Difference between revisions of "Arduino/C2/Arduino-with-LCD/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 156: Line 156:
 
| 05:27  
 
| 05:27  
 
| सर्किट आकृतीनुसार मी '''Arduino''' आणि '''LCD''' चे सेटअप केले आहे.
 
| सर्किट आकृतीनुसार मी '''Arduino''' आणि '''LCD''' चे सेटअप केले आहे.
आपला उद्देश '''LCD''' वर डिसप्ले '''strings''' लिहिणे आहे.
+
आपला उद्देश '''LCD''' डिसप्लेवर दोन '''strings''' लिहिणे आहे.
  
 
|-
 
|-

Revision as of 14:58, 7 December 2018

Time Narration
00:01 Interfacing Arduino with LCD वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Arduino बोर्ड LCDशी कनेक्ट करणे,

LCD वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.

00:18 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि C किंवा C++ च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:30 येथे मी Arduino UNO Board, उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि Arduino IDE वापरत आहे.
00:40 आपल्याला काही बाह्य डिव्हाइसेसची देखील आवश्यकता आहे जसे :

LCD 16 by 2, Potentiometer,, Breadboard, Pin header, Jumper Wires,

00:55 Soldering Iron, Soldering Stand, Soldering Lead आणि Soldering Paste.
01:04 आता circuit कनेक्शनचे तपशील पाहू.
01:09 येथे, आपण पाहतो की इथे LCD मध्ये 16 पिन्स आहेत.
01:14 Pin 1 ही ground पिन आहे जी GND द्वारे दर्शविली जाते.

Pin 2 ही 5 व्हॉल्ट्सची पिन आहे जी VCC द्वारे दर्शविली जाते.

01:29 VO ही LCD contrast pin आहे. येथे आपल्याला potentiometer जोडणे (कनेक्ट करणे) आवश्यक आहे.

यामुळे व्हेरिएबल व्होल्टेज, LCD च्या कॉन्ट्रास्टवर नियंत्रण ठेवू शकेल.

01:42 Register Select साठी RS आहे. हे कमांड रजिस्टर किंवा डेटा रजिस्टर म्हणून वापरले जाऊ शकते.
01:52 Command register हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, data register हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते.
02:02 RW ही एक Read Write पिन आहे.

आपण एकतर LCD वरून डेटा वाचू शकतो किंवा LCD वर लिहू शकतो.

02:12 E हे Enable पिन चे प्रतिनिधित्व करते. ही माहिती स्वीकारण्यासाठी LCD सक्षम करते.
02:20 हे data पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड LCD वर पाठविला जातो.
02:29 ह्या LCD Backlight पिन्स आहेत. ह्यांचा वापर LCD ला पॉवर देण्यासाठी, display contrast नियंत्रित करण्यासाठी, LCD backlight on किंवा off इत्यादी करण्यासाठी केला जातो.
02:43 Pin 15 हे backlight LCD चे Anode आहे.

Pin 16 हे backlight LCD चे Cathode आहे.

02:53 आतापर्यंत आपण LCD चे पिन तपशील पाहिले आहे.
02:58 आपण सोल्डरिंग कसे करू शकतो हे पाहण्यासाठी soldering स्टेशन्सवर जाऊ.
03:04 येथे आपल्याकडे 16 by 2 LCD आहे.

याचा अर्थ, ते प्रत्येक ओळीवर 16 वर्ण दर्शवू शकते आणि अशा 2 रेषा आहेत.

03:16 Extension pin जे LCD वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण breadboard ला सहज कनेक्ट करू शकू.

Soldering iron ज्यात आधीच पावर आहे, Solder paste आणि Solder wire

03:33 दर्शविल्याप्रमाणे प्रथम बाह्य पिन LCD वर ठेवा.
03:38 नंतर, व्हिडिओमध्ये दर्शविल्याप्रमाणे solder paste बाह्य पिनांच्या टोकावर ठेवा.
03:46 मग पुन्हा ते कनेक्ट करा.
03:49 दर्शविल्याप्रमाणे सपाट पृष्ठभागावर बाह्य पिनासह LCD घट्ट बसवा. त्यामुळे आपण सोल्डरिंग करताना ते हलणार नाही.
04:02 सोल्डर रॉडला थोडीशी पेस्ट लावून घ्या आणि दर्शविल्याप्रमाणे वायरीच्या टोकाला स्पर्श करा.
04:09 काही सेकंदांपर्यंत तो धरून ठेवा जेणेकरून तार वितळते आणि बाह्य पिनाला जोडली जाते, जसे दर्शविले गेले आहे.
04:19 मी दोन पिनांसाठी सोल्डरिंग केले आहे. दोन पिनांसाठी केलेला सोल्डरिंगचा क्लोज अप पाहा.
04:27 त्याचप्रमाणे उर्वरित पिनांचे सोल्डरिंग करा.
04:32 ह्या प्रयोगासाठी आता circuit diagram वर जाऊ.
04:37 जसे दर्शविले गेले, LCD चे contrast नियंत्रित करण्यासाठी Potentiometer जोडलेले आहे.
04:44 Potentiometer हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरलेला एक लहान आकाराचा इलेक्ट्रॉनिक घटक आहे.
04:51 पिन क्रमांक 11 हा Enable शी जोडलेला आहे आणि पिन नंबर 12 शी register select जोडला आहे.
05:00 Read write pin हे ground ला जोडलेले आहे, याचा अर्थ आपण LCD वर लिहित आहोत.
05:07 आपण आपल्या प्रयोगासाठी केवळ 4 डेटा लाईन वापरत आहोत.

Pin 15 आणि Pin 16 एलसीडीच्या बॅकलाईटसाठी जोडलेले आहेत. येथे दर्शविल्याप्रमाणे Pin 15 VCC ला आणि pin16 ground ला कनेक्ट करा.

05:27 सर्किट आकृतीनुसार मी Arduino आणि LCD चे सेटअप केले आहे.

आपला उद्देश LCD डिसप्लेवर दोन strings लिहिणे आहे.

05:38 आता आपण Arduino IDE मध्ये प्रोग्राम लिहिणार आहोत.

Arduino IDE वर जाऊया.

05:46 प्रथम आपण Liquid crystal library साठी संदर्भ पुस्तिका पाहणार आहोत.
05:52 मेनू बारमध्ये, Help आणि नंतर Reference वर क्लिक करा.

हे ऑफलाईन पेज उघडेल.

06:00 Reference सेक्शन अंतर्गत, Libraries वर क्लिक करा.
06:04 मग उपलब्ध Standard Libraries पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
06:10 LiquidCrystal वर क्लिक करा. उपलब्ध functions बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वर्णन(डिस्क्रिप्शन) वाचा.
06:18 त्यात म्हटले आहे की, हे 4 bit किंवा 8 bit डेटा लाईन्ससह कार्य करते.
06:24 पुढे आपण LiquidCrystal function आणि त्याचे पॅरामीटर्स पाहू.
06:30 त्याच्या फंक्शन्ससाठी मॅन्युअलचा संदर्भ घेणे हा नेहमीच एक चांगला सराव आहे.

LiquidCrystal function वर क्लिक करा.

06:39 8 बिटसाठी किंवा 4 बिटसाठी ते कसे वापरले जाते हे सिंटॅक्स दर्शविते.
06:46 आपल्या प्रयोगासाठी, आपण फस्ट लाईन सिंटॅक्स वापरू .
06:51 Arduino IDE वर जाऊ.
06:54 प्रथम, येथे आपण Liquid crystal library समाविष्ट करणार आहोत.
06:59 मेन्यू बारमध्ये, Sketch वर आणि Include Library वर क्लिक करा.

नंतर LiquidCrystal निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे LiquidCrystal.h फाईल समाविष्ट करेल.

07:14 आता दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. मी पॅरामीटर्स समजावून सांगते.
07:21 lcd हा लिक्विड क्रिस्टलचा एक प्रकार आहे.
07:26 पहिला पॅरामीटर आहे Register Select. Register Select हा Arduino board च्या पिन 12 शी जोडलेला आहे.
07:35 दुसरा पॅरामीटर आहे Enable. हा पिन 11 शी जोडलेला आहे.
07:41 पुढील 4 पॅरामीटर्स LCD च्या डेटा लाईन्स आहेत.
07:46 LCD' चे d4, d5, d6 आणि d7 Arduino board पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत.
07:58 आपण pins सह लायब्ररीची सुरूवात करीत आहोत. कोडची ही ओळ void setup function च्या बाहेर असू शकते.
08:07 void setup function मध्ये, प्रयोगासाठी आवश्यक असलेला प्रारंभिक सेटअप आपण लिहू. तिथे एक फंक्शन आहे ज्याला begin म्हणतात.
08:18 ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू.

संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ.

08:27 मॅन्युअल सांगते-

1. इंटरफेसला LCD स्क्रीनवर आरंभ करते. 2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि 3. इतर कोणत्याही LCD library commands आधी कॉल करणे आवश्यक आहे.

08:45 आता आपण पॅरामीटर्स पाहू.

lcd : type liquid crystal चे व्हेरिएबल, cols: प्रदर्शित कॉलम्सची संख्या.

08:58 आपल्या LCD मध्ये आपल्याकडे 16 कॉलम्स आहेत.

rows: प्रदर्शित असलेल्या ओळींची संख्या. आपल्याकडे 2 रोज आहेत.

09:09 Arduino IDE वर पुन्हा जाऊ.
09:13 आता टाईप करा: lcd.begin कंस उघडा 16 कॉमा 2 कंस बंद करा semicolon.
09:23 Set Cursor कमांड कर्सरला LCD' मधील निर्दिष्ट रो आणि कॉलममध्ये स्थान देईल.
09:30 Zero comma zero म्हणजे झीरोथ रोज आणि झीरोथ कॉलम.
09:36 तिथे print नावाचा दुसरा कमांड आहे जो LCD' वर टेक्स्ट प्रिंट करेल.
09:44 टाईप करा: lcd.print आणि काही टेक्स्ट एंटर करा, जसे First Row
09:52 मी प्रोग्राम समजावून सांगते.
09:55 हा प्रोग्राम 16 by 2 कॉन्फिगरेशन LCDवर प्रिंट करेल.

कर्सर प्रथम स्थानावर सेट करा. lcd.print हा LCD मध्ये First Row टेक्स्ट प्रिंट करेल.

10:12 प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा.
10:19 आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट “First row” पाहू शकतो.
10:25 दुसऱ्या ओळीवर काहीही दिसत नाही.
10:29 दुसऱ्या ओळीवर देखील प्रिंट करण्यासाठी प्रोग्राम बदलू.
10:34 कोड कॉपी आणि पेस्ट करा. “lcd.begin” ओळ पुसून टाका, जरी प्रोग्रामच्या सुरूवातीस त्याने आरंभ केला आहे.
10:46 दर्शविल्याप्रमाणे setcursor कमांड 0th कॉलममध्ये आणि 1 रो बदला.
10:54 print command टेक्स्ट “second row” मध्ये बदला.
10:59 आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करूया.
11:06 टेक्स्ट दुसऱ्या ओळीमध्ये देखील प्रदर्शित होतो.
11:10 आपण void loopमध्ये कोणताही कोड वापरला नाही.

परंतु तरीही आपल्याला loop template ठेवणे आवश्यक आहे. कारण Arduino सिंटॅक्सकडून loop function आवश्यक आहे.

11:24 एकदा टेक्स्ट पाठविला की, तो तिथे कायमचा असतो.
11:29 दुसऱ्या ओळीत कर्सरची स्थिती 3ऱ्या कॉलममध्ये बदलू.
11:34 पुन्हा, कंपाइल करा आणि प्रोग्राम अपलोड करा.
11:38 दुसऱ्या रोमधील कॉलम स्थितीतील बदल लक्षात ठेवा.
11:43 मॅन्युअलमध्ये आपल्या function सूचीकडे परत जा.
11:47 तिथे scrollDisplayLeft, scrollDisplayRight इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा.
12:01 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
12:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:  LCD Arduino board ला कनेक्ट करणे आणि

LCD वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.

12:18 पुढील असाईनमेंट करा.

दुसऱ्या रो मध्ये “Hello World” टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी तोच प्रोग्राम बदला. कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा. प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा. LCD मध्ये प्रदर्शित मजकूर पाहा.

12:40 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया तो डाऊनलोड करून पाहा.
12:48 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
12:58 कृपया ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:13 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana