Single-Board-Heater-System/C2/Accessing-SBHS-through-Scilab-on-Windows/Marathi
From Script | Spoken-Tutorial
00:01 | 'Accessing SBHS through Scilab on Windows' वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | 'SBHS ' म्हणजे 'Single Board Heater System.' |
00:10 | या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत 'Scilab' आणि 'SBHS' यांच्यात सीरियल संचार सेटअप करणे. |
00:17 | 'Step Test' प्रयोग करणे. |
00:20 | या ट्यूटोरियल साठी मी 'Windows-7 Operating System' आणि 'Scilab' 5.3.3. वापरत आहे. |
00:28 | आपण 'www.scilab.org' वरून सायलॅब डाउनलोड करू शकतो. |
00:34 | सायलॅब इन्स्टॉल करण्यासाठी 'http://spoken-tutorial.org' वरून सायलॅब स्पोकन ट्युटोरियलची शृंखला पहा. |
00:44 | या ट्युटोरियलमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला 'Introduction to Xcos', 'Connecting SBHS to computer' पाहिले पाहिजे. |
00:52 | स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर यासाठी संबंधित ट्यूटोरियल या शृंखलेत उपलब्ध आहे. |
00:59 | सुरवात करण्यासाठी, आम्हाला 'Scilab Step Test code' डाउनलोड करावा लागेल. यामुळे एक वेब ब्राऊजर उघडू. |
01:06 | ऍड्रेस बारमध्ये टाइप करा: 'os-hardware.in'. SBHS प्रोजेक्ट वर क्लिक करा आणि नंतर डाउनलोड लिंकवर क्लिक करा. |
01:19 | 'SBHS Local Code' सेक्शन मधील उपलब्ध फाईल डाऊनलोड करा आणि फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करा. |
01:29 | लक्षात घ्या की डाउनलोड केलेली फाईल 'zip' फॉरमॅट मध्ये असेल. |
01:34 | या फाईलवर राईट-क्लिक करा आणि येथे 'Extract here' निवडा. |
01:38 | 'scilab codes local' नावाचे एक फोल्डर तयार होईल. |
01:43 | आता आपण आपला प्रयोग सुरू करण्यास तयार आहोत. |
01:47 | 'SBHS' आपल्या संगणकाशी जोडलेला आहे आणि त्याची पॉवर ऑन आहे याची खात्री करा. |
01:53 | प्रथम, आपण चेक करूया कि SBHS ला 'communication port' नंबर असाइन केलेला आहे. |
01:58 | हे करण्यासाठी 'My Computer' वर राईट क्लिक करून नंतर 'Properties' वर क्लिक करा'. |
02:05 | एक विंडो उघडेल. या विंडोमध्ये 'Device Manager' वर क्लिक करा. |
02:11 | कृपया नोंद घ्या की 'Windows 7' चे स्वरूप आणि अनुभव इतर 'Windows' व्हर्जनशी पूर्णपणे भिन्न आहे. |
02:19 | तुम्ही त्या स्टेप्सला देखील बदलू शकता जे मी तुमच्या विंडोस व्हर्जनच्या अनुरूप येथे दाखवते. |
02:28 | 'device manager' तुम्हाला तुमच्या कॉम्पुटरवरील हार्डवेअर डिव्हाइसेसची सूची दाखवेल. |
02:33 | 'Ports (COM & LPT)' पर्याय निवडा. |
02:38 | हे येथे आहे, त्यास उघडण्यासाठी या पर्यायावर डबल क्लिक करा. |
02:42 | जर आपण 'RS232' केबल कनेक्ट केला असेल तर 'communications Port COM1' ला पहा अन्यथा, 'USB Serial Port' ला पहा. |
02:52 | RS232 कनेक्शनसाठी, पोर्ट नंबर मुख्यतः 'COM1' राहते. |
02:59 | 'USB' कनेक्शनसाठी ते दुसर्या क्रमांकावर बदलू शकते. |
03:03 | योग्य 'COM' नंबर ची नोंद घ्या, माझ्या बाबतीत तो 'COM14' आहे. |
03:09 | आता, कधीकधी 'USB' केबल कनेक्ट केल्यानंतर आपल्याला एक दोन डिजिटचा 'COM' पोर्ट नंबर मिळतो. |
03:17 | 'serial tool box' जो आपल्या बोर्ड आणि कॉम्पुटरला कनेक्ट करतो केवळ एकच-अंकी पोर्ट नंबर हाताळू शकतो. |
03:24 | म्हणून आपला 'COM port number' बदलणे आवश्यक आहे. |
03:28 | मी 'COM' पोर्ट नंबर बदलण्याची पद्धत दाखवते. |
03:31 | त्या विशिष्ट 'COM' पोर्टवर डबल-क्लीक करा. |
03:34 | 'Port Settings' टॅबवर क्लिक करा आणि नंतर 'Advanced' वर क्लिक करा. |
03:40 | 'COM port number' ड्रॉप-डाउन मेनूमधील, पोर्ट नंबरला कोणत्याही एका डिजिट नंबरमध्ये निवडा. |
03:46 | 'Windows' आपल्याला दाखवतो की सर्व पोर्ट सध्या वापरात आहेत परंतु वास्तविकतेत हे केवळ जुने स्टेटस आहे. |
03:55 | त्यामुळे जर अन्य 'USB' डिव्हाईस जोडलेले नसेल तर, आपण सक्तीने एक विशेष COM पोर्ट नंबर वापरू शकतो. |
04:03 | या सेटिंग्ज लागू करण्यासाठी 'OK' वर क्लिक करा. |
04:07 | 'Properties' विंडो बंद करण्यासाठी 'OK' वर क्लिक करा. |
04:11 | 'Device Manager' आणि उर्वरित विंडो बंद करा. |
04:14 | आता 'SBHS' वापरून 'Step Test' प्रयोग करण्यासाठी सायलॅब कॉन्फिगर कसे करणे हे आपण शिकूया. |
04:23 | डेस्कटॉपवर आपण सेव केलेले 'Scilab local codes' फोल्डर उघडा. |
04:28 | 'Step test' फोल्डर उघडा. |
04:31 | 'ser underscore init dot sce' फाईल शोधून त्यावर डबल क्लिक करा. |
04:37 | हे आपोआप Scilab लॉन्च करेल आणि 'Scilab editor' मध्येही फाइल उघडेल. |
04:43 | फाईल उघडत नसल्यास 'File' मेन्यूवर क्लिक करा नंतर 'Open a file' वर क्लिक करा. |
04:50 | 'ser underscore init' फाइल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा. |
04:57 | 'scilab workspace' वर जा आणि खालील कमांड 'execute' करा. |
05:03 | 'get d space dot dot slash common underscore files' टाइप करा आणि 'Enter' की दाबा. |
05:10 | नंतर टाइप करा: 'exec space dot dot slash common underscore files slash loader dot sce' आणि 'Enter' दाबा. |
05:21 | आपण पाहू शकता की तो एक संदेश देतो की त्याने 'serial port toolbox' लोड केला आहे. |
05:26 | सायलॅब एडिटर वर जा. |
05:28 | 'ser underscore init dot sce' फाईलमध्ये त्या ओळीवर जा ज्यात व्हेरिएबल 'port2' ची व्हॅल्यू विचारली आहे. |
05:36 | 'port2' व्हेरिएबलची व्हॅल्यू ओळखण्यासाठी 'COM port number' सह बदलणे आवश्यक आहे. |
05:44 | 'port' नंबर त्या नम्बरशी बदला जो आपण ओळखलेला आहे जो आपण काही सेकंदांपूर्वी सेट केला आहे. |
05:52 | हे सिंगल कोट्स मध्ये आहे याची खात्री करा. |
05:55 | या फाईलच्या सामग्रीमध्ये कोणतेही इतर बदल करू नका. |
05:59 | आता फाइल save करा. |
06:01 | मेनूबारवर फाईलला कार्यान्वित करण्यासाठी 'Execute' बटणावर क्लिक करा. |
06:06 | 'Scilab workspace' वर आपल्याला 'COM Port Opened' मॅसेज मिळेल. |
06:12 | तथापि, असेही होऊ शकते कि आपल्याला एक एरर मॅसेज मिळेल. |
06:16 | मी स्लाइड्स वापरुन समजावून सांगते कि एक सामान्य एरर कसे हाताळाल. |
06:21 | मी स्लाईडस वर जाते. |
06:23 | 'TCL/TK' संबंधित एरर दर्शविली जाते, 'SBHS' शी जुडलेल्या 'USB' केबलला पुन्हा जोडा आणि ही फाइल पुन्हा कार्यान्वित करा. |
06:33 | 'COM' 'पोर्ट नंबर बदलला आहे का ते एकदा तपासा. |
06:37 | जर हे आताही कार्य करत नसल्यास, 'Scilab' ला पुन्हा सुरु करा आणि प्रक्रिया पुन्हा करा. |
06:42 | 'Scilab workspace' मध्ये, खालील कमांड्स कार्यान्वित करा. |
06:46 | टाइप करा: 'exec space step underscore test dot sci' आणि 'Enter' दाबा. |
06:54 | नंतर टाइप करा: 'xcos space step underscore test dot xcos' आणि 'Enter' दाबा. |
07:03 | हे 'step test' प्रयोगासाठी बनवलेल्या 'xcos interface' ला लॉन्च करेल.https://translate.google.co.in/?hl=mr#en/mr/one%20mitre%20per%20second |
07:09 | तुम्ही 'blocks' वर डबल-क्लिक करून 'block parameters' बदलू शकता. |
07:13 | तुम्हाला पहिल्यांदाच पॅरामीटर्स न बदलण्याची सल्ला दिली जाते |
07:18 | 'Xcos' विंडोच्या मेनूबारमध्ये, 'Simulation' पर्यायावर क्लिक करा, आता 'Start' पर्याय निवडा. |
07:27 | 'Xcos' फाईल यशस्वीरित्या कार्यान्वित केल्यावर, तीन ग्राफसह एक 'plot window' दिसेल. |
07:35 | पहिला ग्राफ 'Heater in percentage' आहे. |
07:40 | दुसरा ग्राफ 'Fan in percentage' आहे आणि |
07:44 | तिसरा ग्राफ 'Temperature in degree Celsius' आहे. |
07:49 | नोंद करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. मी स्लाईडस वर जाते. |
07:54 | इमेजमध्ये दर्शविल्याप्रमाणे 'SBHS' डिस्प्लेवर 'Fan, Heater' आणि 'Temperature' दिसते. |
08:01 | कृपया लक्षात घ्या की ग्राफमध्ये दर्शविलेली व्हॅल्यू 'SBHS' डिस्प्लेवर दाखवल्याप्रमाणेच असावीत. |
08:08 | जर असे नसेल तर याचा अर्थ 'Scilab' चा 'SBHS' सह संप्रेषण (संपर्क) होत नाही. |
08:14 | तुम्ही हे देखील तपासू शकता जर संप्रेषण 'LEDs' वेळोवेळी चमकतात. |
08:19 | तुम्हाला या इमेजमध्ये दर्शविल्याप्रमाणे 'SBHS' वर 'USB' कनेक्टरच्या पुढे हि LEDs मिळेल. |
08:26 | हा प्रत्यक्ष प्रयोग आहे आणि परिणांमांना देण्यासाठी काही वेळ घेईल. |
08:30 | मी काही वेळेसाठी रेकॉर्डिंग थांबवेल. |
08:35 | पुरेश्या वेळेसाठी प्रयोग रन केल्यानंतर, अंतिम ग्राफ्स येथील प्रमाणे दाखवले जातील. |
08:41 | आपण पाहू शकतो की 'heat' व्हाल्यूमध्ये तापमानाने 'step change' वर प्रतिसाद दिला आहे. |
08:47 | बहुतेक प्रक्रिया जी आपण पाहिली ती फक्त एकच फाईल कार्यान्वित करून पूर्ण केली जाऊ शकते. |
08:53 | मी तुम्हाला ही फाईल दाखवते. 'step test' फोल्डरवर जा. |
08:58 | 'scilab' लाँच केल्यानंतर 'xcos' उघडे पर्यंत, स्टेप्स 'start.sce' फाईल वापरून कार्यान्वित केली जाऊ शकते. |
09:07 | मी स्लाईड्सवर परत जाते. |
09:10 | आपल्याला 'start dot sce' फाइल वापरण्याची सल्ला, प्रक्रिया समजून घेतल्यानंतरच दिली जाते. |
09:17 | ही फाइल गृहीत धरते की 'ser underscore init dot sce' फाईलमध्ये दिला गेलेला 'port' नंबर योग्य आहे. |
09:26 | आता, प्रयोग बंद करण्यासाठी, 'Xcos' विंडोच्या मेनू बारमध्ये उपलब्ध 'Stop' पर्यायवर क्लिक करा. |
09:35 | प्रयोग पूर्ण केल्यानंतर, 'SBHS' ला रीसेट करूया. |
09:40 | हे पुन्हा स्पष्ट करण्यासाठी मी स्लाइड्सवर जाते. |
09:44 | चित्रात दर्शविल्याप्रमाणे 'SBHS' वर 'Reset' पुश बटण दिलेले आहे. |
09:49 | रीसेट करण्यासाठी, 1 किंवा 2 सेकंदांसाठी 'Reset' बटण दाबा आणि नंतर ते सोडा. |
09:55 | 'reset' ऑपरेशन 'Heat' 0% आणि 'Fan' 100% करते. |
10:00 | तथापि 'LCD' वर दोन्हीसाठी '0' दिसत आहे. |
10:05 | या प्रयोगासाठी डेटा फाइल 'Step test' फोल्डरमध्ये सेव केला जातो. |
10:10 | मी तुम्हाला ही फाईल दाखवते. |
10:13 | डेटा फाईलचे नाव 'time stamp' फॉरमॅट मध्ये आहे. |
10:17 | डेटा फाइलचे नाव 'Year Month Date Hours Minutes Seconds dot txt' ह्या प्रकारे वाचा. |
10:27 | मी डेटा फाईलची विषय वस्तू उघडून दाखवते. |
10:31 | यात प्रत्येक सॅम्पलसाठी 'heat, fan' आणि 'temperature' व्हल्यूज आहेत. |
10:36 | म्हणूनच, ही फाईल विश्लेषण हेतूसाठी वापरली जाऊ शकते. |
10:40 | थोडक्यात. |
10:42 | या ट्यूटोरियल मध्ये, आम्ही 'Scilab' आणि 'SBHS' यांच्यातील 'serial communication' सेट करायला शिकलो. |
10:48 | 'Step Test' प्रयोग करायला शिकलो. |
10:52 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ 'Spoken Tutorial' प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा. |
10:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम वर्कशॉप आयोजित करते आणि ऑनलाइन परीक्षा पास करणार्यांना प्रमाणपत्र देते. |
11:04 | अधिक माहितीसाठी, आम्हाला संपर्क करा. |
11:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:13 | या मिशन विषयी अधिक माहिती [1] या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
11:17 | हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |