Synfig/C2/E-card-animation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Synfig वापरून “E-card animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण काही png इमेजेस वापरून E-card animation तयार करणे शिकू.
00:11 येथे आपण इमेजेस png फॉरमॅटमध्ये इम्पोर्ट करणे शिकू.
00:16 इमेजेस एनिमेट करणे.
00:18 टेक्स्ट एनिमेशन करणे.
00:20 एनिमेशन प्रिव्ह्यू करणे.
00:22 avi फॉरमॅटमध्ये एनिमेशन रेंडर करणे.
00:25 या ट्युटोरिअलसाठी, मी Ubuntu Linux 14.04 Os
00:32 आणि Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:35 आता Synfig उघडू.
00:38 Dash home वर जा आणि टाईप करा Synfig.
00:42 तुम्ही लोगो वर क्लिक करून Synfig उघडू शकता.
00:47 आता ई-कार्ड एनिमेशन तयार करूया.
00:52 प्रथम आपल्याला आपली Synfig फाईल सेव्ह करण्याची गरज आहे.
00:56 File वर जा आणि Save वर क्लिक करा.
00:59 सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.
01:02 E-card-animation म्हणून फाईलनेम टाईप करा आणि Save बटण वर क्लिक करा.
01:07 प्रथम आपण Toolbox वर जा आणि Rectangle टूलवर क्लिक करा.
01:12 नंतर दाखवल्याप्रमाणे कॅनव्हस वर एक आयत काढा.
01:17 आपण सेटिंग्ज अश्या प्रकारे बदलू कि कॅनव्हसच्या आत इम्पोर्ट केलेले इमेज फिट होईल.
01:23 असे करण्यासाठी, Edit वर जा. Preferences वर क्लिक करून नंतर Misc वर क्लिक करा.
01:30 Scaling new imported image to fix canvas पर्याय वर क्लिक करा.
01:35 आता, Ok वर क्लिक करा. हा पर्याय इमेजेसना अश्याप्रकारे इम्पोर्ट करेल कि ते canvas च्या आत फिट राहतील.
01:44 कृपया लक्षात घ्या: आपल्याला png फॉरमॅट मध्ये इमेजेस इम्पोर्ट करण्याची आवश्यकता आहे.
01:49 याचे कारण असे की jpg / jpeg सारखे अन्य इमेजचे फॉरमॅट्स Synfig कॅन्व्हस वर वेगळ्या पद्धतीने कार्य करते.
01:58 रेंडर झाल्यानंतर देखील, जेव्हा png इमेजेस वापरल्या जातात तेव्हा आउटपुट गुणवत्ता उत्तम असते.
02:05 Synfig इंटरफेसवर परत येऊ या.
02:09 File वर जा आणि Import वर क्लिक करा.
02:12 मी माझ्या Documents फोल्डरच्या अंतर्गत E-card-animation folder मध्ये आवश्यक इमेजेस सेव्हे केल्या आहेत.
02:20 हे इमेजेस या वेबपेज वरील Code files लिंकमध्ये उपलब्ध आहेत.
02:26 कृपया Code files ची लिंक शोधा आणि तुमच्या मशीनवर इमेजेस सेव्ह करा.
02:31 आता माझ्याबरोबर सराव करा.
02:34 Bg इमेज निवडा आणि Import वर क्लिक करा.
02:37 आपल्याला canvas वर Bg इमेज मिळेल.
02:41 इमेजचा आकार बदलण्यासाठी, प्रथम नारंगी बिंदू किंवा नारंगी डक धरून ठेवा, आणि दाखवल्याप्रमाणे Bg इमेज कॅनव्हसमध्ये फिट करण्यासाठी माउसला आत किंवा बाहेर हलवा.
02:55 आता, फोल्डरमधील Cake इमेज निवडा आणि Import वर क्लिक करा.
03:00 आपल्याला केकची इमेज आपल्या कॅनव्हस वर मिळेल. याचप्रकारे इतर सर्व इमेज इम्पोर्ट(इम्पोर्ट) करा.
03:08 लक्ष द्या, आपल्याकडे तीन नव्या लेयर्स आहेत - Cake,Flowers आणि Balloons.
03:14 आता ह्या इमेजेसचे आकार बदलूया. Layers panel वर जा.
03:19 प्रथम Cake चा लेअर निवडा. निवड केल्यावर, कॅनव्हस वर रीसाइज हाताळणी दिसतील.
03:27 नारंगी बिंदूवर क्लिक करून केक इमेजचे आकारमान बदला.
03:32 समान प्रक्रिया पुन्हा करा आणि अन्य दोन इमेजेसचे आकार देखील बदला.
03:38 आता दाखवल्याप्रमाणे इमेजेस हलवून त्यांना कॅनव्हसच्या बाहेर ठेवा.
03:45 नंतर Animation पॅनल वर जा. Turn on animate editing mode icon वर क्लिक करा.
03:52 टाइम कर्सर 30th फ्रेम वर ठेवा.
03:56 केकचा लेअर निवडा.
03:58 दर्शविल्याप्रमाणे केकची इमेज कॅनव्हसच्या डाव्या तळाशी हलवा.
04:05 पुढे, Balloons लेअर निवडा.
04:08 टाइम कर्सर 30th फ्रेम वर ठेवा.
04:11 Keyframes panel वर जा आणि Add a keyframe वर क्लिक करा.
04:16 आता, टाइम कर्सर 48th फ्रेम वर ठेवा.
04:21 Keyframes panel वर जा आणि Add a keyframe वर क्लिक करा.
04:27 कॅनव्हसच्या मध्य-डाव्या बाजूला Balloons इमेज हलवा.
04:31 पुन्हा, टाइम कर्सर 60th फ्रेम वर ठेवा.
04:36 Keyframes panel वर जा आणि Add a keyframe वर क्लिक करा.
04:41 कॅनव्हसच्या उजव्या तळाशी Flowers इमेज हलवा.
04:47 या एनिमेशन सह पुढे जाण्यासाठी आम्ही टेक्स्टची एक ओळ जोडणार आहोत.
04:52 त्याआधी आपण एनिमेशन बंद करूया.
04:57 असे करण्यासाठी, Turn off animate editing mode आयकन वर क्लिक करा.
05:02 आता टेक्स्ट समाविष्ट करू. डिफॉल्ट Fill colour पांढरा असल्यामुळे, पांढऱ्या पार्श्वभूमीवर टेक्स्ट दिसणार नाही.
05:12 तर मी हा रंग काळ्यामध्ये बदलेल.
05:16 आता, Toolbox वर जा आणि Text Tool वर क्लिक करा.
05:20 नंतर कॅनव्हस वर कुठेही क्लिक करा. आपल्याला Input text डायलॉग बॉक्स मिळतो.
05:27 येथे आपण “Happy Birthday” टाइप करणार आहोत.
05:32 Ok वर क्लिक करा.
05:36 लक्ष द्या कि आता आपण कॅनव्हस वर टेक्स्ट पाहू शकतो.
05:40 आता, 'लेअर्स पॅनल' वर जा आणि 'टेक्स्ट लेअर' निवडा.
05:45 पुढे Parameters panel वर जा आणि Size वर क्लिक करा.
05:51 त्याचे व्हॅल्यू 80 पिक्सेलमध्ये बदला आणि नंतर colour ची व्हॅल्यू जांभळ्या रंगात बदला.
05:57 Toolbox वर जा आणि Text Tool वर क्लिक करा. पुन्हा एकदा कॅन्हवस वर क्लिक करा.
06:04 आपल्याला आणखी एक Input text डायलॉग बॉक्स मिळेल.
06:09 या टेक्स्ट बॉक्स मध्ये. टाईप करा “Have a wonderful, happy, healthy birthday now and forever”.
06:21 आणि नंतर Ok वर क्लिक करा. आता हा टेक्स्ट कॅनव्हस वर देखील पाहू शकतो.
06:27 Parameters panel वर जाऊन Size वर क्लिक करा.
06:32 व्हॅल्यू 30 पिक्सेलमध्ये बदला आणि colour काळ्या रंगात बदला.
06:38 आता लेअर्स पॅनल वर जाऊ.
06:41 पहिल्या टेक्स्ट लेअर वर क्लिक करा आणि त्या लेअरचे नाव Happy Birthday मध्ये बदला.
06:48 त्याचप्रमाणे, दुसऱ्या टेक्स्ट लेअर वर क्लिक करा आणि लेअरचे नाव Now and Forever मध्ये बदला.
06:56 लेअर्सना योग्य नाव देणे ही चांगली सवय आहे.
07:01 यामुळे आम्हाला भविष्यात सहजपणे शोधण्यास मदत होईल.
07:06 आता दाखवल्याप्रमाणे कॅनव्हसच्या बाहेर टेक्स्ट लेअर्स हलवा.
07:13 Turn on animate editing mode आयकन वर क्लिक करा.
07:18 नंतर, लेअर्स पॅनल वर जा. Happy Birthday लेअर निवडा.
07:24 आता, टाइम कर्सर 72nd फ्रेम वर ठेवा.
07:29 Keyframes panel वर जाऊन Add a keyframe वर क्लिक करा. दाखवल्याप्रमाणे टेक्स्ट हलवा.
07:37 नंतर लेअर्स पॅनल वर जा आणि Now and forever लेअर निवडा.
07:44 नंतर टाइम कर्सर 90th फ्रेम वर ठेवा.
07:48 Keyframes panel वर जा आणि पुन्हा एकदा Add a keyframe वर क्लिक करा.
07:55 आता दाखवल्याप्रमाणे कॅनव्हस वर जा आणि Now and forever हलवा.
08:02 आता आपली Synfig फाईल सेव्ह करा.
08:05 File वर परत जाऊन Save वर क्लिक करा.
08:09 आता आपण प्रिव्ह्यू तपासू. File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा.
08:15 quality 0.5 म्हणून सेट करा आणि FPS 24 म्हणून सेट करा.
08:24 Preview बटण वर क्लिक करा. नंतर Play बटण वर क्लिक करा.
08:29 आपल्याला स्क्रीनवर एनिमेशनचे प्रिव्ह्यू दिसेल.
08:33 Preview विंडो बंद करा.
08:35 शेवटी, एनिमेशन रेंडर करू.
08:38 हे करण्यासाठी, File वर क्लिक करून नंतर Render वर क्लिक करा.
08:43 Render setting विंडो वर जा.
08:46 Choose वर क्लिक करा . Save render as विंडो उघडा.
08:50 Document वर क्लिक करा. E-card-animation folder वर क्लिक करा.
08:55 नाव E-card-animation.avi मध्ये बदला.
09:00 Target ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा. एक्सटेंशन ffmpeg म्हणून निवडा.
09:06 Time टॅब वर क्लिक करा आणि End time 110 मध्ये बदला. नंतर Render वर क्लिक करा.
09:20 आता आपले एनिमेशन तपासू. Document वर जा.
09:24 E- card-animation folder वर डबल क्लिक करा.
09:26 E- card-animation.avi निवडा.
09:30 Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन वर राईट क्लिक करून प्ले करा.
09:39 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:44 थोडक्यात. या ट्युटोरिअल मध्ये आपण E-card एनिमेशन तयार करणे शिकलो.
09:50 आपण इमेजेस इम्पोर्ट करणे शिकलो.
09:54 इमेजेस एनिमेट करणे. टेक्स्ट एनिमेशन करणे.
09:57 एनिमेशन प्रिव्ह्यू करणे आणि .avi फॉरमॅटमध्ये एनिमेशन रेंडर करणे.
10:04 तुमच्यासाठी असाइन्मेंट आहे. Flower इमेज शोधा जे Code files लिंकमध्ये उपलब्ध आहे.
10:11 फ्लॉवर(फुल) इमेजेस वापरून, सामान एनिमेशन तयार करा.
10:16 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
10:23 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.

10:31 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
10:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
10:42 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana