोबर जुळवून बघितले जाईल.
01:48 ते न जुळल्यास, ते match_n ह्या पुढील केसवर जाईल.
01:54 VARIABLE दिलेल्या कुठल्याही एखाद्या स्ट्रिंगशी जुळतो का ते तपासले जाईल.
02:01 जुळल्यास डबल सेमीकोलन (;;) पर्यंत सर्व कमांड कार्यान्वित होतील.
02:07 VARIABLEकुठल्याच स्ट्रिंगशी न जुळल्यास asterisk सोबतच्या कमांड कार्यान्वित होतील.
02:14 ही डिफॉल्ट case कंडिशन आहे कारण asterisk सर्व स्ट्रिंगशी जुळतो.
02:21 esac हे case ब्लॉक पूर्ण झाल्याचे दाखवते.
02:26 case स्टेटमेंट उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
02:32 मी case.sh फाईलमधे प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. तो उघडू.
02:38 उपलब्ध डिस्क स्पेस विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर तशी सूचना देणारा मेसेज हा प्रोग्रॅम प्रिंट करेल.
02:45 ही shebang lineआहे.
02:47 CentOS, RedHat इत्यादी इतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममधे bash चे लोकेशन वेगळे असू शकते.
02:55 आधी वापरलेला पाथ /bin/bash थेट binary फाईलला निर्देश करतो.
03:01 येथे वापरलेला env bash च्या ख-या लोकेशनचा गोषवारा देतो.
03:07 shebang लाईनमधील ह्या सुधारणेमुळे स्क्रिप्ट कुठल्याही GNU/Linux सिस्टीमवर चालू शकेल.
03:16 df -(hyphen)h मुळे डिस्कवरील जागा वाचण्यायोग्य पध्दतीने दाखवली जाते.
03:22 आऊटपुट sort -rk5 कडे पाठवले जाईल, जे पाचवा कॉलम उलट्या क्रमाने सॉर्ट करेल.
03:31 नंतर आऊटपुट awk 'FNR == 2 {print $5}' कडे पाठवले जाईल.
03:38 जे दुस-या ओळीचे पाचवे फिल्ड मिळवेल.
03:43 शेवटी आऊटपुट cut -(hyphen)d “%” -(hyphen)f1 कडे पाठवून त्यातील % sign काढेल.
03:55 ही case स्टेटमेंटची पहिली ओळ आहे.
03:59 येथे space 0 ते 69 मधील व्हॅल्यूशी जुळवून बघू.
04:04 हे जुळल्यास, “Everything is OK” असे प्रिंट करेल.
04:08 पुढे हे space 70 ते 89 च्या मधील किंवा 91 पासून 98 पर्यंतच्या व्हॅल्यूशी तुलना करेल.
04:17 जुळल्यास “Clean out. There's a partition that is $(dollar)space % full.” असे प्रिंट केले जाईल.
04:27 येथे space 99 सोबत जुळवून बघितली जाईल.
04:30 ती जुळल्यास “Hurry. There's a partition at $(Dollar) space %!”असे प्रिंट केले जाईल.
04:39 ही केसची डिफॉल्ट कंडिशन आहे कारण asterisk सर्व स्ट्रिंग्जशी जुळते.
04:45 येथे caseस्टेटमेंट पूर्ण झाले आहे.
04:48 आता टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू.
04:52 टाईप chmod space plus x space case dot sh
04:57 टाईप dot slash case dot sh
05:02 Everything is OK. लक्षात घ्या तुमच्या डिस्कस्पेसनुसार आऊटपुट बदलेल.
05:10 माझ्या मशीनसाठी हे 0 आणि 69 मधील व्हॅल्यूबरोबर जुळले आहे. हे Everything is OK. प्रिंट करेल.
05:18 तुमच्या मशीनसाठी कोणता मेसेज प्रिंट होतो ते तपासा.
05:20 त्यानुसार कोणते case स्टेटमेंट कार्यान्वित झाले हे तुम्हाला समजून घेता येईल.
05:27 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
05:31 पाठात शिकलो, caseस्टेटमेंटचे महत्त्व. आणि डिस्क स्पेसच्या उदाहरणाच्या सहाय्याने त्याचा सिंटॅक्स समजून घेतला.
05:41 असाईनमेंट म्हणून,
05:42 गणिती क्रिया करण्याचा मेनूसहित प्रोग्रॅम लिहा.
05:47 हा a आणि bअसे युजर इनपुट घेईल.
05:51 (बेरीज +, वजाबाकी -, भागाकार / आणि गुणाकार *) ह्यापैकी गणिती क्रियांबद्दल विचारेल. मूल्यमापन करून आऊटपुट प्रिंट करेल.
06:01 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:06 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:08 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
06:16 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:23 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:31 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:35 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:48 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
06:53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana