User talk:Manali

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Arrays-and-functions

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, here document, here strings


Visual Cue Narration
00.01 नमस्कार. HERE document and strings वरील पाठात आपले स्वागत.


00.08 या पाठात शिकणार आहोत,
00.11 * विशिष्ट उद्दिष्ट असलेल्या रीडायरेक्शनला Here डॉक्युमेंटस आणि Here स्ट्रिंग्ज म्हणतात.
00.17 * हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.


00.20 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00.26 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.(http://www.spoken-tutorial.org)
00.32 ह्या पाठासाठी आपण वापरू,


00.34 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00.39 * GNU BASH वर्जन 4.2
00.42 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00.49 Here डॉक्युमेंट बद्दल जाणून घेऊ.
00.52 * हा विशिष्ट उद्देश असलेला टेक्स्ट किंवा कोडचा ब्लॉक आहे.
00.56 * हा एक I/O redirect चा फॉर्म आहे.
01.00 * हा इंटरऍक्टिव्ह प्रोग्रॅम किंवा कमांड लाईनला कमांडसची यादी देतो.
01.06 * ही स्वतंत्र फाईल म्हणून हाताळली जाऊ शकते.
01.10 * हे shell स्क्रिप्टकडे रीडायरेक्ट केलेले अनेक ओळींचे इनपुट म्हणूनही हाताळले जाऊ शकते.
01.17 त्याचा सिंटॅक्स,
01.18 command space less than less than space HERE.
01.24 नंतर पुढील ओळीवर, टेक्स्ट इनपुटस देऊ शकतो.
01.29 टेक्स्ट इनपुटस कितीही ओळींचे असू शकते.
01.33 येथे text1, text2, textN टेक्स्ट इनपुटस आहेत.
01.40 टेक्स्ट इनपुटस नंतर पुढील ओळीवर पुन्हा HERE हा कीवर्ड टाईप केला.
01.46 हे HERE डॉक्युमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते.
01.50 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.


01.53 मी here dot sh फाईल उघडत आहे.
01.59 कोडमधील पहिली ओळ shebang line आहे.
02.04 ह्या ओळीनंतर कोडचा ब्लॉक लिहू.
02.09 wc शब्द संख्या दाखवते.
02.12 wc हायफन w HERE डॉक्युमेंट मधील शब्द संख्या मोजेल.
02.20 दुस-यांदा HERE येईपर्यंत असलेला कोडचा ब्लॉक किंवा टेक्स्ट ही फाईल समजली जाते.
02.28 HERE डॉक्युमेंट मधील घटक हे wc हायफन w कमांडसाठी इनपुट आहे.
02.36 अनेक ओळींचे इनपुट वाचताना HERE हे wc हायफन w या कमांडसाठी डिलिमीटरचे काम करेल.
02.47 हीच कमांड टर्मिनलवर कार्यान्वित करून पाहिल्यास '4' हे आऊटपुट मिळेल.
02.55 कारण 'wc हायफन w' कमांड मधे चार शब्द पास केले होते.
03.03 फाईल सेव्ह करण्यासाठीSave वर क्लिक करा.
03.06 CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03.15 टाईप करा: chmod space plus x space here dot sh
03.22 एंटर दाबा.
03.24 टाईप करा dot slash here dot sh
03.27 एंटर दाबा.
03.30 आपण 4 हे आऊटपुट बघू शकतो.
03.33 म्हणजे Here डॉक्युमेंटमधे शब्दसंख्या 4 आहे.
03.38 प्रोग्रॅमवर जा.
03.41 येथे टेक्स्टच्या सुरूवातीला आणखी दोन शब्द समाविष्ट करा.
03.47 Hello and welcome to Bash learning
03.52 Save वर क्लिक करा.
03.54 पुन्हा प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
03.57 टर्मिनलवर टाईप करा dot slash here dot sh
04.04 एंटर दाबा.
04.06 आता 6 हे आऊटपुट मिळेल कारण टेक्स्टमधे आणखी दोन शब्द समाविष्ट केले होते.
04.13 Here डॉक्युमेंटमधे अर्ग्युमेंटही पास करू शकतो.


04.18 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.


04.22 hereoutput dot sh नावाची फाईल उघडू.
04.28 cat कमांड फाईल्स कंकॅटीनेट करेल आणि स्टँडर्ड आऊटपुट प्रिंट करेल.
04.35 लक्षात घ्या HEREऐवजी thisस्ट्रिंगचा वापर केला आहे.
04.41 नेहमी HERE हे डिलिमीटर वापरणे गरजेचे नसते.
04.47 तुम्ही इतरही डिलिमीटर वापरू शकता.
04.51 ही ओळ 0th (शून्य क्रमांकाचे) अर्ग्युमेंट दाखवेल.
04.55 डिफॉल्ट रूपात 0th (शून्य क्रमांकाचे) अर्ग्युमेंट हे फाईलनेम असते.
05.00 ही ओळ प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले अर्ग्युमेंट दाखवेल.
05.05 आणि ही ओळ प्रोग्रॅममधे पास केलेले दुसरे अर्ग्युमेंट दाखवेल.
05.09 येथे डॉक्युमेंट thisहेच डिलिमीटर वापरून डॉक्युमेंट पूर्ण केले आहे.
05.17 फाईल सेव्ह करा.
05.18 प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
05.21 टर्मिनलवर टाईप करा: chmod space plus x space hereoutput dot sh
05.29 एंटर दाबा.
05.32 टाईप करा dot slash hereoutput dot sh space Sunday space Monday
05.40 असे आऊटपुट मिळेल:
05.43 0'th argument is: dot slash hereoutput dot sh जे फाईलनेम आहे.
05.49 1st argument is: Sunday
05.51 2nd argument is: Monday
05.55 आता Here string बद्दल जाणून घेऊ.
05.59 * टेक्स्ट किंवा व्हेरिएबलच्या इनपुट रीडायरेक्शनसाठी Here string वापरली जाते.
06.06 * इनपुट त्याच ओळीवर सिंगल कोटसमधे नमूद केलेले असते.
06.12 सिंटॅक्स असा आहे. command space three less than symbols space सिंगल कोटसमधे लिहा string
06.22 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
06.25 here dot sh ही फाईल उघडू.
06.30 येथे शेवटी टाईप करा: wc space हायफन w three less than symbols space सिंगल कोटसमधे Welcome to Bash learning
06.44 हे कोटसमधील स्ट्रिंग कमांड wc हायफन w कडे रीडायरेक्ट करेल.
06.52 केलेले बदल सेव्ह करण्यासाठी Save क्लिक करा.
06.55 टर्मिनलवर जा.
06.58 टाईप करा: dot slash here dot sh
07.03 6 आणि 4 असे आऊटपुट बघू शकतो.
07.08 here डॉक्युमेंटमधे 6 आणि here स्ट्रिंगमधे 4 अशी शब्दसंख्या आहे.
07.15 याप्रमाणे तुम्ही स्वतःचे Here स्ट्रिंग लिहू शकता.
07.20 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07.23 थोडक्यात,


07.25 पाठात शिकलो,
07.27 * HERE डॉक्युमेंट
07.29 * HERE स्ट्रिंग
07.31 असाईनमेंट म्हणून, स्ट्रिंग अप्पर केसमधे रूपांतरित करा.
07.36 * Here डॉक्युमेंट
07.37 * Here स्ट्रिंगचा वापर करा
07.39 मदत: tr space a हायफन z space capital A हायफन capital Z.
07.47 ही कमांड लोअर केसमधील अक्षरे अप्पर केसमधे रूपांतरित करेल.
07.54 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07.57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.01 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08.06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


08.12 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.17 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.


08.25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.


08.29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.38 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
08.44 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.


08.50 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
08.54 सहभागासाठी धन्यवाद.